✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 12/10/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१८७१ - भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स ॲक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले. हा कायदा १९४९मध्ये रद्द केला गेला.◆१९८८ - जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गिनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.◆१९९९ - परवेझ मुशर्रफने मियाँ नवाझ शरीफचे सरकार उलथवून पाकिस्तानची सत्ता हस्तगत केली.💥 जन्म :-◆१९११ - विजय मर्चंट, भारतीय क्रिकेट खेळाडू.◆१९४६ - अशोक मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-◆१९६७ - राम मनोहर लोहिया, भारतीय नेता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उज्जैन मध्ये महाकाल कॉरिडोरचं उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्ती करावी लागेल, समान नागरी कायद्याची आवश्यकता - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशातील आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे अध्यक्ष रवी कुमार एस. यांनी दिला आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपुरात लवकरच होणार ड्रोनद्वारे पोस्टाची डाक पार्सल सेवा, यापूर्वी केंद्रीय मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार गुजरातमधील भूज तालुक्यात हा प्रयोग करण्यात आला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *चिपळून तालुक्यातील डेरवण येथे 13 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेला होणार सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विदर्भ- कोकण कन्या ठरल्या चॅम्पियन : योगासनात महाराष्ट्र महिला संघाला सुवर्ण; आर्टिस्टिक सांघिक गटात महिला संघ अव्वल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा वर्ल्ड रेकॉर्ड... दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, सामन्यासह मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *शालेय संस्कार प्रार्थना*🎖️•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभू👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Hwc8KjFmFnY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *नासा येवतीकर, कन्या शाळा धर्माबाद*📱9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपली कामे आणि आपण*मुलांनो, एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर तसा प्रसंग ओढावतो. ज्यावेळी घरात वडील किंवा भाऊ नसतो, त्यावेळी तशीच काहीशी पंचाईत मुलींच्या बाबतीत सुध्दा घडते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामाची विभागणी करून घेते. त्यामुळे असा प्रसंग निर्माण होऊ शकतो. त्यास्तव कामाची विभागणी न करता प्रत्येक व्यक्तीने सर्वच कामे करायला शिकणे अत्यंत महत्वाचे आहे. घरात झाडू मारणे, भांडे घासणे, कपडे धुणे, भाजी निवडणे, दळण आणणे, स्वयंपाक करणे ही कामे आई किंवा बहिणीनेच करावीत असा काही लिखित नियम नाही. ही कामे मुलांनी स्वतःहुन केलीच पाहिजेत तरच भविष्यात जेंव्हा शिक्षणासाठी घर सोडून बाहेरगावी राहण्याचा प्रसंग येतो त्यावेळी केलेल्या या कामाचा अनुभव कामाला येतो. बाजारातून भाजीपाला खरेदी करणे, किराणा सामान आणणे, कपडे इस्त्री करून आणणे, वृत्तपत्र आणणे इत्यादी घराबाहेर करावयाची कामे वडील किंवा भावंडांची कामे मुलींनी वेळ मिळेल तशी आवर्जून करावीत. ही कामे मुलांची आणि ती मुलींची असे कामाचे वर्गीकरण मुळात करूच नये. सकाळी झोपेतून उठल्यावर आई सांगण्याच्या अगोदर अंथरूण, पांघरूण घडी करून व्यवस्थित ठेवणे, जेवायला बसताना निदान स्वतःपुरते तरी ताट, वाटी आणि पाण्याने भरलेला ग्लास घेणे, जेवण संपल्यावर ताट नियोजित धुण्याच्या ठिकाणी ठेवणे, आपली पुस्तके, वह्या, पेन, दप्तर इत्यादी सर्व व्यवस्थित ठेवून घेणे यासारख्या लहानसहान कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपली कामे आपणच करायची सवय लहानपणापासून लावून घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी उदाहरण म्हणू आपल्या सर्वांचे आवडते परमपूज्य साने गुरुजी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे जीवनचरित्र वाचल्यास आपली कामे आपण का करावीत याचे महत्व कळते. समर्थ रामदास स्वामी यांनी तर जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला असा उपदेश दिला आहे. त्यामुळे आज नाही, आतापासूनच आपण आपली कामे करायला सुरुवात करू या.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *कॅलेंडरमध्ये रोज एका नक्षत्राचे नाव का लिहिलेले असते ?* 📙जानेवारी महिन्यामध्ये कॅलेंडरचा म्हणजे दिनदर्शिकांचा हंगाम जोरात सुरू असतो. महालक्ष्मी, दाते, कालनिर्णय अशा असंख्य दिनदर्शिका बाजारामध्ये येतात. प्रत्येकाच्या घरामध्ये या दिनदर्शिका भिंतीवर लटकलेल्या असतात. दिनदर्शिकेमधील सण उत्सवाच्या तारखा सोडल्या तर इतर माहितीबाबत सर्वसामान्य लोक अज्ञानी असतात. अर्थात हे काहीजणांच्या फायद्याचंही असतं म्हणा. अहो एवढंच काय, शाळेमध्ये दिनमान सांगण्यासाठी मुले येतात आणि अश्विन शुद्ध शके १९२४ असे काहीतरी म्हणत जातात. सांगणाऱ्या मुलांना या शब्दांचा यत्किंचितही अर्थ समजत नाही, आणि कोणी समजावून सुद्धा देत नाही. शाळेमध्ये असणाऱया फळ्यावर सुद्धा ही माहिती लिहिलेली असते. अहो एवढंच काय वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा हे दिनमान झळकत असतं. दिनदर्शिकेचे महत्त्वाचे काम तारीख समजणे हे आहे. परंतु हल्लीच्या दिनदर्शिकांमध्ये माहितीचा प्रचंड मारा आहे. त्यातील नक्षत्रांसंबंधी माहितीचा वेध घेत या प्रश्नाची सोडवणूक करूया.दिनदर्शिकेमध्ये रोज एक नाव लिहिलेलं असतं. प्रामुख्याने अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृगशीर्ष. . . . ते रेवतीपर्यंत अशी एकूण सत्तावीस नावं लिहिलेली असतात. रेवतीनंतर परत याच क्रमाने पुन्हा एकदा नावांची जंत्री सुरू होते. त्यात अजिबात खंड नसतो. ही नावं कशाची आहेत हे विचारलं तर अचूक उत्तर येतं, ते म्हणजे नक्षत्र ! पण नक्षत्र म्हणजे काय ? असं विचारलं तर मात्र अजिबात सांगता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. नक्षत्र म्हणजे काय ? आणि ती सत्तावीसच का ? याचा परामर्श आता आपण घेणार आहोत. नक्षत्र ही संकल्पना भारतीयांची आहे. भारतीयांच्या दृष्टीने चंद्राला फार महत्त्व आहे. रात्रीच्यावेळी आकाशामध्ये चंद्राबरोबरच असंख्य चांदण्यासुद्धा दिसतात. दिवसा सूर्य प्रकाशामुळे चांदण्या गायब होतात. पण त्या असतात एवढं मात्र नक्की. एक गोष्ट विसरू नका की, या चांदण्या म्हणजे प्रचंड मोठे आणि आपल्यापासून खूप दूर असलेले दुसरे सूर्य आहेत. या चांदण्याच्या पार्श्वभूमीवर चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. या फिरण्यामुळे चंद्र रोज जागा बदलतो. चंद्राला पृथ्वीभोवती तीनशे साठ अंशांतून फिरायला सत्तावीस दिवस लागतात. त्यामुळे एका दिवसात तो अंदाजे बारा अंशाने पूर्वेकडे सरकतो. हे गणित करताना पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती फिरते हे लक्षात घ्याव लागेल. चंद्र आज कोणत्या ठिकाणी आहे हे सांगण्यासाठी भारतीयांनी चंद्राच्या पाठीमागे असणाऱया चांदण्यांचा उपयोग केला. ज्याप्रमाणे शहरातून जाणाऱ्या बसच्या मार्गात विविध स्टॉप असतात. तसंच आकाशातून जाणाऱ्या चंद्राच्या मार्गात सत्तावीस स्टॉप करण्यात आले. हे स्टॉप म्हणजे आकाशातील सत्तावीस भाग. त्या भागांमध्ये या चांदण्या येतात. त्यांना कल्पनेनं जोडून एक काल्पनिक आकृती तयार केली गेली. या आकृतीला भारतीयांनी नक्षत्र हे नाव दिलं. नक्षत्र म्हणजे आकाशातील चांदण्यांचे समूह. हे समूह उघड्या डोळ्यांनी आकाशात दिसतात, फक्त आपण कधीही पाहण्याची तसदी घेतलेली नाही. मनोरंजनाच्या जमान्यामध्ये या चमचमणार्या ठिपक्यांकडे पाहण्यात अजिबात रस वाटत नाही. हो पण एक मात्र विशेष आहे की यावर आधारित कर्मकांडावर प्रचंड विश्वास ठेवण्यात आपणाला काहीही गैर वाटत नाही. थोडक्यात काय तर भारतीयांनी आकाशाचे सत्तावीस भाग केले. त्या भागातील चांदण्याच्या समूहाला नक्षत्र म्हणून संबोधलं. याचा अर्थ चंद्र रोज एका भागामध्ये अर्थात नक्षत्रात असतो. दिनदर्शिकेमध्ये आजच्या तारखेला अश्विनी लिहलेलं असेल, तर आपण समजायचं की आजचा चंद्र अश्विनी नक्षत्रात आहे. म्हणजे काय तर चंद्राच्या आसपासच्या चांदण्या म्हणजे अश्विनी नक्षत्र. किती सोपं आहे हे गणित. अर्थात पुर्वीच्या काळातील मानवाने हे असंख्य निरीक्षणं करून मांडलेले आहे हे विसरून चालणार नाही. त्याच्या निरीक्षणवृत्तीला सलामच केला पाहिजे. समजा आज कॅलेंडरमध्ये पुष्य लिहिलेलं आहे, तर याचा अर्थ असा होतो की आजचा चंद्र पुष्य नक्षत्रात आहे. आणि आज चुकून गुरुवार असेल तर एक फर्स्टक्लास योग येतो. त्याला गुरूपुष्यामृतयोग म्हणतात. सदर दिवशी पेपरमधून हमखास जाहीर होते 'सोने खरेदीचा भाग्याचा दिवस'. आता मला सांगा, तीस हजार रुपये तोळे सोने खरेदी करून कोणाचं भाग्य उदयाला येणार ? सोनाराचं की घेणाऱ्याचं !जवळपास तीन लाख चौर्‍यांशी हजार किलोमीटर अंतरावरील चंद्र, पाचशे वीस प्रकाशवर्ष अंतरावरील पुष्य नक्षत्र, आठवड्यातील एक दिवस गुरुवार, खाणीतून काढलेलं सोनं, ते विकणारा सोनार, विकत घेणारी व्यक्ती आणि तिचं भाग्य. याचा काही संबंध ? अर्थात विचार केला तरच असली अतार्किक मांडणी समजू शकते. अशा प्रकारची मांडणी व्यक्तीचा आत्मविश्वास, कष्ट करण्याची तयारी, शिक्षण, वैचारिक प्रगल्भता यांना छेद देते एवढं मात्र निश्चित.*डाॅ. नितीन शिंदे**'अंतराळ समजून घेताना' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ माणसाचा खरा शत्रू कोण असतो तर तो स्वतःच असतो. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' अशी ओळख कोणत्या महापुरुषांची आहे ?२) केंद्राच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट कामगिरीत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला ?३) *सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे ?* ४) 'इंडिया मोबाईल काँग्रेस २०२२' मध्ये देशातील ५ जी दूरसंचार सेवेचा प्रारंभ केव्हा व कोणी केला ?५) 'जागतिक पशुदिन' केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) डॉ. बाबासाहेब आंबेडकर २) मध्यप्रदेश ३) मध्यप्रदेश ४) १ ऑक्टोबर २०२२, पंतप्रधान नरेंद्र मोदी ५) ४ ऑक्टोबर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● संपन्न कुलकर्णी● अमित शिंदे● जगन कुलवंत● जरावाड सायारेड्डी● अशोक हाक्के● बालाजी लक्ष्मणराव सातपुते● संतोष शातलवार● माधवराव धुप्पे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*अन्याय्य मार्गाने मिळवलेला पैसा स्वत:च्या आणि परिवाराच्या अध:पतनास कारणीभूत होतो. कितीही प्रयत्न केले तरी असला पैसा व्यक्तीला वाममार्गालाच नेतो. अनैतिक वर्तणूकीने काही काळ यशस्वी होत असल्याचा भास निर्माण झाला तरी पापाचे भूत पिच्छा सोडत नाही. पैसा मिळवू नये असे नाही. पैसा हे मानवाचे सहावे इंद्रिय आहे. त्याच्याशिवाय मूळही पाच इंद्रिय काम करणार नाहीत हे खरे आहे. प्रश्न पैसे मिळविण्याचा नाही, किती मिळवायचा हा आहे. जो पैसा मिळविताना माणुसकीची सारी तत्वे पायदळी तुडविली जातात आणि ज्या पैशाचा विनियोग माणसाच्या खरेदी-विक्रीत होतो, त्या पैशाला काय अर्थ आहे?**ज्याप्रमाणे पैसा औषध विकत घेऊ शकतो; पण आरोग्य विकत घेऊ शकत नाही. पैसा सेवा विकत घेऊ शकला तरी माणूस विकत घेऊ शकत नाही. गैरमार्गाने आलेल्या संपत्तीला गैरमार्गाने जाण्यासाठीच पाय फुटतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे. शेकडो वर्ष उलटली तरी आपण व्यास, वाल्मिकींना विसरलो नाही. राजघराण्यात जन्मल्यामुळे नव्हे, तर राजघराण्याचा त्याग केल्यामुळे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांची नावे घेतली जातात. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, कबीर यांची नावे प्रात:स्मरणीय झाली आहेत ती त्यांनी सांगितलेल्या माणुसकीच्या धर्मामुळे. आपले नाव जनतेच्या जीभेवर असावे असे वाटणे स्वाभाविक आहे त्यासाठी पैशांबरोबर आत्मियतेची गरज आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥* ●•• 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माणूस देहयष्टीने कसा आहे हे आपणास त्यांच्याकडे पाहिल्यावर लगेच समजते. त्याच्या सानिध्यात राहायची गरजच नाही, परंतु त्याचा स्वभाव कसा आहे हे जर पाहायचे झाले तर त्याच्या सान्निध्यात राहिल्याशिवाय समजत नाही. जेव्हा आपण इतरांशी संबंध ठेवतो तेव्हा काही काळ त्यांच्या संपर्कात राहून ठरवतो. त्याचे आणि आपले जर का संवादातून जमले तर पुढचे पाऊल टाकतो अन्यथा त्याच्याशी संबंध ठेवावे का नाही हा विचार करून ठरवतो.चांगले संबंध ठेवायचे ठेवायचे असतील तर त्यांच्या देहयष्टीकडे न पाहता स्वभावाकडे पाहावे आणि मगच संबंध जोडावे तरच दोघांचेही जीवनव्यवहार चांगल्या प्रकारे पार पडतील.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चतुर बिरबल*बिरबलच्या चातुर्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती. तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबारात एक पंडित आला होता. बादशहाच्या परवानगीने त्याने दोन प्रश्न बिरबलाला विचारलेपंडित : खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण? बिरबल : ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरते, तो ज्ञानी आणि निरर्थक ठरते तो अज्ञानी असतो.पंडित : सर्वांत उत्तम ऋतू आणि सर्वात वाईट ऋतू कोणती?बिरबल : पोटभर खायला, अंगभर ल्यायला आणि आपली जवळची माणसे प्रेम करायला असतील, तर सर्वच ऋतू उत्तम असतात. परंतु खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही आणि कोणी प्रेम करणारेही नाही, अशी ज्याची स्थिती असेल, त्याला सर्वच ऋतू वाईट असतात.बिरबलाने दिलेली अशी उत्तरे ऐकताच तो पंडित बादशहाला म्हणाला, ''खाविंद, मला वाटले होते, त्यापेक्षा कितीतरी पटींनी बिरबलजी अधिक चतुर आहेत.''*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment