✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/07/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९९६-उद्योगपती गोदरेज यांना जापान सरकार तर्फे 'ऑर्डर ऑफ रायझिंग सन' पुरस्कार प्रदान. १९६८ - इंटेल कंपनीची स्थापना. १९२५-अडाल्फ हिटलर ने 'माईन काम्फ'हे आत्म चरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले. १८५७-मुंबई विद्यापीठाची स्थापना 💥 जन्म :- १९१८-नेल्सन मंडेला तथा 'मदीबा' ,दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते. १९६७ - व्हिन डीझेल, अमेरिकन अभिनेता. १९८२ - प्रियांका चोप्रा, भारतीय अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १९६९- 'लोकशाहीर' अण्णाभाऊ साठे,लेखक,कवी व समाजसुधारक २०१२ - सुपरस्टार राजेश खन्ना, हिंदी चित्रपट अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - डोंगरी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत तर जखमींना 50 हजार रुपये देणार - मुख्यमंत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *चांद्रयान-२ या अवकाशयानाचे २१ जुलै रोजी दुपारी किंवा २२ जुलै पहाटे पुनर्प्रक्षेपण करण्याचा विचार भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) करत आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नागपूरसह अकोला, वाशीम, धुळे आणि नंदूरबार जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कुलभूषण जाधव प्रकरणी भारताला मोठं यश ; पाकिस्तानला चपराक - विशेष सरकारी वकील उज्वल निकम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *गोव्यात विरोधी पक्षनेतेपदी दिगंबर कामतनिवड, मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या दिगंबर कामत यांना पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *'मेड इन इंडिया' कादंबरीफेम साहित्यिक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन, खामगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात त्यांनी पूर्णवेळ उपस्थिती दर्शविली होती.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *१६ वर्षीय अनिष बनवालाने जर्मनीत सुरू असलेल्या कनिष्ठ वर्ल्ड कप स्पर्धेत 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - अमर रहे* https://storymirror.com/read/story/marathi/re186hy4/amr-rhe/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ज्वालामुखीचा उद्रेक केव्हा होतो ?* 📙 आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग टणक आणि स्थिर वाटला तरी हे धरतीचं कवच अनेक खंडांमध्ये विभागलं गेलेलं आहे. हे खंड पृथ्वीच्या पोटात असलेल्या द्रव पदार्थावर तरंगत असतात. पृथ्वीच्या गाभ्यामधलं तापमान अतिशय चढं असतं. त्यापायी तिथले कातळ, दगड वितळतात आणि त्यांचं द्रवरूप मॅग्मामध्ये रूपांतर होतं. हा मॅग्माही अतिशय तप्त अवस्थेत असतो. त्यापायी त्याचा दबाव वरच्या खंडांवर पडत असतो. ज्या वेळी हा दबाव एका मर्यादेपलीकडे जातो तेव्हा तो मॅग्मा वरवर चढू लागतो. ज्वालामुखीच्या पोटातल्या या मॅग्माला वर चढण्यासाठी एक नळीसारखी मोकळी जागा सापडते. हिलाच व्हेन्ट म्हणतात. व्हेंटचं वरचं टोक ज्वालामुखीच्या उघड्या तोंडाशी जोडलेलं असतं. हा तापलेला मॅग्मा वरवर चढत असताना वाटेत आलेल्या खडकांनाही वितळवतो. त्यामुळे त्यांचं प्रमाण व दबाव वाढत जातो. वरवर जातानाच त्याचं लाव्हामध्ये रूपांतर होतं. हा लाव्हा त्या मुखाशी पोचला की जोराने बाहेर फेकला जातो. यालाच ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतात. असा स्फोट झाल्यासारखा उद्रेक झाला की राख, धूळ आणि न वितळलेले खडकांचे तुकडे वातावरणात उंच फेकले जातात. राख व खडक परत जमिनीकडे ओढले जातात. पण बाहेर पडलेला लाव्हा मात्र द्रवरूप असल्यामुळे बहुतेक वेळा ज्वालामुखीच्या बाहेरच्या बाजुवरून ओघळत खाली उतरतो. त्याचा वेग जास्त असला तर तो झपाट्याने आसपासच्या प्रदेशात पसरतो. वाटेत आलेल्या सगळ्यालाच वितळवत, जाळत तो दूरदूरवर पसरत जातो. पुरातन पॉम्पे शहराजवळच्या व्हेसुव्हियस या ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा ते सर्व शहर बेचिराख होऊन त्या लाव्हाखाली गाडलं गेलं होतं. हा लाव्हा जसा थंड होतो तसं त्याचं अग्निजन्य खडकांमध्ये रूपांतर होतं. जर उद्रेक झालेला ज्वालामुखी सागराच्या पोटात असेल तर अशा थंड झालेल्या लाव्हापासून बेटं तयार होतात. हवाई बेटांचा उगम असा झाला आहे. ज्वालामुखीचा उद्रेक एकाएकी काहीही पूर्वसूचना न देता होऊ शकतो. पण उद्रेक होण्यासाठी पुरेसा मॅग्मा तयार होऊन व्हेन्टवाटे वरवर चढत जाण्याची आवश्यकता असते. ते होण्यासाठी काही कालावधी निश्चितच जातो. त्यामुळे काही पूर्वसूचना मिळू शकतात. त्यातल्या बहुतेक भूकंपाच्या छोट्या छोट्या धक्क्यांच्या स्वरूपातल्या असतात. तर काही वेळा तापलेल्या मॅग्माच्या हालचालीमुळे जमिनीचं तापमान वाढत जातं किंवा तिथं असलेल्या तसेच गरम पाण्याच्या झऱ्यांचं तापमानही वाढत जातं. काही वेळा जमिनीला फुगवटाही येतो. पण या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी संवेदनशील उपकरणांची गरज असते. सुप्त ज्वालामुखींच्या आसपासच्या प्रदेशात ठेवलेल्या अशा उपकरणांद्वारे पूर्वसूचना मिळाल्यास तेथील नागरिकांचं स्थलांतर करून जीवितहानी टाळता येते. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अनुभवाने आलेले शहाणपण हे हजारो पुस्तकं वाचुन आलेल्या शहाणपणापेक्षा किती तरी पटीने श्रेष्ठ असते. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतात सहारा हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?* मुंबई 2) *लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते ?* मीटर 3) *दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत ?* अरविंद केजरीवाल 4) *तुकडोजी महाराज यांचे नाव काय होते ?* माणिक बंडोजी ठाकूर 5) *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुचे नाव काय होते ?* आडकोजी महाराज *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  श्रीनिवास पुसा ●  राज राठोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संपर्क, नातं व संबंध या गोष्टी नीट समजून घ्यायला हव्यात. संपर्कात असणे म्हणजे संबंधात असणे. हा संबंध कधी इतर नात्यांतून निर्माण झालेला असतो, कधी वैचारिक असतो, कधी भावनिक असतो. ते प्रेम आणि आदरातून निर्माण झालेलं असतं. सामाजिक संबंध हे घालून दिलेल्या मानदंडातून निर्माण झालेले असतात. पती आणि पत्नी यांच्यात भावनिक, बौद्धिक, आत्मिक संबंध असतोच का ? फार कमी 'आहे' असे उत्तर येऊ शकेल, कधी कधी नसतो देखील ! केवळ सामाजिक व्यवस्थेप्रमाणे तो संपर्क किंवा संबंध असतो.* *एखाद्या व्यक्तिविषयी आपण जेंव्हा विचार करतो तो ती व्यक्ती कालपर्यंत कशी होती, यावरून तिच्याबाबत आपल्या मनात एक प्रतिमा तयार झालेली असते. त्यातूनच आपण त्या व्यक्तिकडे बघत असतो. पण, आज ती व्यक्ती वेगळी असू शकते. म्हणून केवळ भूतकाळाच्या प्रतिमेवरून विचार करून चालणार नाही. खरा संपर्क, संबंध, प्रेम असणार असेल तर ते भूतकाळात आणि भविष्यकाळात असत नाही; ते असतं वर्तमानकाळात..या क्षणात आणि आता ! जेंव्हा आपल्यातलं मनुष्यत्व वाढत राहतं, पुढे जात राहतं आणि असं होत राहिलं की मग कालचा मनुष्य आणि आजचा मनुष्य यात तफावत आढळते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर  सतगुर  ना  मिल्या , रही  अधूरी  सीश  | स्वांग जाति का पहरी कर ,  घरी  घरी  मांगे  भीष  || अर्थ :       महात्मा कबीर गुरूचे जीवनातील अनन्य साधारण असणारे महत्त्व सांगताना म्हणतात की, जीवन जगताना असो की शिक्षण घेताना असो गुरू असलाच पाहिजे.  गुरू (मार्गदर्शक) भेटला नाही ज्ञानाची अर्धवट प्राप्ती होते. अर्धवट ज्ञान  आत्मघातकी ठरतं.  ते जीवनाच्या वाटेवर सर्वात घातक ठरू शकते. महाभारतातील अभिमन्यूचा प्रसंग समजून घेतला तरी अर्धवट ज्ञान किती धोकादायक ठरतं हे पुढील पिढ्यांच्या ध्यानी यायला वेळ लागणार नाही. अभिमन्यू कुशल योद्धा होता. चक्रव्युहात घुसणे जाणत होता परंतु चक्रव्पुह भेदण्याची कला त्याला जमत नव्हती. त्यातच त्याला प्राण गमवावा लागला.        अर्धवट ज्ञानी पारंगत असल्याचं ढोंग करतो. या ढोंगापायी त्याला नकल करावी लागते. नकल करणारा परिपूर्ण असत नाही. अशा व्यक्तींच्या माध्यमातूनच अंधश्रद्धा व चुकीच्या रुढी समाजात पसरवल्या जातात. ही अर्धशिक्षित फौजच समाजाला चुकीच्या दिशेनं नेते. संभ्रम निर्माण करीत असतात. स्वतःच्या मार्गाला विवेकाची जोड नसल्याने स्वतःचीच फसगत करून घेतात.  प्रसंगी पथ भरकटून भीक मागण्याचेही त्यांच्या नशिबी येते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपल्या दररोजच्या जीवनात एक चांगला विचार केला आणि आचरणात आणला तर अनेक चांगल्या गोष्टींवर विजय मिळवू शकतो.तो विचार आपल्यासाठी प्रेरणा व इतरांसाठी प्रेरणादायी ठरु शकते.आपल्या एका चांगल्या विचारांमुळे इतरांच्या जीवनात जे वाईट विचार सदैव घोळत असतात आणि त्या विचारांमुळे त्यांच्या प्रगतीऐवजी दिवसेंदिवस अधोगती व्हायला लागते ती अधोगती आपल्या सानिध्यात आल्यामुळे व आपल्या चांगले विचार ऐकल्यामुळे थांबू शकते.आपल्या एका चांगल्या विचारांमुळे इतरांच्या जीवनात चांगली प्रगती होत असेल तर आपण आपल्यासाठीच नाही तर इतरांसाठी व समाजासाठी काहीतरी चांगले केल्याचे समाधान वाटेल.चांगल्या विचारातून केव्हाही चांगलेच उगवले जाते हे मात्र नक्की आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🍃🌱🍃🌱🍃🌱🍃🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरुड आणि डोमकावळा* एका गरूडाने कुरणात चरत असलेल्‍या मेंढ्यांच्‍या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्‍या कोकराला पळवून नेले. त्‍याचे हे धाडस आणि सामर्थ्‍य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्‍या गरूडाकडे भीतीयुक्‍त आदराने पाहू लागले. 'गरूडाने पळवले त्‍यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्‍मान वाढेल, त्‍याच्‍याइतकीच प्रतिष्‍ठा आपल्‍याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले.  त्‍यासाठी त्‍याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्‍या पाठीवर बसून त्‍याला उचलण्‍याचा प्रयत्‍न केला पण ते कोकरू उचलले जाण्‍याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्‍या पाठीवरील लोकरीमध्‍ये अडकले व तिथून सुटण्‍यासाठी त्‍याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्‍या कानी गेली. तो तिथे आला व त्‍याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्‍याला स्‍वत:च्‍या मुलांच्‍या स्‍वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्‍याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्‍हणाला,'' या मूर्ख पक्ष्‍याला जर तुम्‍ही याचे नाव विचारले तर हा स्‍वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्‍ठ असा पक्षी म्‍हणून स्‍वत:ची ओळख करून देईल पण प्रत्‍यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.''  *तात्पर्यः प्रत्यक्षात वेगळे आणि अप्रत्यक्षपणे वेगळा मोठेपणाचा आव काही लोक आणत असतात.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment