✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/02/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९१९ - जालियानवाला बागची कत्तल - भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ही एक महत्त्वाची घटना होती. १९३९ - भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना. 💥 जन्म :- १९१३ - दत्ताजी ताम्हाणे, स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी विचारवंत. 💥 मृत्यू :-  २००८ - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *जम्मू-काश्मिरात पूंछ व राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात वैजापूर तालुक्यातील फरीदाबाद येथील रहिवासी जवान किरण थोरात यांना वीरमरण* ----------------------------------------------------- 2⃣ *अॅट्रॉसिटी : कोर्टाला कायदा बदलण्याचा अधिकार नाही; केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात उत्तर* ----------------------------------------------------- 3⃣ *नांदेड - कुंडलवाडी नगरपालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसचे शेख मुखत्यार विजयी, सत्ताधारी भाजप उमेदवाराचा 252 मतांनी केला पराभव* ----------------------------------------------------- 4⃣ *वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड* ----------------------------------------------------- 5⃣ *परभणी - परभणी येथे महसूल आयुक्तालय स्थापन करावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परभणीकर संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू* ----------------------------------------------------- 6⃣ *राष्ट्रकुल स्पर्धा: महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेने सुवर्णपदक जिंकले* ----------------------------------------------------- 7⃣ *गोल्ड कोस्ट - कुस्तीपटू सुशील कुमारने पुरुषांच्या 74 किलो वजनी गटात जिंकले सुवर्णपदक* ----------------------------------------------------- *किदम्बी श्रीकांत ठरला जगातील अव्वल बॅडमिंटनपटू, श्रीकांतने जागतिक क्रमवारीतील पुरुषांच्या विभागात डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सलसनला पिछाडीवर टाकत अव्वल स्थानाला गवसणी घातली आहे* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणीचे महत्व ( सामना )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://www.saamana.com/nagorao-yevatikar-article-on-born-and-dead-registration/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बीड जिल्हा* हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी आहे. जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड़ कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात. बीड जिल्ह्यातील माजलगाव हा एक सधन तालुका म्हणून ओळखला जातो.मांजरसुभाहून बीडकडे जाताना पालीघाट लागतो. गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. या भागास गंगथडी असेही म्हणतात. हा सुपीक भाग गाळापासून बनला आहे. यात गेवराई, माजलगाव व परळी या तालुक्यांचा समावेश होतो. परळी येथे वैद्यनाथ मंदिर आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा पाळायला शिका *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो ?* 👉      २४ नोव्हेंबर *२)  स्थानिक स्वराज्य संस्था सुरू  करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?* 👉      राजस्थान *३)  मनरेगा योजनेअंतर्गत लाभार्थ्याना मजूरी वाटप करण्याची जबाबदारी कोणाची असते ?* 👉      ग्रामसेवक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विठ्ठल वाघमारे 👤 दर्शन जोशी 👤 यश सब्बनवार 👤 व्यंकटेश पाटील 👤 यादव ऋरामे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *वाणी* लोक या बोटावरचं त्या बोटावर आणतात आपण तसं केलच नाही असे राजरोस म्हणतात खुप जपावं लागत आपल्या जबानीला अशाने किंमत कशी राहील बोलणा-याच्या वाणीला शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'आयुष्यात' संगतीला फार महत्त्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो. 'संतसंगती' लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते. ज्यांच्याशी आपण संगत करातो, त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात.* *देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात, तर संतसंगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे ?* *प्रवासात आपल्या शेजारी विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाइलाजाने तिथेच बसावे लागते. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक, घातक असते.* *"सत्पुरूषाची संगत ही उत्तम, लाभदायी ठरते. संतसंगतीपासून 'सद्‌भावना' आणि 'सद्‌विचार' प्राप्त होतात."* ••●🌱‼ *रामकृष्णहरी* ‼🌱●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= या जगात आतापर्यंत विद्वान माणसे शरीराने जरी या जगातून गेली असली तरी ती आपल्या विचारांनी अमरच झालेली आहेत.कारण त्यांचे विचार हे सर्वसामान्य माणसेही आपल्या जीवनात आदर्श विचार मानून त्या विचारांच्या मार्गावरुन चालतात म्हणजे विचार रुपाने ते सदैव आपल्या जीवनात पाठराखण करत असतात.म्हणतात ना ' मरावे परी कीर्तीरुपी उरावे ' म्हणजेच विद्वान माणसे आपल्या जीवनात सदैव आपल्या विचारांच्या,कार्याच्यारुपाने आपल्यामध्येच असतात हे ध्यानात ठेवून आपणही त्यांचा मार्ग अनुसरावा म्हणजे आपणासही विचाररुपी अमरत्व प्राप्त होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590/8087917063. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *असतील शिते तर जमतील भुते* - एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चतुर ससे* एका जंगलात दोन चतुर ससे राहत होते.ते एकदा जंगलात फिरत आसतांना त्यांना एका झाडाखाली एक वाघ बसलेला दिसला.ससे खूपखूप घाबरले पण ते खूपच चतुर होते.त्यातील एकाने झाडाच्या फांद्या तोडल्या व अंगाभोवती गुंडाळल्या.उड्या मारतमारत तो वाघासमोरून निघून गेला.वाघ पाहतच राहिला. लगेचच दुसरा ससा ऐटीत वाघासमोर आला व म्हणाला ,"वाघदादा आपल्या जंगलात चालणारे व प्राण्यांना खाणारे झाड आले,ते तुम्ही पाहिले का?" वाघ मनातून घाबरला.त्याने नुकतेच चालणारे झाड पाहिले होते.वाघ काहीच बोलला नाही.तेवढयात दुसरा ससाही तेथून पळून गेला.अशा त-हेने मोठ्या युक्तीने सशांनी आपली सुटका करून घेतली. *बोधः "शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ".* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment