✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/08/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १५७४ - गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी. 💥 जन्म :- ● १९३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार. ● १९३४ - बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९४७- नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी 'बी' ● १४८३ - लुई अकरावा, फ्रांसचा राजा. ● १६१९ - शिमाझु योशिहिरो, जपानी सामुराई. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 *9604481084* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. येत्या काळात पोटखराबा आणि जिरायत असलेले हजारो हेक्टर क्षेत्र आता बागायती खाली येणार, राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता याचा फायदा होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १७ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल आज एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'फिट इंडिया' मोहिमेचा शुभारंभ; दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर पार पडला सोहळा, 'फिट इंडिया' अभियानात उद्योग, चित्रपटसृष्टी आणि क्रीडाविश्वासह इतर क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामींनी सुचवला उपाय, म्हणाले- 'पाककडे जाणारी जहाजं थांबवून, व्यापार बंद करावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे करणार भाजपमध्ये प्रवेश, तसेच ते आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलिन करणार असल्याची माहिती खुद्द स्वत: राणे यांनीच दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पॅरालिम्पियन दीपा मलिकला राजीव गांधी खेलरत्न तर क्रिकेटर रवींद्र जडेजा आणि रेसलर पुजा ढांडालासहित 19 जणांना अर्जुन अवॉर्ड पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई :  15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिके आणि भारत यांच्यात सुरू होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाची करण्यात आली घोषणा, महेंद्रसिंग धोनी, जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश नाही.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बैलांचा सण : पोळा* बैलाच्या ताकदीवर तो शेतातील सर्व कामे करून घेतो. शेताची नांगरणी, वखरणी, पेरणी किंवा शेतातून घराकडे मालाची ने-आण करण्यासाठी या बैलांचा वापर केला जातो. पूर्वी दळणवळणाची सुविधा एवढी विकसीत झाली नव्हती तेव्हा शहरात जाण्या-येण्यासाठी बैलगाडीतून प्रवास करावा लागायचा. सायकल नावाची........ पूर्ण खालील लिंकवर मिळेल.....! https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_29.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कर्करोग / कॅन्सर म्हणजे काय ?* 📙 कर्करोग किंवा कॅन्सर हा शब्द अंगावर शहारे आणतो. कॅन्सरचा आणि मृत्यूचा कोठेतरी संबंध आहे, हे मनात दडलेले असते हे याचे कारण. कर्करोगापेक्षा कॅन्सर हाच शब्द सहजगत्या वापरला जातो, नाही का ? कॅन्सरविरोधी लढाई ही खरे म्हणजे हरणारी लढाई असते, असा प्रचलित समज आहे. रक्ताचे काही कॅन्सर, कातडीचे काही कॅन्सर, स्तनाचे व गर्भाशयमुखाचे काही कॅन्सर लवकर लक्षात आले तर ही लढाई जिंकता येते, हे अलीकडे आकडेवारीने सिद्ध झाले आहे. पण अन्यथा या बाबतीत डॉक्टर शब्द वापरतात 'सर्व्हायवल रेट' हा म्हणजेच ते रोगाच्या राहिलेल्या वर्षांचा हिशोबच उलगडत असतात. आपल्या शरीरातील असंख्य प्रकारच्या पेशी त्यांना दिलेली कामे निमूटपणे करत असतात. पण अचानक त्यांतील काही बंड करतात. त्यांचा आकार वेडावाकडा वाढू लागतो. त्यांना नेमून दिलेली कामे होईनाहीशी होतात. त्यांची शरीराला अडचण होऊ लागते. अन्य अवयवांचे काम करायला त्यांचा अडथळा येऊ लागतो. या अडथळ्यांचाच एक परिणाम म्हणजे वेदना. जसजसे विविध प्रमुख अवयवांचे अडथळे वाढतात, तसतसे शरीर साथ देईनासे होते. यातुनच मृत्यू ओढवतो. आपल्या शरीरात रक्तरस म्हणजे लिम्फ नावाचा रस सर्वत्र रक्तरसवाहिन्यांतून वाहत असतो. कॅन्सरच्या पेशींचा या वाहिन्यांतून फैलाव सगळ्या शरीरभर होऊ शकतो. जेथे फैलाव होईल, तेथे त्यांची पुन्हा वाढ होऊ लागते. ज्यावेळी यकृत, फुप्फुस, प्लीहा, मेंदू या जागा या पेशींनी व्यापल्या जातात, तेव्हा संपूर्ण शरीराचेच कार्य बंद पडू लागते. शरीरातील पेशी अशा का बंड करून उठतात, याचा अजून आपल्याला पत्ता नाही. पण त्यांना बंड करायला प्रवृत्त करणाऱ्या वस्तूंना आपण कार्सिनोजन्स व कॅन्सरकडे प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी म्हणून संबोधतो. उदारणार्थ, डांबर व त्यापासून बनणाऱ्या पदार्थाने कातडीचे कॅन्सर होतात, क्ष-किरणांमुळे कातडीचे व रक्तातील पेशींचे कॅन्सर होतात, तंबाखूमुळे तोंडातील कॅन्सर होतात, तर धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सारख्याच वातावरणात त्याच वस्तूच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला कॅन्सर होतोच, असे नव्हे; तर त्या वातावरणात न येणाऱ्यांपेक्षा या गटातील लोकांना कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त असते. आज घटकेला जगातील अनेक प्रमुख संशोधन संस्थांतून कॅन्सरविरोधी औषधांबद्दल संशोधन केले जात आहे. त्यासाठी अक्षरश: पाण्यासारखा पैसाही ओतला जात आहे. पण नेमका प्रतिबंध व नेमका इलाज सापडणे खूपच दूर आहे. सध्या उपलब्ध असलेल्या व वापरात असलेल्या इलाजांमध्ये मुख्यत: बंड करणाऱ्या पेशींवर औषधाचा मारा करून त्यांचा नाश करण्याची उपाययोजना आखली जाते. पण अनेकदा या इलाजामध्ये निरोगी पेशीही नष्ट होतात. त्यामुळे रुग्णाची तब्येत अधिकच त्रास देऊ लागते. कॅन्सरविरोधी इलाज म्हणून एका औषधाकडे आशेने पाहिले जाते. ते म्हणजे इंटरफेराॅन. रक्तातील गॅमाग्लोब्युलिनपासून हे औषध तयार करून वापरले जाते. पण त्याची किंमत व निर्मिती हा त्याच्या वापरातील प्रमुख अडथळा आहे. काही वर्षांपूर्वी फक्त कॅन्सरच्या पेशी टाकू काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करणे एवढाच इलाज होता. त्यानंतरचा इलाज म्हणजे क्ष किरणांचा एकत्रित मारा ठराविक डोसमध्ये करणे. यानंतर कोबाल्ट किरणांचा मारा करण्याची पद्धत सुरू झाली. पण नंतर प्रगत औषधे जशी उपलब्ध झाली आहेत, तसे शरीरभर पसरत गेलेल्या कॅन्सरपेशींवर नियंत्रण घालणे शक्य होऊ लागले. विशेषत: रक्ताचा कॅन्सर, रक्तामार्फत पसरणारे कॅन्सर यांवर ही औषधे वापरणे आता सुरू झाले आहे. कॅन्सरच्या संदर्भात नवनवीन औषधांचा वापर करताना त्याच्या दुष्परिणामांची माहिती रुग्णांना दिली जाते. त्यांची परवानगी घेतली जाते व मगच इलाज केले जातात. यामध्ये अनेकदा औषधांचा वापर प्रथम करण्याची वेळ येते व रुग्णांना प्रथमच वापरले जाणारे औषध त्याचे दुष्परिणाम किंवा मृत्यू यातील एकाची निवड करावयाची असते. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ?* मा. राधामोहन सिंह 2) *'देवीची लस' कोणी शोधून काढली ?* एडवर्ड जेन्नर 3) *रक्तगट कोणी शोधून काढले ?* कार्ल लँडस्टेनर 4) *भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात ?* लोकमान्य टिळक 5) *पी व्ही सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* बॅडमिंटन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● नागभूषण मॅकावाड ●  अरुण चव्हाण ●  गणेश बोळसेकर ●  दिलीप झरेकर ●  कृष्णा श्याम दाभडकर ●  माधुरी हातनुरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"सहजीवन म्हणजे काय? खरंच काय लिहायचं सहजीवनाबद्दल? आणि कोणा-कोणाबद्दल लिहायचं? फक्त पती आणि पत्नीचंच सहजीवन असतं का? आई-वडील, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या यांच्याबरोबर घालवलेले लहानपणीचे सोन्यासारखे दिवस हे सहजीवन नाही का ? मला तरी एकाबरोबर घालवलेलं ते सहजीवन असं मर्यादित स्वरूपात नाही मांडता येणार. ज्या ज्या माणसांनी मला भले आणि बुरेही अनुभव देऊ केले त्या सगळ्यांबरोबर जीवन जगलो ते सहजीवनच वाटतं.’’सहजीवन म्हणजे नेमकं काय? बरोबर राहणं की जोडीनं राहणं? एकत्र एका घरात राहणं की कुठेही असलं तरी जवळ असल्याची भावना वारंवार उचंबळून येणं? माणूस कंपू करून, टोळी बनवून किंवा गर्दी करून राहतो त्याला सहजीवन म्हणायचं की प्राणी एकत्र कळपानं किंवा झुंडीनं राहतात त्याला सहजीवन म्हणायचं?* *आजकालच्या धकाधकीच्या आणि न संपणाऱ्या प्रवासानंतर घरी जाऊन बोलायला वेळ नाही म्हणून एकमेकांशी दूरध्वनीवरून किंवा संदेश पाठवून सगळ्या भावना व्यक्त करतो त्याला सहजीवन म्हणायचं? काहीच कळत नाही, की काही कळून घ्यायचं नाही आणि जोपर्यंत काही होत नाही, घडत नाही तोपर्यंत आपलं मस्त चाललंय.. म्हणून खोटय़ा निर्धास्त भावनेनं आला दिवस गेल्या दिवसापेक्षा बरा निघेल म्हणून एकाच छपराखाली राहायचं, त्याला कुटुंब असं नाव द्यायचं आणि जगण्याचं एक चोवीस तास चालणारं आणि हमखास बेरंग करणारं नाटक आपण प्रमुख पात्र म्हणून अभिनय करून पुढे चालू ठेवायचं?* *"कोणत्याही दोन नात्यांमधील सहजीवन हे व्यवहारीक असू शकते तसेच भावनिक सुध्दा असू शकते परंतु एखाद्या पती-पत्नीचे सहजीवन हे भावनिकच असावयास हवे अन्यथा तेथे राग, द्वेष, तिरस्कार, घृणा, मत्सर हे जरूर असणार जे त्या सहजीवनाला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही ...म्हणूनच पती-पत्नीच्या सहजीवनाला वेगळा अर्थ आहे."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सज्जनहो,* *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज* *काय होत या माणसाकडे,* *फक्त वाटणे,देण्यापलीकडे काहीच* *नव्हतं.* *म्हणून ते राष्ट्रसंत* *झाले.* *ते म्हणत* * *राजा सजी महाली,सौख्य कधी* *मिळाली।* *ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत* *माझ्या।* *जाता तरी सुखे जा, येता तरी सुखे* *या।* *कोणावरी ना बोझा, या झोपडीत* *माझ्या।* *अरे बाबांनो आलोच ना भूमीवर ,मग* *सगळं तिचच आहे,सांभाळून काय करता, वाटून बघा किती पटीने वाढत ते* *सांगा,मोजदाद करता येणार नाही.* *या सृष्टीने एक नियम केला आहे, अलिखित आणि चिरंतन---* *जे वाटले ते शेकडो पटीने पुन्हा परत मिळत, मग वाटायला काय हरकत आहे.* *अन्न द्या ,कधी भुकेले राहणार नाही.* *सन्मान करा, कधी मान खाली घालायची वेळ येणार नाही.* *तिरस्कार करा,आयुष्यात कधी कुणी जवळ येणार नाही.* *अपमान करा,करोडो रुपये खर्चूनही कुणी चांगलं म्हणणार नाही.* *धन वाटा, कधी कुणाकडे हात पसरावा लागणार नाही, सदैव मदत तयारच.* *ज्ञान वाटा, जगात तुमच्यासारखा ज्ञानीच प्रत्येकाच्या मनात घर करून* *बसेल,व तुम्ही किर्तीवंत व्हाल* *प्रेम करा,अवघी सृष्टी तुमचीच* *असेल, जगण्याची मजा काही औरच मिळेल.* 🤝🏻 *चला मग वाटताय ना ,शक्य होईल ते तरी *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका पण तुम्ही तुमच्या मनातून काम करत असलेल्या कामावर विश्वास ठेवा.कारण मनातून केलेले काम हेच तुमच्या विश्वासाचे खरे प्रतिक आहे.तीच तुमच्या विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.या तुमच्या कामावरच लोक विश्वास ठेवतात.तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही परंतु तुम्ही मनातून केलेल्या तुमच्या कामावर नक्कीच विश्वास ठेवतील.हीच तुमची खरी ओळख व विश्वासाने केलेल्या  कामाची पावती आहे. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद.9421839590/           8087917063. 🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भेटवस्तू न स्वीकारणे* अब्दुल कलाम यांचा वडिलांची शिकवण स्वातंत्र्यानंतर अब्दुल कलाम यांच्या वडिलांना ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यांनतर एके दिवशी एक व्यक्ती त्यांना भेटायला आले. त्यावेळी कलामांचे वडील घरी नव्हते आणि कलाम अभ्यास करत होते. कलामांचे वडील घरी नसल्याचे पाहून तो इसम म्हणाला, ‘मी तुझ्या बाबांसाठी भेटवस्तू आणली आहे. ते जेव्हा येतील तेव्हा ही भेटवस्तू त्यांना दे.’ काही वेळाने कलामांचे वडील घरी आल्यावर त्यांना ती भेटवस्तू दिसली. चांदीच्या ताटात ठेवलेल्या त्या भेटवस्तू पाहून त्यांनी कलामांना विचारले, ‘बेटा या भेट वस्तू कुठून आल्या.’ तेव्हा कलाम म्हणाले, ‘तुम्ही घरी नसताना एक व्यक्ती घरी आला होता, त्यानेच हे दिले.’ त्यांच्या वडिलांनी त्या भेटवस्तू उघडून पाहिल्या तर त्यात, महागडे कपडे, चांदीचे पेले आणि मिठाई होती. हे पाहिल्यावर ते रागवले. कलाम घरी असूनही त्या व्यक्तीने या भेटवस्तू घरी ठेवल्या आणि कलामांनी त्याला नाकारले नाही, या गोष्टींचा त्यांना राग आला. रागावर अनावर झाल्याने त्यांनी कलामानां जोरात चापट दिली आणि घरात येर-झऱ्या घालू लागले. थोड्यावेळाने कलामांच्या वडिलांना लक्षात आले की आपण रागाच्याभरात कलामवर जास्त ओरडलो आणि उदास झालेल्या कलामांना जवळ बोलवून त्यांच्या डोक्यावर हात फिरवत समजावले. ते म्हणाले, ‘बाळ इथून पुढे माझ्या परवानगीशिवाय कोणतीही भेटवस्तू स्वीकारु नकोस. देव जेव्हा एखाद्याला पद देतो तेव्हा त्यासोबत येणाऱ्या गरजाही पूर्ण करतो. देवाने दिलेल्या गोष्टींपेक्षा जास्त घेणे चुकीचे असते.’ अगदी प्रेमाने समजवत कलामांचे वडील त्यांना म्हणाले, भेटवस्तू स्वीकारणे चांगले लक्षण नाही. भेटवस्तू देण्याच्या मागे देणाऱ्याचा काही हेतू नक्कीच असतो. भेटवस्तू स्वीकारताना काळजी घेतली पाहिजे, अन्यथा त्यावरुन विषाची परीक्षा देण्याची वेळ येऊ शकते. वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट कलामांच्या डोक्यात पक्की बसली आणि त्यानंतर ते भेटवस्तूच्या मोहात पडले नाहीत. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment