✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/07/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २०११-मुंबई शहरात झालेल्या ३ बॉम्बस्फोटात २६ ठार १३० जण जखमी १९८३ - श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तमिळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तमिळ व्यक्तींचे युरोप व कॅनडा व भारतात पलायन. २००५ - पाकिस्तानच्या घोट्की रेल्वे स्थानकात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. १५० ठार. २००६ - इस्रायेलने बैरुत विमानतळावर हल्ला चढवला. 💥 जन्म :- १९०४ - जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती. १९६४ - उत्पल चटर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- २००९-निळू फुले,मराठी चित्रपट अभिनेता १६६० - बाजीप्रभू देशपांडे. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मराठा आरक्षणाला तूर्त स्थगिती नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, दोन आठवड्यांनी सुनावणी : मात्र, पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू नये; न्यायालयाचे मत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुणे/मुंबई : मराठवाडा, विदर्भ, खान्देशात पुरेशा पावसाअभावी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असताना राज्यात १७ जुलैपर्यंत म्हणजे पाच दिवस पाऊस हुलकावणीच देईल, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *अकरावी प्रवेशाची पहिली यादी नव्वदीपार, वाणिज्य, कलेकडे विद्यार्थ्यांचा ओढा : विज्ञानाकडे फिरवली पाठ, विज्ञान शाखेच्या कट आॅफमध्ये घसरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमे व इंटरनेटचा कसा वापर करावा यासंदर्भात केंद्र सरकारने पहिलेवहिले धोरण तयार केले त्यानुसार कार्यालयीन कामासाठी सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेले मोबाईल, संगणक यांचा समाजमाध्यमांकरिता पूर्वपरवानगी असल्याशिवाय वापर करू नये असे केंद्रीय गृह मंत्रालयाने बजावले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ गो. बं देगलूरकर यांची निवड.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लंडन : राफेल नदालला नमवत रॉजर फेडररची विंम्बल्डनच्या फायनलमध्ये धडक; नोवाक ज्योकोवीचसोबत होणार सामना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : विराटच्या अनुपस्थितीत वन डे संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे, तर कसोटी संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपविण्याची शक्यता.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - काटकसर* https://storymirror.com/read/story/marathi/6ffavxie/kaattksr/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 😵 *जांभई केव्हा येते ?* 😵 झोप आली की जांभई येते अशी सर्वसाधारण समजूत आहे. पण ती खरी नाही. कारण दिवसाढवळ्याही एखादं व्याख्यान ऐकत असताना किंवा चक्क एखादा सिनेमा पाहत असतानाही जांभई येते. त्यामुळेच जेव्हा थकवा येतो किंवा कंटाळा येतो तेव्हा जांभई येते असं म्हटलं तर ते अधिक संयुक्तिक होईल. जांभई येते तेव्हा आपला जबडा सताड उघडा पडतो. त्याच्याशी जोडलेले स्नायू ताणले जातात आणि हवा जोराने आत खेचली जाते. या सर्वांशी जांभई येण्याचा संबंध आहे. जांभई सर्वांनाच येते. लहान मुलांना येते, मोठ्या माणसांना येते, जनावरांना येते आणि पक्षांनाही येते. एवढंच काय पण अजून न जन्मलेल्या आईच्या पोटात वाढणाऱ्या मुलालाही जांभई येते. ती का येते हे जरी अजून कोडंच असलं तरी तिच्यासंबंधी पुष्कळ माहिती मिळालेली आहे. जांभई साधारणपणे ६ सेकंद टिकते. मनुष्यप्राण्यामध्ये बीजफलन होऊन नव्या जीवाची नांदी म्हटली गेल्यानंतर जेमतेम ११ आठवडे होतात न होतात तो जांभई येते. आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमसमध्ये जांभईचं नियंत्रण केंद्र आहे. थकवा किंवा कंटाळा आल्यानंतर जांभई येते याचा शोध एका अनोख्या प्रयोगातून लागला. वैज्ञानिकांनी १७ ते १९ वर्षे वयाच्या मुलामुलींची दोन गटांमध्ये विभागणी केली. एका गटाला त्यांनी एमटीव्हीवर दाखवतात तसे गाण्यांचे व्हिडीओ दाखवले. तर दुसऱ्या गटाला निरनिराळ्या रंगांचे बारकोड्स दाखवले. एकूण तीस मिनिटं हा कार्यक्रम चालला होता. त्या दरम्यान त्या दोन्ही गटातल्या मुलांनी किती जांभया दिल्या याची मोजदात केली गेली. त्यावरून असं दिसून आलं की पहिल्या म्हणजे गाण्याचे व्हिडिओ पाहणाऱ्या गटातल्या मुलांनी सरासरी ३.४ जांभया दिल्या तर दुसऱ्या म्हणजे कंटाळवाणे बारकोड्स पाहणाऱ्या गटातल्या मुलांना त्याच वेळात ५.८ जांभया आल्या. असा कंटाळा आला की हायपोथॅलॅमसमध्ये मेंदूतल्या संदेशवाहक रसायनांचा तसंच काही संप्रेरकांचा पाझर सुरू होतो. त्याचा प्रभाव पडून जांभयांचं नियंत्रण करणारं केंद्र कार्यान्वित होतं. येणारी जांभई दाबुन टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यातून समाधान मिळत नाही. उलट आणखी जांभया येतात. कारण जांभई येताना जबडय़ाचे स्नायू जोवर पूर्णपणे ताणले जात नाहीत तोवर जांभईच्या कारणाचं समाधान होत नाही. थकवा येतो तेव्हा आपला श्वासोच्छवास मंद गतीने होत असतो. त्यामुळे शरीरातल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. त्याची नोंद घेऊन हायपोथॅलॅमस कार्यान्वित होतो असाही दावा काही वैज्ञानिकांनी केला आहे. या उलट शरीरात कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाण वाढलं म्हणजेही जांभई येते असंही मत प्रदर्शित केलं गेलं आहे. पण यालाही वैज्ञानिक प्रमाण मिळालेले नाही. त्यामुळे थकवा किंवा कंटाळा आला की जांभई येते हे मान्य असलं तरी त्यामुळे नेमकं काय साधलं जातं हे अजूनही कोडंच आहे. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुखाला सोबत असते पण दु:खाला एकटेपणाने जगावे लागते. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?* सातारा 2) *महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ?* महाराष्ट्र एक्सप्रेस 3) *महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?* आंबोली (सिंधुदुर्ग) 4) *भाताचे कोठार असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?* गोंदिया 5) *भारताचे प्रवेशद्वार कोणते ?* मुंबई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  अनुराधा पहाडे राजूरकर ●  रवी यलमोड ●  शेख अहमद ●  सुनील जवंजाल *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼🚩 *विचार धन*‼ 🚩● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तुळस, तुळशीची माळ, गोपीचंदन, टाळ, भगवी पताका आणि एकादशी या गोष्टींना वारक-यांमध्ये अतिशय महत्व आहे. भागवत संप्रदायात तुळशीला फार महत्व आहे. गळ्यात तुळशीची माळ घातल्यानंतर दारू आणि मासांहार सोडून निर्व्यसनी झालेली लाखो माणसं सापडतील. वैष्णवांचा जत्था टाळ मृदंगाच्या निनादात व हरीनामाच्या गजरात चालू लागला की तो पंढरपुरलाच चालला आहे हे ओळखण्याची खूण म्हणजे महिलांच्या डोईवरील लहानसे 'तुळशी वृंदावन.'* *वारक-याच्या गळ्यात तुळशी माळ व दारी तुळशी वृंदावन. 'तुळस' म्हणजे मुर्तिमंत सात्विकता, तिचे दर्शनही सुखावह असते. तुळशीची माळ ही समर्पित आणि प्रासादिक जीवनाचे प्रतीक आहे. पवित्र तुळशी वृंदावनाला डोक्यावर घेऊन पंढरीच्या वारीत महिला सहभागी होतात. सावळ्या पांडुरंग परब्रम्हाला तुळस अतिप्रिय आहे. गळ्यात तुळशीहार घालून तो उभा आहे.* *होईन भिकारी। पंढरीचा वारकरी ॥* *हाचि माझा नेमधर्म। अवघे विठोबाचे नांव॥* 💥 *॥ रामकृष्णहरी ॥* 💥 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोइ एक राखै सावधां, चेतनि पहरै जागि । बस्तर बासन सूं खिसै, चोर न सकई लागि ॥ भौतिकाच्या नादे काढी जागुनिया सारी रात जे देई परमानंद त्याची सांग काय बात अर्थ : जो सर्वकाळ दक्ष व तत्पर म्हणजेच जागा असतो. त्याच्या घरी चोरी होणे. कपडे भांडी कुंडी चोरीला जाणे असा प्रकार घडत नाही. माणूस भौतिक क्षणिक बाबींना जपण्याचा किती आटापिटा करत असतो. नाशीवंत वस्तुंच्या मोहासाठी माणसाची केवढी मोठी धडपड चाललेली असते. मानसाचं जीवन व शरीरही नश्वर व क्षणभंगूर आहे. कोणत्याही क्षणी ते नष्ट होऊ शकतं. म्हणून माणसानं तत्पर असावं. सत्कर्म व सन्मार्ग सोडू नये. विकारांपासून अलिप्त राहण्यासाठी वाईट संगती, वाईट विचार व वाईट प्रवृत्तीं सोडून दिल्या पाहिजेत व सदैव दक्षता बाळगली पाहिजे. सद्गुण व सत्संगतीचा मार्ग अाचरावा लागेल - एकनाथ डुमणे, मुखेड ९०९६७१४३१७ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनातील कोणत्याही व्यवहारात दोन बाजू असतात आणि जेव्हा मनुष्य दोन्ही बाजूंचा विचार करतो तेव्हा त्याला ख-या व्यवहाराचे ज्ञान अवगत झाले आहे असे समजावे.जर एकाच बाजूने विचार करायला लागला तर कधी कधी कमी फायदा होतो तर जास्त नुकसान.नुकसान जेव्हा व्हायला लागते तेव्हा त्याला ख-या व्यवहाराचे ज्ञान अत्यल्प आहे असे समजावे.कुठेतरी त्याची बाजू कमी आहे.अशावेळी त्याच्या मनात नकाराची,नैराश्याची,परिस्थितीशी टक्कर देण्याची क्षमता अधिक वृद्धिंगत झाली आहे.त्यामुळेच वेळोवेळी अपयशाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे.ह्या अशा नकारात्मक उर्जेचा त्याग करायचा असेल तर उलट विचार करायला हवे.जीवनात येणा-या कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी.मन स्थिर ठेवून कृती करण्याची तयारी,ठाम विश्वास, कामात एकाग्रता आणि सातत्य ह्यावर जर अधिक भर दिला तर कोणतेही जीवनव्यवहारातले प्रश्र्न सोडवायला तत्पर व्हाल.तुमच्या मनातला नकार हा तुमच्या जीवनातला सदैव अपयशाकडे घेऊन जाणारा आहे की,त्यातून काहीच साध्य होणार नाही.त्यापेक्षा सकारात्मक बाजूने जर नेहमी जीवनात विचार करून मार्गक्रमण केले तर जीवनातले कितिही बिकट प्रश्न असले तरी सहजपणे सोडवता येतील.तेव्हा जीवनात ह्या दोन्ही बाजूने विचार करुन योग्य अयोग्य, चांगले वाईट ह्याचे ज्ञान असणे केव्हाही चांगले. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोभी प्रवृत्ती* एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले.  भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’ भिका-याने अट मान्य केली. देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले. झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या !समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला. हावरटपणामुळे नुकसानच होते.लोभी प्रवृत्ती अंगी बाळगणे चांगली नसते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment