कविता - मन पाखरू वृक्षांनी किती मुकुट घातले डोईवर सोनेरी अन् चंदेरी कुरणावर रानात पसरला जसा गुलाल भडक चौफेरी हिरवे हिरवेगार सुंदर हे शेत मन पाखरू होऊन पिंगा घाली चहूकडे, झाडावरील भुंगे फिरती इकडेतिकडे किती सुंदर अचल फुलपाखरे इकडून तिकडे उडती सारे नयनास भावते रंग तयांचे तर्‍हेतर्‍हेचे कितीतरी साजिरे पिवळे ,तांबूस ऊन संपताच पाखरे झाडावरती होती गोळा सांजसमयी पिलास भेटण्यास आतुरती मग मायेचा लळा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.

No comments:

Post a Comment