✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 ऑगस्ट 2023💠 वार - बुधवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ऑगस्ट क्रांतिदिन_**_जागतिक आदिवासी दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २२१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••*२०००:भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील ’इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च’ या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर**१९९३:छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने ’सरहद गांधी’ खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन**१९७५:पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.**१९६५:मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.**१९४५:अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर ’'फॅटबॉय’ हा अणूबॉम्ब टाकला. यात ३९,००० लोक तत्क्षणी म्रुत्यूमुखी पडले तर हजारो लोकांना पुढील अनेक वर्षे किरणोत्सर्गाचे परिणाम भोगावे लागले. प्रथम हिरोशिमा व नंतर नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणूबॉम्बमुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपुष्टात आले.**१९४२:’चले जाव’ चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.**१९२५:भारतीय स्वातंत्र्यलढा – लखनौजवळ काकोरी येथे रेल्वेवर दरोडा* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१:हंसिका मोटवानी – अभिनेत्री व मॉडेल**१९८३:व्यंकटेश उत्तमराव कल्याणकर-- कवी लेखक* *१९७०:अजय बाळकृष्ण कांडर--प्रसिद्ध कवी, पत्रकार* *१९६९:विवेक मुशरन-- भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन अभिनेता**१९६८:गौरव कुमार आठवले-- जेष्ठ गझलकार* *१९६७:डॉ.वंदना रवीन्द्र घांगुर्डे -- संगीत नाटकांत काम करणाऱ्या मराठी गायिका व लेखिका* *१९६६:गोविंद पाटील-- कवी**१९६६:अर्जुन धोंडबाजी मेश्राम -- कवी* *१९५४: गौतम सखारामपंत सूर्यवंशी -- कवी, लेखक* *१९५४:प्रा.बाबुराव दत्तात्रय गायकवाड-- कादंबरी, कथा लेखन करणारे धारवाड येथील लेखक* *१९४९:प्रा.रवीचंद्र माधवराव हडसनकर-- कवी,गीतकार,लेखक**१९४७:रमेश पतंगे -- ज्येष्ठ विचारवंत,प्रसिद्ध लेखक पद्मश्री पुरस्कार(२०२२)**१९३६:सावनकुमार टाक-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,निर्माता आणि गीतकार (मृत्यू:२५ऑगस्ट२०२२)**१९२०:कृ.ब.निकुम्ब – ‘घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात‘ या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी. त्यांचे अनेक कवितासंग्रह व ‘सायसाखर‘ हे खंडकाव्य प्रसिद्ध आहे.(३० जून १९९९)**१९०९:डॉ.विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक (मृत्यू: २८ एप्रिल १९९२)**१८९०:’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते.(मृत्यू:४ आक्टोबर १९२१)**१८१९:विष्णूदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक, त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने ‘नाट्य्कवितासंग्रह‘ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत.(मृत्यू:९ऑगस्ट१९०१)**१७७६:अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ९ जुलै १८५६)**१७५४:पिअर चार्ल्स एल्फांट – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता (मृत्यू:१४ जून १८२५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२:प्रदीप पटवर्धन--लोकप्रिय मराठी अभिनेता (जन्म:१ जानेवारी १९५८)**२०१७:प्रा.शांताराम पवार -- चित्रकार,कवी(जन्म:१७ ऑगस्ट१९३६)**२००२:शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (जन्म:१ जानेवारी १९१८)**१८९२:वामन शिवराम आपटे--कोशकार, संस्कृतचे गाढे अभ्यासक(जन्म:१ जानेवारी १८५८)**१९७६:जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (जन्म:१४ फेब्रुवारी १९१४)**१९०१:विष्णूदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक, त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने ‘नाट्य्कवितासंग्रह‘ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. (जन्म: ९ऑगस्ट १८१९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदान *कित्तूर राणी चन्नम्मा*कित्तूर राणी चन्नम्मा ( जन्म २३ ऑक्टोबर १७७८ - मृत्यू २१ फेब्रुवारी १८९२) ही धारवाड आणि बेळगावच्या दरम्यान असलेल्या कित्तूर या राज्याची राणी होती.कर्नाटकातील कित्तूर मधील राणी चन्नम्मा हिनेदेखील ब्रिटिशांच्या धोरणाविरुद्ध आवाज उठवला. सैन्याने केलेल्या उठावाचे नेतृत्व तिने केले वयाच्या ३३ व्या वर्षी तिने ब्रिटिश सैन्याविरुद्ध शूरपणे लढा दिला.१८२४ मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध सशस्त्र विद्रोह सुरू झाला. या क्षेत्रावर भारतीय नियंत्रण होते परंतु त्यास योग्य प्रकारे ठेवण्यात ती राणी कमी पडली असे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे म्हणणे होते. सशस्त्र विद्रोहात ती पराभूत झाली तुरुंगातच तिचा मृत्यू झाला. पराभूत झाला व त्याला ठार मारण्यात आला. ब्रिटीश शासनाविरुद्ध बंड करणाऱ्या पहिल्या महिला शासकांपैकी ती एक होती.तिचा पराक्रम कर्नाटकातील महिलांसाठी त्यावेळेस प्रेरणादायी ठरला होता.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रात डोळे येण्याच्या साथीने कहर केलाय. राज्यभरात डोळे आलेल्या रुग्णांची संख्या तब्बत अडीच लाखांपर्यंत पोहोचलीय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *वैद्यकीय प्रवेशासाठी 10 लाखांची लाच; पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा डिन रंगेहात जाळ्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, कामगारांच्या मुख्य समस्या आणि मागण्या मान्य झाल्याचा दावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मध्यरात्री झालेली चर्चा यशस्वी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पंतप्रधान पीक विमा योजनेतील लाभार्थ्यांचे 2700 कोटीचे दावे प्रलंबित, सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे राजस्थानातील, तर महाराष्ट्रातील 336 कोटींचे दावे प्रलंबित, कृषिमंत्र्यांची संसदेत माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांना केंद्राच्या नियंत्रणात आणणारं, सेवा विधेयक राज्यसभेतही मंजूर; विधेयकांच्या बाजूने 131 मते, विरोधात 102 मते*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यंदाही पीओपी गणेश मूर्तींवर बंदी, तात्पुरते धोरणही तयार, सुमोटो याचिकेवरील सुनावणीत राज्य सरकारचं उच्च न्यायालयात शपथपत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना अटक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *बुलडाणा* हा जिल्हा अजिंठ्याच्या डोंगर रांगामध्ये वसलेले. हे शहर प्राचीन काळात भिल्लठाणा म्हणून ज्ञात होते.भिल्लठाणा म्हणजे भिल्लाचे स्थान. त्यानंतर बुलढाणा हे नाव पडले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाचा अर्थ रुपांतर आहे. जे थांबेल ते मृत्यू व जे पुढे जात राहील ते जीवन होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे ?२) महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ?३) जगात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो ?४) महाराष्ट्रातील पुणे विभागात किती जिल्हे आहेत ?५) कोणत्या देशात सर्वाधिक प्रमाणवेळा आहेत ?उत्तरे :- १) कर्कवृत्त २) सिंधुदुर्ग ३) मॉरिसरॅम व चेरापुंजी ४) पाच ५) फ्रान्स*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शिवा अंबुलगेकर, साहित्यिक, मुखेड👤 विलास कोळनूरकर, साहित्यिक, उमरी👤 बुद्धभूषण कांबळे, साहित्यिक, लातूर👤 समाधान बोरुडे, शिक्षक, जालना👤 ऋषिकेश जाधव👤 सुशीलकुमार भालके👤 विलास पानसरे👤 बालाजी तेलंग👤 गणेश पांचाळ👤 विलास पाटील करखेलीकर👤 विनायक कुंटेवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा। सदा रामनामें वदे नित्य साचा॥ स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाचे दुसरे नाव संघर्ष आहे. आणि तो, सर्वांनाच करावा लागतो. हेही तेवढेच सत्य आहे. संघर्ष केल्याशिवाय जीवनाचे महती कळत नाही. याची प्रत्येकांनी जाणीव ठेवून जगले पाहिजे. आपल्या वरती कशीही परिस्थिती आली तरी कधीही चुकीचे पाऊल उचलू नये. कारण, माणसाचे जीवन एकदाच येते दुसऱ्यांदा नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वटवृक्ष आणि गवत*एक वडाचे झाड होते. त्याच्या आजूबाजूला हिरवळ होती, गवत होते. ते झाड त्या गवताला हिणवुन म्हणायचे “अरे काय तुमची पद्धत? तिकडुन वारा आला कि वाकले इकडे, इकडून आला कि वाकले तिकडे.. मी बघा माझ्या जागी स्थिर असतो. त्यामुळे लोक माझा आसरा घ्यायला येतात.”काही दिवसांनी एक मोठे चक्रीवादळ आले. त्याच्या जोराने अनेक झाडे उन्मळून पडली. वटवृक्षाची सुद्धा तीच गत झाली. वादळ ओसरल्यावर गवत मात्र शाबुत होते. कधी कधी मोडेन पण वाकणार नाही असा ताठर बाणा आपले जास्त नुकसान करतो. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment