✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01/03/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *जागतिक नागरी संरक्षण दिवस*💥 ठळक घडामोडी● १९०७- टाटा आर्यन अ‍ॅन्ड स्टील कंपनीची स्थापना● १८१८- सिंहगड किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.● १९१९- रॉलट अ‍ॅक्ट निषेधार्थ महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाला प्रारंभ केला.● १९५८- कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीस सुरुवात💥जन्म● १९१७: प्रसिद्ध हिंदी साहित्यिक करतार सिंह दुग्गल ● १९२२: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी ● १९५१: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ● १९६८: सलील अंकोला – क्रिकेटपटू● १९६८: भारतीय वेटलिफ्टर कुंजारानी देवी ● १९८३: भारतीय बॉक्सर मेरी कॉम 💥मृत्यू● १९९९: दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर● १९९४: निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई● १९९४- महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव दादा पाटील यांचे निधन● २००३: गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री● २०१७ - विनोदी लेखक तारक मेहता*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *MPSC ची गुणवत्ता यादी जाहीर, सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय! उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजारांवरील औषधांच्या किंमती निश्चित*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांची वाढ, मोबाईल मिळणार आणि पेन्शन योजना लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *100 कोटींचा कोविड घोटाळा प्रकरण; मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक, याविषयी खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक जिल्ह्यात नाफेडकडून कांदा खरेदी सुरु, दोन दिवसात 3 हजार क्विंटल कांद्याची खरेदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ओदिसामधील तीन जिल्ह्यात नऊ ठिकाणी सोन्याचे साठे सापडल्याची माहिती ओदिसा सरकारने दिली आहे. देवगढ, क्योंझर आणि मयूरभंज येथे सोन्याचे नऊ साठे सापडले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी आजपासून इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकत 2-0 अशी आघाडी घेतली आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆Class-7th English chapter 3.4 "Please don't read this poem"🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/kXnT2GYHNNU~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वसंतराव बंडूजी पाटील*(१३ नोव्हेंबर १९१७ - १ मार्च १९८९) महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री. वसंतदादांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. ते पदमाळे, जिल्हा सांगली येथील शेतकरी कुटुंबातील होते. वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई. दादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. १९३७ मध्ये वसंतदादांनी राजकारणात प्रवेश केला. १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश दिला. त्यात दादांनी भाग घेतला. त्यांना सहा महिन्यांची शिक्ष झाली. १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनातही ते सहभागी झाले. ब्रिटिश सरकारने पकड वॉरंट (अधिपत्र) काढून त्यांना पकडण्यासाठी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अखेर दादा पकडले गेले; दोन वर्षांची शिक्षा झाली; परंतु त्याच दिवशी ते तुरुंगातून पोलिसांच्या बंदुका घेऊन आपल्या काही सहकाऱ्यांसह पळून गेले. त्यांना पुन्हा पकडण्यात आले आणि एकूण तेरा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. १९४६ मध्ये त्यांची मुदतपूर्व मुक्तता झाली. १९५२ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. १९६७ पर्यंत ते आमदार होते. १९४८ मध्ये त्यांनी सांगलीला शेतकरी सहकारी साखर कारखाना काढला. त्यानंतर त्यांनी सहकारी तत्त्वावर सूत गिरण्या आणि तेल गिरण्या उभारल्या.वसंतदादा पाटील हे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (१९६५), राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंधाचे संचालक व अध्यक्ष (१९७०-७२) व साखर निर्यात मंडळाचे अध्यक्ष (१९७०-७१) होते. यांशिवाय राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आदी संस्थांचेही ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९६७). १९६९ साली काँग्रेसचे विभाजन झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईस काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम केले. दादा १९७१ मध्ये अमेरिका येथे भरलेल्या चौदाव्या आंतरराष्ट्रीय ऊस तज्ञांच्या परिषदेस भारतीय शिष्टमंडळाचे नेते म्हणून हजर राहिले. यापूर्वी तीन वेळा त्यांनी जागतिक प्रवास केला होता. त्या वेळचे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांनी आपल्या मंत्रिमंडळात दादांची पाटबंधारे मंत्री म्हणून नेमणूक केली. ते १९७२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. शंकरराव चव्हाणांच्या कारकीर्दीत वर्षभर पाटबंधारे मंत्री होते. पुढे त्यांचा मंत्रिमंडळात अंतर्भाव झाला नाही. त्यानंतर त्यांनी काही दिवस राजकारणातून संन्यास घेतला.महाराष्ट्रात मार्च १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत ४८ पैकी वीसच काँग्रेस सदस्य निवडून आले. म्हणून त्यांनी पुन्हा राजकारणात प्रवेश केला. १७ एप्रिल १९७७ रोजी दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मार्च १९७८ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर दादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांचे संयुक्त मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाले. तथापि हे संयुक्त मंत्रिमंडळ समाधानकारक कार्य करू शकत नाही, या कारणास्तव अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीने वसंतदादांना मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला (१७ जुलै १९७८).श्रीमती शालिनीबाई या त्यांच्या सुविद्य पत्नी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान स्थापन केले असून या प्रतिष्ठानाद्वारे महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात, सुसज्ज रुग्णालये उभारण्याची योजना आहे. त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन.*संकलन : नासा येवतीकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धनाचा लोभ हा माणुसकीला लागलेला कलंक आहे.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नुकतेच निधन झालेले देविसिंह शेखावत कोण होते ?२) कोणत्या वर्षी शिवाजी महाराज 'छत्रपती' झाले ?३) दिल्लीच्या अगोदर भारताची राजधानी कोणती होती ?४) जीवनसत्त्व ब - ९ चे रासायनिक नाव काय आहे ?५) तुपाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते ?*उत्तरे :-* १) माजी आमदार तथा माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती २) सन १६७४ ३) कोलकाता ४) फॉलीक अँसिड ५) भारत*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 आशा तेलंगे, मुंबई👤 साहेबराव बोने, देगलुर👤 अमोल अलगुडे, उमरगा👤 राहुल मॅडमवार👤 साहेबराव गुंजाळ👤 नरेश सुरकूटलावार👤 संजय कदम👤 संतोष चिद्रावार👤 प्रभाकर गोरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा। सदा रामनामें वदे नित्य साचा॥ स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कडू शब्दांनी माणसं दुरावतात तर मधुर शब्दांनी जोडली जातात. त्यामुळे शब्द मोजून-मापून-तोलून वापरण्याचा संदेश संत देतात. शब्द हे शस्त्र असल्याचे सांगतात. त्याचा आपण गांभीर्याने विचार करून ते आचरणात आणावे. 'शब्द आणि ते ज्या वाणीतून बाहेर पडतात ती वाणी' हे अमृत असल्याचे आपण आपल्याला रोज समजून सांगू, तेव्हाच उत्कर्ष शक्य आहे.  ओजस्वी, प्रासादिकता, मांगल्य या शब्द आणि जिव्हाशक्तीशी निगडीत बाबी जगण्याला बळ देतात. आपण चांगले बोलल्याने समोरच्याच्या चेह-यावर विलासणारा आनंद समाधान देतो. काम भले एक दिवस उशीरा होईल; पण जे होईल ते पुन्हा कधी डोके वर काढणार नाही. त्यामुळे संवादाला सुसंवादाच्या पातळीवर नेण्याचे कसब आपल्याला साधायला हवे.**माणसे येतात आणि जातात लक्षात राहतो तो फक्त त्याचा स्वभाव. गेल्यानंतर "फार चांगला माणूस होता" हे एक वाक्य आयुष्यभराच्या कामाचा विजय असतो. शब्द मागे उरतात ते कसे होते याची चर्चा होते आणि ती फक्त व्यक्तीच्या बोलण्यावर अवलंबून असते. त्यामुळे चांगले वागुया, चांगले बोलुया. त्यासाठी अंत:करण शुद्ध हवे. क्लास लावून अमृततुल्य बोलता येत नाही. तिथे जाऊन फार तर पोपट होता येईल. आपल्याला पोपट नव्हे तर कोकिळ होता यायला हवे. असे होणे म्हणजे उन्नती.*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याप्रमाणे पाणी पिल्यामुळे तहान भागविता येते.अन्न सेवन केल्यामुळे भूक भागविता येते.त्याचप्रमाणे चांगल्या ग्रंथांच्या आणि चांगल्या पुस्तकांच्या सानिध्यात राहिल्यामुळे ज्ञानाचीही भूक भागविता येते.या ज्ञानाच्या भूकेमुळे माणसाला चांगले जीवन जगण्याची आशा पल्लवीत होते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याची खरी किंमत*एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला आयुष्याची खरी  किंमत काय असते हो? आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले  ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली .तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून  म्हणाला -.या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो. नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला, वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली- मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला -या खड्यासाठी मी तुम्हाला  दश लक्ष रुपये देऊ शकतो. नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल  त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला -अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार, आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला, त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती,हेतू आणि कुवती नुसारच करणार. त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा.इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका, कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत.*तात्पर्य*-तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे. आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment