✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 ऑगस्ट 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://surveyheart.com/form/66ad9d9e311b89197db7723b••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟦 *_ या वर्षातील २१८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟦 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟦•••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: ब्राझिलमधे रिओ-डी-जानिरो येथे ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होणार आहे.**१९९७: रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन ’सोयूझ-यू’ हे अंतराळयान ’मीर’ अंतराळस्थानकाकडे रवाना**१९९७: फ्रेन्च खुल्या लॉनटेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात विजेतेपद मिळवणार्‍या महेश भूपतीला क्रीडा खात्यातर्फे २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर**१९९४: इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा ’होमी जहांगीर भाभा पुरस्कार’ राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान**१९६५: पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.**१९६२: नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९० मधे त्यांची सुटका झाली.**१८६१: अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.*🟦 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟦••••••••••••••••••••••••••••••••• *१९८७: जेनीलिया डिसूझा -- भारतीय चित्रपट अभिनेत्री**१९८०: वत्सल शेठ -- भारतीय अभिनेता, आणि उद्योजक**१९७५: काजोल – प्रसिद्ध अभिनेत्री**१९७३: डॉ. सोनिया कस्तुरे -- कवयित्री**१९६९: डी. के. शेख (दिलावर कादर शेख)-- प्रसिद्ध कवी, संपादक* *१९६९: वेंकटेश प्रसाद – जलदगती गोलंदाज**१९६८: सुचिता गोपालराव कुनघटकर -- कवयित्री**१९६५: रेखा कुलकर्णी-देशपांडे -- कवयित्री**१९६४: राजू रामचंद्रन डहाके -- कवी**१९६३: विठ्ठल तात्या संधान -- कवी**१९५८: भारती दिलीप सावंत -- कवयित्री ,लेखिका**१९५८: राजाराम गो.जाधव -- मंत्रालयातील निवृत्त सहसचिव तथा प्रसिद्ध कवी, लेखक**१९५६: प्रा. डॉ. श्रृतिश्री बडगबाळकर-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९४९: प्रा. ज. रा. गवळीकर -- कवी* *१९४४: पद्माकर दराडे -- प्रसिद्ध कादंबरीकार**१९४४: उत्तरा बावकर -- भारतीय रंगमंच, चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री (मृत्यू : १२ एप्रिल २०२३)**१९३३: विजया राजाध्यक्ष – लेखिका व समीक्षिका, ७४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा**१९३०: नील आर्मस्ट्राँग – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव (मृत्यू: २५ ऑगस्ट २०१३ )**१९२८: राघोबाजी वामनराव गाणार -- कथाकार* *१९२२: प्रा.भगवंत गोविंदराव देशमुख -- लेखक, संपादक* *१९२२: नरेश भिकाजी कवडी -- भाषातज्ञ, कथाकार, समीक्षक, ज्ञानेश्वरीचे चिकित्सक अभ्यासक आणि अनुवादक (मृत्यू: ४ एप्रिल २००० )**१९१०: डॉ. रामचंद्र ज. जोशी -- लेखक* *१८९०: महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू [१९६१-१९६४], टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू [१९४८], पद्मविभूषण, मराठी शुद्धलेखन महामंडळाचे अध्यक्ष, प्राचीन मराठी इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचे व्यासंगी अभ्यासक (मृत्यू: ६ आक्टोबर १९७९ )**१८६९: नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चाफेकर -- ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक, समीक्षक व कोशकार (मृत्यू: ५ मार्च १९६८ )**१८५८: वासुदेव वामन तथा ’वासुदेवशास्त्री’ खरे – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी (मृत्यू: ११ जून १९२४ )*🟦 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟦•••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:शांता दत्तात्रेय गणोरकर-- कवयित्री, लेखिका (जन्म:२४ मे १९२५)**२०२०: शिवाजीराव पाटील निलंगेकर- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (जन्म :९ फेब्रुवारी १९३१ )* *२०१४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार चापमॅन पिंचर यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९१४ )**२००१: ज्योत्स्‍ना भोळे – संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्‍या गायिका आणि अभिनेत्री. संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७६), अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.(जन्म: ११ मे १९१४ )**२०००: लाला अमरनाथ भारद्वाज – भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर (मृत्यू: ११ सप्टेंबर १९११ )**१९९२: अच्युतराव पटवर्धन – स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते (जन्म:५ फेब्रुवारी १९०५ )**१९९१: सोइचिरो होंडा -- होंडा कंपनीचे संस्थापक जपानी अभियंता आणि उद्योगपती ( जन्म: १७ नोव्हेंबर १९०६)**१९८४: रिचर्ड बर्टन – अभिनेता (जन्म: १० नोव्हेंबर १९२५ )**१९६२: अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्‍रो यांनी गोळी झाडुन घेऊन आत्महत्या केली. (जन्म: १ जून १९२६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी प्रारंभ झालेल्या *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* ला पाहता पाहता नऊ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एक प्रयत्नवरील google फॉर्म भरून आपले अमूल्य प्रतिक्रिया कळवावे. ही नम्र विनंतीसंयोजक :- नासा येवतीकर, 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरुन एनडीएच्या मित्रपक्षात बिघाडी? नितीश कुमारांच्या जेडीयूचा केंद्राला सल्ला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विद्यार्थ्यांनो, जीवनात दूरदृष्टी ठेवून कष्ट करा, प्रसिद्ध अंध उद्योजक डॉ. भावेश भाटीया यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री अचानक दिल्ली दौऱ्यावर!:मराठवाड्यातील आमदारांची फडणवीसांच्या बंगल्यावर बैठक; राजकीय वर्तुळातील मोठी घडामोड*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सात दशकांनंतर आगामी साहित्य संमेलन होणार राजधानी दिल्लीत !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यात भीषण अपघातात 2 ठार; नाशिकमध्येही बस-कारची धडक, 2 महिलांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, शुटआऊटमध्ये 4-2 ने विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा पराभव ; 32 रन्सने श्रीलंकेने दिली मात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 रेनवॉटर हार्वेस्टिंग : पाण्याची साठवण व पुनर्भरण 📙 सर्व मोठ्या गावांचे शहरीकरण झाले. शहरांचे काँक्रिटीकरण झाले. काँक्रिटच्या जंगलाला डांबराच्या रस्त्यांची जोड मिळाली. मग या साऱ्या शहरावर पडणारे पाणी जमिनीत मुरणार कसे ? ते झपाट्याने वाहून जाणार. गटारांतून नालीमध्ये, नालीतून नदीकडे वाहणार. पुन्हा या शहरी वस्तीला पाणी पुरवायचे कुठून ? नळाद्वारे पुरवायला पाणी आणायचे कुठून ? यासारख्या गंभीर प्रश्नांची उत्तरे शोधताना जगातील अनेक ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगची कल्पना प्राधान्याने मांडली गेली. जेथे पाऊस जास्त पडतो, तो कालावधी अल्प असतो. पडलेला पाऊस स्वतःबरोबर बहुमोल मातीचा थर घेऊन जातो. ती माती गाळा रूपाने नदीतून वाहत धरणांच्या भिंतीजवळ साचते व धरणे हळूहळू निकामी होतात. तसेच डोंगरावरची माती वाहून गेल्याने डोंगर बोडके, खडकाळ होतात व पावसाचे प्रमाण कमी होऊ लागते. हा झाला उघड्या जमिनीसंदर्भातला प्रश्न. दुसरा प्रश्न काँक्रिटच्या जंगलातला वर उल्लेखलेला. दोन्ही प्रश्नांना उत्तर एकच. ते म्हणजे जमेल तसे, जमेल तितके पाणी आडवा, जमवा व जिरवा. पाणी अडवायचे उपाय शहरात सोपे. छपरावरचे, गच्चीवरचे, पावसाचे पाणी पन्हाळीद्वारे एकत्रित करून इमारतीच्या शेजारी वा पोटात बांधलेल्या टाकीत साठवायचे. पावसाळा संपल्यावर त्याचाच वापर पिण्याखेरीज लागणाऱ्या अन्य वापरासाठी करायचा. आसाम, मेघालय, नागालँड या उतारावरच्या टेकड्यांच्या प्रदेशात ही पद्धत गेली अनेक वर्षे घराघरांतून वापरली गेली आहे. टाकी पाण्याने भरली, तर जास्तीचे पाणी जवळच खणलेल्या एका खड्डावजा कुपनलिकेत सोडायचे. आठ ते दहा सेंटीमीटर व्यासाचा दोन तीन मीटर खोलीचा खड्डाही या कामी उपयोगी पडतो. भूजलपातळी वाढण्यासाठी त्याचा जरूर उपयोग होतो. शहरात, गावात कूपनलिका खणल्या जातात, पण अनेकदा पाणी लागत नाही. अशा कूपनलिकांमध्येही असे जवळपासचे पाणी भू उदरात भरण्यासाठी सोडता येते. दहा हजार चौरस मीटरच्या सर्वसामान्य इमारतीच्या गच्चीवरचे पाणी साठवल्यास किमान तीन महिने त्या इमारतीत राहणाऱ्या सर्वांना पावसाळ्यात व त्यानंतरचे दोन महिने साठवलेल्या पाण्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकतो. महानगरांमधून इमारतीचे नकाशे मंजूर करून तिला परवानगी देताना अशी रचना करणे आता गरजेचे वाटू लागले आहे. पुणे महानगरपालिकेने स्वतःच्या विस्तीर्ण इमारतीत तशी रचना करायला सुरुवातही केली आहे. 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या एका वाक्यात अन्य ठिकाणच्या रेनवॉटर हार्वेस्टिंगचा सारा अर्थ सामावतो. उतारावर, डोंगरावर समतल बांधांची रचना यासाठी केली जाते. कंटूरबंडिंग या नावाने ती ओळखली जाते. पावसाचे पाणी या विविध बांधांना अडते, जिरते, माती वाहून नेणे थांबते. याशिवाय मोठ्या पावसात वाहणारे पाणी पाझर तलाव बांधून अडवले जाते. पावसाळा ऑक्टोबरमध्ये संपला की, त्यानंतर शेती, जनावरे, पक्षी यांना या पाण्याचा अगदी मार्चपर्यंतही उपयोग होतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाझर तलावाचे पाणी जमिनीत मुरल्याने त्या परिसरातल्या व खालच्या भागातल्या विहिरींची भूजलपातळी उंचावते. महाराष्ट्रातील भूजलपातळी १९५० साली होती, त्याच्या दुपटीने खोलवर गेली आहे. याचाच अर्थ ६ मीटरवर विहिरीला बारा महिने पाणी असायचे, तिथे आता २० मीटरपर्यंत खोल जावे लागते. कुपनलिकांची अवस्था याहूनही वाईट आहे. अनेक ठिकाणी दोनशे फुटांपेक्षा जास्त खोल गेल्याशिवाय पाणी लागत नाही. गावाच्या शिवारात पडलेल्या पावसाच्या पाण्यापैकी किमान पन्नास टक्के पाणी या पद्धतीने अडवणे, जिरवणे शक्य असते, असे प्रयोगाअंती अनेकांनी सिद्ध केले आहे. अण्णासाहेब हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे, तरुण भारत संघाच्या राजेंद्रसिंह यांनी राजस्थानमध्ये, विलासराव साळुंके यांनी पुरंदर जिल्ह्यातील केलेल्या प्रयोगांतून या गावांची पाण्याची गरज भागू लागली आहे. गावात हिरवाई निर्माण झाली आहे, गरज आहे अशा प्रयोगांतून अन्य गावातील गावकऱयांनी प्रेरणा घेण्याची. शेताच्या खोलगट भागात चर खणून शेततळी घेण्याचे प्रयोगही यशस्वी झाले आहेत. पण सार्वत्रिक प्रयोगातून सारा परिसर हिरवागार करण्याचे प्रयत्न मात्र कमी पडत आहेत.छोट्या नदीमध्ये, ओढ्यांमध्ये ठराविक अंतरावर बंधारे घालण्याच्या सरकारी पातळीवरच्या प्रयत्नांनासुद्धा यश येत आहे. ओढ्याच्या पात्रातली दगड, वाळू सिमेंटच्या रिकाम्या पोत्यात भरून व्यवस्थित बंधारा बांधता येतो. असे बंधारे आठ ते दहा वर्षे चांगले टिकतात.इस्रायलसारख्या देशात जेमतेम सहा ते दहा इंच वार्षिक पाऊस पडतो. याउलट भारताच्या अनेक भागांत सरासरी चाळीस ते पन्नास इंच पाऊस पडतो. महाराष्ट्रातील अगदी दुष्काळी भागातसुद्धा पावसाचे वार्षिक प्रमाण वीस इंच एवढे आहे. इस्रायलने पाण्याचा प्रत्येक थेंब उपयोगात आणण्याचा गेली पन्नास वर्षे प्रयत्न केला आहे. याउलट भारतातील पावसाचे पाणी आजही बहुतांश वाहून जाते. पावसाळ्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अक्षरश: भेडसावू लागतो.यावरचा एकमेव उपाय म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पाण्याचे पुनर्भरण, पुनर्वापर करण्याचा आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंकार माणसाला फुलवतो; परंतु त्याला कधीही आधार देत नाही.- रस्किन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणता देश श्रीरामाचे टपाल तिकिट जारी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे ?२) महाराष्ट्रातील पहिले पाणलोट क्षेत्र विकासाचे गाव कोणते ?३) वर्ल्ड अग्रिकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार २०२४ कोणत्या राज्याला जाहीर करण्यात आला आहे ?४) 'दास' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) जगातील पहिला थोरियम आधारित न्युक्लिअर पॉवर प्लांट कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे ?*उत्तरे :-* १) लाओस २) राळेगण सिद्धी, अहमदनगर ३) महाराष्ट्र ४) चाकर, नोकर ५) चीन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्रीराम पाटील जगदंबे, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 भारती सावंत, साहित्यिक, मुंबई👤 अभिनंदन प्रचंड, विषय शिक्षक, धर्माबाद👤 मनोज मानधनी, धर्माबाद👤 विकास कांबळे👤 शेख वाजीद👤 दत्तात्रय सीतावार, कराटे प्रशिक्षक, धर्माबाद👤 किरण सोनकांबळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु मानुष करि जानते ते नर कहिये अन्ध ।यहां दुखी संसारमें आगे यमके बन्ध ॥ 34 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तेल आणि तूप जरी भिन्न असतील तरी त्यांना बनण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो फक्त त्यांनाच माहीत असते. म्हणूनच ते दीर्घकाळ टिकून राहताना दिसत असतात. सोबतच त्यांची जागा सुद्धा योग्य ठिकाणी बघायला मिळत असते. या दोघांमधून आजच्या माणसाला खूप काही शिकण्यासारखे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*इमानदारीचेे फळ*------------$$$$-------------एक राजकुमार विवाह करण्याच्या वयात असतो, त्यासाठी स्वतःचे स्वयंवर तो स्वतःच घोषित करतो. राज्यातील इच्छुक तरुणींना दरबारात ठराविक दिवशी हजर राहण्याची दवंडी सर्वत्र दिली जाते.गावोगावच्या सुंदर आणि धनिकांच्या तरुणी सज्ज होतात ! त्या राजकुमाराच्या राजवाड्यावर एक नोकर असतो त्याच्या मुलीचे त्या राजकुमारावर प्रेम जडलेले असते. मनातून ती त्याला पूजत असते. स्वयंवराची दवंडी ऐकून ती गरीब मुलगी घरी आईला म्हणते, "मी पण जाणार त्यादिवशी दरबारात"आई समजावते कि, "तिथे खूप मोठ्या घरच्या मुली येणार, तुझी निवड कशी होईल ? तू दिसायलाही फार सुंदर नाहीस"मुलगी म्हणते, "ते मलाही माहित आहे, पण या निमित्ताने मला राजकुमारजवळ थोडा वेळ तरी जाता येईल. जवळून पाहता येईल. इतकेही मला पुरेसे आहे"ठरलेल्या दिवशी शंभरेक सुंदर तरुणी दरबारात हजर होतात. त्यात ही नोकराची मुलगी देखील साधेच कपडे घालून उभी असते. दरबार भरतो. राजकुमार येतो. राजकुमार प्रत्येक मुलीजवळ जातो आणि जवळच्या थैलीतील एक "बी" काढून देतो. सर्वाना बिया देऊन झाल्यावर, राजकुमार सांगतो, "हे बी तुम्ही घरी जाऊन कुंडीत लावा. त्याची देखभाल करून तीन महिन्यांनी पुन्हा इथे कुंडीसह या. जिच्या कुंडीतल्या झाडाचे फुल सर्वात जास्त सुंदर असेल, तिच्याशी मी लग्न करेन "सगळ्याजणी ते बी घेऊन घरी जातात. नोकराची मुलगीही घरी येते. एका कुंडीत ते बी पेरते. रोज काळजीने त्याला खत, पाणी वगैरे देते. पण दोन महिने झाले तरी त्यातून काहीच उगवत नाही. मुलगी हार मानत नाही. एका हुशार माळ्याकडे जाऊन काही टिप्स घेते. त्यानुसार पुन्हा प्रयत्न करते. पण कुंडीतून काहीच उगवत नाही. यातच तीन महिन्याची मुदत संपत येते. शेवटी ती निराश होते. तीन महिन्यांनी सर्व सुंदर तरुणी आपापल्या कुंड्या घेऊन दरबारात येतात. प्रत्येकीच्या कुंडीत सुंदर फुल असते. ती नोकरांची मुलगीही स्वतःची कुंडी घेऊन आलेली असते, ज्यात काहीच उगवलेले नसते. सगळ्याजणी तिला हसतात. इतक्यात राजकुमार हजर होतो. तो सर्व कुंड्याचे निरीक्षण करतो आणि शेवटी त्या नोकराच्या मुलीकडे निर्देश करून जाहीर करतो कि, "ती मुलगी मी निवडली आहे, "सगळा दरबार चकित होतो. काही सुंदर मुली चिडतात. त्यातली एक धिटाईने पुढे येऊन विचारते, "जिच्या कुंडीत काहीच उगवले नाही, तिची निवड का ? उलट माझ्या कुंडीत पहा, किती सुंदर गुलाब फुलला आहे. मग माझी निवड का नाही ?"राजकुमार हसून उत्तर देतो, "फक्त ती (नोकराची मुलगी) या पदासाठी योग्य आहे. कारण तिनेच एकटीने "इमानदारीचे" फुल फुलवले आहे. मी तुम्हा सगळ्यांना ज्या बिया दिल्या होत्या त्या निर्जीव होत्या. त्यातून फुल तर सोडाच पण काहीही उगवणार नव्हतेच."सगळ्या दरबारात टाळ्यांचा कडकडाट होतो ! आणि त्या नोकराच्या मुलीच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू पाझरू लागतात. *तात्पर्य* : इमानदारी हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती आणि मौल्यवान आहे ! तो ज्याच्याकडे आहे, तो आयुष्यात यशस्वी नक्की होतो !! मग भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी !! म्हणून महत्वाची *इमानदारी, सलाम करेल दुनियादारी !!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment