✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 जुलै 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_21.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟦 *_ या वर्षातील १९५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟦 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟦•••••••••••••••••••••••••••••••••*२०११: मुंबई शहरात झालेल्या ३ बॉम्बस्फोटात २६ जण ठार तर १३० जण जखमी झाले.**१९७७: रोहित्रावर (transformer) वीज पडल्यामुळे. न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित झाला.**१९२९: जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरु केले.या उपोषणातच ६३ दिवसांनी (१३ सप्टेंबर १९२९) त्यांचा मृत्यू झाला.**१९०८: लोकमान्य टिळकांवर दुसर्‍या राजद्रोहाच्या खटल्याचे काम सुरु झाले.**१८६३: सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.*🟦 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟦•••••••••••••••••••••••••••••••••*१९८४: उर्वशी शर्मा -- भारतीय मॉडेल आणि चित्रपट अभिनेत्री**१९८४: लता अनिल बहाकर-तळोकार -- लेखिका* *१९८२: सुनील कालिदास जवंजाळ -- कवी, लेखक* *१९७२: डॉ. शुभांगी लुंगे -- कवयित्री**१९६५: विलास गोपाळ अंभोरे -- कवी, लेखक**१९६२: जयराम हरी पुरंदरे -- लेखक**१९६१: गणेश निळकंठराव पांडे -- प्रसिद्ध कवी* *१९५८: प्रा.डॉ.नमिता अशोक शेंदरे-- लेखिका* *१९५२: प्रा.माधुरी शानभाग -- प्रसिद्ध मराठी लेखिका,अनुवादक* *१९५२: डॉ निर्मल सिन्नरकर -- कवयित्री, गीत लेखन**१९४७: अस्ताद डेबू -- भारतीय समकालीन नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक (मृत्यू: १० डिसेंबर २०२० )**१९४७: डॉ.वासुदेव नारायण विष्णुपुरीकर -- प्रसिद्ध नाटयलेखक* *१९४२: हॅरिसन फोर्ड – अमेरिकन अभिनेता**१९३९: प्रकाश मेहरा -- दिग्गज भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता (मृत्यू: १७ मे२००९ )**१९३६: सत्यदेव दुबे -- भारतीय पटकथाकार, संवादलेखक, नाट्य-अभिनेते, चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते (मृत्यू: २५ डिसेंबर २०११ )**१९३१: बीना राय -- भारतीय अभिनेत्री(६ डिसेंबर २००९)**१९३०: स्वरूप किशन -- भारतीय कसोटी क्रिकेट पंच (मृत्यू : २१ नोव्हेंबर १९९२)**१९२७: सावळाराम धागोजी म्हात्रे (सावळाराम महाराज) -- कीर्तनकार, समाजप्रबोधक (मृत्यू:१८ फेब्रुवारी १९९२ )**१९१६: रामकृष्ण धोंडो बाक्रे-- ज्येष्ठ संगीत समीक्षक आणि पत्रकार (मृत्यू: २२ डिसेंबर १९९६ )**१९०३: विमलाबाई देशपांडे -- कवयित्री, लेखिका* *१८९२: केसरबाई केरकर – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७ )*🟦 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟦•••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:यशपाल शर्मा -- भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू (जन्म: ११ ऑगस्ट १९५४ )**२०१०: मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक (जन्म: ८ मार्च १९३१ )**२००९: निळू फुले – प्रसिद्ध अभिनेते (जन्म: ४ एप्रिल १९३० )**२०००: इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध कवयित्री व लेखिका (जन्म: ४ जानेवारी १९१४ )**१९९४: पं.कृष्णा गुंडोपंत तथा ’के. जी.’ गिंडे – शास्त्रीय (धृपद) गायक, संगीतकार व शिक्षक (जन्म: २६ डिसेंबर १९२५ )**१९९०:अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ ’बॉबी’ तल्यारखान – क्रीडा समीक्षक व समालोचक (जन्म: १८९७ )**१९६९: महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक.(जन्म: १२ जानेवारी १९०२ )**१९१९: गणेश जनार्दन आगाशे -- अर्थशास्त्राचे अभ्यासक, लेखक, कवी, निबंधकार (जन्म: १ जानेवारी १८५२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुलांचे गुण शाळेतून दिसतात*प्रत्येक गोष्ट शाळेतूनच का शिकावी लागते ? मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी शाळेत पाठवा, मुलांना लिहिण्या-वाचण्यासाठी शाळेत पाठवा, मुले संस्कारी होण्यासाठी शाळेत पाठवा. एखादे मूल काही वाईट केलं किंवा खराब केले की लगेच बोलल्या जाते, गुरुजींनी, तुला शाळेत हेच शिकवलं का ? तसं तर तुला घरी हेच शिकवलं का ? असे फार कमी बोलल्या जाते. वास्तविक पाहता यात गुरुजींचा काहीही दोष नसतो मात्र अगदी सहजपणे असे बोलले जाते............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अखेर पंकजा मुंडे बनल्या आमदार, 10 वर्षांनी उधळला विजयाचा गुलाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शैक्षणिक प्रवेशासाठी असणारी आठ लाख रुपयांची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव विधानसभेमध्ये सादर करण्याच्या हालचाली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ड्रग्जनंतर एनर्जी ड्रिंकचाही मुद्दा विधिमंडळात; किराणा दुकानातून पेरलं जातंय घातक द्रव्य; सभापतींनी दिले महत्त्वाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एक रुपयात पीक विमा, योजनेसाठी उरले शेवटचे 4 दिवस; 15 जुलैपर्यंत नोंदणी करुन योजनेत सहभाग घ्यावा, शेतकर्‍यांना प्रशासनाचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आता 25 जून संविधान हत्या दिवस म्हणून घोषित, केंद्राचा निर्णय, अधिसूचना जारी!*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एक सदस्यीय समितीच्या तपासात दोषी आढळल्यास वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा पूजा खेडकर यांची गच्छंती अटळ, केंद्र सरकारच्या सूत्रांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडने जेम्स अँडरसनला दिला विजयी निरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *रेनवॉटर हार्वेस्टिंग : पाण्याची साठवण व पुनर्भरण* 📙 सर्व मोठ्या गावांचे शहरीकरण झाले. शहरांचे काँक्रिटीकरण झाले. काँक्रिटच्या जंगलाला डांबराच्या रस्त्यांची जोड मिळाली. मग या साऱ्या शहरावर पडणारे पाणी जमिनीत मुरणार कसे ? ते झपाट्याने वाहून जाणार. गटारांतून नालीमध्ये, नालीतून नदीकडे वाहणार. पुन्हा या शहरी वस्तीला पाणी पुरवायचे कुठून ? नळाद्वारे पुरवायला पाणी आणायचे कुठून ? यासारख्या गंभीर प्रश्नांची उत्तरे शोधताना जगातील अनेक ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगची कल्पना प्राधान्याने मांडली गेली. जेथे पाऊस जास्त पडतो, तो कालावधी अल्प असतो. पडलेला पाऊस स्वतःबरोबर बहुमोल मातीचा थर घेऊन जातो. ती माती गाळा रूपाने नदीतून वाहत धरणांच्या भिंतीजवळ साचते व धरणे हळूहळू निकामी होतात. तसेच डोंगरावरची माती वाहून गेल्याने डोंगर बोडके, खडकाळ होतात व पावसाचे प्रमाण कमी होऊ लागते. हा झाला उघड्या जमिनीसंदर्भातला प्रश्न. दुसरा प्रश्न काँक्रिटच्या जंगलातला वर उल्लेखलेला. दोन्ही प्रश्नांना उत्तर एकच. ते म्हणजे जमेल तसे, जमेल तितके पाणी आडवा, जमवा व जिरवा. पाणी अडवायचे उपाय शहरात सोपे. छपरावरचे, गच्चीवरचे, पावसाचे पाणी पन्हाळीद्वारे एकत्रित करून इमारतीच्या शेजारी वा पोटात बांधलेल्या टाकीत साठवायचे. पावसाळा संपल्यावर त्याचाच वापर पिण्याखेरीज लागणाऱ्या अन्य वापरासाठी करायचा. आसाम, मेघालय, नागालँड या उतारावरच्या टेकड्यांच्या प्रदेशात ही पद्धत गेली अनेक वर्षे घराघरांतून वापरली गेली आहे. टाकी पाण्याने भरली, तर जास्तीचे पाणी जवळच खणलेल्या एका खड्डावजा कुपनलिकेत सोडायचे. आठ ते दहा सेंटीमीटर व्यासाचा दोन तीन मीटर खोलीचा खड्डाही या कामी उपयोगी पडतो. भूजलपातळी वाढण्यासाठी त्याचा जरूर उपयोग होतो. शहरात, गावात कूपनलिका खणल्या जातात, पण अनेकदा पाणी लागत नाही. अशा कूपनलिकांमध्येही असे जवळपासचे पाणी भू उदरात भरण्यासाठी सोडता येते. दहा हजार चौरस मीटरच्या सर्वसामान्य इमारतीच्या गच्चीवरचे पाणी साठवल्यास किमान तीन महिने त्या इमारतीत राहणाऱ्या सर्वांना पावसाळ्यात व त्यानंतरचे दोन महिने साठवलेल्या पाण्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकतो. महानगरांमधून इमारतीचे नकाशे मंजूर करून तिला परवानगी देताना अशी रचना करणे आता गरजेचे वाटू लागले आहे. पुणे महानगरपालिकेने स्वतःच्या विस्तीर्ण इमारतीत तशी रचना करायला सुरुवातही केली आहे. 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या एका वाक्यात अन्य ठिकाणच्या रेनवॉटर हार्वेस्टिंगचा सारा अर्थ सामावतो. उतारावर, डोंगरावर समतल बांधांची रचना यासाठी केली जाते. कंटूरबंडिंग या नावाने ती ओळखली जाते. पावसाचे पाणी या विविध बांधांना अडते, जिरते, माती वाहून नेणे थांबते. याशिवाय मोठ्या पावसात वाहणारे पाणी पाझर तलाव बांधून अडवले जाते. पावसाळा ऑक्टोबरमध्ये संपला की, त्यानंतर शेती, जनावरे, पक्षी यांना या पाण्याचा अगदी मार्चपर्यंतही उपयोग होतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाझर तलावाचे पाणी जमिनीत मुरल्याने त्या परिसरातल्या व खालच्या भागातल्या विहिरींची भूजलपातळी उंचावते. महाराष्ट्रातील भूजलपातळी १९५० साली होती, त्याच्या दुपटीने खोलवर गेली आहे. याचाच अर्थ ६ मीटरवर विहिरीला बारा महिने पाणी असायचे, तिथे आता २० मीटरपर्यंत खोल जावे लागते. कुपनलिकांची अवस्था याहूनही वाईट आहे. अनेक ठिकाणी दोनशे फुटांपेक्षा जास्त खोल गेल्याशिवाय पाणी लागत नाही. गावाच्या शिवारात पडलेल्या पावसाच्या पाण्यापैकी किमान पन्नास टक्के पाणी या पद्धतीने अडवणे, जिरवणे शक्य असते, असे प्रयोगाअंती अनेकांनी सिद्ध केले आहे. अण्णासाहेब हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे, तरुण भारत संघाच्या राजेंद्रसिंह यांनी राजस्थानमध्ये, विलासराव साळुंके यांनी पुरंदर जिल्ह्यातील केलेल्या प्रयोगांतून या गावांची पाण्याची गरज भागू लागली आहे. गावात हिरवाई निर्माण झाली आहे, गरज आहे अशा प्रयोगांतून अन्य गावातील गावकऱयांनी प्रेरणा घेण्याची. शेताच्या खोलगट भागात चर खणून शेततळी घेण्याचे प्रयोगही यशस्वी झाले आहेत. पण सार्वत्रिक प्रयोगातून सारा परिसर हिरवागार करण्याचे प्रयत्न मात्र कमी पडत आहेत.छोट्या नदीमध्ये, ओढ्यांमध्ये ठराविक अंतरावर बंधारे घालण्याच्या सरकारी पातळीवरच्या प्रयत्नांनासुद्धा यश येत आहे. ओढ्याच्या पात्रातली दगड, वाळू सिमेंटच्या रिकाम्या पोत्यात भरून व्यवस्थित बंधारा बांधता येतो. असे बंधारे आठ ते दहा वर्षे चांगले टिकतात.इस्रायलसारख्या देशात जेमतेम सहा ते दहा इंच वार्षिक पाऊस पडतो. याउलट भारताच्या अनेक भागांत सरासरी चाळीस ते पन्नास इंच पाऊस पडतो. महाराष्ट्रातील अगदी दुष्काळी भागातसुद्धा पावसाचे वार्षिक प्रमाण वीस इंच एवढे आहे. इस्रायलने पाण्याचा प्रत्येक थेंब उपयोगात आणण्याचा गेली पन्नास वर्षे प्रयत्न केला आहे. याउलट भारतातील पावसाचे पाणी आजही बहुतांश वाहून जाते. पावसाळ्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अक्षरश: भेडसावू लागतो.यावरचा एकमेव उपाय म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पाण्याचे पुनर्भरण, पुनर्वापर करण्याचा आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरे शिक्षण फक्त सत्याचे दर्शनच घडवत नाही, तर ते अमलात आणते आणि तेच त्याचे पूर्ण ध्येय असते. ---- मेरी-बेकर-एडी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे पथक प्रमुख* म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?२) रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत ?३) 'कारगिल वॉर द टर्निंग पॉईंट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?४) 'ठसा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) देशाची पहिली ट्रांसजेंडर सब इन्स्पेक्टर कोण बनले आहे ? *उत्तरे :-* १) गगन नारंग २) नरेंद्र मोदी ३) कर्नल एम. बी. रवींद्रनाथ ४) खूण ५) मानवी कश्यप, बिहार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अनुराधा पहाडे राजूरकर, माहूर👤 सुनील जवंजाळ, सांगोला👤 अहमद शेख👤 रवी यलमोड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्वास-श्वास में नाम ले बृथा श्वास मत खोए।न जाने इस श्वास को आवन होए ना होए॥10॥कबीर साहेब कहते है – हर स्वास में नाम लेने के लिए कहते है , एक भी स्वास खली नहीं जाना चाहिए बिना नाम का , क्यूंकि इस स्वास का कोई भरोसा नहीं है अभी गया तो वापस लौटे या नहीं।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना मान, अपमान यांचे येणे,जाणे सुरूच राहते. त्या दोन्ही प्रसंगी संयम तसेच शांतपणे रहाण्याचा प्रयत्न करावा. कारण शांत हा एक सर्वोत्तम गुणच नसून संपत्ती सुद्धा आहे म्हणून त्याची महानता कित्येक वर्षापासून जाणली गेली आहे. त्याचा आदर केला जातो. आपणही त्या गुणाचा आदर करावा. कधीकाळी सांगता येत नाही. आपला अपमान करणारे सुद्धा ती शांतता बघून पुन्हा एकदा नव्याने जगायला लागतील तोच आपल्यासाठी मिळालेला सर्वांत मोठा सन्मान असेल.म्हणून शांत राहण्याचा अवश्य प्रयत्न करावा जेणेकरून आपल्या या एका प्रयत्नाने एखाद्या भटकलेल्या माणसाला नवी दिशा मिळेल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ फसवे बाह्यरूप ❃*        एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन्ह खात बसल्या असता त्यापैकी एकजण दुसरीस म्हणाली, 'आमची स्थिती मोठी शोचनीय आहे ! आम्ही फक्त जिवंत आहोत एवढंच, बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही.     आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो ! यापेक्षा रानातल्या वार्‍यासारख्या उड्या मारणार्‍या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती !' हे बोलत असताच एक हरिणामागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने प्रत्यक्ष पाहिला.    त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणार्‍या पहिल्या घोरपडीला म्हणाली, 'ज्या हरणाचं जीवन आपल्याला मिळावं अशी इच्छा तू करीत होतीस त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे, हे आता प्रत्यक्षच पाहा अन् ज्या मोठेपणाबरोबर अनेक दुःखही भोगावी लागतात तो मोठेपणा देवाने आपणास दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान !'         *_🌀तात्पर्य_ ::~*  *बाह्य रूपावर जाऊन फसू नये, कारण त्याच्या अंतर्यामी दुःख असण्याचीच शक्यता असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment