✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20/02/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥घडामोडी⌛१९८७- मिझोरम व अरुणाचल या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला⌛१९८८- गीता सेठीने राष्ट्रीय बिलियर्ड स्पर्धा जिंकली 💥जन्म१९३६: माजी भारतीय फुटबॉल खेळाडू जर्नल सिंह १९५६: भारतीय चित्रपट अभिनेता अन्नू कपूर १९७३: भारतीय चित्रपट अभिनेते प्रियांशु चटर्जी 💥मृत्यू१९०५: विष्णुपंत छत्रे – भारतातील सर्कस उद्योगाचे जनक१९५०: बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू १९७४: के. नारायण काळे – नाट्यसमीक्षक १९९४: त्र्यं. कृ. टोपे – घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू १९९७: श्री. ग. माजगावकर – पत्रकार, ’माणूस’ साप्ताहिकाचे संपादक २००१: इंद्रजित गुप्ता – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते२०१२: डॉ. रत्‍नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच होणार वाढ. यावेळी महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढू शकतो.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी केली जाईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *टीसीएसमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना धोका नाही, पगारवाढही मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखेर औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील रंजना, प्रतिथा वाघिणी गुजरातला रवाना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संजय राऊतांच्या अडचणी पुन्हा वाढणार? मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तो दिवस दूर नाही, ज्या दिवशी लोक ड्रोनमध्ये बसून विमानतळावर जातील - नितीन गडकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दिल्ली: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील उर्वरित २ कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा, जयदेव उनाडकटचा संघात पुन्हा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिवजयंती**व्हिडीओ लिंक👇*https://youtu.be/cFWtCFBYWpE~~~~~~~~~~~~~~~~~ *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••कादंबरी - लक्ष्मीhttp://kathamaala.blogspot.com/2020/07/blog-post.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे. या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी इ.स. १९६२ साली युद्ध केले होते. इटानगर ही अरुणाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. अरुणाचलमध्ये शेजारच्या राज्यांप्रमाणे फुटीरवादी संघटनांचा प्रभाव नाही. आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य आज रोजी इ.स. १९८७ साली स्थापन झाले. भारतात सर्वात विरळ लोकसंख्या अरुणाचल प्रदेशाचीच आहे. तरीही या छोट्याशा राज्याचे भारतासाठी भूराजकीय महत्त्व आहे. मोनपा व मिजी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. अरुणाचलची साक्षरता ६६.९५ टक्के आहे. या राज्यात आदिवासींचे प्रमाण जास्त असल्याने भारतातल्या कमी साक्षर राज्यात या राज्याची गणना होते. भात, मका व नाचणी ही अरुणाचलमधील प्रमुख पिके आहेत.अरुणाचल हे अतुलनीय निसर्ग सौंदर्याने नटले असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे राज्य आहे.*संकलन *••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रात सध्या किती माळढोक पक्षी आहेत ?२) इलेक्ट्रिक वाहने, मोबाईल अशा उपकरणांच्या बॅटरी तयार करण्यासाठी कशाचा वापर करण्यात येतो ?३) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार कोण ठरला आहे ?४) संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस कोण आहेत ?५) १५०० एकराचे जंगल शाबूत ठेवण्यासाठी पेटून उठलेल्या मध्यप्रदेश राज्यातील महिलेचे नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) केवळ एक २) लिथियम ३) रोहीत शर्मा ४) अँटोनियो गुटेरेस ५) उजीयारो केवटीया, समनापुर, जि. डींडोरी*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डुमलवाड शंकर राजेन्ना, स.शि.   प्रा.शा.शिरूर ता.उमरी,जि.नांदेड.👤 अनाम मैनुद्दीन शेख, नांदेड👤 शिरीष गिरी, सहशिक्षक, धारूर👤 दिलीप लिंगमपल्ले, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना पाविजे सर्वही सूख जेथे। अति आदरें ठेविजे लक्ष तेथें॥ विविकें कुडी कल्पना पालटिजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥४०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपण स्वत:च्या मनाशी कधीतरी संवाद साधला पाहिजे. बाहेरच्यांशी आपण  खूप बोलतो. नको तेवढा वेळ घालवतो, पण त्यात 'स्वसंवाद' साधायला विसरतो. हा विसर आयुष्याच्या शेवटाला आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. आपण अनेक गोष्टी सहज करू शकलो असतो, क्षमता असूनही आपण एकही शाश्वत काम उभे करू शकलो नाही, ही जाणीव नैराश्यकडे नेणारी असते.*       *" तुका म्हणे होय मनासि संवाद,*           *आपुलाचि वाद, आपणाशी।"**असा वाद आता संपला आहे; कारण वाद होण्यासाठी मुळात संवाद व्हावा लागतो. त्यासाठी एकदा स्वत:त डोकावून पाहावे लागते. एकदातरी स्वत:ला कडकडून भेटायला हवे. आपले नेमके उलटे होते.*                           *हजारों मैंफिले हो,*                *लाखो मेले हो,*               *खुदसे ना मिलो,*             *तो बिलकुल अकेले हो ॥**हे असे एकटेपण कुणालाही, कधीही येता कामा नये. समाजात अनेकांना 'एकांत' आणि 'एकटेपणा' यातला फरक कळत नाही. एकांत साधना, अभ्यास या विषयाशी निगडीत आहे, तर एकटेपणा हा नकारात्मक आहे. एकांताचे अनुमान 'सुखावह' तर एकटेपणाचे 'भयावह' असतात....!*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या जगात कोणतीही वस्तू किंवा कोणताही जीव कायमस्वरुपी या जगात राहण्यासाठी किंवा टिकण्यासाठी आलेला  नाही. एखादी वस्तू चांगली आहे तोपर्यंत त्याचा वापर करतो आणि काम संपले की त्याला खराब झाली म्हणून अडगळीला टाकून देतो कारण त्याची किंमत शून्य होते. तसे मानवी जीवाचे नाही. मानवी जीवाचे वय वाढत जाते त्याबरोबरच मूल्यही (जगण्याचे महत्व) अधिकाधिक वाढत असते.जसजसे वय वाढत जाईल आणि तसे तसे अनुभवाने समृद्ध होत जाईल.जगण्याचे मूल्यही कळायला लागेल.पण त्या मिळालेल्या चांगल्या  अनुभवाचे पडसाद मागे राहणा-यावर पडले तर तुमच्या पश्चात ते अजरामरच राहणार आहेत.कारण आपणहीकधी ना कधी या जगातून निघूनच जाणार आहोत.मग आपण जाण्याचे दुःख बाळगायचे नाही तर आपण इतरांना काहीतरी चांगले देऊन गेलो याचे समाधान वाटून जीवन समर्पित करावे.यातच खरे जीवन जगण्याचे सार आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🌅जीवनाचे सार* *एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्त‍ पडत असे तर कधी पूर्ण दुष्काळ, कधी ऊन जास्त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्ही सर्वव्यापी प्रभू परमेश्वर असाल इतर सर्व गोष्टीतले तुम्हा‍ला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्हाला मी करतो की तुम्ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्या्त द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्यांच्या राशी कशा घालतो ते पहाच तुम्ही..'' देव हसला आणि म्हणाला,''तथास्तू , तुझ्या म्हणण्या प्रमाणे आज, आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला. शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्यासाठी गहू पेरले, जेव्हा त्याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्हा त्याने ऊन पाडले, जेव्हा त्याला पाणी द्यायचे होते तेव्हा त्याने पावसाचा वर्षाव केला. प्रचंड ऊन, गारा, पूर, सोसाट्याचा वारा याचा स्पर्शही कधी त्याने आपल्या् पीकांना होऊ दिला नाही. काळ निघून गेला आणि त्याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्हे् इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो. पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला. पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्हाच्या ओंब्यांमध्ये एकही दाणा नव्हाताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्हाचा दाणा भरला गेला नव्हता. थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय ओकलून रडू लागला. त्याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्हणाला,'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्छेेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्हणून पीक तसे येईल पण तसे होत नसते. त्या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्या वा-यातच पिक उभे राहते तेव्हालाच त्याच्यात बळ येते. प्रचंड उन्हातही त्याच्यात जगण्याची इच्छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्याला त्याची कुवत कळत नाही. सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्याच गोष्टीची किंमत राहत नाही. आव्हाने मिळाले नाही म्हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्हाच त्या पिकात जगण्याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तू हे कधीच होऊ दिले नाही म्ह्णून तुझे पीक हे पोकळ निघाले. सोन्याला सुद्धा चकाकी येण्या‍साठी आधी आगीतून जावे लागते तेव्हाच ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्हाच सोन्याचा उत्कृष्ट दागिना बनतो.'' आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.* *🧠थोडक्यात- जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्हाने नसतील तर मनुष्य अगदी खिळखिळा बनून राहतो.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment