*आपली माणसं कशी ऒळखायची..?* या प्रश्नाचं शोधलेलं उत्तर अडचणीत ज्या व्यक्तीची आठवण येते ती व्यक्ती आपली असते... आपल्या घरात कुठेतरी काडी पेटी असते. ती कुठे आहे हे आपणाला माहीत पण असतं, ती जागेवर आहे इतकच आपण पाहतो आणि परत आपल्या कामाला लागतो किंवा आपली कामं करतो. आपलं रुटीन सुरु आहे, काडीपेटी तिच्या जागी आहे. तुम्ही तुमच्या जागी आहात. तुमच्या रोजच्या जीवनात त्या काडीपेटीचं फक्त अस्तित्व आहे. काम काहीच नाही पण अस्तित्व मात्र आहे, हे तुम्हालाही माहित आहे. कधी कधी काही वस्तू साफसुफ करताना आपण काडीपेटीलाही साफ करतो आणि परत जागेवर ठेवतो. आपल्या ध्यानी मनी नसताना कोणा एका रात्री अचानक लाईट जाते आणि डोळ्यासमोर गुडूप अंधार होतो. आपल्याकडे डोळे आहेत. ते उघडेही आहेत पण त्याचा काहीही उपयोग होत नाही म्हणून आपण पटकन डोळे बंद करतो आणि घरात आपण जिथे आहोत तिथून डोळे झाकून काडीपेटीच्या दिशेने पावलं टाकतो. हात पुढे करतो. आपल्या हातात काडीपेटी येते कारण ती कुठे आहे हे आपणास माहीत असते. आपण त्यातील एक काडी पेटवतो आणि घरात प्रकाश करतो आणि मेणबत्ती शोधतो आणि ती पेटवून चहुकडे कायम स्वरूपी प्रकाश करतो. आता आपण घटनेचे विश्लेषण करू या. 1) काडीपेटीची आवश्यकता नव्हती त्या काळात सुध्दा तिची काळजी घेतली. आवश्यक तेथे सुरक्षित ठेवली तशीच आपल्या अवती भोवती असणारे आपले मित्र, आपले नातेवाईक, शेजारी यांची काळजी घ्या त्यांची विचारपुस करा. आणि परत रिलेशन अपडेट ठेवा. हीच माणसं संकट समयी आपल्याला मदत करतात. 2)अंधार पडला तेव्हा तुमच्याकडे डोळे होते पण तरीही त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. तसंच कधी कधी होतं, संकट किंवा समस्या आल्यानंतर तुमच्याकडे असणाऱ्या क्षमता चालत नाहीत किंवा कमी पडतात. 3) अंधार पडल्यानंतर आणि आपल्या क्षमतांचा उपयोग होत नाही म्हटल्या नंतर आपण डोळे बंद करून काडीपेटी पर्यंत पोहोचलो. इतका पक्का विश्वास आपणाला असतो की आपण हात पुढे केला आहे आणि भरलेली काडीपेटी तुमच्या हातात येते आपण काडी पेटवतो आणि मग डोळे उघडतो. इतका विश्वास त्या काडीपेटीचा आपणाला असतो. तसंच आपण जपलेली माणसं जर मनापासून जपलेली असतील तर अजिबात धोका होत नाही कारण आपण ती काळजी आपण रोज घेतलेली असते त्यामुळे आपण कॉन्फिडंट असतो. आता आपण पाहू या आपली माणसं कोण आणि त्यांना कुणी जपलं.? अ) आपणं रोज चालताना नमस्काराला कंजूषी करू नका. ब) लोकांशी भरपूर बोला संवाद करा. क) आपणही लोकांना छोट्या मोठ्या कामात मदत करा. ड) आणि आपली काडीपेटी किंवा काडीपेट्या जपून ठेवा त्यांची काळजी घ्या. त्यांचं अस्तित्व मान्य करा. 🙏संकलित.🙏

No comments:

Post a Comment