✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/04/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली. १९७१: द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली 💥 जन्म :- १४७८: हिन्दी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य संत सूरदास  💥 मृत्यू :-  १९७५: भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवासाच्या स्वीडन आणि ब्रिटन दौऱ्यावर रवाना* ----------------------------------------------------- 2⃣ *सीरियातील अस्थिरतेमुळे पेट्रोलचे दर 90 रूपयांवर जाण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 3⃣ *जालना : जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांची बदली. मुंबई शहरचे जिल्हाधिकारी म्हणून होणार रुजू.* ----------------------------------------------------- 4⃣ *रत्नागिरी : ॲट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही बदल केलेला नाही. त्यांनी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत - केंद्रीय मंत्री रामदास आठवले* ----------------------------------------------------- 5⃣ *सावंतवाडी येथे भरती मेळावे घेतलेल्या २२ कंपन्यांना गोवा सरकारच्या नोटिसा.* ----------------------------------------------------- 6⃣ *मक्का मशीद स्फोट: सुनावणी घेणारे विशेष एनआयए कोर्टाचे न्यायाधीश आर. रेड्डी यांनी दिला राजीनामा* ----------------------------------------------------- 7⃣ *‘आयपीएलच्या बॅनर’मुळे पश्चिम रेल्वेला ‘ब्रेक’ !, कोलकात्याचा दिल्लीवर 71 धावांनी सहज विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *पर्यावरण आणि मानवी जीवन ( सामना )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://www.saamana.com/environment-and-human-life/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या शहरात उत्तर महाराष्ट्राचे, नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी लेणी ही बौध्द लेणी आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची नापा व्हॅली' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशकात गंगापूर येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ(य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी ॲन्ड इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको नावाचा शहराचा एक नवीन विभाग वसवला आहे.मुंबई व पुण्याप्रमाणेच नाशिक शहर विकास प्राधिकरण स्थापन झालेले शहर आहे. पंचवटी हाही नाशिकचा एक भाग आहे.नाशिक मधील अशी धार्मिक स्थळ पाहिल्याबरोबर आपल्याला पुरातन काळाचे महत्व कळते. नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. या महाकाव्यानुसार  लक्ष्मणाने  रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. त्यामुळे या जागेचे नाव 'नासिक' असे पडले.  *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधार होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  बांगलादेशाची स्थापना केंव्हा झाली ?* 👉 1971 *२) बभारतात पहिली लोकसभा केंव्हा अस्तित्वात आली ?* 👉   1952 *३)  भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते ?* 👉 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 शेखर गिरी, साहित्यिक 👤 चंद्रशेखर अनारे 👤 राजू मेकाले 👤 चंद्रकांत तालोड 👤 योगेश मरकंटी 👤 देवराव पाटील कदम *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रीमंती* पैसा असला म्हणून कोणी श्रीमंत होत नसतो प्रचंड पैसेवालाही एखादा गरीब रहात असतो श्रीमंती धनाची नाही मनाची असावी लागते गरीब व्यक्ती श्रीमंता पेक्षा चांगली वागते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रीपूर येथील राजा यांच्‍या निधनानंतर त्‍यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्‍यपदी बसविण्‍यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता पण अनुभव पाठीशी कमी असल्‍यामुळे अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशावेळी त्‍याची माता त्‍याला हिंमत देत असे व योग्‍य मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्‍या राज्‍यातील गंगानगरमधील राजा भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्‍ही सैन्‍ये एकमेकांना भिडली, तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते. दोनच दिवसात भीमसेन यांनी चार मैल भागावर आपला ताबा मिळविला. राजवीरच्‍या तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्‍याला हार पत्‍करावी लागली हे ऐकले तेव्‍हा राजमातेने मनातल्‍या मनात काही ठरवले.* *राजवीर झोपण्‍याआधी राजमातेचे दर्शन घेण्‍यासाठी आला तेव्‍हा राजमाता लहान लहान सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र बांधून लोखंडाच्‍या मोठ्या तुकड्याला तोडण्‍याचा प्रयत्‍न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले,’’आई, सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही’’ राजमाता म्‍हणाली,’’खरं बोललास, संख्‍येने मजबुतीला पराजित केले जाऊ शकत नाही त्‍याप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्‍हा. शत्रूची कितीही संख्‍या तुम्‍हाला तोडू शकणार नाही अशी ताकद तुमच्‍यात आहे ती जागृत करा. तुमच्‍या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल.’’ राजवीरने याप्रमाणे केले व त्‍याने भीमसेनाला हरवून युद्धात विजय संपादन केला. दृढ मनोबलाने हारलेले युद्धही जिंकता येते. काही वेळेला दृढनिश्‍चय, ठाम मनोबल हेच यशाचे इंगित असते.* ••●🔹‼ *रामकृष्णहरी* ‼🔹●•• 🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखादा चांगला विचार तुमच्या जीवनात खूप काही चांगली प्रेरणा देते आणि जीवनच बदलून टाकते.त्या एका चांगल्या विचारामुळेच तुमचा जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक मजबूत बनतो.तुम्ही भूतकाळ विसरून येणा-या भविष्याची अधिक चांगली अपेक्षा कराल.तुम्हाला काहीतरी नवे करण्याची इच्छा निर्माण होते आणि तुमच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण करते. पण एखादा वाईट विचार जर केलात तर तुम्ही तुमच्या जीवनात अपमान, मानहानी, जीवनात निरुत्साह निर्माण करुन तुमच्या जीवनाला अधोगतीकडे नेल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवन आनंदी, सुखी, समाधानी जगायचे असेल तर दररोज एक चांगला विचार संतांचा, विचारवंतांचा किंवा ज्यांनी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरीत केले त्यांना कधीही विसरु नका.कारण ते तुमच्या जीवनाचे खरे प्रेरणास्थान आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली* - अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *अर्थ* एक पंडित स्वतःला फार मोठा विद्वान समजत असे. त्याच्या मनात विचार आला कि राजाच्या समक्ष राजपुरोहीताशी शास्त्रार्थ केला पाहिजे. मला कोणी हरवू शकत नाही याचा त्याला गर्व झाला होता. राजपुरोहिताला हरविले कि राजाला आपली विद्वत्ता माहित होईल आणि त्याद्वारे राजा आपणास बक्षीस पण देईल असे त्याच्या मनात होते. त्यानुसार ठरवून तो राजदरबारात गेला, त्याने पुरोहिताला शास्त्रार्थ करण्यासाठी आव्हान दिले. राजपुरोहीताने पंडिताला प्रथम प्रश्न विचारण्यास सांगितले, पंडिताने प्रश्न केला,"पाच मी, पाच शी, पाच न मी आणि पाच न शी याचा अर्थ सांगा?" राजपुरोहीताला प्रश्न समजला नाही. त्याने राज्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी ७ दिवसांची मुदत मागून घेतली. राजाने मुदत दिली मात्र सात दिवसानंतर मृत्युदंड कबुल असेल तरच. सात दिवसात पुरोहिताने उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण बुद्धीने,नशिबाने साथ दिली नाही. मोठमोठ्या विद्वानांना हि या प्रश्नाचे उत्तर विचारून पाहिले पण त्यानाही यातील कुट शोधता आले नाही. राजपुरोहिताने विचाराची दिशा सोडून दिली, आता फक्त मृत्यूचा विचार तो करत होता. मृत्युच्या भीतीने त्याने नगर सोडून दिले, गावाबाहेर चालत राहिला, चालून चालून थकला तेंव्हा एका झोपडीपाशी जावून बसला. योगायोगाने ती झोपडी त्या पंडिताची होती आणि तो आपल्या पत्नीशी बोलत होता. पंडित बायकोला प्रश्नाचे उत्तर सांगत होता,"माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने राजपुरोहित मरणार हे खरे ! अगं ! पंधरा तिथीमध्ये पाच तिथी अशा असतात कि त्यांच्या पुढे 'मी' प्रत्यय लागतो -पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी तसेच पाच तिथी अशा असतात ज्यामध्ये 'शी' प्रत्यय लागतो-एकादशी,द्वादशी,त्रयोदशी,चतुर्दशी आणि पुर्णमाशी आणि पाच तिथीमध्ये मीही लागत नाही आणि शी हा प्रत्यय लागत नाही-प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि षष्ठी. बघ हे उत्तर राजपुरोहीताला कधीच येणार नाही." हे बाहेरून पुरोहिताने ऐकले आणि दुसऱ्या दिवशी दरबारात उत्तर दिले व स्वत:चा जीव वाचविला. अहंकारी पंडिताला राजाने दंड केला. *तात्पर्य- दुसऱ्याला कधीही कमी लेखू नये कारण आपण या ना त्या प्रकारे त्या अवस्थेत जावू शकतो.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment