✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27/02/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ● १९८७: मराठी राजभाषा गौरव दिन● २००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.💥 जन्म :-● १९१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज● १९४३: कर्नाटक चे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा● १९५२: भारतीय चित्रपट निर्माता प्रकाश झा● भारतीय हॉकी खेळाडू संदीप सिंग💥 मृत्यू :- ● १८८७: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी● १९३१: काकोरी कट व लाहोर कट यातील नेते क्रांतिकारक चंदशेखर आझाद● १९५६: भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर● १९९७: श्यामलाल बाबू राय ऊर्फ ’इंदीवर’ – गीतकार● २०१०: भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचं मतदान संपलं, मतदारांचा अल्प प्रतिसाद, 2 मार्चला मतदानाचा निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईत शिंदे-फडणवीस सरकारकडून विकासकामांना गती, 320 कामांचं केलं भूमीपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *परभणी जिल्ह्यातील महत्वाच्या विकास कामांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते झाले उद्घाटन.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नाशिकची द्राक्ष युरोपात, आतापर्यंत 32 हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ग्रीन हाऊससाठी राजस्थान सरकारकडून शेतकऱ्यांना 50 ते 70 टक्के अनुदान देण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जी-20 च्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून औरंगाबाद जिल्ह्यात 1400 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बॉर्डर-गावस्कर सीरीजमधील तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदोर येथील होळकर स्टेडियमवर सुरु होणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मराठी राजभाषा गौरव दिन*त्यानिमित्ताने लेख व कविता खालील👇🏼लिंकवरhttps://nasayeotikar.blogspot.com/2021/02/marathi-bhashaa-din.htmlलेख व कविता वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*🏆Class-8th English chapter 3.2 The Song of songs-Story🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/F5N2EOP_wnk~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *वि. वा. शिरवाडकर*विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य  कवी,  लेखक,  नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतीकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कंजूष म्हणजे तो व्यक्ती, जो श्रीमंत म्हणून मरण्यासाठी आयुष्यभर गरिबीत जगतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सिंहाच्या अगोदर कोणत्या प्राण्याला 'जंगलाचा राजा' म्हटले जायचे ?२) जगात शिक्षण क्षेत्रात आघाडी देश कोणता ?३) कोणत्या नदीला 'महाकाली नदी' असे संबोधल्या जाते ?४) जीवनसत्त्व ब - ६ चे रासायनिक नाव काय आहे ?५) कोणत्या देशात सर्वात जास्त शेतकरी आहेत ?*उत्तरे :-* १) हत्ती २) कॅनडा ३) शारदा नदी ४) पायरीडॉक्सीन ५) भारत *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गंगाधर मुटे, वर्धा👤 श्यामल पाटील👤 साई पांचाळ*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना जे घडी राघवेवीण गेली। जनीं आपुली ते तुवां हानि केली॥ रघूनायकावीण तो शीण आहे। जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥४६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माणूस शरीराने थकतो कारण शरीर काळाशी बांधलेले असते. मृत्यू अटळ असला, तरी मृत्यूच्या आधी असे काही कर्तृत्व दाखवायला हवे, की पुढील भविष्यातही आपले स्मरण केले जाईल. मानवी जीवन हे नवीन आव्हाने स्विकारण्यासाठी आणि नवे काहीतरी शोधण्यासाठी आहे. त्यामुळे बदलांचा हसतमुखाने स्विकार करा. स्वत:ला छंदांमध्ये, वाचनात, कौटुंबिक आणि समाजकार्यात गुंतवा. दृष्टी आनंदी असेल, तर सृष्टी मोहक वाटते आणि प्रसन्नतेची वृष्टी होते.**विन्स्टन चर्चिल म्हणतात, आशावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी शोधते, तर निराशावादी व्यक्तिला प्रत्येक संधीत संकट दिसत असते.. प्रत्येक क्षण आपल्यासाठी काही ना काही घेऊन येतो. काहीवेळा दृष्टीकोन ही किरकोळ बाब वाटते. 'सकारात्मक दृष्टीकोन' हे फक्त सांगण्यापुरते आहे, असेही वाटते; परंतु हे तसे नाही. या दृष्टीकोनात जीवन घडविण्याची किंवा बिघडविण्याची क्षमता आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात,'जगात तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीही दु:खी करू शकत नाही. तेव्हा आनंदी रहा... यशासाठी मधला मार्ग नाही.*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *उंदीर कोंबडा आणि मांजर*एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, "आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment