✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 ऑगस्ट 2023💠 वार - सोमवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २३३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••*१९९३:मंगळाच्या शोधमोहिमेसाठी पाठवण्यात आलेल्या 'मार्स ऑब्झर्व्हर' या यानाचा पृथ्वीशी (NASA) संपर्क तुटला.**१९९१:लाटव्हियाने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले.**१९११:पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे ’मोनालिसा’ हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.**१८८८:विल्यम बरोज याने बेरजा मारणार्‍या यंत्राचे पेटंट घेतले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:दिलीप अधिकराव शिंदे -- लेखक, कवी* *१९६५:प्रा.डॉ.बाळकृष्ण रामचंद्र लळीत-- प्रसिद्ध लेखक,व्याख्याते* *१९६१:व्ही.बी.चन्द्रशेखर – भारताचा फिरकी गोलंदाज(१५:ऑगस्ट २०१९)**१९५६:विद्याधर माधव ताठे-- संतवाङ्गमयाचे अभ्यासक आणि प्रसिद्ध लेखक**१९४८:मेघा जोशी -- कथालेखिका* *१९४८:दया घोंगे - कवयित्री लेखिका* *१९४२:विजय खाडिलकर -- प्रसिद्ध कथाकार* *१९४१:कुमार गणेश सप्तर्षी -- प्रसिद्ध लेखक संपादक* *१९३५:कृष्णाजी जनार्धन दिवेकर-- मराठी साहित्यिक* *_१९३४:सुधाकरराव नाईक – महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री (मृत्यू:१० मे २००१)_**१९३१:डॉ.शंकर केशव मोडक -- लेखक**१९२४:श्रीपाद अच्युत दाभोळकर ‘प्रयोग परिवार‘ या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ (मृत्यू:३०एप्रिल २००१)**१९१०:नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले चित्रकार (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९२)**१९०९:नागोराव घन:श्याम तथा ‘ना. घ.‘ देशपांडे – कवी (मृत्यू: १० मे२०००)**१९०२:चिंतामणी आत्माराम मुंडले -- नाटयलेखक* *१८९४:शाहूराव दगडोबा उजगरे-- कवी (मृत्यू:२३ डिसेंबर १९६७)**१८७१:गोपाळ कृष्ण देवधर – भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य, ’सेवासदन’ या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक (मृत्यू:१७ नोव्हेंबर १९३५)**१८५७:रघुनाथ पांडुरंग करंदीकर-- मराठी भाषेतील पत्रांच्या व दैनंदिनींच्या संग्रहासाठी प्रसिद्ध असे साहित्यिक(मृत्यू:२४ एप्रिल १९३५)**१७८९:ऑगस्टिन कॉशी – फ्रेन्च गणितज्ञ (मृत्यू: २३ मे १८५७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: कल्याण सिंग-- राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल, माजी मुख्यमंत्री उ.प्र (जन्म:५ जानेवारी १९३२)* *२००७:हैदर, कुर्रतुल ऐन-- भारतीय उर्दू लेखिका आणि ज्ञानपीठ पुरस्काराच्या मानकरी(जन्म:२०जानेवारी १९२७)* *२००६:बिस्मिला खाँ – शहनाई नवाझ (जन्म:२१ मार्च १९१६)**२००१:शरद तळवलकर – आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार (जन्म:१ नोव्हेंबर १९२१)**२००१:मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शं. ना. तथा दादासाहेब अंधृटकर* *१९९५:सुब्रमण्यन चंद्रशेखर – तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक.(जन्म:१९ आक्टोबर १९१०)**१९९१:गोपीनाथ मोहंती – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक (जन्म:२० एप्रिल १९१४)**१९८१:आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार, बहुभाषा कोविद, रसिक, सखोल चिंतक, गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म:१ डिसेंबर १८८५)**१९७८:विनू मांकड – सलामीचे फलंदाज व डावखुरे मंदगती गोलंदाज(जन्म:१२ एप्रिल१९१७)**१९७७:प्रेमलीला ठाकरसी – एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या कुलगुरू(जन्म:१८९४)**१९७६:पांडुरंग सातू नाईक – आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक (जन्म:१३ डिसेंबर १८९९)**१९४०:लिऑन ट्रॉट्स्की – रशियन क्रांतिकारक(जन्म:७ नोव्हेंबर १८७९)**१९३१:’गायनाचार्य’ पं. विष्णू दिगंबर पलुसकर – संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक (जन्म:१८ ऑगस्ट १८७२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविताश्रावणात घन निळा बरसला- कवी मंगेश पाडगावकरश्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशिमधाराउलगडला झाडांतून अवचित, हिरवा मोरिपसाराजागुनि ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारीजिथे तिथे राधेला भेटे, आता श्याम मुरारीमाझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारारंगाच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षीनिळया रेशमी पाण्यावरती थेंब-बावरी नक्षीगतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारापाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आलेमाझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरु झालेमातीच्या गंधाने भरला, गगनाचा गाभारापानोपानी शुभशकुनांच्या कोमल ओल्या रेषाअशा प्रीतीचा नाद अनाहत, शब्दावाचून भाषाअंतयार्मी सूर गवसला, नाही आज किनारासंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *चांद्रयान-3 चंद्रापासून अवघ्या 25 किलोमीटरवर, 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्रावर उतरणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आरोग्य विभागातील नोकर भरती लवकरच सुरू होणार, जवळपास 12 हजार पदांची जाहिरात पुढील आठवड्यात निघण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यातील कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार-2023 अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बफर स्टॉकमधील कांदा बाहेर काढणार, अनुदानित कांद्याची 25 रुपये किलो दराने विक्री, दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोकणवासीयांसाठी खुशखबर! मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मोफत एसटी सेवा; तर कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या नावांची अखेर घोषणा; महाराष्ट्रातून अशोक चव्हाणांची वर्णी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या T20 सामन्यात भारताने आयर्लंड वर 33 धावांनी मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *लातूर* महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे पूर्वीचे नाव लत्तपूर असे होते. त्यानंतर त्या नावात बदल करुन लातूर या नावाने ओळख निर्माण झाली.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माता म्हणजे ममतेच्या महन्मंगल मंदिरांनी गजबजलेलं तीर्थस्थान होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'ज्ञानरचनावाद - समजपूर्वक शिक्षण'* या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?२) वीर - विरांगणांच्या सन्मानार्थ कोणते अभियान राबविण्यात येत आहे ?३) जगप्रसिद्ध एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंगचे बालपणीचे नाव काय होते ?४) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पूर्ण नाव काय होते ?५) नुकतेच कोणत्या राज्य सरकारने नव्या १९ जिल्ह्यांची निर्मिती केली आहे ?*उत्तरे :-* १) अशोक चेपटे व युवराज माने ( दोन्ही प्राथ. शिक्षक ) २) मेरी माटी, मेरा देश ३) नामग्याल वांगडी ४) सुभाषचंद्र जानकीनाथ बोस ५) राजस्थान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 भूषण परळकर, नांदेड👤 दत्ता नरवाडे, सहशिक्षक, बिलोली👤 भीमाशंकर जुजगार, सेवानिवृत्त शिक्षक, धर्माबाद👤 विश्वास बदापूरकर, येताळा👤 साईनाथ राचेवाड, सहशिक्षक, बिलोली👤 साईनाथ हवालदार, येवती👤 रघुनाथ सोनटक्के, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे। तया अंतरीं सर्वदा तेचि आहे॥ जनी सज्जनी वाद हा वाढवावा। पुढें मागता शोक जीवीं धरावा॥६१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपलं सर्वच चांगलं आहे आणि इतरांचं सर्वच वाईट असते या प्रकारची जर...आपली विचारसरणी असेल तर ते, व्यर्थ आहे कारण, आपल्या परीने जर..आपले चांगलेच असेल तर...इतरांचेही त्यांच्या परीने थोडं तरी चांगले असू शकते प्रत्येकांचे विचार वेगवेगळे असू शकतात. म्हणून उगाचच नको त्या गोष्टीकडे लक्ष देऊन वेळ वाया घालवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सुख दु:ख*एका शिष्याने एके दिवशी गुरुदेवास विचारले" गुरुजी माझ्याच आयुष्यात पावलोपावली दुख का...?" त्यावेळेस गुरुजीने त्या शिष्यास एक पेला पाणी आणि दोन चमचे मीठ आणावयास सांगितले.गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे त्या शिष्याने ते संपूर्ण मीठ पेल्यामध्ये टाकून एका चमच्याने विरघळवले. त्यानंतर गुरुजींनी तो संपूर्ण पेला शिष्याला प्यायवयास लावला आणि विचारले,"पाण्याची चव कशी वाटली ? तेव्हा शिष्य म्हणाला, "अतिशय खारट".त्यानंतर गुरुजी त्या शिष्याला घेऊन मोठ्या तळ्याकडे गेले... सोबत आणलेले दोन चमचे मीठ त्यांनी तळ्यात टाकावयास सांगितले... आणि पुन्हा तळ्याचे पाणी प्यावयास सांगितले व नंतर विचारले पाणी कसे वाटले?शिष्याकडून ऊत्तर आले... अतिशय मधुर.गुरुजींनी विचारले, "मीठ तळ्यात पण टाकलेस ते खारट वाटले नाही. पण... पेल्यामध्ये मात्र खारट वाटले दुःखाचे पण तसेच आहे. मन जर पेल्यासारखे लहान असेल तर दुःखाने हुंदके येतात व माणूस त्रस्त होतो. पण.... मन विशाल तळ्यासारखे असेल तर दुःखाचा सुतराम ही परीणाम होत नाही."*विशाल मनाने जगा... मनाची संकुचीत अवस्था टाकून द्या... जगात प्रत्येकालाच दुःख आणि यातना आहेत कुणीही सुखी नाही... पण काही पेल्यासारखे लहान मन करुन जगतात ते सदैव दुःखीच असतात आणि काही विशाल मन असणाऱ्यावर दुःखाचा सुतराम परीणाम होत नाही... !!*संकलन•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment