*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚वाचा. वहीत लिहा.✍* *वाक्प्रचार व अर्थ - (ग)* *गहजब होणे - बोभाटा होणे* *गगन ठेंगणे होणे - खूप आनंद होणे* *गळ्याला तात लागणे - प्राणघातक संकटात सापडणे* *गुळणी फोडणे - स्पष्ट शब्दात सांगणे* *गळ्यात धोंड पडणे - जबाबदारी अंगावर येणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *म्हणी व अर्थ - (ग)* *गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली - एखादी गोष्ट सिद्धीस गेली तर ठीक नाही तरी नुकसान नाही.* *गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी - गरिबीमुळे आपण काही करू शकत नसलो तरी गोड बोलणं शक्य असल्यास गोड तरी बोलावे* *गरजवंताला अक्कल नसते - गरजेमुळे अडणार्‍याला दुसऱ्याचे निमूटपणे ऐकून घ्यावे लागते* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*

No comments:

Post a Comment