*🌹जीवन विचार*🌹 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 आनंद हा अमृतासमान असतो त्यासाठी दुःखाचे समुद्र मंथन करावे लागते तरच जीवनाचा खरा आनंद उमजतो आणि हा उमजलेला आनंदरुपी आनंद अमृतासमान असतो. आनंद आणि दुःख हे दोन्हीही अविभाज्य असतात.आणि अनेकदा बरोबरच येतात.जीवनात दुःखाशिवाय आनंदाची किंमत कळत नाही.तापलेल्या लोखंडाला हातोड्याचे घाव सहन करूनच मगच त्याला हत्याराचा आकार प्राप्त होतो. जीवनात अनेक सुखदुःखाचे प्रसंग येतात.आपल्या या जीवनात जीवनरुपी सागरात सुखाचे मोती आणि शिंपलेही आहेत.आनंद हा सर्व सृष्टीत , आपुलकीत कौतुकात, मैत्रीत अशा अनेकविध मध्ये सामावलेला आहे.फक्त तशी दृष्टी हवी. जीवनात सुख दुःखाचा खेळ हा अविरत सुरू असतो. 〰〰〰〰〰〰 ☘☘☘☘☘☘☘ 🙏शब्दांकन / संकलन🙏 ✍ प्रमिलाताई सेनकुडे हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰

No comments:

Post a Comment