✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 05/02/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९५२: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 💥 जन्म :- १९३६: कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म. 💥 मृत्यू :-  २००३: ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या हरिजन या मराठी अंकाचे संपादक गणेश गद्रे २००८: योग गुरू महर्षी महेश योगी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣  *गेल्या २ वर्षांत केंद्र सरकारमध्ये जवळपास अडीच लाख नोक-या निर्माण झाल्या, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली* ----------------------------------------------------- 2⃣  *तिजोरीत खडखडाट नाही खणखणाट आहे, राज्याची अर्थव्यवस्था रूळावर - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार* ----------------------------------------------------- 3⃣  *जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट बोर्डावर नामुष्की, बीसीसीआयची वेबसाईट निघाली विक्रीला* ----------------------------------------------------- 4⃣  *औरंगाबाद - औरंगाबादेत ८ एप्रिल रोजी  स्वतंत्र धर्मासाठी लिंगायत समाजाचा मोर्चा, लिंगायत समन्वय समितीच्या बैठीत निर्णय* ----------------------------------------------------- 5⃣  *भारताच्या फिरकीपुढे द. आफ्रिकेचे लोटांगण, विराटसेनेची २-० आघाडी* ----------------------------------------------------- 6⃣  *इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधुला उपविजेतेपद, अंतिम सामन्यात बिव्हेन झँगने केला पराभव. १८-२१, २१-११, २०-२२ अशा तीन सेटमध्ये सिंधूवर मात* ----------------------------------------------------- 7⃣  *डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवत चौथ्यांदा अंडर -19 वर्ल्डकप जिंकला.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========           *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========             *कथा - बदल्याचा बळी* वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_2.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃    *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= कर्करोग वा कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे.प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाक्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशीँची आवशकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजे अर्बुद किंवा ट्यूमर. अर्बुदाचे दोन प्रकार आहेत. बिनाइन ट्यूमर म्हणजे कर्करोगाची गाठ. ही गाठ सहज काढून टाकता येते. अशा बिनाइन ट्यूमरच्या पेशी बाहेर पडून नव्या अवयवामध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करीत नाहीत. बहुतेक बिनाइन ट्यूमर प्राणघातक नाहीत.मारक गाठी (मॅलिग्नंट) कर्करोग. कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणार्‍या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवामध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्यापेशी लसिका संस्थेमार्फत किंवा रक्तवाहिन्यामधून इतर अवयवांमध्ये प्रवेशतात. त्यामुळे मूळ ज्या अवयवामध्ये मारक गाठी झालेल्या असतात त्याहून वेगळ्या अवयवामध्ये कर्करोग पसरतो. या प्रकारास कर्कप्रक्षेप म्हणतात. जेव्हा कर्करोग मूळ अवयवामधून दुसर्‍या अवयवामध्ये प्रक्षेपित होतो त्यावेळी दुसर्‍या अवयवामधील कर्करोग पेशी मूळ अवयवामधील कर्कपेशीप्रमाणेच असतात. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूमध्ये स्थालांतरित झाल्यास मेंदूमधील कर्कपेशी या फुफ्फुस कर्कपेशीच असतात. अशा आजारास प्रक्षेपित फुफ्फु्स-कर्करोग म्हणतात. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक  📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमच्या जीवनाला वळण देण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणजे ध्येयवेडा प्रवास *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  ३९वे मराठवाडा साहित्य संमेलन कोठे झाले?* 👉     बीड *२)  राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री कोण आहेत?* 👉     पंकजा मुंडे  *३)  बीसीसीआयचे नवीन महाव्यवस्थापक कोण आहेत?* 👉    साबा करीम  *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सौ. रंजना जोशी, सहशिक्षिका, धर्माबाद 👤 सदाशिव मोकमवार, येताळा 👤 निलेश गोधने, सहशिक्षक, नांदेड 👤 भीमराव वाघमारे 👤 संदीप मुंगले, धर्माबाद 👤 श्याम राजफोडे 👤 विठ्ठल पेंडपवार, नांदेड 👤 बाळासाहेब कदम, सहशिक्षक, धर्माबाद 👤 अच्युत पाटील खानसोळे,  सहशिक्षक, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========             *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ=========   *जाहिरात* जाहिरातीत खोटं ते खरं असे ठसवले जाते  खोट्याला खरं म्हणून  डोक्यात बसवले जाते  विश्वसनिय वाटणारीही  जाहिरात फसवी असते  जाहिरात म्हणजे फक्त  खिसे उसवा उसवी असते      शरद ठाकर    सेलू जि परभणी    8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.*  *समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.*  *"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"*          ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य अधिक मौल्यवान आहे.कारण बाह्यसौंदर्य अधिक दिसण्यासाठी नानाप्रकारचे सौंदर्य प्रसाधने व मूल्य देऊन निर्माण केले तरी ते जास्त काळ टिकत नाही किंवा टिकवता येत नाही.ते अल्पकालीन आहे. आंतरिक सौंदर्य असे आहे की,त्याची किंमतही मोजून आणता येत नाही आणि अन्य माध्यमांतून प्राप्तही करता येत नाही.असे सौंदर्य आपल्या अंतःकरणात उपजतच असते फक्त त्याला योग्यप्रकारे हाताळता आले पाहिजे.ह्या आंतरिक सौंदर्यामुळे अनेक नाती जोडून जीवनातला आनंद उपभोगता येतो न इतरांनाही आपल्या आनंदात व इतरांच्या आनंदात भर पाडता येते तसेच कोणत्याही प्रकारचे मूल्य न देता शेवटपर्यंत टिकवता येते.फक्त त्याच्यासाठी आंतरिक तळमळ असायला हवी. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎑📝🎑📝🎑📝🎑📝🎑📝🎑 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आपले नाक कापून दुसर्‍याला अपशकुन.* - दुसर्‍याचे वाईट व्हावे म्हणून अगोदरच स्वतः चे वाईट करून घेणे.  *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= एका बेडकाचे पोर नदीकाठी बसून तेथे एका वेताच्या जाळीकडे मोठ्या कौतुकाने पाहात होते. त्याची आई जवळच होती. तिच्याजवळ त्याने त्या वेताच्या हिरव्या पानांची व त्यांच्या भक्कम कांडांची फार स्तुती केली. काही वेळाने मोठे वादळ झाले आणि त्याच्या जोराने ती वेताची जाळी उपटली गेली व सगळे वेत नदीतून सैरावैरा वाहू लागले. त्यातला एक मोडका वेत त्या बेडकीच्या हाती लागला. तो आपल्या पोरास दाखवून ती म्हणाली, 'मघाशी जो वेत तुला इतका भक्कम दिसत होता, त्याची आता काय स्थिती झाली आहे ती पाहिलीस का ?' तात्पर्यः - नाम बडे दर्शन छोटे ! अशा वस्तू बर्‍याच असतात. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment