✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/04/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक पुस्तक दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १६३५: अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली 💥 जन्म :- १८५८: समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती  💥 मृत्यू :-  १९९२: ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात जाणार चीनच्या दौऱ्यावर, 27 आणि 28 एप्रिलला शी जिनपिंग यांच्यासोबत शिखर बैठकीत घेणार सहभाग* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - काबूल आणि बगलान येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा भारताने केला निषेध, जखमींवरील इलाजासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे दिले आश्वासन* ----------------------------------------------------- 3⃣ *सावंतवाडी - वेंगुर्लेत समुद्राच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ उंच उंच लाटा समुद्र सुरक्षा रक्षकासह पोलीस वेंगुर्ले बंदरावर दाखल परस्थिती नियंत्रणात* ----------------------------------------------------- 4⃣ *जम्मू-काश्मीर - हंदवादा येथे पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांच्या ठिकाणाचा भांडाफोड, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त* ----------------------------------------------------- 5⃣ *गडचिरोली - भामरागड तालुक्यातील ताडगाव परिसरात नक्षल- पोलीस चकमकीत 14 नक्षलवादी ठार, आतपर्यंतच्या नक्षलविरोधी अभियानातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : हज यात्रेचे सरकारी अनुदान बंद झाल्यानंतर, प्रथमच होत असलेल्या हज यात्रेला भारतातून यंदा १ लाख ७५ हजार २५ यात्रेकरू जाणार आहेत* ----------------------------------------------------- 7⃣ *मोक्याच्यावेळी केलेल्या चुका महागात पडल्याने पुन्हा एकदा गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हातातील सामना गमवावा लागला, राजस्थानचा रॉयल विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *पोशाख* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा http://nasayeotikar.blogspot.com/2017/01/dress-code-system.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सांस्कृतिक राजधानी - पुणे* पुणे जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण प्रचलित आहे - पुणे तिथे काय उणे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा तर नैर्ऋत्येस अहमदनगर जिल्हा आहे. जगप्रसिद्ध पुणे विद्यापीठ पुणे शहरात असून पुण्यास पूर्वेचे ऑक्सफर्ड असेही म्हणतात अखिल विश्वासाठी पसायदान मागणार्‍या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणार्‍याया संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणार्‍या संत तुकारामांची, पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आणि संत तुकारामांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकर्‍यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात. शिवाजीच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणार्‍या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= चांगल्या विचारांच्या पुस्तकांनी मस्तक सुधारते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?* 👉      व्यंकटेश माडगुळकर *२)  फकिरा ही कादंबरी कोणाची ?* 👉      अण्णाभाऊ साठे  *३)  बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिले ?* 👉  पु.ल.देशपांडे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अभिषेक संगम, धर्माबाद 👤 तेजस मार्कंडेय, औरंगाबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *पुस्तक* सुधारवायचे असेल आपले मस्तक तर नेहमी वाचत राहावे नवनवीन पुस्तक पुस्तकविना कोणी आपला दोस्त नाही त्याशिवाय आपले जीवन मस्त नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *कृषिसंस्कृतीत सापाला अनन्य स्थान आहे. वावरात साप दिसला की तो आपला राखणदार आहे, असं लोकमानस मानतं. शेतक-याची संपत्ती म्हणजे त्याचं शेत आणि कुठल्याही संपत्तीचं; विशेषत: गुप्तधनाचं साप राखण करतो, अशी लोकांची भाबडी श्रद्धा असते.* *काया वावरात सरप ताजातुजा* *मारू नको बापा पुरवधीचा राजा* *अशी लोकवाङमयाची शिकवण असते. शेतक-यांच्या आणि सापांच्या कितीतरी लोककथा आहेत. सापाला पुरूषतत्वाचे प्रतिक मानतात. त्यामुळेच वारूळस्थ नागाची पूजा करतात. पृथ्वी स्त्रीरूप आणि साप पुरूषरूप.. त्यांच्या संयोगातून समृद्धी नांदते अशी लोकसमजूत असते. मुळात साप शेतीचा सहाय्यक म्हणून रक्षणकर्ता असतो, पण तो राखणदार असतो ही लोकश्रद्धा. काही का असेना पण वावरातील सापाला सहसा मारत नाहीत. तो शेतीला उपद्रवी उंदरांसारख्या प्राण्यांचा नाश करतो म्हणून शेतक-यांचा मित्र असतोच.* ••●🌺‼ *रामकृष्णहरी* ‼🌺●•• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखादे सकस बियाणे जमिनीत टाकले तर त्या बियाणापासून सकस धान्य उपजले जाते हा विश्र्वास बियाणे टाकणा-या शेतक-याला जसे माहित असते. त्याचप्रमाणे एखादा चांगला विचार चारचौघांमध्ये जर रुजला तर त्याच विचारांचे इतरही जनमानसात विचार रुजून एक सशक्त चांगल्या विचारांची पिढी निर्माण होऊन एक चांगला सशक्त समाज नक्कीच निर्माण होऊ शकेल असा चांगला विचार करणा-या विचारवंताला माहित असतो.तो देण्याचा स्वातंत्र्याने प्रयत्न करतो.परंतु एखादा वाईट विचार हा संपूर्ण समाजाला तळागाळापर्यंत पोहचला तर एक चांगली सशक्त पिढी विनाशाकडे नक्कीच जाऊ शकेल.त्यापेक्षा केव्हाही चांगल्या विचारांची कास धरुन आपले जीवन व सामाजिक जीवन समृद्ध करण्यास सहाय्य करावे.यापेक्षा अन्य महामंत्र कोणताच नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🌾🌱🌾🌱🌾🌱🌾🌱🌾🌱 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अहो रूपम अहो ध्वनी* - एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *जाणीव स्वत्वाची* एका जंगलात एक वाघाचे पिल्लू लहान असतानाच त्याच्या आईपासून व वाघाच्या समुदायातून दुरावते. रस्ता चुकल्यावर ते इकडे तिकडे फिरत असताना त्याला एक बकऱ्यांचा कळप दिसतो. ते त्या कळपामध्ये सामील होते. बकऱ्यांच्या कळपात बराच काळ वाघाचे पिल्लू राहते व त्याचे सर्व आचरण हे बकऱ्यासारखे होते.ते ना गर्जना करते किंवा धाडसी कृत्यही करीत नव्हते. कारण वाघांसोबत न राहिल्याने आपल्या जमातीतील प्राणी कसे वागतात याचे त्याला ज्ञान नव्हते. एके दिवशी बकऱ्या चरत असताना एक वाघ त्यांना पाहतो आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. सगळ्या बक-या शांतपणे चरत आहेत आणि त्यांच्या बरोबर एक वाघाचे पिल्लू पण हिंडत आहे. बकऱ्याना त्या पिल्लाची भीती वाटत नाही म्हणजेच ते पिल्लू त्यांच्यात वाढलेले आहे हे त्याच्या लक्षात येते. तो वाघ त्या बकऱ्याजवळ जातो आणि गर्जना करतो, त्याबरोबर जीवाच्या भीतीने सगळा कळप पळायला सुरुवात करतो तसे ते वाघाचे पिल्लू पण पळायला सुरुवात करते, पण मोठा वाघ त्याला अडवतो आणि म्हणतो," अरे! मी गर्जना केल्याबरोबर बकऱ्या पळाल्या हे ठीक आहे. पण तू का पळत आहेस? आणि माझ्या गर्जनेला तू प्रत्युत्तर न देता म्याव म्याव का ओरडत आहेस? बकऱ्या पळून जाणे साहजिक आहे पण मी थांब म्हंटल्यावर तू थांबला याचा अर्थ तुझ्यात कुठेतरी वाघ जिवंत आहे. तू बकरी नाही याचा पुरावा मी तुला देतो " असे म्हणून मोठा वाघ पिल्लाला घेवून पाण्याजवळ जातो तेथे त्याचे प्रतिबिंब दाखवून त्याला त्याच्यातील वाघ असण्याची जाणीव करून देतो. पिल्लाला आपल्या स्वत्वाची जाणीव होते व ते आपल्या वाघांच्या समुहात राहायला जाते. *तात्पर्य- स्वत्वाची जाणीव होणे हि मोठी गोष्ट आहे.आपण आपल्यातील आपल्याला जोपर्यंत ओळखत नाहीत तोपर्यंत आपली अवस्था वाघाच्या पिल्लाप्रमाणे राहते.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment