कथा क्रमांक ८६

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ८६ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻  सत्कर्म* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰
 जगज्जेता अलेक्झांडर
जवळजवळ संपूर्ण जग जिंकून आपल्या सैन्यासह
माघारी आपल्या देशात परतत होता. परंतु जाताना तो अतिशय गंभीर आजारी झाला.
अनेक उत्कृष्ट उपाय करूनही आजारातून बरे होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती.
जिंकलेले संपूर्ण साम्राज्य, एवढी मोठी शूर
सेना, आपली जगज्जेती तीक्ष्ण तलवार आणि अमाप संपत्ती, ह्या सर्वांचा त्याग करून आपणाला आता मृत्यूला सामोरे जावे लागणार
ह्याची त्याला जाणीव झाली. आपण आता कोणत्याही परिस्थितीत आपल्या मायदेशी जीवंत पोहचू शकत नाही हे त्याला कळून चुकले.
मृत्यूच्या शेवटच्या घटका मोजत असताना त्याने आपल्या सरदाराला पाचारण
केले आणि म्हणाला ” मी आता लवकरच हे जग
सोडून निघून जाणार आहे, माझ्या तीन इच्छा आहेत आणि त्या पूर्ण करण्याची सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे."
सरदाराला साश्रूपूर्ण होय म्हणण्याशिवाय
गत्यंतर नव्हते.
अलेक्झांडर म्हणाला:

*१*. माझी पहिली इच्छा “
माझ्या खाजगी डॉक्टरनेच
माझी शवपेटी एकट्यानेच उचलून न्यावी”
*२*. माझी दुसरी इच्छा “
माझी शवपेटी स्मशानभूमीवर
नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे”
*३*. आणि माझी अंतिम इच्छा ” माझे
दोन्ही हात शवपेटीेच्या बाहेर काढून लोंबकळत ठेवावे.”
आपला राजा आपणाला
कायमचे सोडून जाणार, हे ऐकून सर्व सेना अतिशय दुःखी झाली.
सरदाराने इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले,
तरी देखील हिम्मत करून प्रश्न विचारला,
” हे राजन, ह्या कसल्या विचित्र इच्छा."
राजाने एक दीर्घ श्वास
घेतला आणि म्हणाला,
“माझ्या आयुष्यात मी जे
काही आता शिकलो, ते सर्व जगाला माहीत व्हावे म्हणूनच ह्या तीन इच्छांची पूर्तता करणे
गरजेचे आहे”
माझ्या खाजगी डॉक्टरने
माझी शवपेटी एकट्यानेच उचलून न्यावी, ह्यातून मला जगाला एक संदेश
द्यावयाचा आहे की, जगातील कोणीही उत्कृष्ट डॉक्टर देखील तुम्हाला मरणापासून वाचवू शकत नाही
.मरण हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे
जीवन हे गृहीत न धरता ते चांगल्या प्रकारे कोणालाही न दुखावता कसे जगता येईल
हा प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जगज्जेता म्हणून नावलौकिक प्राप्त करण्यासाठी मी आयुष्यभर सतत लढाया केल्या,
अपार संपत्ती गोळा केली,पण मरताना मात्र मी काहीच घेवून जाणार नाही,
म्हणूनच
माझी दुसरी इच्छा
“माझी शवपेटी स्मशानभूमीवर
नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे,केवळ संपत्ती कोणत्याही प्रकारे
जमविणे म्हणजेच जीवन नाही." हा संदेश
लोकांना मिळेल
आणि अशी संपत्ती मिळविण्यासाठी केलेली
धावाधाव म्हणजेच जीवनातील अमूल्य
वेळेचा कालापव्य.
जनतेला कळू द्या मी रिकाम्या हातानेच ह्या जगात आलो आणि रिकाम्या हातानेच हे
जग सोडून जात आहे,
म्हणून
 माझी तिसरी इच्छा
” माझे दोन्ही हात
शवपेटीेच्या बाहेर काढून लोंबकळत ठेवावे."
हे सर्व सांगून थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला.

 *तात्पर्य*
*माणुस मरतांना शेवटी काहीच सोबत नेत नाही.फक्त कर्मच सोबत येते .म्हणजे जेव्हा काळाची उडी पडेल तेव्हा कोणीही वाचवू शकत नाही*.
*सगळं इथेच ठेवून जायचे आहे.*
*एक माणूस म्हणून या संसारात चांगले  वागावे, आणि  चांगली कर्मे करावीत*.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝 संकलन / समूह प्रशासक*
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:

Post a Comment