शुर शिवबा राजे
राजे तुमच्या धाडसाचे ,कर्तृत्वाचे
गुणगानाचे गाऊन पोवाडे
मिळवितो आम्ही सन्मान सगळीकडे
शुर शिवबा राजे तुम्ही जन्मास यावे एकदागडे
विश्वास होता तुमच्या नेहमी मनी
शत्रुस जिंकायचे तुम्ही गनिमी
काव्यानी नेहमी नेहमी
स्वराज्याची शपथ घेऊन
रयतेच्या सुखासाठी झिजलात तुम्ही
ताकद होती तुमच्यात तलवारीची
शिकवण होती तुम्हास आऊसाहेबांची
शुर शिवबा राजे आहात तुम्ही कर्तुत्ववान
मराठी अस्मितेच्या महाराष्ट्राची शान
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रमिलाताई सेनकुडे.
No comments:
Post a Comment