✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/11/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८३८ - द टाइम्स ऑफ इंडिया ची द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने स्थापना २००७ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांची हकालपट्टी करून देशात आणीबाणी लागू केली १९८८ : श्रीलंकेतून आलेल्या तमिळ भाडोत्री सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले १९९८ : पूर्वी धंदेवाईक पैलवान असलेल्या जेसी व्हेंचुराची मिनेसोटाच्या राज्यपालपदी निवड 💥 जन्म :- १६१८ : औरंगजेब, मोगल सम्राट १९३३ : अमर्त्य सेन, भारतीय अर्थतज्ञ १९३३ : मायकेल डुकाकिस, अमेरिकन राजकारणी १९५१ : अझमत राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू 💥 मृत्यू :- १९७० - पीटर दुसरा, युगोस्लाव्हियाचा राजा १९९६ - ज्यॉँ-बेडेल बोकासा, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष २००४ - शेख झायेद बिन सुल्तान अल नहायान, संयुक्त अरब अमिरातीचा राष्ट्राध्यक्ष . *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *व्यापाऱ्यांना एका तासात 1 कोटींचं कर्ज मिळणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना ही नव्या कर्ज योजनेची केली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *एक पैसाही न देता 'शिक्षकांची भरती' होणार, सरकार 4,738 जागा भरणार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची मोठी घोषणा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *12 दिवसांपासून सुरू असलेला ओला, उबर चालकांचा संप अखेर मागे; परिवहन मंत्री दिवाकर रावतें सोबतच्या बैठकीत तोडगा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. उद्धव भोसलेंची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - DSK प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रकडून मराठे व गुप्ता यांना अधिकार बहाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सोलापूर - माळशिरस नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी मनीषा इंगळे तर उपाध्यक्षपदी डाॅ. मारुती पाटील यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसी क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी तर हिटमॅन रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/yX3WyZ2YwR Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रतिलिपी दिवाळी अंक प्रकाशित झालय त्यातील माझी प्रकाशित......! *"कथा - भाऊबीज"* वाचा प्रतिलिपि वर https://marathi.pratilipi.com/story/qhzRZfB59oqg?utm_source=android&utm_campaign=content_share अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अमर्त्य सेन* अर्थशास्त्रज्ञ अर्मत्य सेन यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३३ रोजी झाला. त्यांना अतिशय प्रतिष्ठेचा नोबेल सन्मान मिळालेला आहे. ते हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय जादवपूर विद्यापीठ आणि दिल्लीच्या स्कुल आँफ एकाँनाँमिक्स तसेच आँक्सफोर्ड विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. एमआयटी, स्टेनफोर्ड, बर्कले व काँरनेल विद्यापीठांमध्ये त्यांनी सेवा दिली आहे. त्यांचा जन्म कोलकातामध्ये झाला. शांतीनिकेतनमध्ये शिक्षण पुर्ण झाल्यावर त्यांनी केंब्रिजच्या ट्ििनटी काँलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी काही काळ म्यानमारच्या मंडाले येथेही घालवला आहे. त्यांनी चाळीस वर्षात ३0 च्यावर पुस्तके लिहिली आहेत. १९७३ ते ७१ दरम्यान ते दिल्लीच्या स्कुल आँफ एकाँनाँमिक्समध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यावेळी माजी पंतप्रधान डाँ. मनमोहन सिंग यांच्यासह अनेक विद्वान अर्थशास्त्रज्ञ त्यांचे सहकारी होते. अर्थशास्त्रातील संशोधक म्हणून जादवपूर विद्यापीठातून त्यांची कारकिर्द घडली. अर्थशास्त्रातील संशोधनासाठी त्यांना १९९८ मध्ये सर्वोच्च असा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर केंद्र सरकारनेही त्यांना १९९९ मध्ये देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'डेक्कन हेरॉल्ड' या वर्तमानपत्राचे प्रकाशन स्थळ कोणते ?* बेंगळुरू *२) डोळ्यांच्या बाबतीत महत्त्वाचे जीवनसत्त्व कोणते ?* अ जीवनसत्त्व *३) पेशीकेंद्राभोवती दोर्‍यासारखा सूक्ष्मतम असणार्‍या भागाला काय म्हणतात ?* रंगपरमाणू *४) भूपृष्ठाची मोजणी, वक्रता कोन मोजणारे उपकरण कोणते ?* थिओडोलाइट *५) अर्थशास्त्रातील संशोधनासाठी १९९८ मध्ये नोबेल पुरस्कार मिळविणारे भारतीय कोण ?* अमर्त्य सेन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  एस पी जाधव ●  संदीप पगारे ●  मयूर महाजन *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सवय* गुलामीची सवय लागली की माणूस स्वतःची ताकत विसरतो याच्यात ताकतच नाही असा सर्वात गैरसमज पसरतो सवयीचे गुलाम न होता स्वतःच्या ताकतीची जाणीव व्हावी आपली सामर्थ्य आपण आपल्यात डोकावून पहावी शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत कबीर यांनी मानवी जगण्यातल्या खोटेपणावर प्रहार करीत ख-या भक्तीची जाणीव आपल्या रचनांमधून करून दिली. त्या रचना फारच दिलासा देणा-या आहेत. कुणाचीही वेदना ही आपली सहवेदना झाली पाहिजे यावर भर देत संतानी जो विचार मांडला तो अमूल्य जीवनाचा विचार आहे. गुरूस्वरूप असणा-या संताबद्दल कबीर म्हणतात....* *संगत संतनकी कर ले।* *जनमका सार्थक कछु कर ले।* *उत्तम नरदेह पाया प्राणी इसका* *हित कछु कर ले ॥* *या सांगण्यातून कबीरांनी जीवनाचे सार्थक कशात आहे, हेच सांगितले. त्या सार्थकतेच्या पाठीमागे आपण केव्हा आणि कधी जाणार आहेत, याचा विचार जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर करायला हवा. संत हे कृपादृष्टी करणारे असल्याने त्यांच्याकडून कधीही कठोर वागणूक मिळणे अशक्य आहे. त्यांनी दाखविलेला मार्ग ही प्रकाशवाट असते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 51* कबीर संगी साधु का, दल आया भरपूर । इन्द्रिन को तब बाँधीया, या तन किया धर । अर्थ : खर्‍या संतांच्या संगतीने माणसाच्या वर्तनात बदल होतो. संत संगतीमुळे मानवाला कल्याणकारी मार्ग सापडतो. संत द्वेष, माया, मोह ,विकार, वासना यापासून अलिप्त राहतात. संताचे ठायी विचार , विवेक, वैराग्य, दया, क्षमा, समता , निरामयता इ सद्गुणांची खाणंच असते. त्यांच्या कृपा कटाक्षाने सुद्धा काळीज फुटेतो धावणार्‍याला शांती मिळते व तो समाधानाच्या मार्गावर येतो. विज्ञानाचा पदवीधर असणार्‍या नरेंद्राच्या मस्तकी गुरू रामकृष्ण परमहंसांचा स्यर्श झाला. मनाची चंचलता नाहीशी होवून नरेंद्र अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणारा पहिला तत्ववेत्ता ठरला. अध्यात्म व विज्ञानाने एकमेकांच्या हातात हात घेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मानवतेला विकासाची जोड मिळेल व विज्ञानाच्या बुद्धि प्रामान्यतेला सहृदयता मिळेल. हे संपूर्ण जगाला सांगणारा तो विज्ञाननिष्ठ संन्यासी 'स्वामी विवेकानंद' होतो . किती मोठी अद्भूत शक्ती संचरत असते, खर्‍या साधूंच्या ठायी ! खरे साधू भौतिक सुखांच्या सान्निध्यात वावरूनही त्यांची कधीच आस धरीत नाहीत. संन्यासी वृत्तीनं जगताना इंद्रीयांच्या अधिन असणार्‍या मनालाच हे संन्यस्त जिंकून घेतात. मनाला विकारी न होवू देता विवेकपूर्ण जगत निरामयतेचा अंगीकार करून हे दिव्यत्वानं जगालाच भारून टाकतात. त्यांचं क्षणभराचं सान्निध्यही माणसाला दिव्य दृष्टी बहाल करून जातं. खर्‍या संत, सज्जनाच्या सहवासाने जीवनाला मानवतेची जोड मिळते. माणूस विकारमुक्त होऊन विवेकानं जगायला लागतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्या रेखाटलेल्या चित्रात कल्पनेने रंग देऊन चित्र रंगवून पूर्ण करणे सोपे असते, परंतु जीवनाच्या चौकटीत आखलेल्या चित्रात रंग देणे फार कठीण असते.त्यामध्ये जीवनात प्रसंगानुरूप येणारे वेगवेगळे सुखाचे, दु:खाचे,आनंदाचे,विरहाचे,नात्यांचे, जीवन व्यवहाराचे अनेक रंग कसे भरावे याचे कल्पक ज्ञान असणे आवश्यक आहे आणि वास्तव जीवनात ते साकारणे त्याहीपेक्षा जास्त अवघड जाते.कधी कधी आयुष्य संपते तरीही जीवनाच्या चित्रात रंग पूर्ण देणे होत नाही.जो कोणी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या कौशल्याने रंगवण्याचे काम विशिष्ट कलेने करतो तेव्हा त्याच्या जीवनाचे आदर्श चित्र रंगवतो आणि त्या रंगवलेल्या चित्रांचे इतर लोक अनुकरण करतात नि जीवनात एक वेगळा आनंद घ्यायला लागतात. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 📚🎊🎨🎊📚🎨🎊📚🎊 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वर्तणूक - Behavior* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दानधर्म* कानपूरमध्‍य़े गंगेच्‍या काठी बसून एक भिकारी भीक मागत होता. भिकेत त्‍याला जे मिळेल ते त्‍यातून तो आपला उदरनिर्वाह चालवित होता. त्‍याच्‍या हातात एक कटोरा असायचा. त्‍याला तो जाणा-या येणा-याच्‍या पुढे करायचा. ज्‍याला त्‍यात काही टाकावयाचे असेल ते टाकत होता. परंतु तो भिकारी तोंडाने काही मागायचा नाही. अन्‍य भिका-याप्रमाणे तो दीनवाणा होत नसे. एके दिवशी तिकडून एक श्रीमंत माणूस जात होता. भिका-याने पाहिले, श्रीमंताच्‍या अंगावर अत्‍यंत भारी कपडे होते, गळ्यात आणि अंगावर सोन्‍याचे दागिने चमकत होते. उंची राहणी ही त्‍याच्‍या वर्तनातून दिसून येत होती. श्रीमंत वाटतो म्‍हणून भिका-याने त्‍याच्‍याकडे कटोरा पुढे केला, ते पाहून त्‍या श्रीमंताच्‍या चेह-यावर तिरस्‍कार उमटला. त्‍याने खिशातून एक रूपायाचे नाणे काढले व त्‍या भिका-याकडे फेकले व छद्मी हसला. तो पुढे निघणार इतक्‍यात भिकारी जागेवरून उठला. त्‍याने त्‍या श्रीमंताचे उद्धट वर्तन व गरीबांसाठी असलेले तिरस्‍करणीय भाव पाहून ते रूपायाचे नाणे श्रीमंताकडे परत फेकले व म्‍हणाला,’’ घे सांभाळ तुझी दौलत, मला तुझ्यासारख्‍या गरीबाचा पैसा नको, ज्‍या दानामध्‍ये तिरस्‍काराचा भाव आहे असे दान स्‍वीकार करू नये असे मला सांगण्‍यात आले आहे. दान करतानासुद्धा शुद्ध मनाने, चांगल्‍या भावाने दान करावे जेणे करून घेणा-याला व देणा-याला समाधान लाभते.परमेश्‍वराने माणूस बनविताना जर काही फरक केला नाही तर तू तिरस्‍कार करून परमेश्‍वराचा अपमान करतो आहेस हे लक्षात ठेव. ’’ हे ऐकताच श्रीमंताला आपली चूक लक्षात आली. त्‍याने तात्‍काळ भिका-याची क्षमा मागितली. तात्‍पर्य :- दान सत्‍पात्री, प्रेमपूर्वक व नि:स्‍वार्थ भावनेने केल्‍यास त्‍याचे समाधान मिळते./ जगात सर्वजण समान आहेत. श्रीमंती आज आहे तर उद्या श्रीमंती नसेल याची जाणीव ठेवून वागले पाहिजे.माणसाने मनोभावे निस्वार्थीपणे दानधर्म करावा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment