✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/04/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९१६: होम रुल लीगची स्थापना झाली. 💥 जन्म :- १९३१: लेखक मधु मंगेश कर्णिक  💥 मृत्यू :-  १९९२: ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. विनायक कृष्ण गोकाक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *UPSC चा निकाल जाहीर, उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरीष बदोले यांचा महाराष्ट्रातून पहिला, तर देशात विसावा क्रमांक* ----------------------------------------------------- 2⃣ *डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती.* ----------------------------------------------------- 3⃣ *मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात 20.6 टक्के वाढ; उद्योग समूहाचा एकूण नफा 36,075 कोटी* ----------------------------------------------------- 4⃣ *९८ वं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन मुलुंडमध्ये होणार; १३ ते १५ जून कालावधीत संमेलन होणार* ----------------------------------------------------- 5⃣ *गडचिरोली पाठोपाठ छत्तीसगडमध्येही नक्षलवाद्यांचा खात्मा, 7 नक्षलवाद्यांना कंठस्नान.* ----------------------------------------------------- 6⃣ *जळगावच्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाकडून घेण्यात आलेल्या कथा आणि काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर, कथा स्पर्धेत नागोराव येवतीकर यांच्या प्रामाणिक वसंता या कथेला प्रथम पारितोषिक* ----------------------------------------------------- 7⃣ *IPL 2018 : दिल्लीचा कोलकात्यावर 55 धावांनी विजय* ----------------------------------------------------- *विशेष सूचना - शाळेला सुट्या लागल्यामुळे उद्यापासून दिनांक 15 जूनपर्यंत ही सेवा उपलब्ध होणार नाही. याची सर्व वाचक मित्रांनी नोंद घ्यावी.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *परावलंबी जीवन* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_28.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *जळगाव* जळगाव जिल्ह्यास पूर्वी पूर्व खानदेश हे नाव होते. जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, आग्नेयेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , नैर्ऋत्येस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते., ही शेती भारतातील इतर शेतकर्‍यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० चौरस किमी आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंठा पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा ही कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जळगाव जिल्हा हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणीदेखील बोलली जाते. जिल्ह्यात सरासरी ६९० मिलिमीटर इतका पाऊस पडतो. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- तापी, पूर्णा, गिरणा, वाघूर,अंजनी प्रसिद्ध कवी बालकवी व कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या जळगाव जिल्ह्यातील होत्या तर साने गुरुजी ह्यांची हा जिल्हा ही कर्मभूमी होती. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो,  भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  लाल बहादुर शास्त्री यांची समाधि कोठे आहे ?* 👉🏼   विजयघाट *२) भारतात हरितक्रांति चे जनक कोणास म्हटले आहे ?* 👉🏼    एम. एस. स्वामीनाथन *३) शेवटचे मुगल शासक कोण होते ?* 👉🏼    बहादुर शाह जफर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नागेश चिंतावार, प्राथमिक शिक्षक सचिव, भास्कर पतपेढी, नायगाव 👤 गौतम वाघमारे 👤 विवेक बैसकर 👤 नामदेव पांचाळ *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *पारदर्शकता* पारदर्शकता म्हणतात ती खरंच असते का? पारदर्शकता म्हणतात ती तिथं असते का? पारदर्शक म्हटले तरी त्यावर आळ असतो खरंच पाहिलं तर तिथे ही घोळ असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'गुरू' हे जन्मालाच यावे लागतात, त्यांच्याकडे गुरूपदाला पोहचण्याची विद्वत्ता असते, पात्रता असते. धर्माचरण कडक पाळण्याची त्यांची दक्षता असते. अशा गुरूंच्या वाणीला सामर्थ्य आलेले असते, त्यांना अपरोक्षज्ञान प्राप्त असते. सतत ईश्वराच्या नामस्मरणामुळे मन:शांती असते. शरीरात वास करीत असलेल्या ईश्वराला कसलाच त्रास होऊ नये म्हणून कडक शुचिर्भूतता पाळलेली असते. गुरूंनी तर, ज्या शरीरात ईश्वराचे वास्तव्य आहे त्या शरीराला वस्त्रांचाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने वस्त्र परिधान केलेली असत.* *'गुरू' मानणे हे कोणाला कमीपणाचे वाटत असेल तर तो माणूस कधीच शिक्षणास पात्र होऊ शकत नाही. आपल्याकडे 'गुरूशिष्य' परंपरा महान आहे, आणि गुरूप्रती विनम्र भाव ठेवल्यास गुरू प्रसन्न होऊन त्यांच्याकडचे ज्ञानभांडार शिष्यांपुढे मोकळे करतात. जे जे म्हणून गुरूपदी पोहचले ते सर्व आधी उत्तम शिष्य झाले आणि नंतर गुरूपदी पोहचले. असे काही गुरूशिष्य पाहाताना ईश्वरी शक्तीचा साक्षात्कार होतो.* ••●🥀‼ *रामकृष्णहरी* ‼🥀●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= देशाच्या सीमेवर लढणारा जवान कधीच मागे वळून पाहत नाही. कारण मागे आपण सुरक्षित आहोत हे त्याला माहीत असते. धोका आहे फक्त समोर. समोरच्या शत्रूला आपण कसे नष्ट करू हाच विचार सदैव त्याच्या समोर असतो. जर का आपण थोडे जरी दूर्लक्ष केलो तरी आपण आपला जीव गमावू शकतो म्हणून तो समोर येणा-या संकटाला डोळ्यात तेल घालून जागत असतो. ज्याप्रमाणे सीमेवरच्या जवानाचे आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्यपणे जीवन जगणा-या माणसांचेही आहे. जीवनात समोर येणारे कोणतेही संकट सांगून थोडेच येणार आहे ? मग ते आर्थिक असो, कौटुंबिक असो किंवा अजून कोणतेही असो. यांना आपण कसे तोंड देता येईल आणि बाजूला कसे दूर करता येईल याची जर सावधानता बाळगली तर कोणतीही काळजी करायची गरज नाही. मागे गेलेल्या काळाला पहायची गरज नाही परंतु येणा-या काळाला जर आपण दक्ष राहिले तर कोणतेही संकट निश्चितच दूर होऊ शकते आणि जीवन सुखावह होऊ शकेल. हा विचार नेहमी माणसाने सातत्याने करायला पाहिजे आणि त्यासाठी माघार न घेता सतर्क राहायला शिकले तरच जीवनात यशस्वी होऊ शकतो. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.9421839590/8087917063. ⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜ =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *ओळखीचे चार जीवे न सोडी* - ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कृती* एका गावात एक गरीब माणूस राहत होता शिक्षण नाही त्यामुळे कोणते चांगले कामही मिळत नव्हते, तो भिक्षा मागून आपले पोट भरत होता. एके दिवशी त्याला भिक्षेच्या रुपात तांदूळ मिळाले, तांदूळ त्याला फार दिवसांनी मिळाले होते. तो फार आनंदी होता. दुसऱ्या एका घरातून त्याला भाकरी आणि भाजी मिळाली. त्याने ती भाजीभाकरी खाल्ली आणि तांदूळ एका मडक्यात भरून भिंतीला असलेल्या खुंटीला अडकवून ठेवले. तो खाटेवर पडून आराम करू लागला.मडक्याला पाहून तो विचार करू लागला, त्यात आज तांदूळ आहेत. उद्याही तांदूळ मिळाले तर मडके अर्धे भरून जाईल, आणि असे जर तांदूळ मिळताच राहिले तर काही दिवसातच मडके तांदळाने भरून जाईल.मग आपण तांदळासाठी अशी ४-५ मडकी करू. २-३ महिन्यानंतर एक लहान पोतेभर तांदूळ जमा झाले कि ते तांदूळ आपण विकून टाकू. त्यातून पैसा मिळेल मग आपण अजून तांदूळ खरेदी करू ते जास्त भावाने विकू त्यात पैसा मिळेल असे करता करता आपल्याला भरपूर पैसा मिळू लागेल. पैसा जमा झाला कि आपण लग्न करू, मग मुले होतील, ती सुंदर आणि खोडकर असतील. मुलांना मी चांगले संस्कार करेन, त्यांनी जर ऐकले नाही तर तर त्यांना लाथ मारेन, असे विचार करत असताना त्याने खरोखरीच एक लाथ हवेत मारली आणि त्याच्या दुर्दैवाने ती लाथ तांदळाच्या मडक्याला बसली. त्याबरोबर ते मडके लाथेने हवेत भिरकावले गेले आणि मडके खाली पडून फुटले. त्यातील सगळे तांदूळ घरात साचलेल्या घाणेरड्या जागेत पडले. त्यासोबतच त्याचे स्वप्न भंग पावले. *तात्पर्य-कृती महत्वाची आहे. कृती आणि विचार यात जर साम्य नसेल तर हानी होते. जे विचारात आहे तेच कृतीत असायला हवे.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment