✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 जून 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2016/05/travels-with-safe_21.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १७० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८१:जनावरांमधे आढळणार्या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.**१९६२:'महाराष्ट्र टाइम्स' या वृत्तपत्राचे पहिले अंक प्रसिद्ध* *१९५६:रँग्लर र.पु.परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.**१९४६:डॉ.राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले. या घटनेच्या स्मरणार्थ पणजींतील एका रस्त्याला ’१८ जून रस्ता’ असे नाव देण्यात आले आहे.**१९०८:फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.**१९३०:चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.**१८३०:फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.**१८१५:वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९:उल्हास सुभाष निकम--लेखक**१९८७:मोहिन हसन अली -- इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू**१९७७:टीना तांबे-- भारतीय शास्त्रीय कथ्थक नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक**१९७५:प्रा.डॉ.किरण प्रभाकर वाघमारे -- लेखक**१९७२:महेश लिमये-- भारतीय सिनेमॅटोग्राफर-दिग्दर्शक**१९७०:अरविंद स्वामी-- भारतीय अभिनेता,निर्देशक**१९६५:उदय हुसेन – सद्दाम हुसेन यांचा मुलगा (मृत्यू:२२ जुलै २००३)**१९६०:प्रा.डॉ.भास्कर भुजंगराव बडे-- कवी, कथाकार,बालकादंबरीकार**१९५७:मंगल ढिल्लो -- भारतीय अभिनेता,लेखक(मृत्यू:११ जून २०२३)**१९५४:नंदकुमार बाबूराव येवले-- लेखक**१९५०:डॉ.श्रीकांत मधुसूदन गोडबोले-- लेखक* *१९४५:प्रा.कमलाकर देविदास हनवंते-- प्रसिद्ध लेखक* *१९४२:पॉल मॅकार्टनी – संगीतकार, संगीतसंयोजक,वादक,गीतलेखक**१९५०:उध्दव किसनराव भयवाळ-- प्रसिद्ध कवी,लेखक**१९३७: मुरलीधर गोडे-- शब्दांचा जादूगार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कवी,गीतकार (मृत्यू:१९ मार्च २०२०)**१९३६:प्रा.गोपाळ दत्त कुलकर्णी-- प्रसिद्ध लेखक (मृत्यू:२२ आक्टोबर २०१९)**१९३१:के.एस.सुदर्शन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक(मृत्यू:१५ सप्टेंबर २०१२)**१९३०:श्रीकृष्ण बापूराव जोशी-- मराठी भाषेतील एक बहुश्रुत लेखक* *१९२५:प्रा.विमल राजाराम कुलकर्णी-- लेखिका* *१९११:कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ (मृत्यू:८ सप्टेंबर १९९७)**१८९९:शंकर त्रिंबक तथा ’दादा’ धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक (मृत्यू:१ डिसेंबर १९८५)**१८९८:विनायक आत्माराम पाठारे-- नाटककार निबंधकार (मृत्यू:२२ एप्रिल १९६२)**१८९४:गंगाधर रामचंद्र साने-- कादंबरीकार, बोधप्रद पुस्तकाचे लेखक (मृत्यू:२६ एप्रिल १९६५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:मिल्खा सिंग-- भारतीय धावपटू(जन्म: २० नोव्हेंबर १९२९)**२००९:उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक,पद्मविभूषण (१९६९), (जन्म:१४ एप्रिल १९२२)**२००३:जानकीदास – हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते (जन्म:१९१०)**२००३:नसीम बानो-- भारतीय अभिनेत्री (जन्म:४ जुलै १९१६)**१९९९:श्रीपाद रामकृष्ण काळे – ५२ कादंबर्या आणि ११०० हुन अधिक कथा लिहिणारे साहित्यिक,कथा आणि कादंबरीकार (जन्म:८ जुलै १९२८)**१९७४:सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती,साहित्यिक (जन्म:१६ आक्टोबर १८९६)**१९६२:जे.आर.तथा नानासाहेब घारपुरे – पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य,नामवंत विद्वान* *१९५८:डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म:२३ आक्टोबर १९००)**१९३६:मॅक्झिम गॉर्की – रशियन लेखक (जन्म:२८ मार्च १८६८)**१९०२:सॅम्युअल बटलर – इंग्लिश लेखक (जन्म:४ डिसेंबर १८३५)**१९०१:रामचंद्र भिकाजी गुंजीकर – ’मोचनगड’ या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि ’विविध ज्ञानविस्तार’ मासिकाचे संपादक (जन्म:१० एप्रिल १८४३)**१८५८:मणिकर्णिका तांबे ऊर्फ ’राणी लक्ष्मीबाई’ – झाशीची राणी - इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या (जन्म:१९ नोव्हेंबर १८२८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवघेणा प्रवास* लेख ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, रायबरेलीतून खासदार राहणार; प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी इथं कंचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीची भीषण धडक झाली. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झालाय तर 60 जण जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *1.25 लाख शेतकरी पीक कर्जापासून अद्यापही वंचित:पीक कर्ज वाटप करण्याकडे खासगी बँकांचा कानाडोळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जिल्ह्याच्या विकासासाठी गरज पडली तर खा. बळवंत वानखडेंना साथ देऊ:आ. रवी राणा यांची लोकसभा निवडणूक निकालानंतर प्रथमच प्रतिक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरावती शहरातील 41 रस्ते दुभाजकांचे सौंदर्य वाढणार: मनपाने मागवले प्रस्ताव, जाहिरात लावल्यास अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मृग नक्षत्राचा कापूस लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांनी साधला मुहूर्त:दमदार पावसाची प्रतीक्षा, खरीप पिकाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *T20 विश्वकप - उद्यापासून सुपर 8 च्या लढतीस प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१०० लोकांचा एक समूह आयुष्यावर वक्तव्य करणाऱ्या एका प्रख्यात वक्त्याचा सेमिनार अटेन्ड करीत होते...त्या वक्त्याने प्रत्येकाकडे एकेक फुगा (balloon) दिला . प्रत्येकाने फुगा फुगवायचा आणि त्यावर आपले नाव टाकून हॉल मध्ये सोडायचा होता. सर्व लोक कामाला लागले.प्रत्येक जण आपण फुगवलेल्या फुग्यावर स्वतः चे नाव टाकीतहोता. बघता बघता हॉल १०० फुग्यांनी भरून गेला...नंतर त्या वक्त्याने सर्वांना ५मिनिटांचा अवधी दिला आणि इतक्या साऱ्या फुग्यांतूनस्वतः चे नाव असलेला फुगा शोधायला लावला.!!इतक्या भरगच्च फुग्यांतूनस्वतः फुगवलेला फुगा शोधताना सर्वांची तारांबळ उडाली. ५मिनिटेसंपली तरीही कुणीही स्वतः च्या नावाचा फुगा शोधूशकला नाही!!... नंतर त्या वक्त्याने प्रत्येकाला कुणाचेही नाव असलेला एकफुगा उचलायला सांगितले. प्रत्येकाने एकेक फुगा उचलला.वक्त्याने प्रत्येकाला सांगितले की आपल्याकडेज्याच्या नावाचा फुगा आहे त्या माणसाला तो फुगा देऊन टाका.अश्या प्रकारे प्रत्येकजण आपल्या हातातील फुग्यावर ज्याचेनाव आहे त्याला तो देऊ लागला आणि २ मिनिटांतप्रत्येकाकडे स्वतःच्या नावाचा फुगा आला.!!यावर तो वक्ता बोलू लागला…"आपल्या आयुष्याचेही असेच झाले आहे.! प्रत्येक जण आनंद,सुख, समाधान या गोष्टी शोधण्यासाठी जंग जंगपछाडतो आहे... परंतु खरा आनंद, खरे सुख कशात आहेयाची कुणालाही कल्पना नाही...स्वतः चा खरा आनंद आणि खरे समाधान इतरांच्या आनंदातदडलेला असतात. इतरांना त्यांचा आनंदद्या आणि त्याबदल्यात तुम्हालाही नक्कीच आनंदआणि समाधान मिळेल. मानवी आयुष्याच्या यशाचे खरेगमक यातच आहे...." हे ऐकून संपूर्ण हॉल नि:शब्दझाला....नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे,कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,तर आयुष्यभर एकटे राहाल..!माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय..जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो.. पण मृत्यूचयेण मात्र अकस्मात असत.. कारण त्याला माहितीय, माणूससुखाची वाट पाहू शकतो, दु:ख येणार हे मात्र पचवू शकतनाही..स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!विश्वास उडाला की आशा संपते!काळजी घेण सोडल की प्रेम संपत!म्हणुन, स्वप्न पाहा,विश्वास ठेवा,आणि काळजी घ्या!आयुष्य खुप सुन्दर आहे.🌠*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विजयी तोच होतो, जो विजयी होण्यासाठी साहस करतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी* तिसऱ्यांदा कोणाची नियुक्ती करण्यात आली ?२) जी - ७ समूहात असलेले देश कोणते ?३) कोणाची आठवण म्हणून नोबेल पुरस्कार दिले जाते ?४) 'गंध' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*उत्तरे :-* १) अजित डोवाल २) अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली, जर्मनी, कॅनडा व जपान ३) आल्फ्रेड नोबेल ४) वास, परिमळ ५) डॉ. पी. के. मिश्रा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 धनंजय गुडसुरकर, शिक्षक व साहित्यिक, उदगीर👤 अनंत उत्तरवार, शिक्षक, माहूर👤 मेहताब शेख👤 गजानन सुरकार 👤 गंगाधर हरने, शिक्षक, वसमत👤 व्यंकटराव वारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसाने जरी माणसाकडे बघून डोळे झाकून पाठ फिरवली असेल तरी निसर्ग मात्र कधीच डोळे झाकत नाही. तो सर्वाकडेच बघत असतो व त्याचे डोळे कोणीही झाकू शकत नाही.म्हणून त्याच्या नियमाचे सदैव पालन करावे. जो, कोणी त्याच्या नियमाचे पालन करुन जगतो त्याकडे निसर्गाची कायम लक्ष असते. फरक एवढेच की, तो कोणालाही कळू देत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खऱ्या खोट्याची पारख*एका सोनाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. एके दिवशी सोनाराच्या पत्नीने, आपल्या मुलाला नीलमणीचा एक हार दिला आणि म्हणाली- "बेटा, हा हार घेऊन तुझ्या काकांच्या दुकानात जा आणि त्यांना सांग की हा हार विका व आम्हाला काही पैसे द्या."मुलगा तो हार घेऊन काकांच्या दुकानात गेला. काकांनी त्या हाराकडे बारकाईने पाहिले आणि म्हणाले - "बेटा, आईला सांग की सध्या बाजारात खूप मंदी आहे. थोडे दिवस थांबून नंतर तो विकल्यास, तुम्हाला चांगला भाव मिळेल." त्याला थोडे पैसे देत त्याचे काका म्हणाले, “तू उद्यापासून माझ्याबरोबर दुकानात बसत जा.”दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा रोज दुकानात जाऊ लागला आणि तिथे बसून हिर्यान्ची आणि रत्नांची पारख कशी करायची, ते शिकू लागला.थोड्याच दिवसात, तो हिऱ्यांचा मोठा पारखी झाला. आपल्या हिऱ्यांची पारख करवून घेण्यासाठी, दूर -दूरवरून लोकं त्याच्याकडे येऊ लागले.एके दिवशी त्याचे काका त्याला म्हणाले, "बेटा, तुझ्या आईकडून तो हार घेऊन ये आणि तिला सांग की आता बाजारात खूप तेजी आहे, त्याला चांगला भाव मिळेल."आईकडून तो हार घेऊन, त्याने स्वत:च त्याची पारख केली असता तो हार नकली असल्याचे त्याला आढळून आले. त्याला आश्चर्य वाटले, की काका स्वत: हिऱ्याचे व रत्नांचे मोठे पारखी आहेत... मग त्यांनी आम्हाला हे का सांगितले नाही?मुलगा तो हार घरीच ठेवून तसाच दुकानात परत आला.काकांनी विचारले, "अरे तू हार का आणला नाहीस?" तो म्हणाला, "काका, तो हार तर नकली आहे... परंतु तुम्ही माझ्यापासून हे का लपवून ठेवलेत?"तेव्हा काका म्हणाले, "जेव्हा तू पहिल्यांदा हार आणला होतास, तेव्हा जर मी तो हार नकली आहे असं सांगितलं असतं, तर तुला असं वाटलं असतं की आज आमच्यावर वाईट वेळ आली आहे, म्हणून काका मला असं सांगत आहेत.पण आज जेव्हा तुला खरं काय आणि खोटं काय, हे पारखण्याचे ज्ञान झाले आहे, तेव्हा तुला समजलेच असेल की तो हार खरोखरीच नकली आहे. त्यावेळी खरं बोलण्यापेक्षा, नातं सांभाळणं, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं."सत्य हे आहे की या जगात, खऱ्या ज्ञानाशिवाय आपण जो काही विचार करतो, पाहतो आणि जाणतो ते चुकीचे आहे. आणि म्हणूनच अशा गैरसमजुतींना बळी पडून आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि आपलं आयुष्य भरकटायला लागतं.इंटरनेटवरून साभार•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment