✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 ऑगस्ट 2023💠 वार - सोमवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २४० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९०:इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.**१९३७:’टोयोटा मोटर्स’ ही स्वतंत्र कंपनी बनली.**१९३१:फ्रान्स आणि सोविएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.**१९१६:पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१९१६:पहिले महायुद्ध – जर्मनीने रोमानियाविरुद्ध युद्ध पुकारले.**१८४५:’सायंटिफिक अमेरिकन’ मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७०:आनंदराव रामचंद्र पवार-- लेखक**१९६८: सुधाकर वासुदेव इनामदार-- कवी,गदिमा व गाडगेबाबा यांचे वरील पोवाडे लेखन व सादरीकरण* *१९६५:संजय नारायण चौधरी -- कवी* *१९५७:अनंत जोग--भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता* *१९५२:गौरी सुभाष गाडेकर-- प्रसिद्ध लेखिका* *१९५१:स्वाती शशिकांत सुरंगळीकर -- कवयित्री,लेखिका**१९४८:जयदेव सुब्बराव हट्टंगडी-- मराठीतले एक नामवंत नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यपरीक्षक (मृत्यू:५ डिसेंबर २००८ )**१९४१:डॉ.श्रावण किसनजी उके--लेखक**१९३४:सुजाता मनोहर – सर्वोच्‍च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा**१९२८:उस्ताद विलायत खाँ – सतारवादक (मृत्यू: १३ मार्च २००४)**१९१८:राम कदम – संगीतकार (मृत्यू:१९ फेब्रुवारी १९९७)**१९०८:विनायक माधव तथा ’विमादी’ पटवर्धन दीक्षित – विनोदकार**१९०६:नटवर्य चिंतामणी गोविंद तथा ’मामा’ पेंडसे (मृत्यू:१९९१)**१९०३:उमाकांत केशव आपटे उपाख्य बाबासाहेब आपटे--राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व लेखक (मृत्यू:२६ जुलै १९७२)**१८९६:रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी– ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (मृत्यू: ३ मार्च १९८२)**१८९३:रघुनाथ दामोदर करमरकर--लेखक, व्याख्याते,संशोधक(मृत्यू:२८ नोव्हेंबर १९६५)**१८७१:श्रीधर विष्णू परांजपे -- टीकाकार, चरित्रकार व समीक्षक (मृत्यू:१८ नोव्हेंबर १९५४)**१७४९:योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी,लेखक,कलाकार आणि राजकारणी (मृत्यू:२२ मार्च १८३२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:कविता विश्वनाथ नरवणे-- जेष्ठ लेखिका (जन्म:१२ मार्च १९३३)* *२०१०:डॉ.सुहासिनी यशवंत इर्लेकर -- कवयित्री,लेखिका,संत साहित्याच्या अभ्यासक(जन्म:१७ फेब्रुवारी १९३२)* *२००१:व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – सुप्रसिद्ध लेखक,चित्रकार,पटकथाकार,शिकारी (जन्म:६ जुलै १९२७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता *पाऊस गाणे*पाऊस आला, पाऊस आलाआला संगे वारापाऊस येता भारूनी जाईआसमंतही सारागडगड करूनी मेघ सावळानाद अंबरी भरतोसौदामिनीचा प्रकाश पसरूनीअवनीवरती येतोपाऊस येता हर्ष होऊनीरिमझिम गाणे गातोस्वैर होऊनी मयूर कसा हानृत्य काननी करतोतरू-वेलींवर कळय़ा फुलेहीडुलती आनंदातभिजता-भिजता वा-यासंगेपाऊस गाणे गातपाऊस येता भिजलेल्यामातीचा पसरे गंधसुचते मजला नकळत तेव्हागीत असे स्वच्छंदअमेय गुप्ते, दादरसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात पुण्याचा डंका! मृणाल गांजाळे यांनी कोरले नाव, ठरल्या राज्यातील एकमेव शिक्षिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईच्या सांताक्रूझमधील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग, तीन जणांचा मृत्यू; पाच जण जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *'परभणीमध्ये विकासाची गंगा आणणार', 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील अनेक भागात पाण्याची परिस्थिती गंभीर, सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून; अजित पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई-गोवा महामार्गाबाबत महत्त्वाची बातमी; गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहनांना बंदी, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कपसाठी बीसीसीआयचा ऐतिहासिक पुढाकार; अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला पाकिस्तानला जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *परभणी* महाराष्ट्रातील परभणी जिल्हा हा पुरातन काळातील प्रभावती देवीच्या मंदिरावरुन या जिल्ह्यास परभणी असे नाव देण्यात आले आहे. *पुणे* महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा विद्येचे माहेरघर या नावाने ओळखले जाते. तसेच राष्ट्रकूट राजवटीत या शहराचे नाव पुनवडी होते. पुण्य या शब्दावरुन पुणे अशी ओळख निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यात यश मिळवण्यासाठी चिकाटीला जिवलग मित्र बनवा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इन्सुलिनचा वापर कोणत्या आजारात केला जातो ?२) आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?३) बिहू हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे ?४) पंजाब केसरी असे कोणास म्हटले जाते ?५) हवामहल कोठे आहे ?उत्तरे :- १) मधुमेह ( शुगर ) २) स्वामी दयानंद सरस्वती ३) आसाम ४) लाला लजपतराय ५) जयपूर *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 संजय बंटी पाटील, बाळापूर👤 अशोक मामीडवार👤 रवी राजमाने, साहित्यिक, सांगली👤 तिरुपती अंगरोड, धर्माबाद👤 आनंद आवरे, धर्माबाद👤 कवी गणेश घुले, औरंगाबाद👤 कामशेट्टी लक्ष्मण, 👤 साईनाथ गोणारकर, धर्माबाद👤 सुनीता महाडिक, मुंबई👤 विजय दिंडे, धर्माबाद👤 डी. एस. पाटील, भोकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगीं होइजे धन्य या रामनामे। क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे॥ उदासीनता तत्त्वता सार आहे। सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥५७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले स्वतःचे दु:ख‌ इतरांना सांगत फिरणे व तेच दु:ख स्वतः सहन करणे यात खूप फरक आहे. कारण कधी, कधी असं होतं की, आपण मनमोकळेपणाने आपले दु:ख एखाद्या व्यक्तीला सांगताना त्या,व्यक्तीला पूर्णपणे वाचत नाही त्यामुळे बऱ्याच अडचणी न सांगता येत असतात. दु:ख कमी होण्या ऐवजी वाढत जातात.शेवटी आपले दु:ख आपल्यालाच सहन करून त्यातून मार्ग काढावे लागते. त्यासाठी इतरांना सांगत फिरण्यापेक्षा जीवनात आलेल्या दु:खाचे स्वागत करावे कारण, दु:खातूनच शेवटी सुखाची प्राप्ती होत असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *"पवित्र जल"*कोणे एके काळी एका गावात एक सुब्रमण्यम नावाचा गृहस्थ राहात होता. त्याचे त्याच्या बायकोबरोबर अजिबात पटत नसे. त्यामुळे त्यांची दररोज शाब्दिक खडाजंगी व्हायची. अर्थात आजूबाजूचे लोकही यामुळे त्रस्त होते. त्याच वेळेला त्या गावात एक ज्ञानी साधू आले. आपल्या स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी गावातील कित्येक लोक त्यांच्याकडे जात असत. ते ऐकून सुब्रमण्यम यांची पत्नी शांता साधूकडे सल्लामसलतीसाठी गेली. तिची समस्या ऐकून साधू म्हणाले, "महोदया, मी तुम्हाला एक पवित्र जल देत आहे. दररोज कामावरून तुमचे पती घरी आले की त्यांच्यासमोर हसतमुखाने जाऊन त्यांना पाण्याचा ग्लास देत जा. त्यावर त्यांनी काही तक्रार करून भांडण सुरु जर केले तर तुम्ही हे पवित्र जल तोंडामध्ये धरत जा. तुमचे श्रीमान गप्प झाले की मग ते पिऊन टाकत जा. यामुळे तुमच्यातील भांडणे नक्कीच कमी होतील." साधूची ती सूचना ऐकल्यावर शांताबाईने तसेच केले. सुब्रमण्यम यांनी भांडण सुरू जरी केले तरीही शांता त्याला काहीही प्रत्युत्तर देत नव्हती. त्यामुळे महिनाभर त्या दोघात अजिबात भांडण झाले नाही. आजूबाजूचे शेजारीही त्यामुळे आनंदी होते. परंतु महिन्याभराच्या वापरानंतर शांताकडचे पवित्र जल संपत आले. तेव्हा ती पुन्हा त्या साधूकडे पवित्र जल मागायला गेली. यावर साधू म्हणाले, "महोदया, तुम्हाला दिलेले पवित्र हे प्रत्यक्षात साधे पाणीच होते. परंतु मी दिलेले पवित्र जल तोंडात असल्यामुळे तुम्ही काहीही बोलत नव्हता. आणि तुमचे हेच मौनव्रत तुमच्यामध्ये भांडणं न होण्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्ही साधे पाणी पवित्र जल म्हणून वापरा." शांताबाईंना त्यांच्या आपसातील भांडण न होण्याचे गुपित कळले. आणि तेव्हापासून त्यांनी भांडणाच्या दरम्यान मौनव्रत सुरु केले. अशाप्रकारे ते भांडखोर असलेले जोडपे सुखाने संसार करू लागले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment