✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 ऑगस्ट 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_भारत छोडो दिन_* *_ या वर्षातील २२० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००८:चीनमधील बिंजिंग येथे येथे २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**२०००:महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ’महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार’ पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर**१९९८:संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.**१९९४:पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.**१९८५:भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ’ध्रुव’ ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.**१९७४:वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.**१९६७:इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड यांनी ASEAN ची स्थापना केली.**१९६३:इंग्लंडमधे १५ जणांचा टोळीने रेल्वेवर दरोडा टाकुन २६ लाख पौन्ड पळवले.**१९४२:भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात ’चले जाव’ चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी ’करेंगे या मरेंगे’ हा संदेश दिला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८१:रॉजर फेडरर – स्विस लॉन टेनिस खेळाडू**१९७९:जास्मिन रमजान शेख -- कवयित्री, लेखिका,समुपदेशक* *१९७०:शिवाजी निवृत्ती राव घुगे-- कवी लेखक* *१९६९:डॉ.आशुतोष राराविकर -- अर्थशास्त्रज्ञ व प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९६७:डॉ मोना मिलिंद चिमोटे-- समीक्षक, संशोधक आणि लेखिका* *१९६४:विवेक दत्तात्रय जोशी-- प्रसिद्ध कवी* *१९५८:अशालता अशोक गायकवाड-- कवयित्री,लेखिका**१९५५:श्याम खांबेकर--गीतकार व कवी* *१९५१:अरुण वि. देशपांडे--लेखक,कवी,बाल साहित्यिक,समीक्षक**१९४८:प्रा.डॉ.रमेश जाधव-- इतिहास संशोधक**१९४७: सुरेशचंद्र वारघडे-- लेखक* *१९४०:दिलीप सरदेसाई–क्रिकेटपटू (मृत्यू: २ जुलै २००७)**१९३९:डॉ.रंगनाथ नाथराव जोशी-- गीतकार, लेखक* *१९३५:डॉ.लक्ष्मण रामदास नसिराबादकर-- संत साहित्याचे गाढे अभ्यासक(मृत्यू:४ डिसेंबर २०१८)**१९३४:डाॅ. माधव आत्माराम चितळे-- जागतिक कीर्तीचे मराठी जलतज्ज्ञ**१९३२:दादा कोंडके – सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते,दिग्दर्शक,संवादलेखक(मृत्यू:१४मार्च १९९८)**१९२६:शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक.(मृत्यू:३० जुलै १९९४)**१९२५:डॉ.वि.ग.भिडे – शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु, केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार,पद्मश्री (मृत्यू: जून २००६)**१९२०:उषा श्रीपाद पंडित-- कथालेखिका* *१९१६:सदाशिव रामचंद्र गाडगीळ--संशोधक, समीक्षक(मृत्यू:९ ऑक्टोबर २००८)* *१९१२:बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी (मृत्यू:२० डिसेंबर १९९८)**१९१२:तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर – कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज (मृत्यू: ३१ मार्च २००४)**१९०८:सिद्धेश्वरी देवी-- हिंदुस्तानी संगीत शैलीत गाणाऱ्या,वाराणसी येथील गायिका(मृत्यू:१८ मार्च १९७७)**१९०६:परशुराम महादेव बर्वे--विज्ञान विषय लेखन करणारे लेखक* *१९०२:पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २० आक्टोबर १९८४)**१८९८:गजानन विश्वनाथ केतकर--निबंधकार, विचारवंत,गीतेचे अभ्यासक( मृत्यू:१५ जुलै १९८०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१:अनुपम श्याम ओझा-- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता(जन्म:२० सप्टेंबर १९५७)**२०२१:मखराम पवार-- बहुजन महासंघाचे संस्थापक,सह आयुक्त तथा माजी मंत्री म.रा.(जन्म:१ मार्च१९३९)**२०१७:डॉ.भीमराव गस्ती-- देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक(जन्म:१०मे १९५०)* *२०१३:जयमाला शिलेदार-- हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आणि नाट्य अभिनेत्री(जन्म :२१ऑगस्ट १९२६)**१९९९:गजानन नरहर सरपोतदार – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक(२३ एप्रिल १९४०)**१९९८:डॉ.सुमती क्षेत्रमाडे – वैद्यकीय व्यवसाय सांभाळुन साहित्यिक अभिरुची जोपासणार्‍या लेखिका व कादंबरीकार.(जन्म:७ मार्च १९१३)**१८९७:व्हिक्टर मेयर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म:८ सप्टेंबर १८४८)**१८२७:जॉर्ज कॅनिंग – ब्रिटनचे पंतप्रधान (जन्म: ११ एप्रिल १७७०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदानभिकाजी कामा :भारतातल्या सर्वच धर्मियांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. त्यात पारशी धर्मीय लोक ही मागे नव्हते. त्यातलंच एक नाव म्हणजे मदाम कामा. भिकाजी कामा यांचा जन्म 24 सप्टेंबर 1861 रोजी मुंबई येथे एका श्रीमंत पारशी कुटुंबात झाला. 1885 मध्ये तिला इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी पाठवण्यात आले आणि नंतर पॅरिसला गेले, जिथे ती भारतीय राष्ट्रवादी चळवळीत सामील झाली. कामा एक उग्र राष्ट्रवादी होत्या ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. लाला लजपत राय आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यासह अनेक प्रमुख भारतीय राष्ट्रवादीच्या त्या जवळच्या सहकारी होत्या. 1907 मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ट येथे प्रथमच परदेशात भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यासह तिच्या धगधगत्या भाषणांसाठी आणि धाडसी कृतींसाठी त्या प्रसिद्ध होत्या.एका सधन पारशी घरातून आलेल्या या स्त्रीने आपली सगळी संपत्ती अनाथ मुलींच्या आश्रमासाठी देऊ केली. समाजात स्त्री-पुरुष समानता यावी यासाठी चळवळ सुरू केली.कामा यांचे 1936 मध्ये मुंबईत निधन झाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आणि महिलांच्या हक्कांमधील त्यांचे योगदान मरणोत्तर ओळखले गेले आणि त्यांचा सन्मान करण्यात आला. 1962 मध्ये तिला मरणोत्तर पद्मभूषण, भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक, सन्मानित करण्यात आले आणि 1997 मध्ये तिच्या सन्मानार्थ एक स्मरणार्थ स्टॅम्प जारी करण्यात आला.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *एक रुपयात चहा मिळत नाही, पण सरकारने पीक विमा योजना आणली : अजित पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राहुल गांधींना लोकसभेचं सदस्यत्व पुन्हा बहाल, लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दुष्काळाची चाहूल ! मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणात केवळ 42 टक्के पाणीसाठा शिल्लक, पाणी टंचाईच्या संकटाची भीती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यसभेत अमित शहांकडून दिल्ली अध्यादेश विधेयक सादर; विधेयक असंवैधानिक असल्याचं म्हणत काँग्रेसचा हल्लाबोल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बेस्टच्या कंत्राटी कर्मचारी संपामुळे नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही: मंत्री मंगलप्रभात लोढा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिल्लीतील एम्स रुग्णालयात भीषण आग, फायर ब्रिगेडच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023: या स्पर्धेच्या पार्श्नभूमीवर क्रिकेट ऑस्ट्र्रेलियाने १८ खेळाडू्ंच्या संघाची केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *भंडारा* हा जिल्हा पितळी भांड्यांचे शहर म्हणून ओळखला जात होता. भाणारा शब्दापासून भंडारा हे नाव पडले आहे. भाण हा शब्द भांडी या अर्थाने पूर्वी वापरला जात होता. भंडारा हे पितळी भांड्यांसाठी पूर्वापार प्रसिध्द असल्यामुळे भाण शब्दावरुन भाणारा असे नाव पडल्यामुळे त्यानंतर भंडारा असे ठेवण्यात आले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चारित्र्याचा विकास सुसंगतीने होतो तर, बुद्धीचा विकास एकांतात होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला ?२) चहाचा सर्वात जास्त उत्पादन जगात कोणत्या देशात होते ?३) जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश कोणता ?४) भारतातील 'चहाची बाग' म्हणून कोणते राज्य ओळखले जाते ?५) भारतातील सर्वात मोठे चहाचे मळे कोणते आहे ?*उत्तरे :-* १) चीन २) चीन ३) भारत ४) आसाम ५) गटुंगा टी इस्टेट, आसाम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अरुण वि. देशपांडे, साहित्यिक, परभणी ( पुणे )👤 अवधूत पाटील सालेगावकर, धर्माबाद👤 सौ. रेखा बालाजी सुंकेवार, देगलूर👤 अतुल उदाडे👤 योगेश पा. ढगे👤 ऋषिकेश सोनकांबळे👤 लक्ष्मण कामशेट्टी👤 नागेश कानगुलवार👤 रावजी मारोती बोडके👤 संतोष वाढवे👤 संतोष हसगुंडे👤 रवी वाघमारे👤 गजानन सावंत👤 चंदू नागुल*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे। जनीं जाणतां मुक्त होऊनि राहे॥ गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्याला दु:ख झाले की, मग आपण लगेच खचून जातो. अन् सुखात असताना गर्वाच्या संगतीत राहून नको त्या वाटेला जाऊन जीवनाची माती करून घेतो. अशा प्रकारचे जीवन न जगता सुखात असताना कोणालाही कमी लेखू नये. व दु:खात असताना कधीही रडत बसू नये. आपली परिस्थिती कशीही असली तरी सदैव समाधानी रहावे. व इतरांना सुद्धा समाधानी रहाण्याचा सल्ला द्यावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कुत्रा आणि लांडगा*एकदा एक पाळीव कुत्रा गावाबाहेर फिरत होता. त्याला एक लांडगा भेटला. लांडग्याने कुत्र्याला पाहुन त्याच्या गुटगुटीत तब्येतीचं कौतुक केलं. त्यामानाने लांडगा बराच बारीक होता. कुत्र्याने सांगितले कि त्याचा मालक त्याला किती चांगला ठेवतो, चांगलं चांगलं खायला घालतो, त्यामुळेच त्याची तब्येत इतकी छान राहते. त्याने लांडग्याला त्याच्या घरी राहायला यायचे आमंत्रण दिले. लांडगा त्याच्यासोबत निघाला. पण त्याला कुत्र्याच्या गळ्याभोवतीच्या त्वचेवर इतर अंगाच्या मानाने केस कमी आहेत हे जाणवले. त्याने कुत्र्याला विचारले. कुत्रा म्हणाला “अरे घरी असताना मला मालक पट्ट्याने बांधुन ठेवतो. त्यामुळे तिथले केस कमी झालेत, त्यात एवढं काही विशेष नाही.”आता मात्र लांडग्याचा विचार बदलला, तो म्हणाला “मित्रा, चांगलं खायला मिळावं म्हणुन आपलं स्वातंत्र्य गमवावं मला वाटत नाही. हि तर फारच मोठी किंमत झाली.” असं म्हणुन लांडगा परत गेला.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment