कथा क्रमांक ८५

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ८५ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ मोह* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एका नगरात एक पुजारीबाबा राहत होते. शेजारच्या गावातील पुजाऱ्याचे अकस्मात निधन झाल्याने या
पुजारी बाबाना त्या गावात पुजारी म्हणून नियुक्त केले गेले. त्यानंतर एकदा त्या गावी जाण्यासाठी पुजारी बाबा बसमध्ये चढले, त्यांनी कंडक्टरला पैसे दिले आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले.

कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम पुजारीबाबाना परत केली तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले कि त्यात १० रुपये जास्त आले आहेत. पुजारीबाबानी असा विचार केला कि आता कंडक्टर घाईत आहे तेंव्हा त्यांना थोड्या वेळाने पैसे परत करू या. काही वेळ झाला कंडक्टर अजूनही त्याचे तिकिटे देण्याचे काम करतच होता.

पुजारीबाबांच्या मनात एक विचार आला कि आता
तर कंडक्टर इतका घाईत आहे कि त्याला ते १० रुपये परत केले काय आणि नाही केले काय काय फरक पडणार आहे. सरकारी बस कंपनी इतके पैसे मिळवते प्रवाशांकडून मग इतक्या छोट्या रकमेने त्यांना काय होणार? लाखो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून हे १० रुपये आपल्या सारख्या पुजाऱ्याला भेट मिळाले असेच आपण समजू. आपण याचा काही तरी सदुपयोग करू शकू.

पुजारीबाबांच्या मनात असे विचार चालू असतानाच त्यांचे उतरायचे ठिकाण आले. बसमधून उतरताना अचानक त्यांचा हात खिशाकडे गेला व त्यातून ती दहा रुपयाची नोट त्यांनी बाहेर काढली व कंडक्टरला परत दिली व म्हणाले,
"भाऊ !! .......तुम्ही मघाशी मला तिकिटाचे पैसे परत करताना घाईगडबडीत हे दहा रुपये जास्त दिले आहेत."

कंडक्टर हसून म्हणाला,"महाराज! तुम्हीच या गावाचे नवे पुजारी आहात का?"

पुजारीबाबा हो म्हणाले.

त्यावर कंडक्टर पुन्हा बोलू लागला," महाराज, माझ्या मनात तुमचे प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा होती. तुम्हाला बसमध्ये चढताना पाहिले आणि मनात एक विचार आला कि चला आपल्याला या कामामधून वेळ मिळत नाही आणि तुमची भेट घडून येत नाही तेव्हा तुम्ही जसे प्रवचनात उपदेश करता ते आचरणात आणता काय याचा पडताळा घ्यावा म्हणून मी ते दहा रूपये तुम्हाला मुद्दाम जास्त दिले होते. पण मला आता कळून चुकले आहे की तुम्ही जसे बोलता तसेच तुमचे पवित्र आचरण आहे.

महाराज मला क्षमा करा.'' एवढे बोलून कंडक्टरने
गाडी पुढे जाण्यासाठी बेल वाजवली.

पुजारीबाबांना आता घाम फुटला होता, ते घाम
पुसत आकाशाकडे पहात म्हणाले,'' प्रभो, तुझी लीला अपरंपार आहे, दहा रूपयांचा मोह मला आत्ता किती महागात पडू शकला असता पण तुम्ही मला त्यातून वाचवले. देवा तू खरंच दयाळू आहेस. अचानक का होईना त्या दहा रूपयांच्या मोहातून तू मला बाहेर काढले व समाजात होणारी माझी बदनामी थांबवली.''

*तात्पर्यः*
मोह हा वाईट असतो, ज्याक्षणी मोहाने मन ग्रासते त्याक्षणीच मानव प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू
लागतो.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝शब्दांकन/ संकलन/तथा समूह प्रशासक*📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:

Post a Comment