✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/08/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ◆ *वायु सेना दिन - रशिया*◆ 💥 ठळक घडामोडी :- ■ १७९०- अमेरिकेत पहिली जनगणना सुरू. ■ १९८५ - डेल्टा एरलाइन्सचे एल.१०११ प्रकारचे विमान अमेरिकेतील डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३७ ठार. ■ १९९० - इराकने कुवैतवर आक्रमण केले. 💥 *जन्म* :- ◆१८६१-प्रफुल्लचंद्र रे,बंगालमधील प्रसिध्द रसायनशास्त्रज्ञ, ◆ १९३२ - पीटर ओटूल, आयरिश अभिनेता. ◆१९५८ - अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 *मृत्यू* :- ● १५८९ - तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा. ● १६११ - केटो कियोमासा, जपानी सामुराई. ● १९२३ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ, शालेय शिक्षणमंत्र्यांचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *शेतकरी जगवायचा असेल तर एमएसपी उत्पादन खर्चाच्या तिप्पटच हवा, पंजाब हायकोर्टनं ठणकावलं* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रा आज लातूरमध्ये, उदगीरला जाताना शेतकऱ्यांसोबत पेरणीचा अनुभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *शरद पवार हृदयात आहेत असं बोलणाऱ्यांचं हृदय तपासावं, शरद पवारांचा पक्षांतर केलेल्या नेत्यांना टोला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा भोवळ, सोलापुरातल्या कार्यक्रमातील घटना, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर नियोजित दौरा रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अण्णाभाऊ साठेंवरील चित्रपटासाठी पुढाकार घेणार, मातंग समाजासाठी एक लाख घरे - मुख्यमंत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *थायलंड ओपन बॅडमिंटन : साई प्रणीत उपांत्यपूर्व फेरीत, सायना नेहवाल, के. श्रीकांत पराभूत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रदूषण एक समस्या* मनुष्याचे सरासरी आयुष्य जे की पूर्वी शतकाची होती. ती आता हळूहळू कमी होत आहे. आत्ता माणसाचे आयुष्य सरासरी सत्तरच्या आसपास झाले आहे. विविध कारणामुळे मनुष्य आजारी पडत आहे आणि मृत्युमुखीदेखील पडत आहे. डॉक्टराना देखील निदान होणार नाहीत असे रोग जडत आहेत. एशोआरामच्या जिंदगीमुळे देखील माणसाचे आयुष्य घटत चालले आहे. यातच प्रदूषण ही एक महत्वपूर्ण समस्या जाणवत आहे. ....... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मूलभूत बलं किती आहेत ?* 📙 हे विश्व जेव्हा उदयाला आलं तेव्हा झालेल्या महाविस्फोटातून केवळ ऊर्जा रोंरावत बाहेर पडली; पण त्यानंतरच्या काही सेकंदांमध्येच त्या ऊर्जेनं कणांचं रूप धारण केलं. त्यातून जे मूलभूत कण बाहेर पडले त्यांच्या एकमेकांमध्ये काही प्रक्रिया करण्यासाठी त्यांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्यावर काही बलांचा प्रभाव पडला. त्या बलांनाच मूलभूत बलं असं म्हटलं जातं. अठराव्या शतकापर्यंत अशा तीन बलांचीच माहिती होती. विद्युतभारांना एकमेकांकडे आकर्षित करणारं विद्युतबल, चुंबकीय प्रभावाचा आविष्कार करणारं चुंबकीय बल आणि विश्वाच्या उदयाला कारणीभूत झालेल्या गुरुत्वाकर्षणाचं बल. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीअखेरीस आणि खरं तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा अणूंच्या अंतर्गत रचनेचा उलगडा झाला तेव्हा मग त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सबल आणि दुर्बल, स्ट्राँग आणि वीक या बलांची माहिती मिळाली. एकूण मूलभूत बलांची संख्या पाच झाली. ऋण आणि धन विद्युतभारांना एकमेकांकडे आकर्षित करणारं विद्युतबल अनेक पदार्थांच्या रचनेत भाग घेऊन त्यांना आकार देतं, याची माहिती मिळाली होती. तसंच अवकाशात चमकणाऱ्या विद्युल्लतेच्या आविष्कारातही त्या बलाचा मोठाच सहभाग असतो, हेही माहीती झालं होतं; पण जेम्स क्लार्क मॅक्सवेल यानं त्या बलाची सांगड चुंबकीय बलाशी घालून दिली. एकाच बलाची ही दोन रूप आहेत. हे सिद्ध करणारी समीकरणं त्यांनी मांडली. आपल्याला दिसणारा प्रकाश त्याच्या दोन्ही बाजूंना असणारे अवरक्त आणि जंबुपार किरण आणि त्यांच्याही अलीकडे पलीकडे पसरलेल्या रेडिओलहरी, सूक्ष्मलहरी, क्ष- किरण, गामा किरण ही सारी विद्युत चुंबकीय लहरींची वेगवेगळी रूपे आहेत हेही दाखवून दिलं गेलं. त्यामुळे एकूण मूलभूत बलांची संख्या चारावर आली. एकोणिसशे सत्तरच्या दशकात स्टीवन वाईनबर्ग, शेल्डन ग्लॅशो आणि अब्दुस सलाम यांनी सैद्धांतिक भौतिकीतल्या काही समीकरणांद्वारे अणूंच्या अंतरंगातच कार्यक्षेत्र मर्यादित असलेल्या दुर्बल बलाची सांगड विद्युतचुंबकीय बलाशी घालून मुलभूत बलांची संख्या तीनवर आणून ठेवली आहे. तरीही ही सारी बलं एकाच महाबलाची वेगवेगळी रूपं आहेत, अशी भौतिकशास्त्रज्ञांची श्रद्धा आहे. त्या तिन्ही मुलभूत बलांची सांगड घालून त्या महाबलाची ओळख पटविण्याची धडपड गेले शतकभर चालूच आहे. आईनस्टाईननंही आपलं उत्तरआयुष्य या महाबलाचा वेध घेण्यात व्यतीत केलं होतं. त्यात त्याला यश मिळालं नसलं तरी भौतिकशास्त्रज्ञांनी आपले प्रयास चालूच ठेवले आहेत. त्यात ते यशस्वी होईपर्यंत तरी मूलभूत बलांची संख्या तीनच राहील. - *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जगातील सर्वात लांब भिंत कोणती ?* चीनची भिंत (2415 km) 2) *स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली ?* 1जुलै 1955 3) *साने गुरुजी यांचा जन्म कोठे झाला ?* पालगड (रत्नागिरी) 4) *माउंट एव्हरेस्टची उंची सर्वप्रथम कोणी मोजली ?* सर जॉर्ज एव्हरेस्ट 5) *कोणताही हिंदी चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होतो ?* शुक्रवार *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  दयानंद भुत्ते ●  रवींद्र वाघमारे ●  दिगंबर वाघमारे ●  कैलाश चंदोड ●  काशीनाथ उशकलवार ●  जी. पी. मिसाळे ●  आनंद पाटील धानोरकर ●  शिलानंद गायकवाड ● प्रतीक गाडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गाण्याचा रियाज करावा तसा दु:खाचा रियाज करता येईल का? गाण्याच्या रियाजाने गायकांस त्याचा आवाज टिकवून धरता येतो. आवाजाची धार शाबूत राहते. त्याचं गाणं दिवसेंदिवस खुलत जातं. दु:खाच्या रियाजाने असं काही होईल का? दु:ख जर आणखीनच टोकदार होणार असेल तर दु:खाचा रियाज करायला कुणी धजणार नाही. कुणाला हवं आहे दु:खं ! नकोच आहे दु:खं. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून पृथ्वीभर जेवढे काही देव आहे, त्यांना साकडे घालून होते. खुद्द देवालाच दु:खाच्या संदर्भात जाब विचारणा-या माणसाची कथा आपण ऐकलीच आहे.* *माणूस देवाला म्हणतो की, 'देवा तू सुखात माझ्याबरोबर असतो. कारण तेंव्हा दोन माझी अन् दोन तुझी पावलं उमटलेली असतात. मात्र दु:खात तू माझ्यासोबत नसतोस, कारण तेंव्हा माझी एकट्याचीच पावलं उमटलेली असतात !' तेंव्हा देव त्यास म्हणतो,'अरे दु:खातही मी तुझ्याबरोबरच होतो! ज्या दोन पावलांची गोष्ट तू करतो आहेस, ती पावलं तुझी नसून माझीच आहे. मी तुला कडेवर उचलून घेतलं होतं.' तरी माणूस मान्य करणार नाही. हीच माणसाची मोठी समस्या आहे. माणूस दु:खाचा बाऊ फार करतो. दु:खाची सवय करून घ्यायची ..ही गोष्ट फार लांब राहिली. सुख पाहता जवापाडे । दु:ख पर्वताएवढे ॥ तुकाराम महाराजांनी सुखाचे आणि दु:खाचे माप आपल्यासमोर ठेवले आहे. सुख जवसाच्या 'बी' इतके लहान, तर दु:ख पर्वताएवढे विशाल आहे. जवसाच्या बी इतक्या छोट्या असलेल्या सुखाचे व्यवस्थापण आपण करीत असतो. मात्र, पर्वताएवढ्या दु:खाचे व्यवस्थापण आपण बिलकुलही करीत नाही. म्हणून ते कमी व्हायच्या ऐवजी वाढत जाते..इतके की जवसा एवढ्या सुखाचाही तेच चट्टामट्टा करून टाकते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुख आणि दुःख ही मानवी जीवनाची नैसर्गिक प्रयोगशाळा आहे.* *जो सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा* *करत राहील त्याचा* *प्रयोग यशस्वी होईल.* *संतानी म्हटले आहे, सुख जवापाडे,दुःख पर्वताएवढे।* *प्रत्येकाला आपले दुःख दुसऱ्यापेक्षा मोठे वाटते, दुःखाला आपला सच्चा मित्र बनवून* *बघा मग खरी जीवनाची मजा चाखायला मिळेल.* *जेव्हा जेव्हा दुःख जवळ येण्याचा प्रयत्न करीन तेंव्हा तेंव्हा त्याच्या समोरच तुम्ही प्रतिआव्हान म्हणून पाय रोवून उभे रहा.* *आणि जमलं तर एक सुंदर गीत गुणगुणत रहा* . *दुनिया मे कितना गम है।* *मेरा गम कितना कम है।* *लोगोका गम देखा तो,* *मैं अपना गम भूल गया।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते* ) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संधी* एक दानशूर राजा होता.त्यानं एक दिवस जाहिर केलं की,उद्ध्या माझ्या महालाचा मुख्य दरवाजा उघडला जाईल.त्या . नंतर ज्याला जी वस्तू हवी असेल,त्यानं फक्त त्या वस्तूला हात लावायचा. दुसरा दिवस उजाडला,सर्व लोक राजवाड्यात शिरले,गर्दी जमली.प्रत्येकजण आपल्याला हवी असलेली वस्तू शोधायचा, कुणी सोने घेतले,कुणी पैसे,कुणी घोडा तर कुणी दुभती जनावरे. राजा एका कोप-यात थांबून हा सर्व प्रकार पाहात होता.अचानक,त्याचं लक्ष एका चिमुकलीवर गेलं.ती गर्दीतून वाट काढत हळूहळू राजाच्या दिशेने येत होती.राजा पहात असतानाच ती त्याच्याजवळ पोहोचली आणि तिने आपल्या नाजूक हातांनी राजाला स्पर्श केला.क्षणार्धात राजा तिचा झाला.राजाच तिचा झाल्यामुळे तिथल्या सर्व वस्तूदेखील तिच्या मालकीच्या झाल्या. 💐विचार करा💐 ज्या पध्दतीने राजाने लोकांना संधी दिली होती त्याच पध्दतीने परमेश्वर आपल्या प्रत्येकाला रोज संधी देतो.पण,त्या लोकांसारखीच आपली चूक होते,परमेश्वराऐवजी आपण,त्याने निर्मिलेल्या प्रापंचिक वस्तू निवडतो.पण,देवच जर आपला झाला तर संपूर्ण जगच आपले होईल, खरंय ना !!! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment