✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/12/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक एड्स निर्मूलन दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९५८ - मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य. १९६३ - नागालँड भारताचे १६वे राज्य झाले. १९६५ - भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना. १९७३ - पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य. १९७४ - टी.डब्ल्यू.ए. फ्लाइट ५१४ वॉशिंग्टन डलेस ईंटरनॅशनल विमानतळाच्या वायव्येस कोसळली. ९२ ठार. 💥 जन्म :- १०८१ - लुई सहावा, फ्रांसचा राजा. १०८३ - ऍना कॉम्नेना, बायझेन्टाईन इतिहासकार. १९८० - मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ११३५ - हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा. १९७३ - डेव्हिड बेन गुरियन , इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अर्जेंटिना - जी-20 संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली - विनाअनुदानित गॅस सिलेंडर 133 रुपयांनी स्वस्त, अनुदानित गॅस सिलेंडर 7 रुपयांनी महागला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई - आगामी शिक्षक भरतीमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईत शिक्षणाची वारी उत्साहात संपन्न, तीन दिवस चालेलेल्या शिक्षणाच्या वारीत विविध शैक्षणिक बाबीची मिळाली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : विधानसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या विजय औटी यांची बिनविरोध निवड, विधानसभा अध्यक्षांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त प्रासंगिक लेख खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय https://goo.gl/9wZXYz आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विजयालक्ष्मी पंडीत* १८ ऑगस्ट १९०० साली स्वरूप (विजयालक्ष्मी) यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव स्वरूपराणी व वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू असे होते. त्यांना एक बहिण व एक भाऊ होता. भावाचे नाव जवाहरलाल नेहरू व बहिणीचे कृष्णा नेहरू असे होते. पाच वर्षांच्या असताना त्या इंग्लंड येथे गेल्या तेथेही त्यांना शिकवण्यास शासिका नेमल्या. स्वरूप यांचे प्राथमिक शिक्षण घरीच अध्यापिकांद्वारे झाले. नंतर त्या शिक्षणासाठी स्वित्झलर्ंड येथे गेल्या. स्वरूप (विजयालक्ष्मी) यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यांचा भाऊ व त्यांचे वडील राजकारणातच होते. तेथे स्वरूप यांची भेट रणजीत पंडित यांच्याशी झाली.ते अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि १० मे १९२१ साली स्वरूप व रणजीत यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांचे नाव स्वरुपचे विजयालक्ष्मी पंडित असे झाले.विजयालक्ष्मी पंडित या संसदपट्टू व उत्तम वक्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. २१ विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरविले. त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून १९६२ ते १९६४ पयर्ंत काम केले. १९५३ मध्ये त्या संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. १९६४ मध्ये त्या फूलपूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आल्या *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल …, मन शांत ठेऊन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल …!! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) न्यूझीलंडची राजधानी कोणती ?* वेलिंग्टन *२) 'इंटरनॅशनल इयर ऑफ चाईल्ड' म्हणून कोणते वर्ष साजरे करण्यात आले ?* १९७९ *३) जॉर्जियातील प्रमुख नद्या कोणत्या ?* रिआन, कुर्‍हा - कंबोडिया *४) ग्रहगोल आणि सूर्यकुलाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते ?* खगोलशास्त्र *५) अवकाशात अवकाशयानातून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण ?* राकेश शर्मा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  शिवराज गाडीवान ●  योगेश जायशेठ ●  विठ्ठलराव मुजळगे ●  श्याम दरबसतेवार ●  श्रीकांत लांडे ●  सुभाष सोनक्के ●  मारोती दिंडे ●  हेमंत भेंडे ●  मारुती गिरगावकर ●  राजकुमार दाचावार ●  श्याम नरवाडे ●  शिवाजी पुरी ●  बालाजी कलकोटे ●  श्याम पाटील ●  राजेंद्र पाटील ●  विश्वनाथ पांचाळ *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्या चरणी कोणी जेव्हा लिन होतो लिन झाल म्हणून कोणी थोडा दीन होतो लिन झालं म्हणून कोणी लाचार समजू नये लिन होतो म्हणजे दुबळे विचार समजू नये शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.* *काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.* *"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही, त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."* •• ●‼ *रामकृष्णहरी* ‼● •• 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    कबीर माया पापिनी, फंद ले बैठी हाट । सब जग तो फंदे परा, गया कबीरा काट । सारांश महात्मा कबीर म्हणतात की, माया मोहात पाडणारी पापिनी आहे. माया माणसाला अलिप्त राहून कार्य करू देत नाही. एखाद्या कार्यात स्वतःला पूर्ण रुपाने झोकून देवून कार्य करू पाहताना मायेचे पाश माणसाला भ्रमित करून टाकतात. मायेची कित्येक रूपं आपल्या अवती-भवती वावरत असतात. पारध्यानं सावज आपल्या जाळ्यात अडकलं पाहिजे म्हणून न दिसणारे परंतु षड्विकारांनी युक्त अशी सावजाला हलूच देत नाही ती ! मायेजवळ मोहिनी अस्त्र असतं. कुणाला सत्ता, संपत्ती श्रीमंतीचा मोह, कुणाला विषय वासनेचा मोह तर कुणाला सौंदर्याचा मोह मोहित करीत असतो. मायेकडून एकदा का हे मोहिणीअस्त्र टाकल्या गेलं की माणसं स्वतःच्या मान-मर्यादा विसरून जातात. मायेहातचं बाहुलं बणून राहातात. सज्जन ,साधू मात्र अशा माया मोहावर विजय मिळवून असतात. ते मायेला , मोहाला जराही भुलत नाहीत. कधीच त्यांनी माया मोहाचे पाश तोडून टाकलेले असतात, राजपुत्र म्हणून वावरताना दुःखाची पुसटशी छायाही कधी त्याला स्पर्श केली नाही. मात्र हाच वैभवात वाढलेला सुखवस्तू राजपुत्र नगरातून फेरफटका मारताना माणसाचं दुःखमय जगणं पाहातो. माणसांचं जगणं दुःखमय असलं तरीही माणसांचं पुन्हा-पुन्हा त्यातंच गुरफटणं ! या सार्‍याचं त्या राजपुत्राकडून सखोल चिंतन होतं आणि दुःखाच्या निर्मितीची कारणं शोधणं सुरू होतं. दुःखाचं कारण लालसा, मोहात सापडतं ! सारे मोह मायेचे पाश तटातट गळून पडतात. जगाप्रति दयाभाव दाटून येतो. आणि राजसुखाचा त्याग करून सिद्ध होतात महाकारूणी तथागत गौतम बुद्ध ! संपूर्ण जगाला मानवता धर्माची शिकवण देतात व लोककल्याणाचा मार्ग दाखवतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बरेवाईट,सुखदुःख, पापपुण्य, खरेखोटे,प्रामाणिक,सत्यवान,बेईमान, भाग्यवान या गोष्टींचा मानवी जीवनाशी अगदी निकटचा संबंध जोडला जातो.यातूनच कसे जीवन जगायला शिकले पाहिजे हे कळते. ज्या गोष्टी आपण आपल्या मनातून प्रामाणिकपणे करत असतो त्यातून आपल्या वृत्तीतून,कृतीतून इतरांना त्रास होणार नाही,आपल्यामुळे इतरांची मने दुखावली जाणार नाहीत, आपल्या वर्तणूकीमध्ये बेबनाव किंवा खोटेपणा नाही, दैनंदिन जीवनात आणि व्यवहारात नेहमी सतर्कपणे राहून समाधानाने जीवन जगतो तो खरा यशस्वी होतो यालाच आपण पुण्यवान, भाग्यवान, चारित्र्यसंपन्न, सदाचारी, सुखी, समाधानी समजतो.हे सारे गुण ज्यांच्यामध्ये आहेत ते खरेच माणूस म्हणून जगण्यास पात्र आहेत.त्यांच्या जीवनात खोट्याला,दुस-याला दु:ख देण्याला, स्वत:च्या स्वार्थाला कधीच थारा जीवनात दिलेला नसतो.त्यांचे हे गुण समाजासाठी प्रेरणा देतात. ज्या व्यक्तीमध्ये वरील कोणतेही गुण नाहीत अशा व्यक्तींचे जीवन म्हणजे सर्व अवगुण संपन्न, अहितकारक, समाजविघातक दुष्ट वृत्ती असलेली दुराचारी व्यक्ती म्हटले पाहिजे.ज्या अशा त्यांच्या वाईट वृत्तीमुळे किंवा वाईट कृतीमुळे समाजातले चांगले असलेले वातावरण बिघडल्या जातो.त्यांचे स्थान समाजामध्ये शून्य असते. ह्या वरील दोन्ही गोष्टींचा फरक जाणून खरे काय आहे आणि आपण कसे रहायला अथवा जगायला पाहिजे याचे ज्ञान ज्यांच्याजवळ आहे आणि ते ज्ञान घेऊन स्वाभिमानाने ,प्रामाणिकपणे जीवन जगतो तोच खरा जीवनात यशस्वी होतो. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद ..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भाग्यवान - Lucky* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोठीच त्याची सावली* सूर्य नुकताच मावळत होता. एक कोल्हा त्याच्या गुहेतून आळसावत उठला. त्याला शिकारीला जाण्याची तशी घाई नव्हती. त्या जंगलात भरपूर गुबगुबीत हरणे व मांसल ससे होते. एखादा प्राणी कोल्हय़ाला सहज सापडायचा. कोल्हय़ाने आसपास नजर फिरवली तर सूर्याच्या किरणामुळे गुहेच्या भिंतीवर पडलेली त्याची सावली त्याला दिसली. स्वत:ची मोठी सावली पाहून कोल्हा खूश झाला व स्वत:शीच म्हणाला, '' वा! मी आकाराने किती मोठा आहे!! मी जर एवढा मोठा असेन तर त्या क्षुद्र सिंहाला मी का घाबरू? तो सिंह स्वत:ला जंगलाचा राजा समजतो. आज मी त्याला दाखवतो की जंगलाचा खरा राजा कोण आहे!'' कोल्हय़ाचे हे वाक्य हवेत विरते न विरते तोच त्याला एक जोरदार गर्जना ऐकू आली. मागोमाग कोल्हय़ाच्या मोठय़ा सावलीला त्याहीपेक्षा मोठय़ा सावलीने झाकून टाकले. ती सिंहाची सावली होती. त्याने एक पंजा कोल्हय़ाला मारताच कोल्हा धूळ चाटू लागला. ''आता सांग, जंगलाचा खरा राजा कोण आहे?'' ''आपणच आहात, हुजूर'' जखमी झालेला कोल्हा कण्हत म्हणाला.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment