✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/11/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १५२० - फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला. 💥 जन्म :- १८५३ - हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री. १९११ - वाक्लाव रेंच, चेक कवी. १९५० - एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता. १९५० - रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. 💥 मृत्यू :- १८९० - महात्मा जोतीराव फुले, भारतीय समाजसुधारक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *इस्लामाबाद - सार्क संमेलनात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान देणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण, पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्राचा दावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुख्यमंत्र्यांच्या भेटीशिवाय मैदान सोडणार नाही; रिफायनरीविरोधात नाणारवासीय आक्रमक* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली - जी-20 देशांच्या संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून जाणार अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी रणबीर सिंह* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : राज्यात सध्या 50 टक्के आरक्षण आहे, 52 टक्के नाही, त्यामुळे एसईबीसीचं 2 टक्के आरक्षण जिवंत आहे - मुख्यमंत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बाॅलिवूडमधील ज्येष्ठ गायक मोहम्मद अझिझ यांचं निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई - भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने प्रशिक्षक रमेश पोवार आणि सीओए सदस्य डायना एडलजी यांच्यावर केले गंभीर आरोप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकदा तरी अनुभववी शिक्षणाची वारी* https://nasayeotikar.blogspot.com/2018/11/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जोतीराव गोविंदराव फुले मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना १८८८ या साली मिळाली. शेतकर्‍यांचे आसूड हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्‍चय केला. त्यांनी १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत १८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ते आपल्या भूमिकेवर ठाम असत. जोतीरावांनी पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) कॅमेरूनची राजधानी कोणती?* याओंडे *२) कुवेतमध्ये कोणती राज्यपद्धती अस्तित्वात आहे?* राजेशाही *३) प्रवरा नदीच्या प्रवाहाची लांबी किती?* १५० कि.मी. *४) सागरेश्‍वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?* हरणांसाठी *५) आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन संघटनेची स्थापना कधी झाली?* १९६५ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  राम चव्हाण  ●  भैया कांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रतिष्ठा* आपल्या पेक्षा आपल्या प्रतिष्ठेच वय जास्त असतं आपणच आपली प्रतिष्ठा सांभाळने रास्त असतं एका दिवसात कोणालाच प्रतिष्ठा मिळत नसते छोट्याशा चुकीनेही ती दूरदूर पळत असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसाने माणसांशी, सर्व प्राणीमात्रांशी आणि निसर्गाशी माणसासारखं वागावं ही आपल्या धर्माची शिकवण आहे. सृष्टीतलं चैतन्य म्हणजे ईश्वर ! सर्वसामान्य माणसाला देवाची उपासना करणं सोपं जाईल म्हणून सगुण साकार म्हणजेच मूर्तीची पूजा सुरू झाली. मंदिरातल्या मुर्तीचं पावित्र्य जपायचं असेल तर स्त्री-पुरूष कोणालाच गाभा-यात प्रवेश द्यायचा नाही, मुर्तीला स्पर्श करू द्यायचा नाही हे समजण्यासारखे आहे. मंदिरातल्या वातावरणाचं पावित्र्य राखलं जावं, कुठले कपडे घालून देवदर्शनाला मंदिरात जावं हे भान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. कालबाह्य रूढी-परंपरा सोडून दिल्या तरच पुढच्या पिढीला हा धर्म, ही संस्कृती आपली वाटेल.* *माणिक वर्मा यांनी गायलेलं, ' क्षणभर उघड नयन देवा !' हे गीत आठवतं. या रचनेत कवी देवाला डोळे उघडायला सांगत नाही, तर देवदर्शनासाठी आलेल्या एका अंध व्यक्तिसाठी ही प्रार्थना करीत आहे. त्या अंध व्यक्तिचे क्षणभर तरी डोळे उघडून त्याला तुझं दर्शन दे, अशी प्रार्थना कविराज करत आहे. स्त्रियांवर होणारे आत्याचार, अन्याय थांबव.. ते करणारांचे डोळे क्षणभर तरी उघड, अशी प्रार्थना नवरात्राच्या निमित्ताने दुर्गादेवीपाशी करावीशी वाटते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर माया पापिनी, फंद ले बैठी हाट । सब जग तो फंदे परा, गया कबीरा काट । सारांश महात्मा कबीर म्हणतात की, माया मोहात पाडणारी पापिनी आहे. माया माणसाला अलिप्त राहून कार्य करू देत नाही. एखाद्या कार्यात स्वतःला पूर्ण रुपाने झोकून देवून कार्य करू पाहताना मायेचे पाश माणसाला भ्रमित करून टाकतात. मायेची कित्येक रूपं आपल्या अवती-भवती वावरत असतात. पारध्यानं सावज आपल्या जाळ्यात अडकलं पाहिजे म्हणून न दिसणारे परंतु षड्विकारांनी युक्त अशी सावजाला हलूच देत नाही ती ! मायेजवळ मोहिनी अस्त्र असतं. कुणाला सत्ता, संपत्ती श्रीमंतीचा मोह, कुणाला विषय वासनेचा मोह तर कुणाला सौंदर्याचा मोह मोहित करीत असतो. मायेकडून एकदा का हे मोहिणीअस्त्र टाकल्या गेलं की माणसं स्वतःच्या मान-मर्यादा विसरून जातात. मायेहातचं बाहुलं बणून राहातात. सज्जन ,साधू मात्र अशा माया मोहावर विजय मिळवून असतात. ते मायेला , मोहाला जराही भुलत नाहीत. कधीच त्यांनी माया मोहाचे पाश तोडून टाकलेले असतात, राजपुत्र म्हणून वावरताना दुःखाची पुसटशी छायाही कधी त्याला स्पर्श केली नाही. मात्र हाच वैभवात वाढलेला सुखवस्तू राजपुत्र नगरातून फेरफटका मारताना माणसाचं दुःखमय जगणं पाहातो. माणसांचं जगणं दुःखमय असलं तरीही माणसांचं पुन्हा-पुन्हा त्यातंच गुरफटणं ! या सार्‍याचं त्या राजपुत्राकडून सखोल चिंतन होतं आणि दुःखाच्या निर्मितीची कारणं शोधणं सुरू होतं. दुःखाचं कारण लालसा, मोहात सापडतं ! सारे मोह मायेचे पाश तटातट गळून पडतात. जगाप्रति दयाभाव दाटून येतो. आणि राजसुखाचा त्याग करून सिद्ध होतात महाकारूणी तथागत गौतम बुद्ध ! संपूर्ण जगाला मानवता धर्माची शिकवण देतात व लोककल्याणाचा मार्ग दाखवतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण स्वत: केलेल्या कृतीतून मिळालेला अनुभव हा आपल्यासाठी खूप मोलाचा असतो.त्यातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते.आपण करत असलेल्या कृतीसाठी लागणारे साहित्य, कौशल्य, एकाग्रता, पूर्वानुभव आणि समयसुचकता या गोष्टी शिकायला व अनुभवायला मिळतात.हे आपल्याला दुस-याच्या करणा-या कृतीतून मिळत नाही.आपल्याला जो आनंद आणि कृती केल्याचे समाधान मिळते ते इतरांच्या कृतीतून मिळत नाही.यातून अजून एक आपल्याला स्वावलंबन कसे असते हेदेखील शिकायला मिळते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बोडक्या डोक्याचा राजा* कोणे एकेकाळी सोनापूर राज्यावर एक मध्यम वयाचा राजा राज्य करत होता. त्याच्या दोन राण्या होत्या. थोरली राणी राजाप्रमाणेच वृद्ध होती तर धाकटी राणी अगदी तरुण होती. दोन्ही राण्यांचे राजावर अतिशय प्रेम होते. काळ उलटत गेला तसतसे राजाचे केस पांढरे होऊ लागले. थोरल्या राणीला त्याबद्दल काहीच वाटत नव्हते पण धाकटी राणी मात्र अस्वस्थ झाली. तिचा पती वृद्ध दिसणे तिला पसंत नव्हते. त्यामुळे जेव्हा-जेव्हा ती राजाबरोबर असे तेव्हा राजाचे केस विंचरण्याच्या बहाण्याने ती राजाचे पांढरे केस उपटत असे. या उलट थोरल्या राणीला राजाचे केस पांढरे होणे सुखावत होते. ती राजापेक्षा जास्त वृद्ध दिसू इच्छित नव्हती. त्यामुळे ती जेव्हा जेव्हा राजाबरोबर असे तेव्हा राजाचे केस विंचरताना ती राजाच्या काळ्या केसांना उपटून टाकत असे. आता हे सांगायला नको की, थोड्या कालावधीनंतर त्या बिचार्‍या राजाने आपल्या डोक्यावरील सर्व केस गमावले व तो चक्क बोडक्या डोक्याचा राजा बनला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment