✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14/02/2023💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~=========ஜ۩۞۩ஜ=========🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷=========ஜ۩۞۩ஜ=========       *व्हॅलेंटाईन डे*💥 ठळक घडामोडी :- १८८१: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना.१९२४: संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना.१९६३: अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.२०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.💥 जन्म :-१९१४: जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार १९१६: संजीवनी मराठे – कवयित्री१९२५: केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया १९३३: मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – अभिनेत्री१९५०: कपिल सिबल – वकील आणि केंद्रीय मंत्री१९५२: भारतीय जनता पार्टी च्या महिला राजनीतिज्ञ तसेच केंद्रात मंत्री राहिलेल्या सुषमा स्वराजमा स्वराज१९६०: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित निरंजनानंद सरस💥 मृत्यू :- १४०५: मंगोलियाचा राजा तैमूरलंग१९८०: भारतीय चित्रपट दिग्दर्शक मनहर रसकपूर यांचे निधन२००५: हिंदी साहित्यकार तसेच प्रसिद्ध लेखक विद्यानिवास मिश्र यांचे निधन२००७: मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्यामाचरण शुक्ल यांचे निधन.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9404277298=========ஜ۩۞۩ஜ=========   🌷 *आजच्या फ्रेश बातम्या*🌷=========ஜ۩۞۩ஜ=========1⃣ *बंगळुरु : आशियातील सर्वात मोठा Air Show, एअरो इंडिया 2023 ला पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात; जगाला दिसणार मेड इन इंडियाची ताकद*-----------------------------------------------------2⃣ *मुंबई : 28 तारखेला महाराष्ट्र एकीककरण समितीचे मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन*-----------------------------------------------------3⃣ *पुण्यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं जनआक्रोश आंदोलन.. १५ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा... परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकण्याचाही इशारा...*-----------------------------------------------------4⃣ *नाशिकच्या शिवजयंतीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, डीजेलाही बंदी, पोलिसांचं महत्वाचं आवाहन*-----------------------------------------------------5⃣ *घटती प्रवाशी संख्या लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांनंंतर आता पदवीधर, ITI, डिप्लोमा विद्यार्थ्यांनाही मेट्रो  तिकिट दरात सवलत. नागपूर मेट्रो प्रशासनाचा निर्णय.*-----------------------------------------------------6⃣ *कोल्हापूर : फेब्रुवारी मध्यापूर्वीच कोल्हापूर तापण्यास सुरुवात; पारा 35 अंशांवर*-----------------------------------------------------7⃣ *आयसीसीकडून जानेवारी महिन्यासाठीचा प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार भारतीय सलामीवीर शुभमन गिलला देण्यात आला*-----------------------------------------------------*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300=========ஜ۩۞۩ஜ========= 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*=========ஜ۩۞۩ஜ=========*🏆मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी साहित्य प्रदर्शन,नांदेड🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/RcFRyzSLghY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~=========ஜ۩۞۩ஜ=========         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*=========ஜ۩۞۩ஜ=========  *व्हॅलेंटाईन दिनानिमित्त प्रासंगिक लेख*जगाला प्रेम अर्पावे .....!वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.htmlआपले अभिप्राय जरूर द्यावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद*📱9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~=========ஜ۩۞۩ஜ=========    🌷🍃   *विशेष फ्रेश माहिती* 🌷🍃=========ஜ۩۞۩ஜ=========         *कवी संजीवनी मराठे*संजीवनी रामचंद्र मराठे ( १४ फेब्रुवारी,  इ.स. १९१६ पुणे, महाराष्ट्र - १ एप्रिल, इ.स. २०००:पुणे) या एक कवितागायनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी कवयित्री होत्या.संजीवनी मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता करावयास सुरुवात केली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या त्या जी.ए. (गृहीतागमा) व एम. ए. होत्या. आयुष्याच्या उत्तरार्धात संजीवनी मराठे आणि त्यांचे पती खानापूर-बेळगाव सोडून सांगलीस गेले. सांगलीत राममंदिराजवळच त्यांचा रामकृपा नावाचा बंगला होता. संजीवनीबाईंनी काही दिवस सांगलीच्या शाळेत शिक्षिकेचे काम केले. संजीवनी मराठे यांना मिनी, भारती, अंजू या तीन मुली आणि प्रताप नावाचा मुलगा होता. प्रताप हा वैमानिक होता. अंजूने लग्नानंतर पाठविलेली पत्रे संजीवनी मराठे यांनी संपादित करून प्रकाशित केली.महाराष्ट्र शासनाने ’बरं का गं आई’, आणि ’हसू बाई हसू’ या कवितासंग्रहांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.*संकलित माहिती*=========ஜ۩۞۩ஜ=========              *""फ्रेश सुविचार""*=========ஜ۩۞۩ஜ=========*" गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764=========ஜ۩۞۩ஜ=========            *आजची फ्रेश प्रश्नमंजुषा*=========ஜ۩۞۩ஜ=========१) नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल झालेल्या व्यक्तीचे नाव काय ?२) ट्रान्सजेंडर दाम्पत्याला अपत्यप्राप्ती होण्याची देशातील पहिली घटना कोणत्या राज्यात घडली ?३) ग्रामसभेची कार्यकारी समिति कोणती आहे ?४) भारत छोडो आंदोलनाचा ठराव कोणी मांडला ?५) महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय केव्हापासून पेपरलेस होणार आहेत ?*उत्तरे :-* १) रमेश बैस २) केरळ ३) ग्राम पंचायत ४) महात्मा गांधी ५) १ एप्रिल २०२३*संकलन - जैपाल भै. ठाकूर* जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया (९७६५९४३१४४)=========ஜ۩۞۩ஜ=========🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂=========ஜ۩۞۩ஜ=========👤 प्रा. डॉ. अभयकुमार दांडगे, उपसंपादक, दै. प्रजावाणी👤 सतीश कुरमे, सहशिक्षक, माहुर👤 धनराज जाधव, सहशिक्षक, वाशिम👤 विकास बडवे, सहशिक्षक👤 अभिनव भूमाजी मामीडवार👤 योगेश वाघ👤 रुचिता जाधव👤 शिवम चिलकेवार👤 ऋषिकेश उटलवार👤 चंद्रकांत गाडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ]*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*📱9423625769=========ஜ۩۞۩ஜ=========   *!!! @@ मनाचे श्लोक @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ=========असे हो जया अंतरी भाव जैसा । वसे हो तया अंतरी देव तैसा ॥ अनन्यास रक्षीतसे चापपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३५॥  *।। जय जय रघुवीर समर्थ ।।*=========ஜ۩۞۩ஜ=========🌟‼  *आजचा फ्रेश विचारधन* ‼🌟=========ஜ۩۞۩ஜ=========*महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वाकांक्षा यातील फरक जाणून घेण्याची गरज आहे. उत्तुंगतेचा ध्यास जरूर घ्यायला हवा; परंतु त्यामागे उदात्त विचार असायला हवेत. आपले आणि समाजाचे जीवन समृद्ध करण्याची कळकळ असावी. त्याऐवजी केवळ स्वार्थाचा आणि मूठभरांच्याच हिताचा विचार असेल, तर त्यामागची महत्वाकांक्षा हिंसक बनते. अतिमहत्वाकांक्षा नकारात्मक असून, आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरते. इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत. शेक्सपियरच्या नाटकातील नायक मॅकबेथही अतिमहत्वाकांक्षेचा शिकार आहे. स्काॅटलंडचा राजा डंकनच्या दरबारातील तो पराक्रमी उमराव. राजा होण्याची महत्वाकांक्षा त्याला असतेच; परंतु लेडी मॅकबेथ याबाबतच्या अतिमहत्वाकांक्षेने पछाडलेली असते. आपला नवरा राजा व्हावा म्हणून प्रसंगी ही दुष्ट बाई विद्यमान राजाचा खून करायलाही तयार होते.**एका लढाईत विजय मिळविल्याबद्दल सन्मान करण्यासाठी राजा मॅकबेथच्या घरी येतो. पती-पत्नी त्यांचे आदरातिथ्य करतात. दिलेल्या शयनगृहात राजा झोपी जातो. मॅकबेथ महत्वाकांक्षी होता; पण त्यासाठी तो कोणाचा खून करायला तयार नव्हता. मात्र उद्याच्या राजवैभवासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगून लेडी मॅकबेथ राजाचा खून करायला भाग पाडते. मॅकबेथला राजपद मिळते; परंतु त्यानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला, युद्धाला सामोरे जावे लागते. लेडी मॅकबेथ भ्रमिष्ट होऊन मरते आणि मॅकबेथलाही प्राणास मुकावे लागते. अतिमहत्वाकांक्षा विघातक असून -हासाला कारणीभूत ठरते.*    ••●💥‼ *रामकृष्णहरी* ‼💥●••     *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040=========ஜ۩۞۩ஜ=========      *🎯 आजचे फ्रेश विचारवेध......✍🏻*=========ஜ۩۞۩ஜ=========      आयुष्याची खरी सुरुवात तर तुमच्या वाडवडिलांच्या ख-या पुण्याईने सुरु झाली.जीवनाचा ' मध्य ' तर तुमच्या कर्तृत्वाने सिद्ध करायचा आहे.तो तुम्हाला चांगला करायचा आहे की,वाईट हे तुम्हालाच ठरवायचे आहे.कारण हे मात्र तुमच्या हातात आहे.यासाठी तुम्हाला कुणाच्या भरवशावर बसता येत नाही किंवा नशिबावर अवलंबून राहता येत नाही.म्हणून तुमच्या जीवनातला मध्यच महत्त्वाचा आहे.आणि शेवट मात्र आपल्या हाती नाही.भविष्यात केव्हा काय घडेल याचे काही ठामपणे सांगता येत नाही.म्हणून जे आज आणि आता तुमच्यासमोर आहे ते सत्य आहे ते स्वीकारा आणि त्याला कौशल्याने, धैर्याने आणि परिस्थितीनुरूप उत्तर द्यायला पुढे रहा.यातच तुमच्या जीवनाचे खरे सार आहे.*व्यंकटेश काटकर,नांदेड.*  संवाद..९४२१८३९५९०/            ८०८७९१७०६३.=========ஜ۩۞۩ஜ=========🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭=========ஜ۩۞۩ஜ=========        *चांगल्या कर्माचे फलीत*एका जंगलामध्ये *एक म्हतारी* आणि तिची नात राहत होती .आणि त्याच जंगलामध्ये *चार दरोडेखोर* लुटमार करण्यासाठी येत असंत .एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .ते चार दरोडेखोर जंगलामध्ये *आश्रयासाठी* सैरभैर पळु लागले .अचानक त्यांना म्हतारीची *झोपडी* दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला.म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता *पाप पुण्याचा विषय* निघाला.प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.शेवटी म्हतारीने *पैज लावली*. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे  *ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.*प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला.असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असतानातिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी *विजेचा कडकडाट* होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच *भस्मसात* झाले.*तात्पर्य :-**एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे* आजही चार पापी माणसं जगु शकतात. पण त्याने *साथ* सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.म्हणून *पुण्याचा वाटा* नेहमी घेत रहा.ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजनार.〰〰〰〰〰〰〰〰〰*📝   संकलन*  📝*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.**जि.प.प्रा.शा गोजेगाव**ता.हदगाव, जि. नांदेड*http://www.pramilasenkude.blogspot.in📱  9403046894▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment