✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 सप्टेंबर 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - गणेश विसर्जन करताना एक संकल्प करू या .......http://nasayeotikar.blogspot.com/2025/09/ganpati-bappa-morya.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १५२२: फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.• १८८८: चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम.• १९३९: दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.• १९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.• १९६५: पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.• १९६६: दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.• १९६८: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.• १९९३: ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड.• १९९७: अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खाँ यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.• २०२२: कोविड-१९ महामारी - भारताने कोविड-१९ अनुनासिक (Nasal Vaccine) लस मंजूर केली आणि चीननंतर असे करणारा दुसरा देश बनला.• २०२२: लिझ ट्रस - युनायटेड किंगडमच्या पंतप्रधान बनल्या.🎂 जन्म :- • १७६६: इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै १८४४)• १८८९: स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी १९५०)• १८९२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर एडवर्ड ऍपलटन यांचा जन्म.• १९०१: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १९९७)• १९२१: बार-कोड चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२)• १९२३: युगोस्लाव्हियाचे राजा पीटर (दुसरा) यांचा जन्म.• १९२९: हिंदी चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००४)• १९५७: पोर्तुगालचे पंतप्रधान जोशे सॉक्रेटिस यांचा जन्म.• १९६८: पाकिस्तानी फलंदाज सईद अन्वर यांचा जन्म.• १९७१: भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी यांचा जन्म.• १९१५: बव्हेरियन लेफ्टनंट आणि राजकारणी, बव्हेरिया देशाचे मंत्री अध्यक्ष फ्रांझ जोसेफ स्ट्रॉस यांचा जन्म (मृत्यू : ३ ऑक्टोबर १९८८)🌹 मृत्यू :-• १९३८: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक सली प्रुडहॉम यांचे निधन.• १९६३: कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८८३)• १९७२: जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार अल्लाउद्दीन खाँ यांचे निधन.• १९९०: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचे निधन. (जन्म: २३ जून १९१६)• २००७: इटालियन ऑपेरा गायक लुसियानो पाव्हारॉटी यांचे निधन.• २०२२: भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार अरविंद गिरी यांचे निधन (जन्म: ३० जून १९५८)• २०२२: भारतीय राजकारणी, कर्नाटकचे आमदार उमेश कट्टी यांचे निधन (जन्म: १४ मार्च १९६१)• २०१९: झिम्बाब्वे देशाचे २रे राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांचे निधन (जन्म: २१ फेब्रुवारी १९२४)• १९७९: ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अध्यक्ष पी. के. मुकिया तेवर यांचे निधन (जन्म: ४ एप्रिल १९२३)• १९७८: ऍडिडासचे संस्थापक अडॉल्फ डॅस्लर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकल्प - गेली अकरा दिवस गणपती बाप्पाच्या सहवासात दिवस कसे आनंदात गेले आहेत. पण आपल्या या सामाजिक कार्यातून काही विधायक काम करता आले असते .....! याचा विचार देखील केला नाही. म्हणून एक संकल्प करू या.... मंडळाच्या माध्यमातून एक तरी विधायक कार्य करू या......गणपती बाप्पा मोरया ............ पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील 6 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान; शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल -राष्ट्रपती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अनंत चतुर्दशी - राज्यभरात गणेश विसर्जनाची लगबग, मुंबईत 18 हजार पोलीस, 10 हजार कॅमेरे, ड्रोनद्वारे नजर अन् पहिल्यांदाचा AI चा वापर; गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोलापुरातील महिला IPS अधिकाऱ्याला झापलं, आता व्हायरल व्हिडिओवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले, बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी मी कटिबद्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा, CCMP कोर्स केलेल्या डॉक्टरांची MMC मध्ये नोंद होणार; सरकारच्या निर्णयाविरुद्ध IMA ची याचिका न्यायालयाने फेटाळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे टेस्ला मॉडेल वाय कारचे बनले पहिले मालक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *त्रिभाषा सूत्र लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून समितीची स्थापना, ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे समितीच्या अध्यक्षपदी तर डॉ. सदानंद मोरे, वामन केंद्रे यांच्यासह एकूण सात सदस्यांचा समितीत समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाचा महिला एकदिवसीय विश्वचषक संघ जाहीर, एलिसा हिली संघाचे नेतृत्व करणार; स्पर्धा 30 सप्टेंबरपासून सुरू होईल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील ठाणेदार, शिक्षक, देगलूर 👤 रितेश पोकलवार 👤 विकास डुमणे👤 अनिल सोनकांबळे 👤 आनंद गायकवाड 👤 सचिन पाटील 👤 जयेश वाणी 👤 विठ्ठल तुकडेकर, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 67*हात नाही, पाय नाही तरीही मी रोज धावतो.**थांबायला नाव नाही, सतत पुढेच सरकतो.**सांगा पाहू कोण आहे मी ? 🤔*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - तारा star••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••"आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे." *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'आशियाचा नोबेल पुरस्कार' असे कोणत्या पुरस्काराला म्हटले जाते ?२) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?३) संविधानानुसार केंद्राचे घटनात्मक प्रमुख कोण ?४) 'हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारतामध्ये चहाची लागवड सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये झाली ? *उत्तरे :-* १) रॅमन मॅगसेसे पुरस्कार २) उर्जित पटेल, आरबीआयचे माजी गव्हर्नर ३) राष्ट्रपती ४) आसेतुहिमालय ५) आसाम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अष्टविनायकांपैकी सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर गणपती*थोडक्यात माहिती :स्थान – ओझर, जुन्नर तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र.नाव – श्री विघ्नेश्वर गणपती.• कथा –महादैत्य विघ्नासुराने सर्व जगात विघ्न निर्माण केले. तेव्हा गणपतीने त्याला पराभूत करून "विघ्न" ही शक्ती आपल्या अधीन केली. म्हणून येथे गणपतीला विघ्नेश्वर म्हटले जाते.• मंदिर वैशिष्ट्ये –हे मंदिर अत्यंत सुंदर व सुसज्ज आहे. सोन्याचा कळस, दीपमाळा व भव्य सभामंडप आहेत. मंदिराभोवती दगडी तटबंदी आहे.• मूर्ती स्वरूप –गणपतीचा सोंड डावीकडे वळलेला आहे. रत्नजडित डोळे व नाभीवर हिरेजडित दागिना आहे.👉 अष्टविनायक यात्रेत लेण्याद्रीचा गिरिजात्मक पाहिल्यानंतर पुढचा सातवा गणपती ओझरचा विघ्नेश्वर असाच मानला जातो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हा देवांचा देव गणपती सर्वाहुनी वेगळावाहतो दुर्वाकुर कोवळा….. || धृ ||सिद्धी विनायक तू हेरंबा, मंगल दायक तू आरंभचिंतामणी तू जय सुख दाता, विषाल देही वैराग्याच्यारंग तुझा सोवळा …… || १ ||पशाकुंश करी विघ्नहरया, उभय करावी देशी अभयाअन्न ब्रम्ह परी मोदक माया, तुझ्या कृपेने मुका बोलतोचालतसे पांगळा ….. || २ ||गजमस्तक तू असीम बुद्धी, रिद्धी सिद्धीची समृद्धीसाहित्याची अमृत सिद्धी, प्रथम पाठीवर तुझा गणेशाॐ कार गिरविला …. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांचे विचार सकारात्मक असतात अशी माणसे त्याच सकारात्मक विचारांना आत्मसात करून नित्यनेमाने कार्य करत असतात. कारण त्यांना वेळेचे भान असते सोबतच आपण इतरांसाठी काय केले पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात. अशा विचारी माणसांना कशाचीही अपेक्षा नसते किंवा कोण काय म्हणतील याकडे लक्ष देण्यासाठी त्याच्याकडे वेळ नसतो. तीच माणसे अभिमानाचे दुसरे नाव असतात. म्हणून जे कोणी चांगले कार्य करत असतील त्यांचे गुणगान करता येत नसेल तर त्यांना नाव ठेवून स्वतः च्या नावाची प्रसिद्धी करू नये. माणसाचे जीवन एकदाच मिळते त्या मानवी जीवनाचे महत्व जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *📗वक्ता आणि श्रोते📗*━━━━━━━━━━━━━━━━*एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्वाच्या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्यांची चुळबुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्हा श्रोत्यांचे आपल्या व्याख्यानाकडे अवधान खेचून आणण्यासाठी वक्त्याने एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्ट ऐकू लागले. वक्ता म्हणाला, एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्या प्रवासाला निघाले. चालता चालता त्यांना वाटेत एक नदी लागली. चिमणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्स इतकेच असे सांगून वक्त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्याने कशी काय नदी पार केली. त्या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्त्याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्हा ती नदी पार करून जाण्याचे सामर्थ्य त्याच्याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्याला बाजूला सारून जाण्याचीही त्याच्यात ताकत होती पण तो अलिकडच्याच तीरावर थांबला.'' श्रोत्यांनी मोठ्या उत्कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्याचे कारण काय. यावर वक्ता म्हणाला,'' ज्या मूर्खाना महत्वाच्या विषयावरचे असणारे व्याख्यान न आवडता मनोरंजक गोष्टी आवडतात त्या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्ही या महत्वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्यावर काही उपाय केले व आपल्या राज्याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्या तीरावर निघून जाईल'' वक्त्याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्यांनी पुढील व्याख्यान शांतपणे ऐकून घेतले.**तात्पर्य :- काहीवेळेस आपल्या चांगल्या व देशहिताच्या योजना लोकांच्या गळी उतरविण्यासाठी युक्तीप्रयुक्तीचा वापर करावाच लागतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 सप्टेंबर 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - शिक्षक दिन विशेष https://nasayeotikar.blogspot.com/2025/09/teachers-day-special.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८८२: थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.• १८८८: जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.• १९०९: लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला.• १९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली.• १९७२: मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.• १९९८: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.• २००१: हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.• २०१३: रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला.🎂 जन्म :-• १२२१: महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी • १८२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी • १९०१: जॅग्वोर कार चे सहसंस्थापक विल्यम लियन्स जॅग्वोर • १९०५: मिनॉक्स चे शोधक वॉल्टर झाप • १९१३: प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. एन. हक्सर • १९२३: भारतीय वकील आणि राजकारणी राम किशोर शुक्ला • १९३७: साहित्यिक व समीक्षक शंकर सारडा • १९४१: केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे • १९५२: अभिनेता ऋषी कपूर• १९६२: यष्टीरक्षक किरण मोरे • १९६४: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव • १९७१: दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू लान्स क्लूसनर यांचा जन्म.🌹 मृत्यू :- • १९९७: हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक डॉ. धर्मवीर भारती • २०००: खळाळून हसवणारे विनोदी कलाकार मोहम्मद उमर मुक्री• २०१२: भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज • २०१२: भारतीय गायक-गीतकार हांक सूफी • २०१५: भारतीय सर्जन आणि राजकारणी विल्फ्रेड डी डिसोझा • २०२२: भारतीय व्यापारी, उद्योगपती सायरस पालोनजी मिस्त्री • २०२२: भारतीय रंगमंच अभिनेते रामचंद्रन मोकेरी • २०२२: भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार राम नरेश रावत••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 05 सप्टेंबर संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने काही खास कथा, लेख, कविता, ई बुक आणि भाषण वाचण्यासाठी वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पाक-अफगाण-बांगलादेशातून 2024 पर्यंत आलेले अल्पसंख्याक भारतात राहू शकतील, यापूर्वी 2014 पर्यंत आलेल्यांना परवानगी होती, CAA अंतर्गत केंद्राचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षणाचा निर्णय होताच ओबीसींसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मनोज जरांगेंची प्रकृती स्थिर, पुढील काही दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखेखाली ठेवणार; उपोषण सोडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गृह विभागात खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा, फौजदार पदासाठी 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लंडनमध्ये मराठी भाषिकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र उभारण्याचा निर्णय - उदय सामंत यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मेट्रो प्रकल्प, लोकल ट्रेन, विमानतळ विकासाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 7 विकेटने हरविले, एडन मार्करमचा नवा विक्रम, 23 चेंडूत केले अर्धशतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सायारेड्डी सामोड, मा. शिक्षक, शारदा विद्यालय, धानोरा बु. ता. उमरी जि. नांदेड 👤 संगमेश्वर नळगिरे, सहशिक्षक, नांदेड 👤 प्रा. मुकेश धर्मले, नांदेड 👤 सुनील अस्वले, पदवीधर शिक्षक, कोल्हापूर 👤 संतोष पेंडकर, सहशिक्षक, धर्माबाद 👤 विशाल गंगुलवार 👤 मुकेश पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 66*लुक लुक करतो रात्रीला**गायब होतो दिवसाला**लाखो मैलांचा माझा प्रवास**निर्माण करतो स्वतः प्रकाश*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - बी / बियाणे••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भाषा ही मनुष्याच्या मनोवृत्तीचा व हृदयवृतीचा उदगार होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ६७ वा रॅमन मॅगसेसे पुरस्काराने भारतातील कोणत्या संस्थेला सन्मानित करण्यात येणार आहे ?२) SCO ची बैठक नुकतीच कोणत्या देशात झाली ?३) आशिया खंडाचा सर्वोच्च सन्मान कोणता ?४) 'हिंडून करायचा पहारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) २०२१ मध्ये केंद्र सरकारने 'राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार' याचे नामकरण कोणत्या नावाने केले ? *उत्तरे :-* १) एज्युकेट गर्ल्स, स्वयंसेवी संस्था, भारत २) तियानजिन, चीन ३) रॅमन मॅगसेसे पुरस्कार ४) गस्त ५) मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लेण्याद्री गणपती ज्यांना 'गिरिजात्मज' गणपती असेही म्हणतात, हे अष्टविनायकांपैकी एक आहेत आणि ते महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ डोंगरावर वसलेल्या एका लेण्यांमध्ये कोरलेले आहेत. या मंदिरात, मध्ययुगीन काळात दोन निवासकक्ष एकत्र करून भिंतीमध्ये गणपतीची मूर्ती कोरण्यात आली होती. हा गणपती गिरिजात्मज (गिरीजाचा आत्माज) म्हणून ओळखला जातो, कारण तो पर्वतावर (लेण्यांमध्ये) जन्मलेला आहे, असे मानले जाते. • लेण्याद्री गणपतीची वैशिष्ट्ये :लेण्याद्री गणपती हा महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असून, त्यांचे दर्शन घेणे हे एक पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. हे गणपती मंदिर एका डोंगरामध्ये कोरलेल्या लेण्यांमध्ये आहे. लेण्यांमध्ये एक गणपती कोरलेला असल्यामुळे या स्थळाला लेण्याद्री असे नाव पडले. 'गिरिजात्मज' या नावाने हा गणपती प्रसिद्ध आहे, ज्याचा अर्थ "पर्वतावर जन्मलेला" किंवा "गिरीजाचा पुत्र" असा होतो. या मंदिरातील मूर्ती मध्ययुगातील १७व्या शतकात कोरलेली असून, दोन निवासकक्ष एकत्र करून भिंतीत गणपतीचा आकार देण्यात आला आहे. अष्टविनायकांमधील सर्व देवतांप्रमाणेच लेण्याद्री गणपतीसुद्धा जागृत मानले जातात, म्हणजेच ते भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *श्री गणेश गाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सभा रंगणी गण-गौवरी चा |नाचत नाचत आला,आला हो वरद विनायक आला || धृ ||प्रथम नमोया विघ्नराया |मंगल मूर्ती या यश द्याया |कार्यारंभी वंदू कृपाळा || १ ||सकल गुणांचा शास्त्र कलांचा |खेळ मांडीला शुभशकूलांचा |श्रुत वर्ग हा तल्लीन झाला || २ ||तू सुखकर्ता – तू दुखहर्ता |तूच करता आणि करवितामोरया मोरया मंगलमूर्ती मोरयामोरया मोरया गणपती बाप्पा मोरयामोरया मोरया मयुरेश्वर मोरयामोरया मोरया भालचंद्र मोरयामोरया मोरया एकदंत मोरयामोरया मोरया गजानन मोरयामोरया मोरया बल्लाळेश्वर मोरयामोरया मोरया वरदविनायक मोरयामोरया मोरया चिंतामणी मोरयामोरया मोरया गिरिजात्मज मोरयामोरया मोरया विघ्नेश्वर मोरयामोरया मोरया अष्टविनायक मोरयामोरया मोरया लंबोदर मोरयामोरया मोरया महागणपती मोरयामोरया मोरया सिद्धिविनायक मोरयामोरया मोरया वक्रतुंड मोरया || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीची व त्याच्या मागे निंदा करण्याची आपल्यात आवड असेल तर एखाद्या गुणवान व्यक्तीची त्याच्यासमोरच स्तुती करण्याची आवड ठेवावी. जर अशी स्तुती करण्याची वारंवार आपल्यात आवड निर्माण झाली तर आपले मान ही वाढेल व एक चांगली व्यक्ती म्हणून आपल्याकडे बघितले जाईल. या प्रकारचे मान कमविण्यासाठी आपल्यातही तसे गुण असावे लागते. तेव्हाच असे विचार आपल्या मनात येतात. कारण निंदा ही कधीही मागे केली जाते. अन् स्तुती समोरच केली जाते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मातेचा उपदेश**एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, "ताई गं मी बघ किती सुंदर, नाही तर तू!' भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही. तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो' त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग की तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.**तात्पर्य :- जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला सद्गुणांची जोड द्यावी लागते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 सप्टेंबर 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16JdEBrPR6/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :-• १७५२: अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.• १९१६: श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली.• १९३५: सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले.• १९७१: कतारला स्वातंत्र्य मिळाले.• २०२२: आर्टेमिस १ रॉकेट - इंधन गळतीमुळे दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने नासाने आर्टेमिस १ रॉकेटचे प्रक्षेपण दुसऱ्यांदा स्थगित केले.🎂 जन्म :- • १८५५: आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुंद्री • १८६९: सेंद्रिय पदार्थांच्या पृथक्करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिट्झ प्रेग्ल • १८७५: पोर्श्या मोटार कंपनी चे संस्थापक फर्डिनांड पोर्श्या• १९०५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ कार्ल डेव्हिड अँडरसन• १९२३: प्रख्यात तबलावादक किशन महाराज • १९२३: टाको बेल चे संस्थापक ग्लेन बेल • १९२३: महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे• १९२७: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते अरुण कुमार चटर्जी तथा उत्तम कुमार • १९३१: नाटककार श्याम फडके• १९३८: नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ रायोजी नोयोरी• १९४०: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा• १९५६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिझु दासगुप्ता • १९६५: अमेरिकन अभिनेता चार्ली शीन• १९७१: भारतीय-अमेरिकन लेखक किरण देसाई • १९७४: भारतीय क्रिकेटपटू राहुल संघवी • १९७६: चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय • १९४८: झांबिया देशाचे ३रे राष्ट्रपती, वकील आणि राजकारणी लेवी मवानवासा • १९४२: भारतीय अभिनेते निपॉन गोस्वामी • १९३५: भारतीय शेतकरी आणि राजकारणी शरद अनंतराव जोशी • १९२८: लक्झेंबर्ग देशाचे २०वे पंतप्रधान, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी गेस्टन थॉर्न• १७२८: इंग्लिश व्यापारी आणि अभियंते, बोल्टन आणि वॅटचे सह-संस्थापक मॅथ्यू बोल्टन 🌹 मृत्यू :- १६५८: इंग्लंडचा राज्यकर्ता ऑलिव्हर क्रॉमवेल • १९४८: चेकोस्लोव्हेकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड बेनेस • १९५३: तबला, घुमट व सारंगीवादक लक्ष्मण तथा खाप्रुमामा पर्वतकर • १९५८: निसर्गकवी माधव केशव काटदरे • १९६७: वार्ताहर, संपादक अनंत हरी गद्रे तथा समतानंद • १९९१: अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक फ्रँक काप्रा • २०००: स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर • २०१४: भारतीय राजकारणी ए. पी. वेंकटेश्वरन • २००७: अमेरिकन वैमानिक, ग्लोबल फायर या फुग्यातून पॅसिफिक महासागर एकट्याने उड्डाण करून न थांबता ओलांडणारे पहिले व्यक्ती स्टीव्ह फॉसेट • २००५: अमेरिकन वकील आणि कायदेतज्ज्ञ, अमेरिका देशाचे १६वे मुख्य न्यायाधीश विल्यम रेहनक्विस्ट ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फुकट वाचण्याची वृत्ती......*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षण : 8 पैकी 6 मागण्या मान्य झाल्यावर पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांनी सोडलं उपोषण, हैदराबाद गॅझेटचा 'शासन निर्णय' जसाच्या तसा निर्गमित*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बिहारमधील लाखो जीविका दीदींना पंतप्रधान मोदींची मोठी भेट, व्हर्च्युअल माध्यमातून सहकारी संस्थेचा शुभारंभ, 105 कोटी रुपये हस्तांतरित*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अहिल्यानगर - विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करून भारताला आत्मनिर्भर बनवावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *वसईतील धोकादायक जीर्ण इमारती पाडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गणरायाच्या निरोपावेळी गडचिरोली, चंद्रपूर, कोकण, पुणे, सातारा, सोलापूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *T-20 विश्वचषका आधी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने जाहीर केली निवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशीद खान T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवकांता व्ही. बिज्जेवार, सिडको, नांदेड 👤 महेंद्र सोनेवणे, शिक्षक व्ही साहित्यिक, गोंदिया 👤 प्रदीप पंदीलवाड👤 आशिष हातोडे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 65*एक खोली आहे, ज्यात न खिडकी, न दरवाजा. तरीही मी बाहेर पडते, मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - स्पंज ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मातृभूमीशी एकनिष्ठ राहणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) SCO चा विस्तारित रूप काय आहे ?२) SCO ची स्थापना केव्हा झाली ?३) SCO या संघटनेचा भारत कोणत्या वर्षी सदस्य झाला ?४) SCO या संघटनेत सध्या किती सदस्य देश आहेत ?५) SCO चे मुख्यालय कोठे आहे ? *उत्तरे :-* १) Shanghai Cooperation Organisation २) १५ जून २००१ ३) जून २०१७ ४) १० देश ५) बीजिंग, चीन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛕 श्री चिंतामणी गणपती, थेऊरस्थान : पुणे जिल्हा, हवेली तालुका, थेऊर गाव (पुणे शहरापासून साधारण २५ किमी अंतरावर).अष्टविनायक यात्रेत थेऊरचा श्री चिंतामणी गणपती पाचवे गणपतीस्थान मानले जाते.📖 पौराणिक कथापूर्वी येथे ऋषी कपिलांचा आश्रम होता. त्यांच्याकडे चिंतामणी नावाचा अद्भुत मणि होता. त्याच्या तेजाने सर्व इच्छा पूर्ण होत. राजा गणराज कपिल ऋषींकडे आला व मणिच्या प्रभावाने सर्व ऐश्वर्य उपभोगला. लोभामुळे त्याने तो मणि कपिल ऋषींकडून हिसकावून घेतला. कपिल ऋषींनी श्री गणेशाची उपासना केली. गणपतीने गणराजाचा पराभव करून मणि ऋषींना परत दिला. पण ऋषींना त्याच्या शक्तीचा मोह वाटू नये म्हणून गणपतीने तो मणि आपल्या कंठात (गलेमध्ये) ठेवून घेतला. तेव्हापासून गणपतीला श्री चिंतामणी गणपती म्हणू लागले.🌸 मंदिराची वैशिष्ट्येमंदिर कृष्णा, मूळा व म्हाळसाखडी या नद्यांच्या संगमाजवळ आहे. मूर्ती सुमुखी व उजव्या सोंडेची आहे. मूर्तीला रत्नजडित डोळे आहेत. गणपतीसमोर मोरेश्वर महाराजांच्या मठाचे छत्रछाया स्वरूप जाणवते. पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. येथे आलेल्या भक्तांची संकटे, चिंता दूर होतात, म्हणून नाव "चिंतामणी".🙏 श्रद्धा आणि महत्त्वयेथे येऊन भक्त आपली चिंता, दुःख, संकटे दूर करण्यासाठी प्रार्थना करतात. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव येथे विशेष मोठ्या थाटामाटात साजरा होतो. अष्टविनायक यात्रा करणाऱ्यांसाठी हे स्थान अत्यंत पवित्र व आवश्यक आहे.👉 थोडक्यात : थेऊरचा श्री चिंतामणी गणपती हा चिंता व संकटे दूर करणारा, इच्छा पूर्ण करणारा अष्टविनायकांतील पाचवा गणपती आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हा देवांचा देव गणपती सर्वाहुनी वेगळावाहतो दुर्वाकुर कोवळा….. || धृ ||सिद्धी विनायक तू हेरंबा, मंगल दायक तू आरंभचिंतामणी तू जय सुख दाता, विषाल देही वैराग्याच्यारंग तुझा सोवळा …… || १ ||पशाकुंश करी विघ्नहरया, उभय करावी देशी अभयाअन्न ब्रम्ह परी मोदक माया, तुझ्या कृपेने मुका बोलतोचालतसे पांगळा ….. || २ ||गजमस्तक तू असीम बुद्धी, रिद्धी सिद्धीची समृद्धीसाहित्याची अमृत सिद्धी, प्रथम पाठीवर तुझा गणेशाॐ कार गिरविला …. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हावं असं नेहमीच प्रत्येकाला वाटत असते.पण, सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडून येत नसतात.अशा वेळी आपल्याला दु:ख होत असते. पण,काही गोष्टी घडायच्या असतात त्याविषयी आपल्याला कळत नाही व ज्या विषयी आपण कधी विचार केला नसतो अचानक काही गोष्टी घडून येतात म्हणून प्रत्येक वेळी आपल्या मताप्रमाणेच घडून येईलच असेही नाही त्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शहाण्याला शब्दांचा मार आणि मूर्खाला काठीचा मार*एका गावात एक मूर्तिकार राहत होता. तो देव देवतांच्या सुंदर मूर्ती घडवत असे. एकदा त्याने देवतेची अतिशय सुंदर मूर्ती घडवली. ती मूर्ती त्याला गि हाईकाला पोचती करायची होती. त्यासाठी त्याने एक गाढव भाड्याने घेतले. ती मूर्ती गाढवाच्या पाठीवर लादली. गाढव रस्त्याने निघाले. ती सुंदर मूर्ती पाहून अनेक माणसे वाटेत थांबत होती. मुर्तीची स्तुती करत होती. काही माणसे वाकून त्या मूर्तीला नमस्कारही करत होती.त्या मुर्ख गाढवाला वाटले की, लोक आपलीच स्तुती करत आहेत. आपल्यालाच नमस्कार करत आहेत. म्हणून गाढव मोठ्या ऐटीत रस्त्याच्या मधोमध थांबले आणि मोठयाने ओरडू लागले. त्याच्या मालकाने त्याला चूचकारुन शांत करण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर मालकाने त्याला काठीचा जोरदार तडाखा हाणला. त्या तडाख्याने गाढवाचा खोटा गर्व गळून पडला. ते ताळयावर आले आणि निमुटपणे पुढे चालू लागले. ✍ *तात्पर्य*✍*"शहाण्याला शब्दांचा मार आणि मूर्खाला काठीचा मार"*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 सप्टेंबर 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16dfbAeQDr/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- ● १९९९ : भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.● १९४६ : भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.● १९२० : कोलकाता येथे महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले.● १९१६ : पाटणा उच्च न्यायालयाची स्थापना🎂 जन्म :-◆ १९४१ : साधना शिवदासानी ऊर्फ ’साधना’ चित्रपट अभिनेत्री◆ १८८६ : प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे, साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक. ◆ १८७७ : फ्रेडरिक सॉडी, नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ 🌹 मृत्यू / ● २०११ : संगीतकार श्रीनिवास खळे● २००९ : आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन ● १९९९ : डी. डी. रेगे, विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रण चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत.● १९९० : नरहर शेषराव पोहनेरकर, निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता लेखक ● १९७६ : विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर, मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक, त्यांच्या ’ययाति’ या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) मिळाला आहे. ● १९६० : डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर, वनस्पतीतज्ञ, ’विज्ञानवर्धिनी महाराष्ट्र’(MACS)या संस्थेचे संचालक ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागरूक पालक .......!*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षणावर वर्षा निवास स्थानी मुख्यमंत्र्याची उच्चस्तरीय बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिक्षकांना TET परीक्षा बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, सेवानिवृत्तीला पाच वर्षे शिल्लक असणाऱ्या शिक्षकांना सुट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अफगाणिस्तानमध्ये भीषण भूकंप, 800 हुन अधिक लोकांचा मृत्यू, उत्तर भारतात देखील जाणवले धक्के*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा दुसरा टप्पा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बिहार - मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही, आयोगाने म्हटले-, 1 सप्टेंबरनंतर आलेल्या हरकतींवरही विचार करू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत तब्बल 51.50 रुपयांची केली कपात, सलग तिसऱ्यांदा व्यावसायिक सिलेंडर झाले स्वस्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Women's World Cup 2025: महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी बक्षीस रकमेची घोषणा; 2022 च्या तुलनेत बक्षीस रकमेत चार पट वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनुजा देशमुख, साहित्यिक, नाशिक 👤 किशोर तळोकार, शिक्षक तथा साहित्यिक, अमरावती 👤 शरद शेलकांडे, पुणे 👤 प्रवीण इंगळे 👤 रवी भलगे 👤 हणमंत भोसके *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 64*माझ्या अंगात छिद्रं हजार, तरी मी पाणी धरून ठेवतो. दाबलं कुणी मला की मी गळतो, सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - लाईट ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सावधपण, उत्तम निर्णयशक्ती, स्वावलंबन आणि दृढ विश्वास, निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण ?२) मोबाईलच्या संदर्भात GB म्हणजे काय ?३) 'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण ?४) 'हरिणासारखे डोळे असणारी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) राष्ट्रपती २) Giga Byte ३) साने गुरुजी ४) मृगाक्षी, मृगनयना, कुरंगनयना, हरिणाक्षी ५) छावा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *महाडचा वरद विनायक*• स्थान : वरदविनायक मंदिर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड (कोळवण) गावाजवळ आहे. अष्टविनायक गणपतींपैकी चौथा गणपती महाडचा वरद विनायक आहे.• इतिहास : हे मंदिर 1725 साली पेशव्यांचे मंत्री श्री. मोरया गोसावींचे शिष्य रामजी महादेव बिवलकर यांनी बांधले.मूळ मूर्तीचे तोंड पूर्वेकडे आहे, पण सध्याची पूजनीय मूर्ती पश्चिमाभिमुख (प्रवेशद्वाराकडे) आहे.• मूर्तीचे वैशिष्ट्य : गणपतींच्या कपाळावर नागराज कोरलेला आहे.ही मूर्ती स्वयंभू मानली जाते.• विशेषता : भक्तांना मंदिराच्या गर्भगृहात जाऊन थेट मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेण्याची परवानगी आहे.येथे एक पवित्र सरोवर (तळे) आहे, जे शुद्धिकरण व स्नानासाठी पवित्र मानले जाते.• पालखी सोहळा : दरवर्षी भव्य मिरवणुका आणि उत्सव येथे साजरे होतात.• महत्व🙏 वरदविनायक म्हणजे सर्व मनोकामना पूर्ण करणारा गणपती. भक्तांचा विश्वास आहे की येथे दर्शन घेतल्याने इच्छित कार्य सिद्ध होते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गजानना गजानना गणरायामुखाने गाऊ या मोरया…. || धृ ||फळे फुले वाहू या पूजन करू यालाडू मोदकांचा नैवेद दावूयाभक्ती भावाने गणेशाला वंदूया, मुखाने …. || १ ||हे मोरेश्वरा हे विघ्नहरागुण किती वर्णू तुझे लंबोदराचौदा विघेचा देवा असे तू पाथा, मुखाने ….. || २ ||देव देवतांच्या हे महाराजानाम तुझे राहो सदा मुखी माझ्यासारे मिळून गणपतीचा घोष करूया, मुखाने…. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वयाने लहान असलेल्यांकडून जेव्हा छोटीशी चूक होते तेव्हा सर्वजण त्याला नको त्या शब्दात बोलत असतात.पण तीच चूक जेव्हा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीकडून होते त्यावेळी वयाने लहान असणारा समजावून सांगतो अशावेळी त्याला शहाणपणा शिकवू नको म्हणून हाकलून लावतात.बरेचदा वयाने मोठा असलेला माणूस समजदार असतोच असे नाही तर वयाने लहान असणारा सुद्धा अनुभवी असू शकतो म्हणून एखाद्याला कमी लेखून त्याचा अपमान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कावळा आणि घडा*एका गावात एक कावळा राहात होता. उन्हाळ्याच्या दिवसात खूप उकाडा पडला होता. कावळ्याला प्रचंड तहान लागली. तो इकडे-तिकडे उडू लागला, पण त्याला पाणी कुठेच मिळत नव्हते.थोड्या वेळाने त्याला एका झाडाखाली ठेवलेला घडा दिसला. कावळा आनंदाने त्या घड्याकडे गेला. पण आतले पाणी खूपच खाली होते. त्याची चोच तेथे पोहोचत नव्हती.कावळ्याने हार मानली नाही. त्याला एक युक्ती सुचली. त्याने जवळचे छोटे-छोटे दगड चोचीत उचलून घड्यात टाकायला सुरुवात केली. हळूहळू पाण्याची पातळी वर आली. शेवटी कावळ्याने आपली तहान भागवली.बोध :- अडचणीत हार मानू नये. हुशारीने विचार केला, तर उपाय नेहमी सापडतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)