✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 जानेवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2016/11/blog-post_23.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २०वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००९:अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.**१९९९:गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर**१९९८:संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ’पोलार संगीत पुरस्कार’ विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर**१९६३:चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.**१९४४:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने बर्लिनवर २३०० टन बॉम्बवर्षाव केला.**१९३७:फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.**१८४१:ब्रिटिशांनी हाँगकाँग बेटाचा ताबा घेतला.**१७८८:इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्‍यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:डॉ. कोंडबा भगवान हाटकर-- लेखक**१९८०:दिनेशकुमार रामदास अंबादे-- कवी* *१९७७:अॅड.नीता प्रफुल्ल कचवे-- कवयित्री,कादंबरी,कथालेखिका* *१९७२:भुपेश पांड्या --चित्रपट अभिनेते (मृत्यू:२३ सप्टेंबर २०२०)**१९७०:डॉ.मंजुषा सुनील सावरकर -- कथा लेखिका,संपादिका* *१९६८:प्रा.अन्नपूर्णा अजाबराव चौधरी-- कवयित्री,लेखिका**१९६४:साहेबराव आनंदराव नंदन-- समाज प्रबोधन,लेखक**१९६३:अमोल मारुती रेडीज -- लेखक,कवी* *१९६०:स्टीफन एम.परेरा-- कथाकार* *१९६०:आपा शेर्पा – १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक**१९५४:विजय शं.माळी- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५१:वसंत सीताराम पाटणकर-- मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी,समीक्षक**१९५०:प्राचार्य डॉ.रमेश अंधारे-- कादंबरीकार,संपादक**१९४७:फुलचंद पत्रुजी खोब्रागडे -- कवी, लेखक* *१९४७:लीला प्रभाकर गाजरे-- कवयित्री**१९४६:डॉ.शोभा अभ्यंकर-- भारतीय संगीतशास्त्रज्ञ आणि मेवाती घराण्याच्या शिक्षिका(मृत्यू:१७ ऑक्टोंबर २०१४)**१९४५:डॉ.माणिक तुकाराम वैद्य-- कवी* *१९३७:प्राचार्य डॉ.दाऊद दळवी-- इतिहासाचे अभ्यासक(मृत्यू:३१ ऑगस्ट २०१६)**१९२४:मनोहर नामदेव वानखडे-- व्यासंगी साहित्यसमीक्षक आणि दलितांच्या वाङ्‌मयीन-सांस्कृतिक चळवळींचे नेते(मृत्यू:१ मे १९७८)**१९२०:विष्णुपंत पुरुषोत्तम भागवत-- लेखक, संपादक (मृत्यू:२३ डिसेंबर १९७५)**१८९८:कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार (मृत्यू:२० आक्टोबर १९७४)**१८७१:सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति (मृत्यू:५ सप्टेंबर १९१८)**१८६१:काशीबाई गोविंदराव कानिटकर --आधुनिक मराठी साहित्यातील आद्यलेखिका(मृत्यू:३० जानेवारी १९४८)**१७७५:आंद्रे अ‍ॅम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१० जून १८३६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९:भगवान ठग -- कवी आणि अनुवादक(जन्म:२४ जानेवारी १९५३)**२००२:रामेश्वरनाथ काओ – रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष.काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते.(जन्म:१० मे १९१८)**२००९:बाळ गंगाधर सामंत--मराठी लेखक, विनोदकार व चरित्रकार (जन्म:२७ मे १९२४)**१९९३:ऑड्रे हेपबर्न – ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी,’रोमन हॉलिडे’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. (जन्म:४ मे १९२९)**१९८८:खान अब्दुल गफार खान तथा ’सरहद गांधी’सरहद्द प्रांत आणि बलुचिस्तानमधील एक महान राजकारणी,ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला (जन्म:३ जून १८९०)**१९८०:कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण(जन्म:१९ डिसेंबर १८९४)**१९५१:अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक (जन्म:२९ नोव्हेंबर १८६९)**१९३६:जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा (जन्म:३ जून १८६५)**१८९१:डेविड कालाकौआ – हवाईचा राजा (जन्म:१६ नोव्हेंबर १८३६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पाऊलवाट : शिक्षण क्षेत्रातील एक दिशादर्शक पुस्तक*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने राज्यात २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हवामान बदलामुळे गेल्या 10 वर्षांत भारतात मान्सूनमधील पर्जन्यमानामध्ये ५५ टक्‍के वाढ: CEEW चा अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हिंगोली - राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकावर चाकूने हल्ला:हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी; हल्लेखोरांवर गुन्हा दाखल, चौकशी सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई : पर्यटन सदिच्छा दूतपदी माजी मिस इंडिया युनिव्हर्स नवेली देशमुख यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *20 ते 28 जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिव्हल 2024 चं आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मनोज जरांगेंचं वादळ राजधानीत धडकणार ! आज अंतरवाली सराटी येथून करणार सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचं 'मिशन वर्ल्ड कप' दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्यासाठी सज्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निसर्ग रुसल्याने नंदनवन ओस काश्मीर म्हणजे साक्षात पृथ्वीवरील नंदनवन. काश्मीर मधील निसर्गाची संपूर्ण जगाला भुरळ पडली आहे विशेषतः हिवाळ्यात काश्मीर मध्ये जाऊन काश्मीरमधील निसर्ग जीवनात एकदातरी अनुभवावा ही प्रत्येकाची इच्छा असते. निसर्गाने काश्मीरला जे दान दिले आहे तसे दान इतर कोणत्याही प्रदेशाला दिले नाही म्हणूनच काही जण काश्मीरला जमिनीवरचा स्वर्ग असेही म्हणतात. झेलम, चिनाब, निडर आदी नद्यांचे खळखळते पाणी, हिरवीगार जंगलसंपदा आणि बर्फाच्छादित पर्वत, धुक्याने पांघरलेली चादर त्यामुळे काश्मीर हे पर्यटकांचे आवडते थंड हवेचे ठिकाण आहे मात्र याच काश्मीरला गेल्या काही वर्षापासून कोणाची तरी नजर लागली. काश्मीरमध्ये पाकिस्तानने दहशतवाद पोसला सतत होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे पृथ्वीवरील या नंदनवनात पर्यटक जीव मुठीत धरूनच येत असे मात्र केंद्र सरकारने काश्मीरला लागू असलेले ३७० वे कलम हटवल्याने तेथील दहशतवादी कारवाया कमी झाल्या त्यामुळे काश्मीरमध्ये पर्यटक पुन्हा परततील अशी आशा वाटू लागली. झालेही तसेच मागील वर्षी जानेवारीच्या मध्यापर्यंत जवळपास १ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती त्यात परदेशी पर्यटकांची संख्याही लक्षणीय होती. काश्मीरमध्ये पर्यटक परतू लागल्याने स्थानिक काश्मिरी लोकांनाही रोजगार मिळू लागला. काश्मीरचे गेलेले वैभव परत येऊ लागले असे वाटत होते. गेल्या वर्षी पर्यटकांनी काश्मीरला पसंती दिल्याने यावर्षी मागील वर्षापेक्षा अधिक पर्यटक काश्मीरला भेट देतील असे वाटू लागले होते. पर्यटकांनी नंदनवन पुन्हा बहरू लागेल असे वाटत असतानाच काश्मीरला पुन्हा कोणाची तरी नजर लागली. यावर्षी काश्मीरमधील निसर्गाने खप्पा मर्जी केली. निसर्ग रुसल्याने यावर्षी म्हणावी तशी बर्फवृष्टी झाली नाही. गुलमर्ग हे काश्मीरमधील सर्वांचे आवडते थंड हवेचे ठिकाण. काश्मीरला जाणारा पर्यटक आवर्जून गुलमर्गचा निसर्ग अनुभवायला गुलमर्ग ला भेट देतोच मात्र यावर्षी गुलमर्ग बर्फाविना कोरडे पडले आहे. संपूर्ण काश्मीर खोऱ्यात च म्हणावी तशी बर्फवृष्टी झाली नाही. अगदी तुरळक बर्फवृष्टी झाल्याने पर्यटकांना बर्फातील स्कियिंग आणि अन्य खेळ खेळता येत नाहीत त्यामुळेच अनेक पर्यटकांनी काश्मीर चे केलेले बुकिंग रद्द केले आहे. यावर्षी मागील वर्षापेक्षा ५० टक्के पर्यटकही आले नाहीत. पर्यटक नसल्याने हिवाळ्यातील सर्व व्यवसाय थंड पडले आहेत. स्थानिक लोकांचा रोजगार बुडाला. काही चित्रपट निर्मात्यांनी काश्मीरमधील चित्रीकरणही रद्द केले आहे. पर्यटक येत नसल्याचा परिणाम काश्मीरच्या अर्थ्यवस्थेवरही झाला आहे. गेल्या वर्षी पर्यटकांनी बहरलेले हे नंदनवन आज पर्यटकांविना ओस पडले आहे. गेल्या अनेक वर्षात अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती असे तेथील जाणकार सांगतात. इतका कमी बर्फवृष्टी यापूर्वी कधी अनुभवली नव्हती असेही तेथील काही लोक सांगतात. यावर्षी निसर्गाने काश्मीरवर अवकृपा केल्याने काश्मीरच नाही तर देश चिंतेत आहे. यावर्षी जरी निसर्गाने अवकृपा केली असली तरी पुढील वर्षी तरी निसर्ग काश्मीरवर कृपा करेल पृथ्वीवरील हे नंदनवन पर्यटकांनी पुन्हा बहरेल अशी अपेक्षा स्थानिक नागरिकच नव्हे संपूर्ण देशातील नागरिक व्यक्त करत आहेत. श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अयोध्या येथील राममंदिरात कोणत्या शिल्पकाराने तयार केलेली मूर्ती विराजमान होणार आहे ?२) आंतरराष्ट्रीय टी - २० क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक शतक कोणी केले ?३) महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता ?४) सर्वात जास्त विमान अपघात केव्हा होतात ?५) फोर्ब्सच्या ताज्या आकडेवारीनुसार सर्वाधिक अब्जाधीश लोक कोणत्या देशात आहेत ? *उत्तरे :-* १) अरूण योगिराज, म्हैसूर २) रोहित शर्मा, भारत ( ५ शतके ) ३) अहमदनगर ४) विमान लँडिंग होतांना ५) अमेरिका ( ७३५ ), भारत ( १६९ अब्जाधीश )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 किशोर पाटील, युनिक कॉम्प्युटर्स, धर्माबाद👤 शंकर बेल्लूरकर👤 अहमद लड्डा सय्यद, पत्रकार👤 संतोष शेटकार👤 शरयू देसाई👤 माऊली जाजेवार👤 विशु पाटील वानखेडे👤 नागनाथ दिग्रसकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी। विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी॥ तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे। म्हणोनी सदा तेचि शोधीत जावे॥१७०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकालाच एकटे यावे लागते आणि एकटेच जावे लागते हा निसर्गाचा नियम आहे. पण, या जगात जगत असताना आजुबाजूचाही आपण विचार करावा. कोणी आपुलकीने मदत करतात तर कोणाचे सांगता येत नाही. म्हणून कोणी आपुलकीच्या नात्याने मदत केली असेल त्यांना कधीही विसरू नये. व जे, कोणी तिरस्कार करतात त्यांचा राग धरू नये. कारण चांगले करणारेच अजरामर होऊन जातात व जे काहीच करत नाही त्यांचे जीवन व्यर्थ होऊन जाते भलेही सोबत कोणी काहीच घेऊन जात नसले तरी इतरांना केलेली मदत ही माणुसकीची साथ असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कोल्हा आणि नगारा*एकदा एक कोल्हा भुकेने व्याकूळ होऊन जंगलात इकडे तिकडे फिरत होता. तेवढ्यात त्याला मोठा आवाज ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने कोल्हा चांगलाच घाबरला. पण तो आवाज कोणता प्राणी काढतोय या उत्सुकतेपोटी दबकत दबकत आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तर त्याच्या नजरेस एक मोठा नगारा पडला. त्या नगार्‍यावर एका झाडाची फांदी वार्‍यामुळे आपटत होती. त्यामुळे तो मोठा आवाज येत होता. हे कोल्ह्याच्या लक्षात आल्यावर कोल्हा नगार्‍यावर आपला पंजा मारून लागला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की नगार्‍याचे कातडे गुंडाळले आहे. ते ओरबाडले तर आत भरपूर मांस असेल. त्यामुळे निदान दोन दिवसांची तरी भूक शमेल. देवाची कृपा समजून त्याने नगार्‍याचे कातडे कुरतडून फाडले तर... आत काहीच नाही. नुसता पोकळ नगारा बघून कोल्हा दु:खी झाला, पण कातडे कुरतडताना त्याच्या दाढाही दुखावल्या.उपदेश : प्रसंग आनंदाचा किंवा भीतीचा असला तरी जो शहाणा माणूस मागचा पुढचा विचार करून वागतो त्याला पश्चात्ताप करण्याची पाळी येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment