✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 ऑगस्ट 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २३४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९७२:वर्णद्वेषी धोरणाबद्दल र्‍होडेशिया (झिम्बाब्वे) ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.**१९६२:फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.**१९४४:दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.**१९४२:दुसरे महायुद्ध – ब्राझिलने जर्मनी व इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.**१९४१:दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.**१९०२:कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना**१८४८:अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९६६:विजयकुमार मेश्राम -- लेखक,कवी* *१९६६:प्रा.डॉ.प्रल्हाद वावरे-- लेखक, समीक्षक,संपादक* *१९६५:महेंद्र सीतारामजी गायकवाड-- लेखक,कवी* *१९६४:मॅट्स विलँडर – स्वीडीश टेनिस खेळाडू**१९६२:सुनील महादेव सावंत--कवी लेखक**१९५८:मानसी मागीकर-- मराठी अभिनेत्री* *१९५५:सुरेश मारोतराव आकोटकर -- प्रसिद्ध कथाकार* *१९५५:चिरंजीवी – सुप्रसिद्ध अभिनेते* *१९५४:खुशालदास तुकारामजी कामडी-- कवी,गीतकार* *१९५४:माणिकराव गोविंदराव ठाकरे-- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी राज्यमंत्री* *१९४७:उज्ज्वल वामनराव कुलकर्णी-- कथाकार**१९४६:मा.विकास शिरपूरकर--सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती**१९३५:पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते.(मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९४)**१९३४:अच्युत पोतदार-- भारतीय अभिनेते, ज्यांनी १२५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे**१९२६:एन.सी सिप्पी-- भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक(मृत्यू:२५ नोव्हेंबर २००१)**१९२५:गणपत दत्तोबा बारवाडे-- कथा कादंबरी व नाट्य लेखक**१९२२:इंदुमती श्रीपाद केळकर-- कादंबरी व चरित्र लेखिका**१९२०:नारायण यशवंत देऊळगावकर (अण्णासाहेब) --पटकथालेखक(मृत्यू:३जून २००८)**१९२०:डॉ.डेंटन कूली – ह्रुदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद**१९१९:गिरीजाकुमार माथूर – हिन्दी कवी (मृत्यू: १० जानेवारी १९९४)**१९१८:डॉ.बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (मृत्यू: १५ जुलै २००४)**१९१६:मधुकर रामराव यार्दी-- पूर्व केंद्रिय वित्त सचिव,संस्कृत अभ्यासक(मृत्यू:२० ऑगस्ट २००१)**१९१५:शंभू मित्रा – बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार (मृत्यू: १९ मे १९९७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२००१:शरद तळवलकर-- चित्रपटांतील अभिनेते(जन्म:१ नोव्हेंबर १९१८)* *१९९९:सूर्यकांत मांडरे – मराठी चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, पद्मश्री (१९७३).(जन्म:२ जून १९२६)**१९९५:पंडित रामप्रसाद शर्मा – संगीतकार, ट्रम्पेट व व्हायोलिनवादक. ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल‘ या जोडीतील प्यारेलाल यांचे ते वडील होत.* *१९८९:पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता.(जन्म:२६ जुलै १८९३)**१९८२:एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार. (जन्म:१९ नोव्हेंबर १९१४)**१९८०:किशोर साहू--चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक बँकॉक विमानतळावर विमानात चढत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन (जन्म:२२ नोव्हेंबर १९१५)**१९७८:जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म:२० आक्टोबर १८९३)**१९७०:विठ्ठल गोपाळ खोबरेकर-- लेखक, पुराभिलेख संशोधक, संपादक(जन्म:२० जुलै१९२३)**१८१८:वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल (जन्म: ६ डिसेंबर १७३२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कवितारिमझिम पाऊस पडे सारखा- कवी पी. सावळारामरिमझिम पाऊस पडे सारखायमुनेलाही पूर चढेपाणीच पाणी चहूकडेगं बाई गेला मोहन कुणीकडेतरुवर भिजले भिजल्या वेलीओलीचिंब राधा झालीचमकून लवता वरती बिजलीदचकुन माझा ऊर उडेहाक धावली कृष्णा म्हणुनीरोखुनी धरली दाही दिशांनीखुणाविता तुज कर उंचावुनीगुंजत मंजुळ मुग्ध चुडेजलाशयाच्या लक्ष दर्पणीतुझेच हसरे बिंब बघुनीहसता राधा हिरव्या रानीपावसातही ऊन पडेसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *चांद्रयान-3 शोधतंय लँडिंगसाठी सुरक्षित जागा, उरले फक्त काही तास; इस्रोकडून लँडिंगसाठी तयारी पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाविकास आघाडीची 23 ऑगस्टला बैठक; इंडिया आघाडी बैठकीच्या तयारीचा घेणार आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *काल पहिल्या श्रावणी सोमवारी; भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची रीघ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक, कालपासून 14 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद, व्यापारी असोसिएशनचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पहिल्या सत्रात सर्व्हर डाऊन, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित; गोंधळामध्ये तलाठी भरती परीक्षा पार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तेलंगणाच्या निवडणुकीसाठी BRS पक्षाच्या 115 उमेदवारांची यादी जाहीर, मुख्यमंत्री केसीआर दोन मतदारसंघातून लढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा, तिलक वर्माला संधी, चहलचा पत्ता कट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *मुंबई* महाराष्ट्राची राजधानी म्हणून आपण मुंबई शहराला ओळखतो. तसेच हा जिल्हा सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच या शहराला भारताचे हॉलिवूड असेही म्हटले जाते. मुंबईतील स्थानिक रहिवासी असलेले कोळी बांधव यांची मुंबा माता ही कुलदैवत आहे. त्यामुळे मुंबईतील मुंबा आणि आई म्हणजे देवी याचे एकत्रीकरण होऊन मुंबई हे नाव देण्यात आले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनुष्याने कोणत्याही परिस्थितीत गर्व करू नये. कारण बहुरूपी आकाश प्रत्येक क्षणी आपले रंग बदलत असते.➖ हाफिज*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अविश्वास प्रस्तावाला सर्वाधिक ( १५ वेळा ) सामोरे जाणारे पंतप्रधान कोण ?२) नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव कोणी दाखल केला ?३) किमान किती खासदारांच्या पाठिंब्याने कोणताही खासदार मंत्रिपरिषदेविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतो ?४) अविश्वास प्रस्ताव कोणत्या एकाच सभागृहात आणता येतो ?५) जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष कोणता ?*उत्तरे :-* १) इंदिरा गांधी २) काँग्रेस खासदार गौरव गोगोई ३) ५० खासदार ४) लोकसभा ५) भारतीय जनता पक्ष ( BJP )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शंकर हमंद, बिलोली👤 शंकर गंगूलवार, धर्माबाद👤 आशिष देशपांडे, नांदेड👤 नागराज येम्बरवार👤 शिवा गैनवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निजध्यास तो सर्व तुटोनि गेला। बळें अंतरीं शोक संताप ठेला॥ सुखानंद आनंद भेदें बुडाला। मना निश्चयो सर्व खेदे उडाला॥६२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण बरेचदा म्हणत असतो की,जे माझ्या नशिबात होते ते,झाले म्हणून वारंवार तिथेच आपण गुरफटून पडत असतो व स्वतः ला दोष देत दु:खी होऊन जगायचेच विसरून जातो. असे करण्या आधी जरा एक दृष्टी आजूबाजूलाही टाकून बघावे या जगात पूर्णपणे सुखी असलेला एकही व्यक्ती दिसणार नाही. दु:ख, वेदना,उपासमार, कशा असतात ते,एकदा जवळून बघावे.व व्यर्थ विचार डोक्यातून काढून टाकावे व पुन्हा एकदा नव्याने जगण्याचा प्रयत्न करून बघावे कारण इतर गोष्टींपेक्षा जीवन जगणे महत्वाचे आहे. कारण जीवनाचे दुसरे नाव संघर्ष आहे आणि तो प्रत्येकालाच करावा लागतो तेव्हाच जीवन जगण्याचा खरा अर्थ कळत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एक सुंदर कथा* ...जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. एका व्यापार्याला बाजारात एक भव्य उंट विकत घ्यायचा होता आणि एक उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरवण्यासाठी उंट विक्रेता व व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली . व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये बराचदा करार झाला आणि शेवटी त्या व्यापा्याने उंट विकत घेऊन घरी नेला ! घरी पोहोचल्यावर व्यापा्याने आपल्या नोकराला उंटाचा काजवा (खोगीर) काढण्यासाठी बोलावले ..! काजवेच्या खाली सेवकास एक लहान मखमली पिशवी सापडली ज्यामुळे उघडकीस आले की ते मौल्यवान हिरा रत्नांनी परिपूर्ण आहेत ..! सेवक ओरडला, "बॉस, तू एक उंट विकत घेतला, परंतु त्याबरोबर काय विनामूल्य आले आहे ते पहा!" व्यापारी देखील आश्चर्यचकित झाला, त्याने आपल्या नोकरांच्या हातात हिरे पाहिले. ते सूर्यप्रकाशामध्ये आणखी चमकत होते आणि चमकत होते. व्यापारी म्हणाले: "मी उंट खरेदी केला आहे, हिरे नव्हे, मी ते त्वरित परत करावे!" नोकर मनात विचार करत होता "माझा बॉस किती मूर्ख आहे ...!" तो म्हणाला: "मालक कोण आहे हे कुणालाही कळणार नाही!" तथापि, व्यापार्याने त्याचे ऐकले नाही आणि ताबडतोब बाजारपेठेत पोचले आणि मखमलीची पिशवी त्या दुकानदाराला परत केली. उंट विक्रेता खूप खूष झाला, म्हणाला, "मी विसरलो होतो की मी माझे मौल्यवान दगड काजवेखाली लपवले होते! आता आपण बक्षीस म्हणून कोणताही एक हिरा निवडा! व्यापारी म्हणाला, "मी उंटासाठी योग्य किंमत दिली आहे म्हणून मला कोणत्याही भेटवस्तू आणि बक्षिसाची आवश्यकता नाही!" जितका व्यापारी नकार देत होता, तितकाच उंट विकणारा आग्रह धरत होता! शेवटी, व्यापारी हसला आणि म्हणाला: खरं तर मी बॅग परत आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी दोन मौल्यवान हिरे आधीच माझ्याकडे ठेवले होते. या कबुलीजबाबा नंतर, उंट विक्रेता खूप चिडला आणि त्याने पटकन बॅग रिकामी केली आणि त्याचे हिरे मोजले ! पण जेव्हा त्याला लक्षात आले की त्याचे सर्व हिरे जशाला तसे आहेत अन एकही हिरा कमी झालेला नाही तेव्हा तो म्हणाला, “हे माझे सर्व हिरे आहेत, तर मग तुम्ही ठेवलेले दोन सर्वात मौल्यवान गोष्टी कोणत्या होत्या ? व्यापारी म्हणाले: ... *"माझा प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान."* विक्रेता मूक होता! यापैकी 2 हिरे आपल्याकडे आहेत की नाही हे शोधण्यासाठी आपण स्वतःमध्ये पहावे. *ज्याच्याकडे हे दोन हिरे आहेत, स्वाभिमान अन प्रामाणिकपणा आहे तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment