✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 जून 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/9ufgVugbPgcVX1ZV/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १७१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्घाटन केले.**१९८९:इ. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८०:ए.आर.अंतुले यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली* *१९७७:ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.**१९६६:’शिव सेना’ या राजकीय पक्षाची स्थापना झाली.**१९६१:कुवेतला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९१२:अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.**१८६२:अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:गणेश बबन नागवडे --कवी,लेखक* *१९७४:किशोरकुमार बन्सोड -- कवी* *१९७०:राहुल गांधी –भारतीय राजकारणी, खासदार**१९६२:आशिष विद्यार्थी-- भारतीय अभिनेता**१९५९:अशोक कुबडे--कवी,लेखक,संपादक* *१९५९:नरहरी सीताराम झिरवळ-- महाराष्ट्रातील राजकारणी,महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष* *१९५७:प्रा.डॉ.रविकिरण वसंतराव पंडित -- लेखक* *१९५७:साधना सिंग-- भारतीय अभिनेत्री* *१९५६:शेख शब्बीर-- नगर जिल्ह्यातील लेखकांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांचे संकलन* *१९५२:विक्रम सेठ-- भारतीय कादंबरीकार आणि कवी**१९४७:सलमान रश्दी – बहुचर्चित लेखक**१९४१:रमेश गजानन पानसे-- शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत**१९४०:शंकर भीमराव ऊफ समुद्रगुप्त पाटील -- मराठवाड्यातील एक ज्येष्ठ इतिहास संशोधक**१९३१:मधुकर रामदास जोशी-- प्रसिद्ध हस्तलिखितशास्त्र तज्ज्ञ, प्राचीन मराठी साहित्य संशोधक,संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक**१८९८:पुरुषोत्तम बाळकृष्ण साठे--कथाकार अनुवादक (मृत्यू:१७ फेब्रुवारी १९७८)**१८७७:डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात – शतायुषी कृषीशास्त्रज्ञ* *१६२३:ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (मृत्यू:१९ ऑगस्ट १६६२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:दिवाकर मोहनी-- मुद्रण आणि लिपी ह्या विषयांचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून प्रसिद्ध(जन्म:१० नोव्हेंबर १९३१)**२०००:माणिक मुदलियार तथा माणिक कदम तथा कामिनी कदम तथा स्मिता – मराठी व हिन्दी रंगभूमीवरील चित्रपट अभिनेत्री (जन्म: ऑगस्ट १९३३)**१९९८:रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार,विनोदी लेखक (जन्म:६ जानेवारी १९२५)**१९९६:कमलाबाई पाध्ये – समाजसेविका (जन्म:८ आक्टोबर १९२०)* *१९९३:विल्यम गोल्डींग – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक (जन्म:१९ सप्टेंबर १९११)**१९५६:थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती,आय.बी.एम.(IBM) चे अध्यक्ष (जन्म:१७ फेब्रुवारी १८७४)**१७४७:नादिर शहा – पर्शियाचा सम्राट (जन्म:२२ आक्टोबर १६९८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सरकारी शाळेकडे पालकांची पाठ*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कांग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा आमदारकीचा राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पोलीस भरती पारदर्शक व्हावी, दोन जिल्ह्यातील भरतीत अंतर ठेवावे, विजय वडेट्टीवार यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *निर्जला एकादशी निमित्ताने पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी, मंदिराचे पुरातन रूप पाहण्यासाठी भक्तांमध्ये उत्सुकता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शनिवारपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस, तरीदेखील धरणात 11 टक्के पाणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागासाठी 12 जुलै रोजी निवडणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; 5 महिला जागीच ठार, 3 गंभीर जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राज्यातील 1065 गो शाळांना अनुदान वितरण करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आयोडीनयुक्त मीठ म्हणजे काय ?* 📙**********************घरातील मिठाची पिशवी पाहा. त्यावर मोठया अक्षरात 'आयोडिनयुक्त मीठ' असे लिहिलेले दिसेल. मिठात आयोडिन का मिसळतात, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ! आयोडिन खूप अल्प प्रमाणात जरी शरीरास आवश्यक असते, परंतु तरी आयोडिन शरीराच्या वाढीसाठी फार आवश्यक असते. थायरॉईड ग्रंथींमध्ये या आयोडीनपासुन थायरॉक्सिन नावाचा अंत:स्राव तयार केला जातो. या स्रावावर शरीराची वाढ व चयापचयाच्या अनेक क्रिया अवलंबून असतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही ग्रंथी सुजते. त्याला गलगंड असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे गर्भातील अर्भक व लहान मुलांच्या वाढीवर, बुद्धिमत्तेवर याचा विपरीत परिणाम होतो व ती मतीमंद व मूकबधिर होतात. मोठ्या माणसांत लठ्ठपणा येतो. हालचाली मंदावतात. बौद्धिक क्षमता कमी होते. वाढ खुंटते. स्त्रियांमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढते. आयोडिन मुख्यत: समुद्री मासे, मीठ व काॅड माशाच्या यकृताचे तेल इत्यादीपासून मिळते. कमी प्रमाणात दूध, मांस, पालेभाज्या व तृणधान्यातही ते काही प्रमाणात सापडते. पिण्याच्या पाण्यातही थोड्या प्रमाणात आयोडीन सापडते. जमिनीमध्ये आयोडिनचे प्रमाण जेथे कमी असेल त्या भौगोलिक प्रदेशात आयोडीनच्या कमतरतेमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात या व्याधीला बळी पडावे लागते. त्यामुळे आयोडिनचा अभाव टाळण्यासाठी आयोडीनचा पुरवठा करणे आवश्यक ठरते. आयोडीनचा पुरवठा करण्यासाठी मीठ व खाद्यतेल यांचा वापर करता येतो. मिठाचा जेवणात समावेश गरीब श्रीमंत असे सर्वच लोक करत असल्याने मिठात टाकल्याने सर्व देशातील या समस्येचा नायनाट करता येईल. त्यामुळे मिठात आयोडिन १ किलोला १५ ते ३० मिलीग्रॅम या प्रमाणात आयोडिन मिसळले जाते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित**डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मन शांत असले की, सर्व प्रश्न सहज सुटतात. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) उलट्या टोपड्या सारख्या आकाराच्या एस्किमोच्या घराला काय म्हणतात ?२) महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ?३) भारतात १९५३ साली भाषावार राज्य पुनर्रचना आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला ?४) 'घोडा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात ? *उत्तरे :-* १) इग्लू २) कोयना, सातारा ३) फाजल अली ४) हय, अश्व, तुरग, वारू ५) २०४ चौरस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रताप भिसे, शिक्षक, नांदेड👤 नागेश कोसकेवार👤 शंकर बेल्लूरवाड👤 नारायण शिनगारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चपाती लाटताना एका बाजूने जरी फाटली असेल तरी तव्यावर भाजताना ती फुगण्याचा प्रयत्न करत असते व खाण्यासाठी चविष्ट बनण्याचा प्रयत्न करत असते कारण तिला माहीत असते की, मऊ चपाती खायला सर्वांना आवडते. तसेच आपण सुद्धा जीवन जगत असताना एका बाजूने जरी दु:ख असले तरी आपल्यात सहनशीलता ठेवून जगण्याचा प्रयत्न करावे व त्या चपाती कडून शिकण्याचा प्रयत्न करावा कारण चपातीने नुसते पोटच भरत नाही तर तिच्याकडून खूप काही शिकायला मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दोन माकडं एका गावाजवळच्या जंगलातून चालली होती. दोन्ही तहानेली आणि भुकेली होती. वाटेत त्यांना एक फळझाड दिसलं. अत्यंत आकर्षक रंगाच्या, सुमधुर वासाच्या फळांनी ते झाड भरलं होतं. फळभाराने त्याच्या फांद्याही पार जमिनीपर्यंत लवल्या होत्या. ती फळं पाहताच माकडांच्या तोंडाला पाणी सुटलं. पण, एक मित्र दुसऱ्याला म्हणाला, मी पुढे जाऊन पाण्याचा आणि इतर खायला काय मिळतंय याचा शोध घेऊन येतो. तू इथे या झाडाखाली बस. आराम कर. पण, चुकूनही यांच्यातलं एकही फळ तोडू नकोस आणि खाण्याचा तर विचारही मनात आणू नकोस.त्या माकडाने पुढे जाऊन नदी किती दूरवर आहे, ते पाहिलं. वाटेत त्याला काही नेहमीची फळझाडं दिसली. त्यांच्या त्या दुपारच्या भुकेची व्यवस्था आहे, याची खातरजमा करून तो मित्रापाशी परत आला आणि तिथलं दृश्य पाहून भयचकित झाला.त्याचा मित्र त्या झाडाखाली विव्हळत पडला होता, त्याच्या तोंडातून फेस येत होता, डोळे निस्तेज झाले होते. त्याने धावत जाऊन मित्राचं डोकं मांडीवर घेतलं आणि विचारलं, हे रे काय झालं?मित्र म्हणाला, क्षमा कर मला. मी तुझा सल्ला ऐकला नाही. ही रसरशीत फळं खाऊन पाहण्याचा मोह मला आवरला नाही. तू गेल्यावर मी ही फळं चाखून तरी पाहू म्हणून खाल्ली आणि आता माझी ही अवस्था झाली आहे. माझी शुद्ध हरपते आहे. कदाचित माझा मृत्यूही समीप आला असेल. म्हणूनच मला एक सांग. या झाडाची फळं विषारी असतील, असा इतका पक्का अंदाज तुला कशावरून आला होता?मित्र म्हणाला, अरे, इथे शेजारीच एक गाव आहे. तिथे माणसं राहतात. आपण, जिथे आहोत, तिथूनच एक पायवाट गेलेली आहे माणसांनी बनवलेली. म्हणजे इथे किती माणसं ये-जा करत असतील! माणसांचा स्वभाव तुला ठाऊकच आहे. इथली सगळी झाडं त्यांनी फळांसाठी, फुलांसाठी, पानांसाठी, लाकडासाठी, डिंकासाठी, रसासाठी ओरबाडली आहेत. हे झाड मात्र इतक्या आकर्षक फळांच्या भाराने लवलेलं आहे, माणसांच्या हाताशीच नाही, तर पायाशी फळं आली आहेत आणि माणसांनी त्याला तोंडही लावलेलं नाही, हातही लावलेला नाही, याचा अर्थ काय निघतो?हे ऐकल्यावर मांडीवरच्या माकडाचे डोळे विस्फारले आणि क्षणार्धात विझून गेले.ओशो•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment