✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/08/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ २०१०-जपानला मागे टाकून चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली. ◆१९८७ - नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाइट २५५ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान डेट्रोइट विमानतळावर कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली. 💥 जन्म :- ◆१९७०-मनिषा कोईराला, अभिनेत्री. ◆ १९७०-सैफ अली खान,चित्रपट अभिनेता. ◆१९५७ - रणधीरसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆ २०१०-नारायण गंगाराम सुर्वे,कवी ◆ १९९७ - नुसरत फतेह अली खान,पाकिस्तानी सुफी गायक. ◆ १८८६ - श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी. ◆ २०१८ - अटलबिहारी वाजपेयी, माजी पंतप्रधान *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी,जि गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कुटुंब नियोजन करणं म्हणजे देशाच्या विकासात योगदान देणं, छोटं कुटुंब असणं ही सुद्धा एका प्रकारची देशभक्तीच आहे' स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *समुद्राला मिळणारं पाणी गोदावरी खोऱ्यात; तेलंगणात जाणारं पाणी नळगंगेत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *29 ऑक्टोबरपासून सरकारी बसमधून महिलांना मोफत प्रवास, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी रक्षाबंधनाच्या दिवशीच दिलं महिलांना मोठं गिफ्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *चीफ ऑफ डिफेन्स' पदाची घोषणा ; तिन्ही दलांचं नेतृत्त्व करणार, संरक्षण दलांच्या बळकटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कोल्हापूर : शिरोली मदरशात घडले माणुसकीचे दर्शन, गेली दहा दिवस 400 हून अधिक पूरग्रस्तांच्या राहण्याची केली व्यवस्था* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली - देशभरात 73 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पोर्ट ऑफ स्पेन - विराटसेनेकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाची विजयी भेट, भारताने वेस्ट विंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पौर्णिमा - अमावस्या* https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_15.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *आम्ल म्हणजे काय ?* 📙 चिंच कशी आंबट असते ? हिरवीगार चिंच खाल्ली, तर दात अगदी आंबून जातात. लिंबाचा आंबटपणा मात्र काही वेळा हवाहवासा वाटतो. विशेषतः उन्हाळ्यात तर तो आवडतोच. ताकाचा आंबटगोडपणा तर पाहिजेच असतो. अगदी मधुर ताक समोर आले, तर पिववत नाही. या सर्व आंबटपणाचे कारण काय असते ? या प्रत्येकात एक अाम्ल असते. आम्लाचे (Acid) विविध प्रकार आहेत. आज जगात शेकडो प्रकारची आम्ले शोधली गेली आहेत, वापरातही आहेत. आपल्या पोटातही एक प्रमुख अाम्ल सतत स्रवत असते. पोटातल्या आम्लाचे नाव हायड्रोक्लोरिक अॅसिड. फळांमध्ये असते ते सायट्रिक अॅसिड, तर दुग्धजन्य खाद्यपदार्थात तयार होते ते लॅक्टिक अॅसिड. या आम्लांची चव आंबटसर लागते. अर्थातच त्यांची तीव्रता जेव्हा कमी असते, तेव्हाच. अन्यथा चक्क जीभ भाजली जाते. जीभच काय पण एखादे तीव्र अंमल म्हणजे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण अगदी अत्यल्प आहे, असे आम्ल जेव्हा कातडीच्या, कापडाच्या, लाकडाच्या किंवा लोकरीच्या संपर्कात येते, तेव्हा ती वस्तू चक्क त्यात विरघळून नष्ट होऊ लागते. तीव्र सल्फ्युरिक अॅसिडमुळे तर कातडी चक्क जळते. म्हणूनच त्याला तेजाब असे म्हणतात. सल्फ्यूरिक, नायट्रिक व हायड्रोक्लोरिक अशी तीन प्रमुख तीव्र आम्ले आहेत. आम्लपदार्थ म्हटल्यावर डोळ्यांसमोर फक्त द्रवच येतो. पण ते खरे नव्हे. कित्येक आम्ले घनरूपही असतात. मात्र एक गोष्ट महत्त्वाची - सर्व आम्लांमध्ये हायड्रोजनचा अणू असतोच. एखादे आम्ल जेव्हा धातूबरोबर संयुक्त पावते, तेव्हा हायड्रोजनचा अणू सुटा होऊन वायूरूप धारण करतो. एखादी वस्तू वा द्रव हा आम्लधर्मी असेल, तर लिटमसच्या कागदाच्या सहाय्याने तो पारखून बघता येतो. द्रवामध्ये लिटमस कागद बुडवला, तर निळा लिटमस लाल होतो. घन आम्ल असेल, तर कागद ओला करून वापरला जातो. आम्लाची तीव्रता ठरवण्यासाठी pH हे परिमाण ठरवले गेले आहे. ० ते ७ च्या दरम्यान सर्व आम्ल व ७ ते ‍१४ या दरम्यान सर्व अल्क पदार्थ मोडतात. शुद्ध पाणी हे सात pH चे असते. सर्वात तीव्र आम्ल ० परिमाण दाखवते, तर अतितीव्र अल्क १४ परिमाणात मोडते. दोन्ही एकमेकांच्या विरुद्धगुणी असतात. उद्योगधंद्यांमध्ये सल्फ्युरिक अॅसिड प्रचंड प्रमाणावर वापरले जाते. खते, रंग, बॅटरीमधील पाणी, स्फोटके, साबण, प्लॅस्टिक या सर्वांसाठी त्याचा उपयोग होतो. नायट्रिक अॅसिडचा विविध स्फोटकांत वापर करतात. हायड्रोक्लोरिक अॅसिड तर पोटात सतत काम करतच असते. त्याचा साठा पोटात गरजेपेक्षा जास्त होऊ लागल्यास घशाशी जळजळते व आंबट व ढेकरा येतात. पण याच अाम्लामुळे खाल्लेल्या अन्नातील सर्व जंतूंचा प्रथम नाश होतो. अर्थातच शरीराला त्रास देऊ शकणारे सर्व अपायकारक घटक इथेच नष्ट केले जातात. मानवाला आम्ल पदार्थ अनेक वर्षांपासून माहित आहेत. कृत्रिमरीत्या तयार केलेली आम्ले जरी फक्त गेली काही शतकेच ज्ञात असली तरी पुरातन धातूयुगापासूनच नैसर्गिक आम्लपदार्थांंचे ज्ञान मानवाला असावे. तांबे, पितळ, लोखंड, ब्राँझ इत्यादी विविध धातूंच्या वस्तू चकचकीत ठेवणे, आकर्षक ठेवणे त्याशिवाय शक्यच झाले नसते. चांदीच्या वस्तूंना झळाळी देणे, सोन्याला चकाकी आणणे या प्रकारासाठीसुद्धा आम्लांचा उपयोग चालूच राहील. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *पश्चिम बंगाल या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?* खंड्या 2) *मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो ?* राष्ट्रपती 3) *महाराष्ट्रातील ऊसतोडणी कामगारांचा जिल्हा कोणता ?* बीड 4) *रेडिओचा शोध कोणी लावला ?* मार्कोनी 5) *सजीवांचे दोन गट कोणते ?* प्राणी व वनस्पती *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● निखीलदेवेंद्र खराबे, नागपूर ●  नरेंद्र नाईक ●  सुभाष पालदेवार ●  सदानंद वतपालवाड ●  जी के प्रसाद ●  अशपाक सय्यद ●  रमेश बारसमवार, ●  मिथुन बिजलीकर ● के. राममोहन *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हसत दु:खाचा केला मी स्विकार,* *वर्षिले चांदणे पिऊन अंधार..* *प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री,* *आनंदयात्री, मी आनंदयात्री !* *दु:खाचा स्विकारही हसत करायचा असतो. दु:खाला धैर्यानं सामोरे जायचे असते. दु:ख सत्वपरीक्षा घेतात. ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे ज्याच्या त्याच्या भाळी दु:ख असते. अशा दु:खाचा बागुलबुवा करून अंधारयात्री व्हायचे, की या दु:खातून माझे आयुष्य तावून सुलाखून पुन्हा झळाळायचे आहे असं म्हणत प्रकाशाचे गाणे गात आनंदयात्री व्हायचे?* *दु:खे समृद्ध अनुभवांची अनुभूती देतात.त्यामुळे खरं तर त्यांच्याबद्दल कृतज्ञ असायला हवे. कारण दु:खानंतरचे सुख आनंदाचा पारिजात फुलवते. जेवनातही विविध चवी हव्यात. चित्रातही अनेक रंग लागतात. गाण्यातही सप्तसूर. मग आयुष्य तरी एका चवीचे, एका रंगाचे, एका सुराचे का हवे? आपल्यात विश्व पाहणे आणि आपणच विश्व होणे. मग अणूरेणसारखे दु:ख आकाशाएवढे का करायचे? नसलेले दु:ख घेऊन का ऊर बडवायचे? वेदनेच्या कल्पनेने का हाय खायची? पायात वहाण नाही म्हणून शोक करणारी व्यक्ती जेंव्हा पाय नसलेल्या व्यक्तीला पाहते तेंव्हा तीचा शोक अनाठायी ठरतो. पाय गमावलेला सैनिक जेंव्हा सहजवानाचा मृतदेह पाहतो तेंव्हा त्याचे दु:ख कमी क्लेशदायी ठरते. जेंव्हा बागडायच्या वयातील छोटी मुले रूग्णालयात व्याधीग्रस्त होऊन मरणयातना भोगताना दिसतात, तेंव्हा वयाने वाढलेल्या आपल्या शरीराला आलेल्या सर्दी, ताप, खोकल्याचे दु:ख ते काय?* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुसंगती सदा घडो ,सुजन वाक्य* *कानी पडो।* *सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याचं सुरेख उदाहरण*... *आचार्य विनोबा म्हणतात की*, *आकाशातुन पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो*. *मात्र तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही*. *तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्यांच अस्तित्वच संपुन जाते*. *कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो*... *पहा गंमत, थेंब तोच परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व व त्याची पतप्रतिष्ठा अवलंबुन असते*. *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *जि. प.शाळा-माणिकखांब,* *ता.इगतपुरी, जि. नाशिक* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अंधारात कसा चढणार डोंगर* तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊम्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने.... रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला.... इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला. 'राम राम पाव्हनं का असं निजलात?' म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता. शेतकरी म्हणाला, ''राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.'' म्हातारा हसला.... म्हणाला, ''अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?'' ''एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात.'' तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ''अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.'' म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा! वाट पाहात बसून कशाला राहायचं? जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. प्रत्येकाजवळ किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश असतो आणि तो ध्येयपूर्तीसाठी पुरेसा असतो. फक्त जिद्द असावी लागते ध्येयापर्यंत पोहचण्याची. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment