✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 जानेवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/12/savitribai-phule.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_बालिका दिन,महिला मुक्तिदिन_*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील तिसरा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००४:नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.**१९५७:हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.**१९५०:पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले.**१९४७:अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.**१९२५:बेनिटो मुसोलिनी इटलीचा हुकूमशहा बनला.**१४९६:लिओनार्डो डा व्हिन्सीने उडणाऱ्या यंत्राची अयशस्वी चाचणी केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:मधुकर बाळासाहेब जाधव-- लेखक, कवी**१९८०:सुनिता झाडे -- लेखिका,संपादिका**१९७५:प्रा.डॉ.विजय फकिरा राठोड-- कवी लेखक,व्याख्याते* *१९७१:सरिता सुवास परसोडकर-- कवयित्री**१९७१:अशोक गणपतराव पाठक-- कवी**१९६५:धनंजय माधवराव मुळे-- लेखक,कवी**१९६२:डॉ.मेघा उज्जैनकर-- लेखिका**१९६१:राजेंद्र खेर - सुप्रसिद्ध कादंबरीकार**१९६०:डॉ.वृषाली किन्हाळकर -- लेखिका* *१९५८:दिगंबर पवार-- कवी**१९५६:शिरीष श्रीकृष्ण गंधे-- कवी,लेखक,चित्रकार,व्याख्याते,अभिनेते**१९५२:श्रीराम वसंतराव ढवळीकर-- लेखक, पत्रकार**१९५१:अशोक निळकंठ सोनवणे-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९४७:मनोहर गणपत भारंबे-- लेखक**१९४६:प्रा.डॉ.दीनानाथ सिद्धराम फुलवाडकर-- कवी,कथाकार,संपादक (मृत्यू:१४ नोव्हेंबर २०२१)**१९३७:सिंधू सदाशिव डांगे--संस्कृत संशोधक, लेखिका,संपादक**१९३१:य.दि.फडके – लेखक,विचारवंत व इतिहाससंशोधक (मृत्यू:११ जानेवारी २००८)**१९२१:चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (मृत्यू:६ जुलै १९९७)**१८८३:क्लेमंट अ‍ॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू:८ आक्टोबर १९६७)**१८५३:कृष्णाजी नारायण आठल्ये--संपादक, चित्रकार,टीकाकार,निबंधकार,कवी(मृत्यु:२९ नोव्हेंबर १९२६)**_१८३१:सावित्रीबाई फुले – भारतीय शिक्षिका,कवयित्री व समाजसुधारक त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.(मृत्यू:१० मार्च १८९७)_* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:डॉ.चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी-- भारतीय न्यायाधीश,लेखक(जन्म:२० नोव्हेंबर १९२७)**२०१५:सरिता मंगेश पदकी--कवयित्री, कथालेखिका, बालसाहित्यकार, नाटककार आणि अनुवादिका(जन्म:१३ डिसेंबर १९२८)**२००२:सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (जन्म:२५ सप्टेंबर १९२०)**२०००:डॉ.सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (जन्म:२६ डिसेंबर १९१४)**१९९८:प्रा.केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (जन्म:८ फेब्रुवारी १९०९)**१९९४:अमरेन्द्र गाडगीळ – मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक(जन्म:२५ जून १९१९)**१९७५:ललितनारायण मिश्रा--बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन.(जन्म:२ फेब्रुवारी १९२३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मी सावित्री बोलतेय....!*....!*नमस्कार .....मी सावित्रीबाई फुले माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी पाठविण्याचे ठरविले. मात्र मी होते अक्षरशत्रू, मला वाचताही येत नव्हते आणि लिहिताही. पण ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नाशिकला १२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव; पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांची बैठकीत हिट अँड रनचा कायदा लागू न करण्याचा झाला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *स्कूल बसच्या चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये, अन्यथा कारवाई करणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा-कुणबीसाठी अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत, मग समितीचा उपयोग काय? जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *1 जानेवारी उलटली तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाबाबत हालचाल नाही, किसान सभेचा आंदोलनाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अंबिका मसाल्याच्या प्रवर्तक कमल परदेशी यांचं 63 व्या वर्षी निधन, शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल असलेल्या उद्योग समूहाच्या चेअरमन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अजिंक्य रहाणेला मिळाली रणजी साठी मुंबई कर्णधारपदाची जबाबदारी, नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच मिळालं सर्वात मोठ गिफ्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ओझोन म्हणजे काय ?* 📙 या दशकातला बहुचर्चित वायू म्हणजे ओझोन. प्राणवायूमध्ये ऑक्सिजनच्या दोन अणूंनी रेणू बनतो. तर ओझोनच्या तीन अणूंनी. पण या छोट्याशा फरकाने दोन्हींच्या गुणांत खूपच फरक पडतो. ओझोन हा फिक्कट निळा, तीक्ष्ण वास असलेला वायू आहे. विजेची मोटार चालू करताना व विजेची बटणे सतत उघडझाप केल्यास एक विशिष्ट वास जाणवतो, तो ओझोनचा. ओझोन वातावरणाच्या अगदी वरच्या थरात म्हणजे वीस ते तीस किलोमीटरमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. येथे त्याचे प्रमाण वातावरणातील दर दहा लाख अन्य रेणूंमध्ये दहा रेणू (10 parts per million) इतके आढळते. याचा उपयोग अतिनील किरणे पृथ्वीवर पोहोचू नयेत म्हणून होतो. याउलट हाच ओझोन जेव्हा वातावरणाच्या खालच्या थरात येतो, तेव्हा तो त्रासदायक बनतो. याच्या सान्निध्याने अनेक कृत्रिम गोष्टी म्हणजे रबर, प्लॅस्टिक, रसायने यांचे उन्हात विघटन होऊ लागते. धूळ, धूर व ओझोन यांच्या मिश्रणाने स्माॅग तयार व्हायला मदत होते. असेही एक मत आहे. ओझोनचा व्यावहारिक उपयोग पाणी शुद्धीकरण व ब्लीचिंगसाठी केला जातो. औद्योगिक वापरासाठी ओझोन तयार करण्याची पद्धत म्हणजे बंदिस्त वातावरणात ठरावीक दाबाचा हवेमध्ये विद्युत ठिणग्या सतत पाडल्या जातात. या हवेत ओझोनचे प्रमाण वाढत जाते व प्राणवायूचे कमी होत जाते. वातावरणात ज्यावेळी प्रचंड विजांचा कडकडाट नैसर्गिकरित्या होतो, तेव्हाही ओझोन तयार होतोच.१९७० सालच्या आसपास ओझोनचा थर अंटार्क्टिकांवरती काही भागांत नष्ट झाला असून तेथे अतिनील किरणांचे प्राबल्य वाढले असल्याचे लक्षात आले. याचा शोध घेताना मानवनिर्मित क्लोरोफ्लुरोकार्बन (सीएफसी) च्या द्रव्याचा हा परिणाम असल्याचे लक्षात आले. हा एक तर्क आहे. हे सीएससीचे निरुपद्रवी कण जेव्हा हळूहळू ओझोनच्या थरातील ओझोनबरोबर संयोग पावतात, तेव्हा मोठ्या प्रमाणातील विघटनाला सुरुवात होते. यामुळे अतिनील किरणांचा पृथ्वीवर मारा वाढल्यास कातडीचे कर्करोग वाढतील व उष्णता वाढून बर्फ वितळून पाण्याची जागतिक पातळी वाढेल, अशी भीती व्यक्त केली गेली. या सर्वांचा परिणाम म्हणून ओझोन वायू या दशकात चर्चेचा केंद्रबिंदुच बनला आहे. सीएफसीचा वापर सर्व एरोसोलमध्ये व शीतीकरणासाठी केला जातो. याचे उत्पादन बंद करून त्याचे पर्याय सर्वांनी वापरावेत, या स्वरूपाचा सर्व देशांनी एक करार मॉन्ट्रियल येथे केला आहे. टप्प्याटप्प्याने उत्पादन कमी करणे व पर्यायी वापर सुरू करणे हे त्यात अपेक्षित आहे.काही शास्त्रज्ञांच्या मते ओझोनचा थराची थर नष्ट होणे यामध्ये मानव व प्राणिजातीला अणुयुद्धाएवढाच धोका उद्भवतो. काहींचे मत याला प्रतिकूल आहे. पण एक गोष्ट निर्विवाद आहे, ती म्हणजे ओझोनचा थर आहे तसाच टिकणे, हे आपल्यालाच काय, पण पृथ्वीवरच्या सर्वच सजीव सृष्टीला आवश्यक आहे.सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*"शिक्षक हा विद्यार्थ्याचा दुसरा पालकच असतो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या आद्य शिक्षिका कोण ?२) *'बालिका दिवस'* केव्हा साजरा केला जातो ?३) 'स्त्री मुक्ती दिन' केव्हा साजरा केला जातो ?४) जालना ते मुंबई दरम्यान धावणारी महाराष्ट्रातील ही कितवी वंदे भारत एक्स्प्रेस आहे ?५) उत्तरप्रदेश राज्यात लोकसभा सदस्यसंख्या किती आहे ? *उत्तरे :-* १) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले २) ३ जानेवारी ३) ३ जानेवारी ४) ६ वी ५) ८०*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. वृषाली किन्हाळकर, साहित्यिक, नांदेड👤 ज्ञानेश्वर विजागत, शिक्षक👤 वर्षा भोळे, नांदेड👤 शुभांगी परळकर, नांदेड👤 संदीप जाधव वसूरकर👤 माधव पवार👤 योगेश पाटील👤 उत्तम जोंधळे👤 राजेश पिकले👤 डॉ. प्रशांत बोड्डेवाड, येवती👤 विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने ।समाधान कांही नव्हे तानमाने॥नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें।समाधान ते सज्जनाचेनि योगे॥१५३॥सरळ अर्थ - केवळ भौतिक ज्ञान असण्याने किंवा केवळ अध्यात्मिक ज्ञानाची जाणीव असल्याने आपल्याला समाधान मिळत नाही. संगीत ऐकण्याने, कर्मयोग पालन करण्याने किंवा संन्यस्त राहण्यानेही जे समाधान मिळत नाही ते सज्जनांच्या संगतीत असण्याने मिळते.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पैसे असोत किंवा वस्तू कितीही लपवून ठेवण्याचा जरी प्रयत्न केले तरी ते जास्त दिवस लपून राहत नाही. त्यांची एक ना एक दिवस गरज पडत असते. तसंच कोणाविषयी कितीही वाईट बोलले तरी ते बोललेले शब्द फार काळ लपून राहत नाही. भलेही त्यावेळी एखाद्याच्या डोळ्यावर जरी पट्टी बांधण्याचा प्रयत्न केले असेल तरी अनेकांच्या डोळ्यावर बांधून असलेली पट्टी बिना आधाराने ही आपोआप सुटत असते म्हणून कोणाच्याही विषयी नको ते बोलून स्वतःचा समाधान करून घेऊ नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्‍वातंत्र्य-पारतंत्र्य*अमेरिकेत एकेकाळी गुलामगिरीची प्रचलित होती. निग्रो लोकांची शेळ्या मेंढ्यांप्रमाणे खरेदीविक्री होत असे. अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीची प्रथा मोडून काढण्‍यासाठी प्रयत्‍न केल्‍यामुळे या प्रथेचा अंत झाला व निग्रो लोकांची गुलामीतून सुटका झाली. मुक्त झाल्‍यानंतर निग्रो लोकांनी रोजगाराचा शोध सुरु केला. एक वृद्ध, अशक्‍त वृद्ध निग्रो माणूस कामाच्‍या शोधात भटकत होता. पण त्‍याला काम काही मिळाले नाही. फिरून फिरून तो थकला व एके जागी बसला. तेथे त्‍याची भेट एका मालक जातीच्‍या ओळखीच्‍या माणसाबरोबर झाली. वृद्ध निग्रोची ती अवस्‍था पाहून तो माणूस म्‍हणाला,''तुझे हे होणारे हाल मला पाहवत नाहीत. तू कशाने इतका त्रस्‍त झाला आहे'' वृद्ध म्‍हणाला,''मला काम मिळत नाही'' तो माणूस म्‍हणाला,''काही दिवसांपूर्वी तर तुझी अवस्‍था चांगली होती.'' निग्रो म्‍हणाला,'' त्‍यावेळी मला बराच आराम होता. माझा मालक खूप दयाळू माणूस होता. मला तो फारसे काम लावत नसे. माझ्यावर अत्‍याचार करत नसे. कठीण कामे करण्‍यास लावित नसे.'' सहानुभूती दाखवून तो माणूस म्‍हणाला,'' अरे मित्रा मग तर ते गुलामीचे दिवसच चांगले म्‍हणायला हवे की, ही मुक्ती काही तुला मानवली नाहीये असेच दिसून येतेय. ती तुझ्या कोणत्‍याच कामी येत नाहीये.'' हे ऐकताच बसलेला तो निग्रो माणूस ताडकन उठून उभा राहिला व उंच स्‍वरात ओरडून बोलला,''मालक, गुलामगिरी स्‍वीकारण्‍यापेक्षा हे मुक्त जीवन हजारपट चांगले आहे. कारण आमच्‍या जीवनावर केवळ आमचाच अधिकार आहे; ते सावरण्‍यासाठी आम्ही स्‍वतंत्र आहोत. मालकाकडून पिंज-यात मिळणा-या पेरूच्‍या फोडी खाण्‍यापेक्षा उंच आकाशात उपाशीपोटी भरारी घेणे पोपटाला खूप आवडते हे लक्षात आहे ना.''*तात्‍पर्य :- मनुष्‍याच्‍या सर्वांगीण विकासासाठी स्‍वातंत्र्य ही पहिली अट आहे, पारतंत्र्य पतनाचे तर मुक्ती प्रगतीचे द्वार आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment