✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 जून 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/diqzqupCC2pBqZ23/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक शरणार्थी दिन _*••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:’महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’तर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.**१९६०:महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना**१९२१:टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना**१८९९:केंब्रिज विद्यापीठाच्या ’ट्रायपॉस’ या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.**१८८७:देशातील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी.एस. टी.) सुरू झाले.**१८६३:वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले.**१८३७:व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:सुग्रीव नामदेव राठोड -- लेखक**१९८४:नितू चंद्रा--भारतीय निर्माता आणि थिएटर कलाकार,शास्त्रीय नृत्यांगना**१९८२:विनायक येवले- समकालीन कवी व समीक्षक* *१९७८:शिल्पा प्रसन्न जैन-- कवयित्री,लेखिका* *१९७६:प्रा.अर्चना श्रीपाद कुलकर्णी-जोशी -- कवयित्री* *१९७४:संगीता किसनराव देशमुख-- कवयित्री,लेखिका* *१९७४:जयराम सीताराम पवार-- प्रसिद्ध लेखक तथा उपजिल्हाधिकारी* *१९७२:पारस म्हांब्रे – क्रिकेटपटू**१९६९:महेश नागोराव कुडलीकर -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९६८:प्रा.शंकर किसनराव येरडे -- समीक्षक, संपादक* *१९६१:वासुदेव महादेवराव खोपडे-- कवी**१९६०:पांडुरंग बलकवडे-- जेष्ठ इतिहास संशोधक,दुर्ग अभ्यासक,शिव चरित्र व्याख्याते**१९५६:डॉ दिलीप माधवराव धोंडगे-- संत साहित्याचे गाढे अभ्यासक,संपादक,लेखक**१९५५:प्रा.डॉ.शोभा भगवान नाफडे-- लेखिका* *१९५४:कांचन प्रकाश संगीत-- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९५४:अॅलन लॅम्ब – इंग्लिश क्रिकेटपटू**१९५३:भालचंद्र गंभीरराव वाघ-- प्रसिद्ध लेखक,कादंबरीकार तथा पूर्व सनदी अधिकारी**१९५२:श्रीधर लक्ष्मणराव सरपे -- कवी,लेखक* *१९५१:निंबाजीराव बागुल-- कवी,लेखक* *१९५१:दिलीप नरहर महाजन-- लेखक तथा प्रकाशक* *१९३९:रमाकांत देसाई – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष (मृत्यू:२८ एप्रिल १९९८)**१९३६:प्रा.अमृत संभाजीराव देशमुख -- कवी, लेखक* *१९३६:सुरेश सरैया-- क्रिकेट जगतात रेडिओ क्रिकेट समालोचक(मृत्यू:१८ जुलै २०१२)**१९३६:सुषमा सेठ -- भारतीय रंगमंच,चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री* *१९३०:श्रीकृष्ण शंकर(बाळासाहेब) सराफ-- लेखक,संपादक**१९२४:डॉ.प्रभाकर लक्ष्मण गावडे-- जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू:२ आगस्ट २०२१)**१९२०:मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान,कम्युनिस्ट नेते (मृत्यू:२६ एप्रिल १९९९)**१९२०:पंडित वसंतराव चांदोरकर --आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर घराण्याचे गायक(मृत्यू:८ जुलै २००१)**१९१५:टेरेन्स यंग – चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९४)**१८८५:विष्णू महादेव भट-- वैद्यकीय ग्रंथाचे लेखक (मृत्यू:३० एप्रिल १९६१)**१८६९:लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक (मृत्यू:२६ सप्टेंबर १९५६)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२००८:चंद्रकांत गोखले – अभिनेते (जन्म:७ जानेवारी १९२१)**१९९७:वासुदेव वामन तथा ’भाऊसाहेब’ पाटणकर ऊर्फ ’जिंदादिल’ – मराठीतले पहिले शायर (जन्म:२९ डिसेंबर १९०८)**१९९७:बासू भट्टाचार्य – चित्रफट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक (जन्म: १९३४)**१९८७:डॉ.सलीम अली हे भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी(जन्म:१२ नोव्हेंबर १८९६)**१८३७:विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा (जन्म:२१ ऑगस्ट १७६५)**१६६८:हेन्रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक (जन्म:१८ डिसेंबर १६२०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पितृ देवो भव: ....*वडिलांचे महत्व सांगणारा लेख..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शासनाच्या चुकीच्या धाेरणामुळे राज्यभरातील पीएचडीचे हजाराे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित:शासनाचे विराेधात पुण्यात संशाेधक विद्यार्थी करणार आंदाेलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठ परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या संचालक पदासाठी सात स्पर्धक:निवड झालेल्या उमेदवाराचे नाव 21 जून रोजी घोषित होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कृषी उन्नती योजना- ग्रामबिजोत्पादन योजनेतून अनुदान : अहमदनगर मधील 26,900 शेतकऱ्यांना अनुदानावर 8 हजार 70 क्विंटल सोयाबिन बियाणे वाटप*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील राजगीर येथील स्थित नालंदा या विद्यापीठाचे उद्घाटन, १७४९ कोटी रुपये खर्चून उभ्या केलेल्या या वास्तुला भारतातील १६०० वर्षांचा इतिहास लाभला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मी स्वत: निवडणूक लढविणार नाही, विधानसभेसाठी आमचा १२७ जागांवर पहिला सर्व्हे पूर्ण : मनोज जरांगे पाटील*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळ बीआयटी वसाहतीत प्रवेशद्वार उभारावे:आशिष शेलारांसह भाजप अनुसूचित जाती मोर्चाची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कारागृहातून बुद्धिबळ खेळणारे संघ तयार करणार- अमिताभ गुप्ता:येरवडा कारागृहात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ परिषदेचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *जीवनसत्त्व 'अ' कोणत्या अन्नपदार्थातून मिळवावे ?* 📙 **************************शरीराला अत्यंत अल्प प्रमाणात लागणारे सेंद्रिय पदार्थ म्हणजेच जीवनसत्त्वे होत. जीवनसत्वांपासून आपल्याला ऊर्जा मिळत नाही. जीवनसत्त्वे पेशींच्या कार्यासाठी विशेषत: इतर पोषक द्रव्यांच्या वापरासाठी आवश्यक असतात. जीवनसत्व 'अ' हे मेदपदार्थात विरघळणारे असे जीवनसत्त्व आहे. दृष्टीसाठी तसेच त्वचा निरोगी राहण्यासाठी या जीवनसत्वाचा उपयोग होतो. जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे रातांधळेपणा होतो. डोळ्यांतील आवरण कोरडे होते. नेत्रपटल कोरडे होते व कालांतराने त्यावर व्रण येतो. जंतूसंसर्ग झाल्यास पूर्ण डोळा काढून टाकण्याची वेळ येते. असे हे जीवनसत्त्व कसे मिळवायचे ते आता पाहू. प्राण्यांचे यकृत, अंडी, लोणी, चीज, दूध, मासे, मांस अशा प्राणीज पदार्थातून ते मिळवता येते. हॅलीवटच्या यकृताच्या तेलात दर ग्रॅमला २७,०००० आंतरराष्ट्रीय एकके इतके 'अ' जीवनसत्त्व असते, तर काॅड माशाच्या यकृताच्या तेलात दर ग्रॅमला ५४० इतके असते. गाजर, पालक, हिरव्या भाज्या, पिकलेले आंबे, पपया, संत्री, टोमॅटो तसेच शेवगाच्या शेंगा व पाने या वनस्पतीज पदार्थांमध्येही 'अ' जीवनसत्त्व असते. त्यामुळे जीवनसत्व 'अ'चा अभाव टाळण्यासाठी वरील पदार्थांचा आहारात नेहमी समावेश करावा. लहान मुलांना जीवनसत्त्व 'अ' चा अभाव होऊ नये व त्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ नये, यासाठी त्यांना जीवनसत्त्व 'अ' चा मोफत पुरवठा राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत करण्यात येतो. यात ६ महिन्यांपासून ६ वर्षांपर्यंतच्या मुलांना दर सहा महिन्यांनी जीवनसत्व 'अ'चा दोन लाख आंतरराष्ट्रीय एकके इतका डोस दिला जातो. त्यामुळे जीवनसत्त्वाच्या अभावाने होणारे आजार टाळता येतात. बाजारात जीवनसत्त्व 'अ' गोळ्यांच्या स्वरूपात विकतही मिळते. प्रौढांनाही जीवनसत्त्वाचा अभाव असल्यास ते टाळण्यासाठी डॉक्टर या गोळ्या घ्यायला सांगतात.*डॉ. जगन्नाथ दीक्षित**डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आशा ही तेजस्वी प्रकाशाची किरण आहे जी अंधारात दिशा दाखवते. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'सोर्स कोड - माय बिगिनिंग्ज'* हे कोणाचे आत्मचरित्र अलीकडेच प्रकाशित झाले आहे ?२) २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण किती महिला खासदार निवडल्या आहेत ?३) स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?४) 'गृहिणी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कुठे आहे ? *उत्तरे :-* १) बिल गेट्स २) ७४ खासदार ३) महाराष्ट्र ४) घरधनीण ५) पुणे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रमेश मुनेश्वर, शिक्षक व साहित्यिक, किनवट👤 धनंजय उजनकर, कार्याध्यक्ष शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद👤 किरण पाटील बेंद्रे, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 वीरभद्र बसापुरे, शिक्षक नेते,, धर्माबाद👤 गणेश अंगरोड, धर्माबाद👤 भगवान बकवाड, शिक्षक नेते, नांदेड👤 लक्ष्मण तुरेराव, लोकमत धर्माबाद तालुका प्रतिनिधी👤 नरसिंग नाईक, शिक्षक, नांदेड👤 शंकर उषापोड, शिक्षक, धर्माबाद👤 दौलतराव वारले, शिक्षक, धर्माबाद👤 विनोद गुम्मलवार, नांदेड👤 लक्ष्मण चन्नावार, नायगाव👤 गणेश यमेवार, धर्माबाद👤 शंकर पाटील कदम0प, धर्माबाद👤 निमेश गावित👤 टक्कन साईराम, तेलंगणा👤 राजेंद्र पाटील👤 संभाजी आटोळकर👤 शादूल चौधरी, शिक्षक, बिलोली*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जसे लाल गर्द टोमॅटो भाजीत टाकल्याशिवाय भाजीला रंग येत नाही. तसंच कांदा चिरताना सुद्धा डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. त्या दोघात किती ताकद असते त्यांचा उपयोग केल्यावरच त्यांचे महत्व कळत असते. म्हणूनच आपल्या जीवनात सुध्दा येणारे चांगले, वाईट प्रसंग आपली परीक्षाच घेण्यासाठी येत असतात असेही नाही तर ते,खूप काही शिकायला सुद्धा भाग पाडत असतात म्हणून त्यांना कंटाळून न जाता सदैव त्यांचे स्वागत करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शपथ*कोकणातले लोक देवभोळे, श्रद्धावान खऱ्या खोट्याचा निर्णय देवळात लावणारे, देवापुढे शपथ घेऊन कोणी खोटे बोलू शकणार नाही असा विश्वास बाळगणारे त्या विश्वासास जागणारे.कोकणातल्या एका शेतकऱ्याची अवजारे गेली. शेतकऱ्याला वाटत होतं. ती चोरली शेतकामावर येणाऱ्या मजुरांनीच. पण चोरी केल्याचं कोणीच कबूल करीत नव्हतं. शेवटी देवळात देवासमोर शपथेवर तसं प्रत्येकानं सांगावं असं गावकऱ्यांनी ठरविलं. शेजारच्या गावात जागृत देवस्थान होतं. तिथं जाऊन शपथ घेण्याचा निर्णय सगळ्यांना मान्य झाला.प्रमुख गावकऱ्यांसह शेतकरी शेतकामगारांना घेऊन शेजारच्या गावात पोचला. त्यांना दवंडी पिटलेली ऐकू येऊ लागली. जवळ गेल्यावर सगळं स्पष्ट ऐकू आलं.‘ऐकाऽ हो ऐका, आपल्या गावातल्या देवळातील सुप्रसिद्ध घंटा चोरीला गेली आहे. जो कुणी चोर पकडून देईल, चोरी कुणी केली सांगेल त्याला मोठं बक्षीस दिलं जाईल.दवंडी ऐकून शहाणा शेतकरी बरोबरच्या लोकांना म्हणाला, आपण इथूनच परतू. देवासमोरची घंटा चोरीला गेली. तिचा शोध लागत नाही. चोर सापडत नाही. मग माझी अवजारं चोरणाऱ्या चोराचा पत्ता कसा लागणार ?देवावर कितीही श्रद्धा असली तरी आपले प्रश्न सोडविण्यात अंधश्रद्धा उपयोगी पडत नाहीच•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment