✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/11/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९१४ : पहिले महायुद्ध  रशियाने ऑट्टोमन साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले  १९७४ : सोलमध्ये नाइटक्लबला लागलेल्या आगीत ७४ ठार  २००० : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (चित्रीत) पहिले रहिवासी पोचले 💥 जन्म :- १७९५ - जेम्स पोक, अमेरिकेचा अकरावा राष्ट्राध्यक्ष १८६५ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष १९६५ - शाहरुख खान, भारतीय अभिनेता 💥 मृत्यू :- १९५० - जॉर्ज बर्नार्ड शॉ, आयरिश लेखक १२८५ : पीटर तिसरा, अरागॉनचा राजा  १३२७ : जेम्स दुसरा, अरागॉनचा राजा  १९३५ : जेम्स कॅमेरोन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *धुळे व अहमदनगर महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले; 9 डिसेंबरला मतदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबईः हिवाळी अधिवेशन 19 ते 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार, अधिवेशनाचं कामकाज 9 दिवस चालणार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *आज घडीला निवडणुका झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील भाजपाला 300 जागा मिळण्याची शक्यता एबीपी न्यूज आणि सी - व्होटरच्या सर्व्हेत वर्तवण्यात आली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्य सरकारने 31 ऑक्टोबर रोजी 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्यानंतर, काल 250 मंडळे दुष्काळ यादीत घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी जमा झाल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवोदितांना खेळाडूपेक्षा माणूस म्हणून घडवायचे आहे ‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमी’ च्या शुभारंभी सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आपले मत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *तिरुवनंतपुरम, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर 9 विकेट्स राखून मिळविला दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 2-1 अशी खिशात टाकली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/MXN8y95 Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रतिलिपी दिवाळी अंक प्रकाशित झालय त्यातील माझी प्रकाशित......! *"कथा - वेळ नाही मला"* वाचा प्रतिलिपि वर https://marathi.pratilipi.com/story/GZ8q7b3fE2Uk?utm_source=android&utm_campaign=content_share अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *थिमक्का* दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिमक्काने लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दुतर्फा 4 कि.मी.पर्यंत चक्क 284 वडाची झाडं लावली अन त्या झाडांवरच तिने मुलांसारखं प्रेम केलं. त्या झाडांना वर्षानुवर्षे रोज पाणी घालून वाढवलं अन आज त्या झाडांचं रूपांतर डेरेदार वृक्षामध्ये झालंय. थिमक्काच्या त्या नेत्रदीपक कार्याची दखल तिकडे अमेरिकेत घेतली गेलीय आणि पर्यावरणावर कार्य करत असलेल्या एका संस्थेचे नामकरण "थिमक्का रिसोर्सेस फॉर एनवायरनमेंट एज्युकेशन" असं करण्यात आलंय. प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. तसं होत नाही म्हणून थिमक्का सारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण अजूनही समतोल राखून आहे. ज्या दिवशी असे लोक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतील तेव्हा पृथ्वीचा विनाश अटळ असेल. म्हणूनच माझं सर्वाना कळकळीचं आवाहन आहे तुम्हाला जर शक्य असेल तर आपल्या परिसरात एक तरी झाड अवश्य लावा अन त्याचा सांभाळ करा. थिमक्का जर 284 वडाची झाडं लावून वाढवू शकते तर तुम्ही एक तरी झाड नक्कीच लावून वाढवू शकता. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून, वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) देशात डाळींचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते ?*  मध्यप्रदेश *२) पश्‍चिम घाटात किती किलोमीटर लांब पर्वत आहे ?* १७०० किमी *३) 'बॉर्न अगेन ऑन द माउंटन' पुस्तकाचे लेखक कोण ?* अरुणमा सिन्हा *४) धातुशास्त्रावर संशोधन करणारी झारखंडमधील संस्था कोठे आहे ?* जमशेदपूर *५) देशातील पहिले अणुशक्ती केंद्र कोठे उभारण्यात आले ?* तारापूर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  शंकरराव कामिनवार, धर्माबाद ●  मारोती बोईनवाड ●  गोविंद देशमुख ●  छाया पुयड ●  महेश धुळेकर ●  प्रवीण शिंदे ●  प्रणित जैस्वाल ●  महेश दुधाळकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विचार* नकारात्मक विचार विनाशाचे कारण आहे सतत नकारात्मकता हे काय धोरण आहे जसा विचार करता तसाच चेह-यावर दिसेल सकारात्मकता नाहीच तर मनात कुठून घुसेल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत कबीर म्हणतात..."बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलीया कोय, जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोय." 'आदर्श व्यक्तिमत्व' एका दिवसात बनू शकत नाही. या जगात वाईटाचा शोध घेतला तर सर्वात वाईट आपण स्वत:च सापडतो.* *'शिल्पकार' जसा एखादे शिल्प घडविताना, त्यातील नकोसा भाग काढतो व हवासा भाग ठेवून एक देखणे शिल्प तयार करतो. तद्वतच आपल्यातील दोष शोधून,ते काढून टाकून एक 'यशस्वी व्यक्तिमत्व' बनण्याचा 'संकल्प' हिच खरी 'घटस्थापना.' हि विधायक 'घटस्थापना' झाली कि आपोआपच ह्रदयात 'मानवतेची प्रतिष्ठापना' झालीच म्हणून समजा.* •• ● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 50* जाति न पुछो साधु की पुछ लिजिए ग्यान । मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान । अर्थ महात्मा कबीर ज्ञानविषयक विवेचनात सांगतात की, विद्वान जाती धर्म किवा कुळावरून ठरवू नये किवा त्याची जात, धर्म, कुळ विचारू नये. तलवारीचं श्रेष्ठत्त्व तिच्या धारेवरून ठरत असतं. तलवार ठेवण्यासाठी कोणतं म्यान वापरलं जातं. ते फार किमती आहे का? हे फार महत्वाचं नसतं. तलवारीला चमकण्यासाठी बाहेर काढावं लागतं. म्यान रिकामंच पडून राहातं. लोकबोलीत एक म्हण आहे. नदीचं मुळ आन ऋषीचं कुळ विचारू नये. किती विचारपूर्वक ही म्हण जपलीय बरं आपल्या पुर्वजांनी ! रामायणाचा रचियेता पूर्वायुष्यात वाटमारी करणारा लुटारू म्हणून हिणवल्या जायचा. एखादा प्रसंग जीवनात घडून जातो अन सुरू होतं जीवनाचं आरपार चिंतन. पार धुवून जातो लुटारूपणाचा कलंक. प्रकटला जीवन अन नात्यांच्या आदर्शत्वाची अनुभूती देत तत्वचिंतक वाल्मिकी . वेळेचा सदुपयोग करीत स्वतःला सदैव वाचन चिंतनात गुंतवून वर्षानुवर्ष गुलामीत खितपत पडलेल्या माणसांना स्वाभिमानाची जाणीव करून देणारा मानव मुक्तीचा एल्गार ही एक क्रांतीच होती. जीवनोद्धाराचा शिक्षण हाच महामार्ग सांगणारे प्रज्ञासूर्य डाॅ.भीमराव आंबेडकर जगाच्या औत्सुक्याचा विषय ठरणे ही जाती ,धर्म किवा कुळाची किमया नव्हती. तर ती विद्वतेची किमया होती. तलवारीला पाहाताना म्यानाला काढून टाकावंच लागतं तसं जातीचंही आहे. विद्वानाची उंची त्याच्या विद्वत्तेवरून पहावी लागते, जातीवरून नव्हे ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण एखाद्यावेळी अनवाणी पायाने पायी जाताना तळपायाला खडा रुतला तर डोळ्यांत टचकन पाणी येते आणि असह्य वेदना होतात.काही काळ आपण झालेले दु:ख खूप सहन करतो आणि पुढे चालायला लागतो पण मनात खडा टोचल्याचे शल्य राहतेच.पण तोच खडा दुस-याच्या पायाला टोचला तर त्याला आपण खाली पाहून चालू नये का असा सल्ला देतो.जो त्रास आपल्याला झाला आहे तो त्रास इतरांना होऊ नये असे ज्यांना मनापासून वाटते ते दुस-या चे कधीच वाईट चिंतीत नाहीत. अशी माणसे नेहमी आपल्या जीवनात असावीसी वाटतात.जे दुस-यांच्या चांगल्या गोष्टींचा विचार करतात ते कधी कधी स्वत:च्या जीवनात दु:ख झालेले कधीच कुणाला सांगत नाहीत.त्यांच्या मनात कधीही वाईट भावना निर्माण होत नाही.अशांचे आयुष्य हे एक दुस-यांसाठी प्रेरणादायी असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌴🌹🌴🌹🌴🌹🌴🌹🌴🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुरक्षित - Safe* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जाणीव* बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले कि घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जहाजावर सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसेना. तो सतत ओरडत राहिला. हे पाहून बादशाहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाश्यांना सांगितले, कि काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा. खलाश्यांनी पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले, समजावून सांगितले, वेगवेगळी आमिषे दाखविली, पण हा गुलाम काही गप्प बसेना. तेंव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी बादशाहाकडे गेला आणि म्हणाला,"हुजूर! मला परवानगी द्या, मी याला गप्प बसवतो." बादशाहाने परवानगी दिली. त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकाविण्यात आले. काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला. ५-६ वेळेला गटांगळ्या खावून झाल्यावर त्याला जहाजावर घेतले, वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला. हे पाहून सर्वच चकित झाले. बादशाहाने वृद्ध खलाश्याला विचारले कि आता हा गप्प कसा झाला? खलाशी उत्तरला,"हुजूर! आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नसता नुसता ओरडत होता. पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्प आहे.त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव. त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे." *तात्पर्य-दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते. दुःख मिळाले नाही, सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment