✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/04/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  1853 - भारतातील पहिली रेल्वेगाडी बोरीबंदर ते ठाणे लोहमार्गाने धावली. 💥 जन्म :- 1867 - विल्बर राईट, अमेरिकन विमान संशोधक 1889 - चार्ली चाप्लिन, विनोदी अभिनेता 💥 मृत्यू :-  २०००: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तसेच शाहू महाराजांचे चरित्रकार अप्पासाहेब पवार  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गडचिरोली - महिला व बाल रुग्णालयाचे उदघाटन प्रसंगी दोन वर्षात गडचिरोली जिल्ह्याला बेघरमुक्त करणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले* ----------------------------------------------------- 2⃣ *आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू २० एप्रिलला करणार उपोषण* ----------------------------------------------------- 3⃣ *राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद व चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द अभिनेते विजय चव्हाण यांना घोषित. * ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : शेतकरी कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्यासाठी १ मे पर्यंतची मुदत वाढ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय* ----------------------------------------------------- 5⃣ *गोल्ड कोस्टवर सोन्याची लयलूट करत भारतानं जिंकली एकूण ६६ पदकं* ----------------------------------------------------- 6⃣ *इंडियन रेसलिंग स्टाइल इंटरस्टेट रेसलिंग टूर्नामेंट (महिला कुस्ती) स्पर्धेत ठाण्याच्या देवकी देवीसिंग राजपूत यांनी 'महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब' पटकावला* ----------------------------------------------------- 7⃣ *भारताचे सुवर्ण हुकले, किदम्बी श्रीकांतला रौप्य पदकावर मानावे लागले समाधान* ----------------------------------------------------- *आय पी एल बातमी -  : रोमहर्षक लढतीत पंजाबचा चेन्नईवर चार धावांनी विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *देशातील एकता कशी टिकेल ? ( सकाळ )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://www.google.co.in/amp/amp.esakal.com/citizen-journalism/esakal-news-nagorao-yevtikar-writes-about-unity-79766?source=images आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *जळगाव* जळगाव जिल्ह्यास पूर्वी पूर्व खानदेश हे नाव होते. जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, आग्नेयेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , नैर्ऋत्येस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते., ही शेती भारतातील इतर शेतकर्‍यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० चौरस किमी आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंठा पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा ही कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जळगाव जिल्हा हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणीदेखील बोलली जाते. जिल्ह्यात सरासरी ६९० मिलिमीटर इतका पाऊस पडतो. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- तापी, पूर्णा, गिरणा, वाघूर,अंजनी प्रसिद्ध कवी बालकवी व कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या जळगाव जिल्ह्यातील होत्या तर साने गुरुजी ह्यांची हा जिल्हा ही कर्मभूमी होती. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधिशाची नेमणूक कोण करते?* 👉     राज्यपाल *२)  कोणत्या कायदान्वये भारतात निवडणुकांचा पाया घातला गेला?* 👉     भारतीय परीषद कायदा १८९२ *३)  भारतीय राज्यघटनेत सर्वसामान्यपणे अंदाजपत्रक हा शब्द कोणत्या कलमात नमूद करण्यात आला आहे?* 👉     कलम २६६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 कु. हिंदुजा शिवाजी अन्नमवार, नांदेड 👤 नितीनकुमार अंबेकर, भावसार 👤राज नागुल, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *दिखावा* आपल्याकडे कामं कमी अन् दिखावाच जास्त आहे असले काम करणाराला वाटते आपलेच रास्त आहे दिखाव्या पेक्षा जास्त आपल काम बोलत असतं दिखाव्यावाल्यांच काम जास्त दिवस चालत नसतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रीपूर येथील राजा यांच्‍या निधनानंतर त्‍यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्‍यपदी बसविण्‍यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता पण अनुभव पाठीशी कमी असल्‍यामुळे अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशावेळी त्‍याची माता त्‍याला हिंमत देत असे व योग्‍य मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्‍या राज्‍यातील गंगानगरमधील राजा भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्‍ही सैन्‍ये एकमेकांना भिडली, तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते. दोनच दिवसात भीमसेन यांनी चार मैल भागावर आपला ताबा मिळविला. राजवीरच्‍या तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्‍याला हार पत्‍करावी लागली हे ऐकले तेव्‍हा राजमातेने मनातल्‍या मनात काही ठरवले.* *राजवीर झोपण्‍याआधी राजमातेचे दर्शन घेण्‍यासाठी आला तेव्‍हा राजमाता लहान लहान सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र बांधून लोखंडाच्‍या मोठ्या तुकड्याला तोडण्‍याचा प्रयत्‍न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले,’’आई, सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही’’ राजमाता म्‍हणाली,’’खरं बोललास, संख्‍येने मजबुतीला पराजित केले जाऊ शकत नाही त्‍याप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्‍हा. शत्रूची कितीही संख्‍या तुम्‍हाला तोडू शकणार नाही अशी ताकद तुमच्‍यात आहे ती जागृत करा. तुमच्‍या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल.’’ राजवीरने याप्रमाणे केले व त्‍याने भीमसेनाला हरवून युद्धात विजय संपादन केला. दृढ मनोबलाने हारलेले युद्धही जिंकता येते. काही वेळेला दृढनिश्‍चय, ठाम मनोबल हेच यशाचे इंगित असते.* ••●🔹‼ *रामकृष्णहरी* ‼🔹●•• 🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= या जगात आतापर्यंत विद्वान माणसे शरीराने जरी या जगातून गेली असली तरी ती आपल्या विचारांनी अमरच झालेली आहेत.कारण त्यांचे विचार हे सर्वसामान्य माणसेही आपल्या जीवनात आदर्श विचार मानून त्या विचारांच्या मार्गावरुन चालतात म्हणजे विचार रुपाने ते सदैव आपल्या जीवनात पाठराखण करत असतात.म्हणतात ना ' मरावे परी कीर्तीरुपी उरावे ' म्हणजेच विद्वान माणसे आपल्या जीवनात सदैव आपल्या विचारांच्या,कार्याच्यारुपाने आपल्यामध्येच असतात हे ध्यानात ठेवून आपणही त्यांचा मार्ग अनुसरावा म्हणजे आपणासही विचाररुपी अमरत्व प्राप्त होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590/8087917063. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आचार भ्रष्टी सदा कष्टी - ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो दुःखी असतो.* *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *विनम्रता* राजाचे आगमन झाले होते, लोक रांगेत उभे होते, राजांच्या मनात प्रजेबाबत आस्था होती कारण तो राजा प्रजेचे हित जाणणारा होता. राजाच्या रथाच्या पुढे मंत्री, सेनापती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रथ होते. सर्वात पुढे सैनिक गर्दीला नियंत्रित करीत होते. या जनसमुदायामध्ये एक अंध संन्यासी पण उभा होता. त्याला या अद्भुत सोहळ्याचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे तो रांगेतून बाजूला उभा होता. जेंव्हा वाजंत्रीवाले जवळ आले, तेंव्हा सैनिक ओरडू लागले, "सरका ! दूर व्हा! बाजूला व्हा!" अंध संन्यासी म्हणाला,"समजले !" मंत्र्याचा रथ आल्यावरही त्याने संन्याशासहित सर्वाना तसाच दूर होण्याचा आदेश सुनावला. संन्याशी परत उत्तरले,"समजले". असेच सर्व सेनापतीचे रथ येताना झाले, त्यावेळेसही सैनिकाचे आणि संन्याशाचे वरीलप्रमाणेच म्हणणे आले. सर्वात शेवटी राजाचा रथ आला. संन्याशाला पाहताच राजा तत्काळ रथाच्या खाली उतरला आणि त्यांच्या पाया पडत म्हणाला,"आपण या गर्दीत येण्याचे का बरे कष्ट घेतले? आपण जर आज्ञा केली असती तर मी तुमच्या आश्रमात येवून तुमची भेट घेतली असती." संन्याशी या वेळीही म्हणाला,"समजले !!" राजाने संन्यासी वृद्धाला विचारले,"महाराज ! मी फारसे काही न बोलता आपण समजले असे म्हणता?" तेंव्हा संन्यासी म्हणाले,"आपल्या या सर्व लवाजम्यात मी फक्त आवाजावरून, उच्चारावरून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून काही निष्कर्ष काढले, ते माझे बरोबर आले त्याला मी समजले म्हणत होतो. सैनिकाचा, सेनापतीचा,मंत्र्याचा वेळेचा सूर हा वेगळा होता आणि मृदू आवाज हा केवळ राजाचा असू शकतो याची मला खात्री होती. राजा मनातून काय समजायचे ते समजला. त्याने त्या अंध संन्याशाला रथातून आश्रमात सोडण्याची व्यवस्था केली. *तात्पर्य-विनम्रतेतून महानता प्रकट होत असते. त्यामुळे कितीही उंची मिळाली तरी अहंकारापासून दूर राहता आले पाहिजे.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment