✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/07/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन* 💥 ठळक घडामोडी :- २०००-अभिनेते दिलीपकुमार यांना 'राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार' जाहीर. १९०३ - फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकायला पाठवली. १९६९-अपोलो -११या अंतराळयानातून गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव बनला. १९४७ - भारतीय व्हाइसरॉय लुई माउंटबॅटनने जाहीर वक्तव्य दिले की वायव्य सरहद्दी प्रांतातील निवडणुकीत जनतेने पाकिस्तानात विलीन होण्याचा कौल दिला आहे. १९९२ - टी.यु. १५४ प्रकारचे विमान त्ब्लिसीजवळ कोसळले. ४० ठार. १९९६ - स्पेनमध्ये विमानतळावर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. ३५ ठार. 💥 जन्म :- १९११ - बाका जिलानी, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९१९ - सर एडमंड हिलरी, गिर्यारोहक. १९२९ - राजेंद्र कुमार, भारतीय अभिनेता. १९५० - नसीरुद्दीन शाह, भारतीय अभिनेता. १९७६ - देबाशिष मोहंती, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९२३ - पांचो व्हिया, मेक्सिकन क्रांतीकारी. १९२७ - फर्डिनांड, रोमेनियाचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *केरळात ८ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने १९ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना पत्र लिहून संध्याकाळी सहापर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *रात्र गस्त घालणार्या पोलीसांच्या खांद्यावर एलईडी दिवे लावण्याचा अनोखा प्रयोग लोणावळा शहरात करण्यात येणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *गणेशोत्सवासाठी एसटीच्या २२०० जादा बसेस, २७ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात, यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने तब्बल २२०० जादा बसेसची केली सोय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *यवतमाळ : वणी पोलीस ठाण्यातील खांबावर गुरुवारी रात्री कोसळली वीज, तीन संगणक निकामी, महिला पोलीस शिपायाला बसला विजेचा धक्का.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) जाहीर केले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *लंडन : महिला क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीनं इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाची ही खेळाडू जवळपास चार वर्षांनंतर बाद झाली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - साहस* https://storymirror.com/read/story/marathi/0gnisi1w/saahs/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ⏰ *एक सेकंद म्हणजे किती काळ ?* ⏰ काळ मोठी अजब चीज आहे. ती एक अमूर्त कल्पना आहे. तरीही आपण तिचं मोजमाप करत असतो. वास्तविक दोन निरनिराळ्या घटनांमध्ये काही अवधी जावा लागतो आणि हा नेहमीच एकसारखा नसतो, हे ध्यानात आल्यानंतर त्या अवधीचं मोजमाप करण्याचं काहीतरी साधन असावं, असं वाटायला लागतं. त्यातूनच काळ या संकल्पनेचा उगम झाला. आपण मोजतो तो दोन नैसर्गिक घटनांमधला अवधी. त्या मोजमापाला काळ म्हणतो. म्हणजे मोजमाप होतं ते त्या अवधीचं, काळाचं नाही. तरीही काळ नावाची एक मोजपट्टी अमलात आणल्यानंतर त्याचं प्रमाणीकरण करणं आवश्यक झालं. दोन अवधीतल्या काळाची मात्रा किती हे समजणं आवश्यक होतं. त्यासाठी मग वरचेवर होणाऱ्या एका आवर्तनातून जाणाऱ्या घटनेची निवड करण्यात आली. त्या दोन आवर्तनातील अवधीला काळाचं एकक मानण्यात आलं. त्यातून मग सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंतच्या अवधीला एक दिवस मानण्यात येऊ लागलं. एकदा पूर्णचंद्र दिसल्यानंतर परत त्याचं दर्शन होईपर्यंत असे कितीतरी दिवस जावे लागतात, हे समजल्यानंतर त्या दिवसांचा एक महिना मानण्यात आला. त्याच सुत्राचं बोट धरत वर्ष या एककाची मात्रा ठरवण्यात आली. नंतर असं दिसून आलं, की आपल्या नेहमीच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, की त्यांच्यामधल्या अवधीचं मोजमाप करण्यासाठी दिवस हे एकक फार मोठं होतं. त्यापेक्षा लहान एककाची त्यासाठी गरज आहे. मग दिवसाचे लहान लहान भाग करून त्यांची एककं करण्याची कल्पना पुढे आली. त्यातूनच मग घटिका, तास, पळं किंवा तास, मिनिटं आणि सेकंद वगैरे एककांची निश्चिती करण्यात आली. तरीही एक तास म्हणजे नेमका किती अवधी किंवा एक सेकंद म्हणजे नेमका किती काळ, हे प्रमाणित करणं गरजेचं होतंच. तसं करायचं तर मग वरचेवर चक्राकार रितीनं होणाऱ्या घटनेचा शोध घ्यायला हवा होता. दिवसाचं प्रमाण ठरवताना पृथ्वीचं स्वतःभोवती होणारं चक्राकार परिभ्रमण विचारात घेण्यात आलं होतं. अशीच काही दिवसांत कितीतरी वेळा होणारी आवर्तनं आहेत काय, याचा शोध सुरू झाला. अणूंच्या अंतरंगातल्या रचनेचा उलगडा झाल्यानंतर त्यांची रचनाही सौरमालिकेसारखी असल्याचं स्पष्ट झालं. अणुकेंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन प्रदक्षिणा घालत असतात, हे दिसून आलं. त्यामुळे मग अणूंमधील आवर्तनांचा विचार होऊ लागला. त्यातूनच हे दिसून आलं की काही अणू आपल्या निरनिराळय़ा ऊर्जापातळींमध्ये सतत वर खाली जात असतात. एखाद्या नटखट मुलानं एक पायरी चढावं मग एक पायरी उतरावं, परत एक पायरी चढावं असा खेळ खेळावा तसे हे अणू एका ऊर्जा पातळीतून वरच्या पातळीत उडी घेतात आणि परत खालच्या पातळीत येतात. त्यांची ही आवर्तनं अविरत चालू असतात. त्या आवर्तनांवर थंडीवार्याचा हवेच्या दाबाचा कशाचाही परिणाम होत नाही. त्यामुळे मग त्यांचाच आधार सेकंदाचं प्रमाणीकरण करण्यासाठी घेण्यात आला. सिझियम या मूलद्रव्याचे अणू एका सेकंदात ९ अब्ज आवर्तनं पूरी करतात आणि त्यात काहीही बदल होत नाही, हे दिसून आल्यानंतर सेकंदाची व्याख्या त्या संदर्भातच करण्यात आली. अचूकपणे बोलायचं तर सीझियमच्या अणूची ९,१९२,६३१,७७० आवर्तनं पूर्ण होण्यासाठी लागणारा काळ म्हणजे एक सेकंद, हे आता जगभर मान्य झालं आहे. *बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दुसऱ्याचे ओझे उतरविण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता तेव्हा तुमचे ओझे पुर्वीपेक्षा हलके होईल हे नक्की. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *माणसाच्या शरीरात एकूण हाडे किती ?* 206 2) *माणसाच्या शरीरातील सर्वात मोठा हाड कोणता ?* फिमर (मांडीचे हाड) 3) *माणसाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणता ?* स्टेप्स (कानातील हाड) 4) *1 मीटर म्हणजे किती सेमी ?* 100 सेमी 5) *'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?* संत ज्ञानेश्वर महाराज *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● साईनाथ माळगे ● गंगाधर पालकृतवार ● लक्ष्मण दावणकर ● मोहन कुलकर्णी ● दत्तात्रय तोटावाड ● व्यंकट चिलवरवार ● श्रीराम भंडारे ● राहूल लोखंडे ● दिनेश राठोड ● सचिन पिसाळ ● साईकुमार ईबीतवार ● बजरंग अरगेलू ● करुणा खंडेलोटे ● ज्ञानेश्वर कोकरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'नकार' साधा नसतो. त्याची एक किमंत असते. ती कधी अत्यंत स्वस्त असते तर कधी अत्यंत महाग. रामायण आणि महाभारताने असे अनेक नकार आपल्यासाठी उदाहरणे म्हणून ठेवले आहेत. रामायणात न दिलेले 'नकार' आदर्श निर्माण करतात. तर महाभारतात 'नकार' दु:ख आणि विध्वंस घडवतात.* *रामाने वनवासात जाण्यास नकार दिला असता तर पितृवचनी राम असा आदर्श राहिला नसता. एका धोब्याच्या टिकेवर रामाने विश्वास ठेवण्यास नकार दिला असता, तर जनहित जपणारा 'राजा' म्हणून रामाचे नाव झाले नसते. या प्रत्येक नकाराने पुढे अनंत यातनांना जन्म दिला, पण शेकडो वर्ष टिकणारे 'आदर्श' जन्माला घातले.* *महाभारतात पावलोपावली शक्तिशाली नकार दिसतात व सामान्यांना आधार देणारे आदर्श निर्माण करतात. कुंतीचा कर्णाला स्विकारण्यास नकार, दुर्योधनाचा पांडवांना राज्य देण्यास नकार, द्रौपदीचा दुर्योधनास नकार हे सर्व विध्वंसक ठरले.* *"अर्जुनाने युद्धाला नकार दिला नसता तर 'भगवद्-गीता' जन्माला आली नसती. आम्ही 'गीते'ला मुकलो असतो."* ••●🔻‼ *रामकृष्णहरी* ‼🔻●•• ⚜⚜⚜⚜⚜ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञान भक्ति वैराग्य सुख पीव ब्रह्म लौ ध़ाये आतम अनुभव सेज सुख, तहन ना दूजा जाये। ज्ञान भक्ति वैराग्य सुख जलद ब्रम्हानंद दायी आत्मानुभव प्राप्तीची सर अन्यत्र कुणा न येई महात्मा कबीर अनुभव ज्ञानाची महत्ती विषद करताना म्हणतात , 'ज्ञान,भक्ति,वैराग्य सुख प्राप्तीद्वारे जलद गतीने ईश्वराचा साक्षात्कार होईल. ईश्वराची दिव्यताही अनुभवता येईल. हा मार्ग ईश्वरी लिला जाणून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा आहे. मात्र आत्मानुभव आत्मा आणि परमात्म्याचंं मिलन घडवून आणतो. जेव्हा आत्माच परमात्म्याच्या रुपाशी एकरूप होऊन जातो. तिथे अन्य कुणाला प्रवेश कसा मिळणार बरे ! जीव आणि शिवाच्या एकरूपतेत मनाचाच मनाशी संवाद घडून येतो. विश्वातील नश्वरता व विकारांना त्याठायी यत्किंचितही स्थान उरत नाही. निसर्गाची सर्वव्यापकता व समदृष्टी त्या जीवात्म्याच्या ठायी स्थापित होते. हा स्थितप्रज्ञतेचा सर्वोत्कट आविष्कार असतो. त्याच्यावर कोणत्याही प्रलोभनाचा प्रभाव पडत नाही . कारण तो स्वतःच अविनाशी विश्वरूपाशी तादात्म्य पावलेला असतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जो माणूस जसा विचार करतो त्याच विचारानुसार जीवनात वागतो. जर चांगले विचार असतील तर त्यांचे परिणाम त्याच्या जीवनात आणि इतरांराच्याही जीवनात चांगलेच होतील. आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नसतील, उपदेशात्मक असतील तर ते नक्कीच जीवनात फलदायी ठरु शकते.अशी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनात नवे चैतन्य आणू शकतात.ते कधीही वाईट विचारांना आपल्या जीवनात थारा देत नाहीत,त्यांना कुणाचेही नुकसान होऊ नये असेच वाटते. परंतू वाईट विचार करणारी माणसे कधीच आपल्या जीवनात यशस्वी होत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या चाललेल्या जीवनात बाधा आणल्याशिवाय राहत नाहीत.अशी माणसे दुष्ट प्रवृतीची असतात.त्यांना स्वत:चे आणि इतरांचे काय आणि किती नुकसान होत आहे याचे भान देखील राहत नाही.अशावृत्तीच्या माणसांपासून केव्हाही दूरच राहिलेले बरे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. 📲 9421839590 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परोपकारी वृत्ती अंगी बाळगणे* एका गावात एक निर्धन मनुष्य राहत होता. परिस्थिती गरीबीची असूनही तो मनाने उदार होता. आपल्या घासातील घास देण्यासही तो कमी पडत नसे. एकदा एका शेठजीकडे तो जेवावयास गेला असताना त्या शेठजीने त्याला पंचपक्वान्नाचे ताट वाढून दिले. ती भरगच्च पदार्थांनी भरलेली थाळी बघून त्या गरीबाला वाटले की यातून किमान तीन माणसांची भूक भागू शकेल. त्याने शेठजीची परवानगी मागितली व त्यातील अन्न त्याने बरोबर घेतले व घराकडे जाण्यास निघाला. रस्त्यात त्याला एक भिकारी भेटला त्याला त्याने खायला दिले. त्यातून उरलेले अन्न घेऊन तो घरी आला, तो जेवायला बसणार इतक्यात एक भिक्षुक या माणसाच्या घरी आला व त्याने त्याला अन्नदान करण्याची विनंती केली. गरीबाने त्याच्यासमोरील ताट त्या भिक्षुकाच्या स्वाधीन केले. त्यानंतर अजून एक अपंग व्यक्ती दाराशी आली त्यानेही या गरीबाकडे अन्न मागितले त्यालाही याने आपल्या थाळीतील अन्न खायला दिले. आता याच्याकडे देण्यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही तेव्हा याने स्वत:ची भूक भागविण्यासाठी एक भांडेभर पाणी घेतले तर समोरून एक वृद्ध व्यक्ती आली व तिने ते पाणी पिण्यासाठी मागितले. याला आता खाण्यापिण्यासारखे काहीच उरले नाही तरीही ही व्यक्ती समाधानात होती आजचा दिवस आपल्यामुळे किमान चार लोकांना तरी खाण्यापिण्यास मिळाले. तो ह्याच विचारात असताना तेथे देव प्रगटले व म्हणाले,'मी तुझी परीक्षा घेण्यासाठीच भिकारी, भिक्षुक, अपंग आणि वृद्ध व्यक्तिचे रूप घेतले होते व तुझ्याकडून काही ना काही मिळते का नाही हे पाहिले आणि तु स्वत:चा विचार न करता दुस-याचा जीव जाणून घेतलास व देत राहिलास. आता या पुढे तुला काहीच कमी पडणार नाही असा मी तुला वर देतो.'' इतके बोलून देव अंतर्धान पावले. *तात्पर्य: देण्यातच खरे सुख लपलेले आहे. कुणाचाही घास हिरावून घेण्यापेक्षा कुणाला तरी एखादा घास देता कसा येईल याचा विचार करणे यातच खरे सुख लपलेले आहे.* *माणसाने आपला जन्म घेण्यासाठी नाहीतर देण्यासाठी झाला ही सदभावना बाळगून परोपकार करीत जावे यातच खरा आनंद आहे.समाधान आहे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment