✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 14/02/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *व्हॅलेंटाईन दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १८८१: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना. १९२४: संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना. १९६३: अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले. २०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला. 💥 जन्म :- १९१६: कवयित्री संजीवनी मराठे १९२५: केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया  💥 मृत्यू :-  १४०५: मंगोलियाचा राजा तैमूरलंग *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा लाभ घेणा-या 100हून अधिक महिलांची मोदींनी घेतली भेट* ----------------------------------------------------- 2⃣ *धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला मिळणार; जिल्हाधिकाऱ्यांकडून उर्जा मंत्रालयात अहवाल सादर* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - बोफोर्स घोटाळा प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली, सर्वोच्च न्यायालयात 28 मार्चला सुनावणी.* ----------------------------------------------------- 4⃣ *हिंगोली - औंढा नागनाथ येथे काल भाविकांची शिवलिंगाच्या दर्शनासाठी रीघ, परिवहनमंत्री दिवाकर रावते, खा. राजीव सातव, आ. डॉ संतोष टारफे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी केली महापूजा* ----------------------------------------------------- 5⃣ *राज्यात रविवारपासून सुरू असलेल्या गारपीट व अवकाळी वादळी पावसाने हजारो हेक्टरवरील रबी पिकांना फटका* ----------------------------------------------------- 6⃣ *पोर्ट एलिझाबेथ - भारताने दक्षिण आफ्रिकेला ७३ धावांनी हरवले. मालिका खिशात* ----------------------------------------------------- 7⃣ *भारतीय महिला क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेचा टी-20च्या सामन्यात 7 विकेट्सनं केला पराभव* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *व्हॅलेंटाईन दिनानिमित्त प्रासंगिक लेख* जगाला प्रेम अर्पावे .....! वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कवी संजीवनी मराठे* संजीवनी रामचंद्र मराठे ( १४ फेब्रुवारी,  इ.स. १९१६ पुणे, महाराष्ट्र - १ एप्रिल, इ.स. २०००:पुणे) या एक कवितागायनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी कवयित्री होत्या. संजीवनी मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता करावयास सुरुवात केली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या त्या जी.ए. (गृहीतागमा) व एम. ए. होत्या. आयुष्याच्या उत्तरार्धात संजीवनी मराठे आणि त्यांचे पती खानापूर-बेळगाव सोडून सांगलीस गेले. सांगलीत राममंदिराजवळच त्यांचा रामकृपा नावाचा बंगला होता. संजीवनीबाईंनी काही दिवस सांगलीच्या शाळेत शिक्षिकेचे काम केले. संजीवनी मराठे यांना मिनी, भारती, अंजू या तीन मुली आणि प्रताप नावाचा मुलगा होता. प्रताप हा वैमानिक होता. अंजूने लग्नानंतर पाठविलेली पत्रे संजीवनी मराठे यांनी संपादित करून प्रकाशित केली. महाराष्ट्र शासनाने ’बरं का गं आई’, आणि ’हसू बाई हसू’ या कवितासंग्रहांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) सायना नेहवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* बॅडमिंटन *2) बुद्धचरित हे प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिले ?* कवी अश्वघोष *3) भारतात सर्वात पहिले कापड गिरणी कुठे सुरू झाली ?* नागपुर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सतीश कुरमे, सहशिक्षक, माहुर 👤 धनराज जाधव, सहशिक्षक, वाशिम 👤 विकास बडवे, सहशिक्षक *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *लाभार्थी* गारपीट म्हणजे काहींची मजा आहे शेतक-यांना मात्र निव्वळ सजा आहे संकटातही काही हात धुवून घेतात लाभार्थ्या पेक्षा दुसरेच माला माल होतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वाकांक्षा यातील फरक जाणून घेण्याची गरज आहे. उत्तुंगतेचा ध्यास जरूर घ्यायला हवा; परंतु त्यामागे उदात्त विचार असायला हवेत. आपले आणि समाजाचे जीवन समृद्ध करण्याची कळकळ असावी. त्याऐवजी केवळ स्वार्थाचा आणि मूठभरांच्याच हिताचा विचार असेल, तर त्यामागची महत्वाकांक्षा हिंसक बनते. अतिमहत्वाकांक्षा नकारात्मक असून, आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरते. इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत. शेक्सपियरच्या नाटकातील नायक मॅकबेथही अतिमहत्वाकांक्षेचा शिकार आहे. स्काॅटलंडचा राजा डंकनच्या दरबारातील तो पराक्रमी उमराव. राजा होण्याची महत्वाकांक्षा त्याला असतेच; परंतु लेडी मॅकबेथ याबाबतच्या अतिमहत्वाकांक्षेने पछाडलेली असते. आपला नवरा राजा व्हावा म्हणून प्रसंगी ही दुष्ट बाई विद्यमान राजाचा खून करायलाही तयार होते.* *एका लढाईत विजय मिळविल्याबद्दल सन्मान करण्यासाठी राजा मॅकबेथच्या घरी येतो. पती-पत्नी त्यांचे आदरातिथ्य करतात. दिलेल्या शयनगृहात राजा झोपी जातो. मॅकबेथ महत्वाकांक्षी होता; पण त्यासाठी तो कोणाचा खून करायला तयार नव्हता. मात्र उद्याच्या राजवैभवासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगून लेडी मॅकबेथ राजाचा खून करायला भाग पाडते. मॅकबेथला राजपद मिळते; परंतु त्यानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला, युद्धाला सामोरे जावे लागते. लेडी मॅकबेथ भ्रमिष्ट होऊन मरते आणि मॅकबेथलाही प्राणास मुकावे लागते. अतिमहत्वाकांक्षा विघातक असून -हासाला कारणीभूत ठरते.* ••●💥‼ *रामकृष्णहरी* ‼💥●•• *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आयुष्याची खरी सुरुवात तर तुमच्या वाडवडिलांच्या ख-या पुण्याईने सुरु झाली.जीवनाचा ' मध्य ' तर तुमच्या कर्तृत्वाने सिद्ध करायचा आहे.तो तुम्हाला चांगला करायचा आहे की,वाईट हे तुम्हालाच ठरवायचे आहे.कारण हे मात्र तुमच्या हातात आहे.यासाठी तुम्हाला कुणाच्या भरवशावर बसता येत नाही किंवा नशिबावर अवलंबून राहता येत नाही.म्हणून तुमच्या जीवनातला मध्यच महत्त्वाचा आहे.आणि शेवट मात्र आपल्या हाती नाही.भविष्यात केव्हा काय घडेल याचे काही ठामपणे सांगता येत नाही.म्हणून जे आज आणि आता तुमच्यासमोर आहे ते सत्य आहे ते स्वीकारा आणि त्याला कौशल्याने, धैर्याने आणि परिस्थितीनुरूप उत्तर द्यायला पुढे रहा.यातच तुमच्या जीवनाचे खरे सार आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *दुरून डोंगर साजरे* - कोणतीही गोष्ट वा वस्तु लांबून चांगली दिसते, जवळुन तिचे खरे स्वरुप कळून येते. (मुख्य दोष कळून येतात.) *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चांगल्या कर्माचे फलीत* एका जंगलामध्ये *एक म्हतारी* आणि तिची नात राहत होती . आणि त्याच जंगलामध्ये *चार दरोडेखोर* लुटमार करण्यासाठी येत असंत . एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली . ते चार दरोडेखोर जंगलामध्ये *आश्रयासाठी* सैरभैर पळु लागले . अचानक त्यांना म्हतारीची *झोपडी* दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला. म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता *पाप पुण्याचा विषय* निघाला. प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हतारीने *पैज लावली*. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे *ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.* प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला. असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले. आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी *विजेचा कडकडाट* होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच *भस्मसात* झाले. *तात्पर्य :-* *एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे* आजही चार पापी माणसं जगु शकतात. पण त्याने *साथ* सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात. म्हणून *पुण्याचा वाटा* नेहमी घेत रहा. ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजनार. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment