✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/07/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जागतिक बाल कामगार निषेध दिन *आषाढी एकादशी निमित्ताने सर्वाना हार्दीक शुभेच्छा* 💥 ठळक घडामोडी :- १९८२-NABARD ची स्थापना १९९९- 'महाराष्ट्र भूषण 'हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार सुनील गावस्कर यांना प्रदान २००१-कृषीशास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामिनाथन यांना 'टिळक पुरस्कार'जाहीर २००५ - आल्बर्ट दुसरा मोनॅकोच्या राजेपदी. 💥 जन्म :- १८६४ - इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, मराठी इतिहास संशोधक १८६४ - जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ. (चित्रीत) १९२० - यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश. १९४७ - पूचिया कृष्णमुर्ती, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६५ - संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- २००० - इंदिरा संत , मराठी कवयित्री. २०१२-दारा सिंग ,मुष्टियोद्द्धा व अभिनेता २०१३-प्राण ,हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *चंद्रभागेच्या काठी जमला वैष्णवांचा मेळा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न, विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करण्यास विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली. या निर्णयामुळे एमबीबीएससाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *कर्करोगाला प्रतिकार करणाऱ्या औषधांचा अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश, जागतिक आरोग्य संघटनेने केली यादी जाहीर, कर्करोगाचे उपचार सुरू असताना रुग्णांची प्रतिकारकशक्ती वाढविण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अहमदाबाद : माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी भाजपचे माजी खासदार दिनू बोघा सोळंकी आणि सहा अन्य जणांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *20 जुलै ते सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात पुन्हा एकदा कृत्रिम पावसाचे प्रयोग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *युवा राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी १६ वर्षीय जेरेमीने सुरेख कामगिरी करताना ६७ किलो वजन गटात स्नॅचमध्ये १३६ किलो वजन उचलताना युवा विश्व, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रम मोडला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवत इंग्लंड अंतिम फेरीत; आता अंतिम फेरीत रविवारी इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात सामना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - फेसबुक मैत्री* https://storymirror.com/read/story/marathi/fn07z43i/phesbuk-maitrii/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌺 *फुल केव्हा फुलतं ?* 🌺 ************************** फुलांनी केवळ कवींनाच वेड लावलंय असं नाही; आपल्या सर्वांच्याच चित्तवृत्ती फुलांना पाहून फुलतात. त्यांचे मनमोहक रंग, त्यांचे आकार, त्यांची रचना, त्यांचा डौल खरोखरंच मोहून टाकणारे असतात. म्हणूनच असावं कदाचित, पण आपल्या आयुष्याच्या प्रत्यक क्षणाची साथ फुलं करतात. जन्म झाला म्हणून जशी फुलांची उधळण होते तशीच शेवटच्या प्रवासाला निघतानाही फुलांच्या माळांनी निरोप दिला जातो. प्रेयसीला भेट म्हणून गुलाब देता देताच त्या प्रणयाचं आयुष्याच्या साथीत रुपांतर करतानाही फुलांच्या माळांची देवाणघेवाण करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येतं. हे असे आनंदाचे दिवस वर्षात केव्हाही येऊ शकतात. तरीही प्रत्येक वेळी आपल्याला फुलं मिळत राहतात. म्हणजे ती सदासर्वकाळ फुलतात असं समजायचं का ? तसं नाही. कारण काही फुलं ठराविक हंगामातच मिळतात. काही दिवसाउजेडीच उमलतात तर रातराणीसारखी काही रात्रीच्या वेळीच आपल्या सुगंधाने आसमंत दरवळून टाकतात. ब्रह्मकमळ तर एकदाच आणि तेही मध्यरात्रीच फुलतं. मग हे फुलं नेमकी फुलतात तरी कधी ? हे समजून घ्यायचं असेल तर आधी ती फुलतातच का, हे ध्यानात घ्यायला हवं. ती फुलतात ते आपल्याला आनंद देण्यासाठी नाही, तर वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत फुलांचं उमलणं एक कळीची भूमिका बजावत असतं. फुलांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर असे परागकण असतात. त्यांच्या मिलनातूनच बी तयार होतं आणि पुढच्या पिढीची नांदी म्हटली जाते. हे मिलन होण्यात कीटक आणि पक्षी मोलाची मदत करतात. त्या मदतगारांना त्यांचं काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं तर काही आमिष दाखवायला हवं. त्यांना आधी आकर्षित करायला हवं. ते करण्यासाठीच फुलं फुलत असतात. त्यांची ती रंगीबेरंगी छबीही तेच काम करत असते. त्यामुळे ते जेव्हा आकर्षित होतील तेव्हा फुलण्यानेच कार्यभाग साधत असतो. तरीही निरनिराळ्या वनस्पतींची वर्गवारी करणाऱ्या कार्ल लिनैस यानं फुलांचीही त्यांच्या उमलण्यावरून तीन गटात विभागणी केली आहे. काही फुलं हवामानानुसार उमलतात काही कोमेजतात. त्यांना लिनैसनं 'मिटिअाॅरिची' असं म्हटलं आहे. काही दिवसाच्या लांबीनुसार आणि कार्यक्रम आखतात. म्हणजे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या वेळा बदलतात. त्यांना त्यानं 'ट्रॉपिची' हे नाव दिले आहे. उरलेली सगळी तिसऱ्या म्हणजेच इक्निनोक्टेल्स या गटात घातलेली आहेत. ती हवामानाची किंवा दिवसरात्रीच्या लांबीची पर्वा न करता दिवसाच्या ठरावीक वेळी फुलतात आणि ठरावीक वेळी कोमेजतात. ज्याँ बातिस्त लमार्क या फ्रेंच वैज्ञानिकाला असं दिसून आलं की फुलण्याच्या वेळी फुलांची उष्णता वाढलेली असते. आपल्या गंधाचा दूरदूरवर फैलाव करण्यासाठी ही वाढीव उष्णता कामी येते, असे त्यानं दाखवलं आहे. काही फुलं तर आसमंताच्या तापमानापेक्षा आपलं तापमान ३५-४० अंशांनीही वाढवू शकतात. तेव्हा फुलांचं तापमान वाढू लागलं की ती फुलतात असंही म्हणता येईल. *बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत करणारे हात जास्त पवित्र असतात. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ?* मुंबई (1972) 2) *महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते ?* मुंबई (1857) 3) *महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली ?* मुंबई 4) *महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?* मुंबई 5) *भारतातील सात बेटांचे शहर कोणते ?* मुंबई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● दिलीप इंगळे ●  हरिहर धुतमल ●  हितेश माधवी ●  साई गाडगे ●  प्रवीण दबडे पाटील ●  शिल्पा जोशी ●  नागेश पडकूटलावार ●  अविनाश पांडे ●  नमन यादव ● सुनील देवकरे ● अमरजुल हुसैन ● दादाराव जाधव ● नंदकुमार कौठकर ● अभिजित राजपूत ● माधव उमरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ●🚩🚩 ‼ *विचार धन*‼ ● 🚩🚩••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *टाळ वाजे....मृदंग वाजे..* *वाजे हरीची वीणा.....!* *माऊली निघाले पंढरपुरा..* *मुखाने विठ्ठल- विठ्ठल म्हणा.!* *हा सगळा भक्तीसागर, विठु नामाच्या गजरात तल्लीन होऊन, नाचत-गाजत एकजीव होऊन माऊलीं सोबत दिवसभर पायी चालत संत स्वरूप वारकरी, आपल्या विठुच्या दर्शनाला पंढरीकडे चालत असतात. क्षणभर वाटतं की अथांग सागर संथ झाला. ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत हा आषाढी वारी पालखी सोहळा पुढे सरकत असतो.* *या वारीमध्ये असेही काही क्षण असतात जे मनाला सुखद प्रसन्नता देतात. विठ्ठल-विठ्ठल नामाचा अखंड गजर...भागवत धर्माचे प्रतीक असलेली आसमंतात फडकणारी पताका...चहूबाजूंनी उत्साहीत वैष्णवांचा भक्तीसागर... आणि वायुवेगाने धावणारा अश्व...अशा भक्तीमय वातावरणात लक्षावधी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा एक क्षण म्हणजे...' रिंगण ' सोहळा..!* *दिंड्या गरूड टके पताकांचे भार ।* *होतो जयजयकार.... नामघोष ॥* 🚩 *॥ रामकृष्णहरी ॥*🚩 *विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥* 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाहन पूजै हरि मिलै तो मै पूजूँ पहार । ताते तो चक्की भली पीसि खाय संसार । सारांश : दगड-धोंडे पूजणार्‍यांचा समाचार घेताना महात्मा कबीर म्हणतात की दगाड-धोंडे पूजल्यामुळे इच्छित साध्य झालं असं होईल, मनोकामना पूर्ण होतील किवा देवाची प्राप्ती होणार असेल तर मी अख्खा पर्वतच पूजायला तयार आहे. त्यापेक्षा दगडापासून बनलेल्या जात्याची काळजी घ्यायला मला आवडेल. कारण हे जातं धान्य भरडण्याच्या कामी येतं. त्यापासून पीठ मिळतं. त्यामुळे जगातील जीवांची भूक तरी भागते. श्रद्धेच्या नावाखाली लोक दगडा-धोंड्याला पूजत राहातात. काही जण रंग फासलेले किंवा हळदी-कुंकू लावलेले दगड दिसताच हात जोडतात. गाडीवरून जाताना मंदिर येताच गाडीचा भोंगा वाजवतात. जसा काही मंदिरातला देव झोपलाय अन आवाज देवून हे त्याला जागं करित आहेत. पहावं ते नवलंच ! एकाचं बघून दुसरा करणार अन ती प्रथाच होणार. आज संगणक युगात वावरताना आंतरजालात दडलेलं जगाचं ज्ञान संगणकावर एका क्लिक मध्ये आपल्यासमोर येतं. संगणक माहिती आदान प्रदानाचं यंत्र आहे. .हे माहित असून सुद्धा त्याला चालू करण्यापूर्वी त्याची पूजा अर्चा करणारे . त्यावर धर्माचे सांकेतिक ठसे उमटवणारे, अज्ञानाचं जोखड वाहणारे ढोंगी बुवा, मौलवी यांचं विज्ञानानंच बणवलेल्या माईकवरून 'ये विज्ञान फिज्ञान सब झुट है । म्हणनं अन विज्ञान शिकलेल्या श्रोतृ समुदायाकडून माना हलवून प्रतिसाद देणं किती ढोंगी व भंकस पणाचा कळस आहे बरं हा ! अशी मानसिकता पाहिली की दया यायला लागते. कोणता संस्कार व शिकवण देत आहेत बरं आपल्या वर्तन अन करणीतून भावी पिढ्यांसाठी ! खरंच का जगू शकत नाही माणूस ढोंगाशिवाय ! का झिडकारत नाही अज्ञानाची काजळी ? विज्ञान आणि मानवतावादाचा मेळ घालत विचारचनं विवेकाचे दीप प्रज्वलित करता आले तर जीवनात दररोजच दिवाळी साजरी होईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपले सुखी जीवन जगण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि सुखी जीवन जगण्यासाठी पैसा कमवतो.तो पैसा एवढा कमवतो की,त्या पैशापायी आपण काय करत आहोत हा समजायला मार्ग सापडत नाही.ज्या गोष्टींसाठी आपण पैसा मिळवला आहे त्यासाठी तर जरुर वापरायला पाहिजे.आपल्या सुखासाठी तर आपण कमवतोच पण आपल्यासारखे सुख इतरांनाही मिळावे असे वाटत असेल तर आपल्या कर्तृत्वाचे हात अशांसाठी पुढे करा की, त्यातून तुमम्हालाही समाधान वाटले पाहिजे.जे अनाथ,अपंग,अंध,निराधार,वृध्द आहेत त्यांना तुमच्याकडून कशाची तरी अपेक्षा आहे अशांना आपण आपल्या केलेल्या कमाईतून काहीतरी मदत करुन जीवनाचे सार्थक करावे.याही व्यतिरिक्त समाजकार्य, देशकार्यासाठीही जे शक्य आहे ते आपल्या परीने करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आपण कमवलेल्या कमाईचे सार्थक होईल.केवळ आपण आपलाच स्वार्थ साधण्यासाठी पैसा कमावला तर त्यात आत्मिक समाधान लाभणार नाही.वेळ निघून गेल्यावर असे होऊ नये की,आपण एवढे कमावले आहे त्यातून आपण आपल्या स्वार्थासाठीच केले आहे पण इतरांसाठी काहीच केले नाही.अशा पश्चातापात पडण्यापेक्षा आपला हात अशांसाठी साठी पुढे करा की,खरी गरज त्यांना आहे.एक आपला हात पुढे केला तर अनेक तीर्थयात्रा करुनही पुण्य मिळणार नाही तेवढे पुण्य आणि समाधान मिळेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरुडाने घुबडाशी केलेली मैत्री* एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’ घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’ पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंटाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला ! आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे.  तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’  तात्पर्य - स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment