✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )~~~~~~~~~~~~~~~~~~~🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 13/10/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १९२३ - अंकारा (चित्रित) तुर्की देशाची राजधानी बनली.◆ १९८३ - अमेरिटेक मोबाईल कम्युनिकेशन्स (आता एटीअँडटी) यांनी अमरिकेतील शिकागो शहरात मोबाईल नेटवर्क सुरु केले.◆ २०१३ - दतिया, मध्य प्रदेश येथील रतनगढ माता मंदिरात चेंगराचेंगरी झाली ज्यात ११५ ठार आणि ११० हून अधिक जखमी झाले.💥 जन्म :-◆ १९११ - अशोक कुमार, भारतीय अभिनेता◆ १९४८ - नुसरात फतेह आली खान, पाकिस्तानी गायक💥 मृत्यू :-◆ १९११ - भगिनी निवेदिता, आयरिश-भारतीय सामाजिक कार्यकर्ती◆ १९३८ - इ. सी. सिगार, अमेरिकन व्यंगचित्रकार, पॉपाय कार्टून चा निर्माता◆ १९८७ - किशोर कुमार, भारतीय गायक, अभिनेता, दिग्दर्शक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बडतर्फ ST कर्मचारी पुन्हा कामावर रुजू, सदावर्तेंच्या निवासस्थानी सेलिब्रेशन*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *चीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या 3000 भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा, चीनने भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *काँग्रेसचे खासदार राहुल गगांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या 'भारत जोडो यात्रे'चा काल 12 ऑक्टोबर रोजी 35 दिवस पूर्ण झाले असून आत्तापर्यंत 900 किमीचा प्रवास पूर्ण झाला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गेल्या सप्टेंबर महिन्यात महागाई दर 7.41 टक्क्यांवर गेला असून खाद्य पदार्थांचा महागाई दर 7.62 टक्क्यांवरून 8.60 टक्क्यांवर पोहोचला आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सर्वात मोठ्या गहू उत्पादक उत्तरप्रदेश व बिहार राज्यात गव्हाचा तुटवडा, किंमतीत 5 टक्क्यांची वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोमहर्षक T-20 सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ ; 2-0 ने मालिकेवरही केला कब्जा *•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Conversation संभाषण👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Zu6FBgq1BbY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे*मुलांनो, काम केल्यानेच मनुष्य मोठा होत असतो. रिकामा बसून किंवा फक्त बोलल्याने जीवनात काही प्राप्ती होत नाही. पंचतंत्रात असे म्हटले आहे की, मनुष्याच्या रूपामुळे किंवा कुळामुळे त्याचा गौरव वाढत नाही. तर माणसाच्या कर्तृत्वामुळे, त्याच्या कार्यामुळे त्याचा गौरव वाढतो. आपण जसे बोलतो त्याप्रमाणे वागले पाहिजे. अन्यथा कुणी आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत. शब्दाला कृतीचे तारण नसेल तर शब्द वांझ ठरतात असे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. म्हणूनच दलितांच्या कल्याणासाठी त्यांनी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर नागपूरच्या पावन दीक्षा भूमीत हजारो अनुयायासोबत बौध्द धर्माची दीक्षा घेतली. त्यांच्या प्रत्येक शब्दाला कृतीची जोड होती म्हणून तर ते दलितांसाठी ईश्वरासमान झाले आहेत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीमुळे मानवी जीवन आनंदी होते असे म्हणताना राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आयुष्यभर साधेपणाने राहिले. देशातील अनेक लोकांना अंगभर कपडे मिळत नाहीत तेंव्हा मी पूर्ण कपड्यानिशी कसा राहू म्हणून त्यांनी कपड्याचा त्याग करून पंचा स्वीकारला आणि देशातील लोकांसाठी चरख्यावर सुत कातण्यास सुरुवात केली. गरीबातल्या गरीब व्यक्तीचा त्यांनी विचार केला. याचा अर्थ जे लोक फक्त बोलत नाहीत तर त्या नुसार कृती करतात आणि वागतात ते खरोखरच महान होतात. केवळ गडगडाट करणारे मेघ कधी पाऊस देत नाहीत म्हणूनच गर्जेल ते बरसेल काय ? असे म्हटले जाते ते काही चूक नाही. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी जसे बोलले तसे वागले आणि चालले म्हणून समाजात आज त्यांचे स्थान सर्वांच्या हृदयात आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले असे संतानी सांगून ठेवले आहे. अस्पृश्यता पाळू नका असा संदेश देणारे संत एकनाथ महाराजानी तप्त तापलेल्या वाळूवरील हरिजन बालकांस कडेवर उचलून घेतले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्य लोकांसाठी घरातील पाण्याचा हौद मोकळा केला. त्याचा परिणाम त्यांना भोगावे लागले परंतु त्याची त्यांना फिकीर नव्हती, कारण ते क्रियाना महत्त्व देणारे होते. विचाराला आचाराची जोड असली की आपल्या हातून चांगले कार्य होते. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात की, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे अर्थात काही ही न करता नुसते बोलणे काही कामाचे नाही.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*🐠9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *नलिकाविरहित ग्रंथी* 📙आपल्या शरीरात दोन प्रकारच्या ग्रंथी असतात. बहि:स्रावी ग्रंथीमध्ये तयार झालेला स्राव नलिकेद्वारे बाहेर पाठवला जातो. उदारणार्थ लाळग्रंथीत तयार झालेली लाळ तोंडात येते. याउलट अंत:स्रावी ग्रंथीत तयार झालेला स्राव ग्रंथीमधीलच रक्तवाहिन्यांत शोषला जातो. रक्तामध्ये शरीरात विविध भागांकडे पाठवला जातो. अशा अंतस्रावांस संप्रेरक, 'हार्मोन' असे म्हणतात. अशा नलिकाविरहित ग्रंथींना 'एंडोक्राइन' ग्रंथी असे म्हटले जाते.शरीरात घडणाऱ्या असंख्य चयापचयाच्या क्रिया व महत्त्वाचे जीवनव्यापार यांवरचे नियंत्रण या ग्रंथींद्वारे राखले जाते. प्रत्येक ग्रंथीमधील स्रावाचे कार्य एखाद्या विशिष्ट लक्ष्यावर काम करते. सर्वात जास्त परिणाम त्या लक्ष्यावर घडून येतो. नलिकाविरहित ग्रंथींच्या प्राकृत व विकृत अभ्यासाची अतिविशिष्ट अभ्यासशाखा मानली जाते (एंडोक्रायनाॅलॉजी ही सुपर स्पेशालिटी). डॉक्टर मंडळी त्यात प्रावीण्य मिळवून काम करतात.अशा नलिकाविरहित ग्रंथी म्हणजे शीर्षस्थ ग्रंथी. (पिट्युटरी), कंठस्थ (थायरॉइड), उपकंठस्थ (पॅराथायरॉइड), मूत्रपिंडावरील (अॅड्रिनल), स्वादुपिंडातील (लँगरहॅन्स आयलेट) या ग्रंथी स्त्री व पुरुषांत सारख्याच असतात. पुरुषात वृषण (टेस्टीज) व स्त्रीमध्ये राज:पिंडे (ओव्हरीज) या वेगळ्या असतात. यांतील प्रत्येक ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावाला बहुदा त्या ग्रंथीच्या नावाने ओळखले जाते. उदाहरणार्थ पिट्युटरी हार्मोन.या ग्रंथीमधील सर्वात महत्त्वाची म्हणजे पिट्युटरी शीर्षस्थ ग्रंथी. अन्य सर्व ग्रंथींवर तर तिचे नियंत्रण असतेच, पण शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या बाबी ती नियंत्रित करते. मूत्रपिंडाचे कार्य, हवेच्या तापमानाशी जोडून मुत्रनिर्मिती कमी वा जास्त राखणे व त्यानुसार शरीराला तहानेची जाणीव करून देणे हे काम तिच्याकडे आहे. स्नायूंवरचे नियंत्रण, विशेषत: गर्भाशयाचे स्नायू बाळाच्या जन्मासाठी कधी आकुंचित करायचे व आईचे दूध कधीपासून निर्माण करायला सुरुवात करायची, यांवरचे नियंत्रण ऑक्सिटोसीन व मॅमॅट्रोपिक हार्मोनने केले जाते. या सर्वांची निर्मिती शीर्षस्थ ग्रंथींच्या मागच्या भागातून होते. याशिवाय पुढील भागात अन्य ग्रंथींना उत्तेजक (ट्रोपिक) हार्मोनची निर्मिती केली जाते. थायरॉइडमधील स्रावांचे सतत नियंत्रण या हार्मोनने होत असते. नलिकाविरहित ग्रंथींचे नेतृत्वच शीर्षस्थ ग्रंथी करत असते. जेमतेम मोठ्या शेंगदाण्याएवढ्या असलेली ही ग्रंथी खरोखरीच जीवनाधार समजली जाते.थायरॉइड हार्मोन मुख्यतः आयोडिनयुक्त असते. खाण्यात, आहारात आयोडाइड्स कमी पडली तर हा स्राव कमी निर्माण होतो. शरीरातील चयापचयाची महत्त्वाची कार्ये व शरीराचे तापमान नियंत्रण आणि शक्तीसंपन्नता यांत ह्या हार्मोनचा महत्त्वाचा कार्यभाग असतो. गलगंड, मेंदूची अपूरी वाढ, मतिमंदत्व असे विकार होऊ नयेत, त्यांना प्रतिबंध करता यावा यासाठी मिठावाटे आयोडीनचा आवश्यक पुरवठा करावा, असे तज्ज्ञांना वाटते. रोज दोन चिमटी एवढेच मीठ आपण खात असल्याने नियंत्रित पुरवठा याद्वारे करणे शक्य होते. मिठाशिवाय जेवण, अळणी अन्नपदार्थ हा विचार आपल्या मनात तरी येतो का ? उपकंठस्थ वा पॅराथायरॉइड या कंठस्थ ग्रंथीमागे दोन छोट्या ग्रंथी असतात. कॅल्शिअम व फॉस्फरस या दोन्हींच्या चयापचयावर पॅराथाॅर्मोनचे नियंत्रण असते. हाडे, दात, शरीरातील सर्व स्रावांत या दोन्हींची गरज असते. त्यासाठी या ग्रंथीचे कार्य महत्त्वाचे ठरते.मूत्रपिंडावरील अॅड्रिनल ग्रंथी मूत्रपिंडावर छोट्या टोपीप्रमाणे असतात. त्यांचा गाभा (मेड्युला) व बाह्यभाग (कॉर्टेक्स) हे दोन वेगवेगळ्या हार्मोन्सची निर्मिती करतात. जीवनावश्यक व हृदयासारख्या महत्त्वाच्या इंद्रियावर नियंत्रण ठेवणारी अॅड्रीनॅलिन व नाॅर-अॅड्रीनॅलिन ही दोन हार्मोन्स गाभ्यात तयार होतात. 'मारा किंवा मरा', अशा समयी या स्रावांचे कार्य अवघ्या शरीराला जाणवते. स्नायूंचा रक्तपुरवठा वाढवणे, हृदयाची गती वाढवणे, रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे, यकृतातील साखरेची म्हणजे ग्लायकोजेनची ग्लुकोज शर्करा बनवणे व अनिच्छावर्ती स्नायू शिथिल करणे ही मुख्य कामे या दोन स्रावांमुळे होतात. अॅड्रिनल ग्रंथीच्या बाह्य भागातून काॅर्टिकोस्टिराॅईड नावाची हार्मोन्स निर्माण होतात. यांतील अल्डोस्टिराॅन हे द्रव्य शरीरातील सोडियम व पोटॅशियम या घटकांच्या चयापचयावर नियंत्रण ठेवते. मज्जातंतूंचे कार्य, हृदयाचे कार्य, स्नायूंचे कार्य यांसाठी या दोन्हींची गरज असते. स्टिरॉइडमधील अन्य द्रव्ये पिष्टमय पदार्थांच्या चयापचयावर नियंत्रण राखतात. त्यांचे कार्य रक्तातील शर्करा जरुरीप्रमाणे वाढविण्याचे असते. प्रथिने व स्निग्ध यांच्या साठ्यांवरही त्यांचे नियंत्रण राहते. याशिवाय शरीरात कोठेही दाह झाल्यास यांचा दाहशामक म्हणूनही उपयोग होतो. विशेषतः सांध्यांचा दाह असल्यास स्टिरॉइडचा तोंडावाटे वा त्याजागी इंजेक्शन देऊन उपयोग होतो. अॅड्रिनल ग्रंथीचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते.स्वादुपिंडातील स्वादुरस पक्वाशयात नलिकेवाटे पोहोचवला जातो. मात्र लँगरहॅन्स आयलेट्स या पेशीसमूहातून इन्सुलिनची निर्मिती होऊन ती थेट रक्तात मिसळते. शक्ती व उष्णता उत्पन्न होण्यासाठी शरीरातील सर्व पेशीजालामध्ये प्राणवायूच्या साहाय्याने ग्लुकोज साखरेचे ज्वलन होते. यासाठी इन्सुलिनची मदत लागते. ती न मिळाल्यास रक्तातील साखरेच्या प्रमाणात वाढ होते. तसेच इन्शुलिनचे दुसरे कार्य म्हणजे रक्तातील जास्तीच्या साखरेचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करून ती यकृतात साठवणे. या दोन्ही संदर्भात या ग्रंथीचे महत्त्व आहे.लैंगिक ग्रंथी पुरुष व स्त्रीमध्ये प्रत्येकी दोन असून त्यांना वृषण व राज:पिंड असे म्हणतात. वयात आल्यावर पुंबीजे व स्त्रीबीजे यांची यथायोग्य वेळी निर्मिती हे त्यांचे एक कार्य. दुसऱ्या कार्यात स्रावनिर्मितीचा म्हणजे हार्मोनचा सहभाग असतो. पुरुषातील टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे जननेंद्रियांची वाढ, दुय्यम लैंगिक लक्षणे म्हणजे दाढी मिशा उगवणे, आवाज फुटणे, स्नायूंचा भरदारपणा यात पूर्णता येते. स्त्रियांच्या राज:पिंडातून इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन हे दोन स्राव स्रवतात. त्यामुळे मासिक पाळी सुरू होते. स्तनांची व नितंबाची गोलाई वाढते, जननेंद्रियांचा आकार पुरेसा वाढतो. गर्भधारणा, गर्भाची वाढ, दूध पुरेसे येणे व गर्भधारणेच्या काळातील अन्य शारीरिक बदल यांवरही याच हार्मोन्सचे नियंत्रण राहते.वयोमानानुसार लैंगिक ग्रंथींचे कार्य मंदावते. स्त्रियांमध्ये पन्नाशीनंतर, तर पुरुषात सत्तरीनंतर या ग्रंथी थकून जातात. त्याप्रमाणे स्त्रियांत रजोनिवृत्ती व पुरुषांत लैंगिक शैथल्य जाणवू लागते. मात्र जीवनाच्या अंतापर्यंत अन्य नलिकाविरहित ग्रंथी कार्यरत असतात. नलिकाविरहित ग्रंथींच्या कार्यकारणभावावर व त्यातील रोगांच्या उपचारांबद्दल आता खूपच प्रगती झाली असली, तरी प्रतिबंधक उपाय फारसे ज्ञात नाहीत.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) आल्फ्रेड नोबेल यांचा जन्म केव्हा झाला ?२) केंद्राच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणात देशातील सर्वात स्वच्छ शहर होण्याचा मान कोणत्या शहराने पटकावला ?३) महाराष्ट्रात शासकीय कार्यालयातील अभिवादन दूरध्वनी संभाषणाच्या सुरुवातीस कोणत्या दोन शब्दांनी व्हावे, या अभियानाचा प्रारंभ केव्हा व कोणाच्या हस्ते झाला ?४) 'भारताचा विंड मॅन' असे कोणाला म्हटले जाते ?५) ५ ऑक्टोबर २०२२ ला कितवा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला ?*उत्तरे :-* १) १३ ऑक्टोबर १८३३ २) इंदौर, मध्यप्रदेश ३) वंदे मातरम्, २ ऑक्टोबर २०२२, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४) तुलसी तांती ५) ६६ वा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● नागोराव कमलाकर● शिवलिंग बेंडके● अजय त्रिभुवन● योगेश चंबोले● किशोर यमेवार● शैलेश शहा● नरेश पत्राळे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.**आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्-भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्याप्रमाणे परीसस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे सज्जनांच्या सहवासाने दुर्जन माणसांत असणारे वाईट गुण देखील हळूहळू लोप पावायला लागतात आणि चांगले गुण अंगी शिरुन तोदेखील सज्जन व्हायला लागतो.आपणच ठरवायचे की कुणाच्या सहवासात राहायचे आणि कुणाच्या नाही ? कुणाच्या सहवासात राहिल्याने आपले कल्याण होईल आणि जीवन कृतार्थ होईल याचा विचार करायला हवा.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जाणीव स्वत्वाची*एका जंगलात एक वाघाचे पिल्लू लहान असतानाच त्याच्या आईपासून व वाघाच्या समुदायातून दुरावते. रस्ता चुकल्यावर ते इकडे तिकडे फिरत असताना त्याला एक बकऱ्यांचा कळप दिसतो. ते त्या कळपामध्ये सामील होते. बकऱ्यांच्या कळपात बराच काळ वाघाचे पिल्लू राहते व त्याचे सर्व आचरण हे बकऱ्यासारखे होते.ते ना गर्जना करते किंवा धाडसी कृत्यही करीत नव्हते. कारण वाघांसोबत न राहिल्याने आपल्या जमातीतील प्राणी कसे वागतात याचे त्याला ज्ञान नव्हते. एके दिवशी बकऱ्या चरत असताना एक वाघ त्यांना पाहतो आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. सगळ्या बक-या शांतपणे चरत आहेत आणि त्यांच्या बरोबर एक वाघाचे पिल्लू पण हिंडत आहे. बकऱ्याना त्या पिल्लाची भीती वाटत नाही म्हणजेच ते पिल्लू त्यांच्यात वाढलेले आहे हे त्याच्या लक्षात येते. तो वाघ त्या बकऱ्याजवळ जातो आणि गर्जना करतो, त्याबरोबर जीवाच्या भीतीने सगळा कळप पळायला सुरुवात करतो तसे ते वाघाचे पिल्लू पण पळायला सुरुवात करते, पण मोठा वाघ त्याला अडवतो आणि म्हणतो," अरे! मी गर्जना केल्याबरोबर बकऱ्या पळाल्या हे ठीक आहे. पण तू का पळत आहेस? आणि माझ्या गर्जनेला तू प्रत्युत्तर न देता म्याव म्याव का ओरडत आहेस? बकऱ्या पळून जाणे साहजिक आहे पण मी थांब म्हंटल्यावर तू थांबला याचा अर्थ तुझ्यात कुठेतरी वाघ जिवंत आहे. तू बकरी नाही याचा पुरावा मी तुला देतो " असे म्हणून मोठा वाघ पिल्लाला घेवून पाण्याजवळ जातो तेथे त्याचे प्रतिबिंब दाखवून त्याला त्याच्यातील वाघ असण्याची जाणीव करून देतो. पिल्लाला आपल्या स्वत्वाची जाणीव होते व ते आपल्या वाघांच्या समुहात राहायला जाते.*तात्पर्य-स्वत्वाची जाणीव होणे हि मोठी गोष्ट आहे.आपण आपल्यातील आपल्याला जोपर्यंत ओळखत नाहीत तोपर्यंत आपली अवस्था वाघाच्या पिल्लाप्रमाणे राहते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment