✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/03/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २००९-Capeler Space Observatory या संशोधन संस्थेची स्थापना २००६-लष्कर-ए-तैय्यब्बा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले २००५ - स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी कुवैतच्या संसदेसमोर निदर्शने. 💥 जन्म :- १९३४ - नरी कॉँट्रॅक्टर, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४२ - उमेश कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५२-व्हिवीयन रिचर्ड्स ,वेस्ट इंडीज क्रिकेटपटू १९५५-अनुपम खेर ,चित्रपट अभिनेता 💥 मृत्यू :- १६४७ - दादोजी कोंडदेव १९५२ - परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ. १९६१ - गोविंद वल्लभ पंत, भारताचे दुसरे गृहमंत्री. २०००-प्रभाकर तामणे,साहित्यिक २०१२-रवी शंकर शर्मा उर्फ रवि-संगीतकार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये स्वच्छतेच्या बाबतीत देशातले तिसरे सर्वाधिक चांगली कामगिरी करणारे राज्य होण्याचा मान महाराष्ट्राने मिळवला आहे.इंदोर सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांकावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना लोकसभा निवडणुका या ईव्हीएमच्या माध्यमातूनच घेतल्या जातील असे स्पष्ट केले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *या वर्षीचा उन्हाळा देशाच्या बहुतांश भागात सर्वसाधारण राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *धनगर समाजाला आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून याबाबत होणार्या कोणत्याही अपप्रचारास समाज बांधवांनी बळी पडू नये, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी केले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कॉम्रेड गोविंद पानसरे प्रेरित नववे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन ९ व १0 मार्च रोजी स्थानिक मातोश्री विमलाबाई सभागृह, अमरावती येथे आयोजित केले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यात १0 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून सुमारे १ कोटी २२ लाख बालकांना पो असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा नामांतर सोहळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे झाले नामांतर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मुलांच्या प्रगतीसाठी .........!* शाळेची गुणवत्ता खराब आहे किंवा शाळेतील मुलांना काही न येणे ह्यासाठी फक्त शिक्षक जबाबदार नाहीत असे यूनेस्कोने नुकतेच आपल्या न्यू ग्लोबल एजुकेशन मॉनिटेरिंग रिपोर्टमध्ये म्हटले आहे. शिक्षक हा एक .................... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गोविंद वल्लभ पंत* गोविंद वल्लभ पंत हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक नेते होते. त्यांचा जन्म १0 सप्टेंबर १८८७ रोजी अल्मोड.ा जिल्हयात श्यामली पर्वतीय क्षेत्रातील खूंट या गावात मूळच्या महाराष्ट्रीय कुटुंबात झाला. त्यांचे पुर्वीचे आडनाव पराडकर होते. डिसेंबर १९२१ मध्ये गांधीजींच्या आवाहनामुळे असहकार चळवळीच्या माध्यमातुन ते सक्रिय राजकारणात आले.पंत हे उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री आणि भारताचे दुसरे गृहमंत्री होते. भारत सरकारने इ.स. १९५७ साली त्यांना भारतर% ने सन्मानीत केले. हिंदी भाषेला राष्ट्रभाषा करण्याबाबत ते विशेष आग्रही होते. जमिनदारी पद्धत समाप्त करण्यात व कुळ कायदा अस्तित्वात आणण्यात त्यांचे मुख्य योगदान होते.अल्पसंख्यकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी कुमाऊउ परिषदेची स्थापना केली. १९0५ च्या बनारस काँग्रेस अधिवेशनास ते हजर होते. १९१६ मध्ये ते काँग्रेसचे सक्रीय सभासद झाले. त्यांनी भिकार्यांची व्यवस्था, मजुरांची सक्तीने भरती, जंगलवासीयांवरील अत्याचार इ. प्रश्न कुमाऊँ परिषदेतर्फे हाताळले. उत्तर प्रदेशाच्या विधान परिषदेत ते निवडून आले (१९२३). त्याच वर्षी मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास आदींनी स्वराज्य पक्षाची स्थापन केली. स्वराज्य पक्षाचे ते सात वर्षे सचिव होते. १९२७ मध्ये ते प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांना दोन वेळा तुरूंगावास घडला. कृषी विषयक सुधारणांसाठीच्या कामगिरीमुळे ते पार्लमेंटरी काँग्रेसच्या संसदीय मंडळाचे चिटणीस झाले (१९३४) *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *सर्वात मोठा खंड कोणता ?* आशिया 2) *सर्वात लहान खंड कोणता ?* ऑस्ट्रेलिया 3) *जगातील एकूण सार्वभौम देश किती ?* 231 4) *जगातील सर्वात मोठा देश ( क्षेत्रफळ ) कोणता ?* रशिया 5) *जगातील सर्वात लहान देश कोणता ?* व्हॅटिकन सिटी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • गोवर्धन शिंदे • शिवम जाधव • भीमराव रेणके • अविनाश मोटकोलू • मनोज घोगरे • कन्ना कनकमवार • महेश कोकरे • मारोती लोणेकर • विश्वनाथ स्वामी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुकाळ* सभा-संमेलनात आता घोषणांचा सुकाळ आहे प्रत्यक्षात मात्र कुठेही नेहमीचा दुष्काळ आहे घोषणांच्या सुकाळात तो झोडपून गेला आहे असल्या या दुष्काळाने हवालदिल झाला आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरीब माणसाला घरापासून दूर राहून पोटाच्या चार घासासाठी प्रचंड मरमर करावी लागते. पण पैशावाल्याच्या बाबतीत हे होत नाही. "एका बसल्या ठिकाणी त्याचा व्यापार चालतो. त्याला घर सोडून कुठेही जावं लागत नाही." गरीबाला एका वस्तूसाठी पैशाअभावी कुढत मरावं लागतं. शेवटपर्यंत ती वस्तू मिळेलच असं होतं नाही. पण "श्रीमंताला मात्र पाहिजे असणारी कोणतीही वस्तू रानावनातच काय या पृथ्वीतलावर कुठंही असली तरी पैशाच्या जोरावर मिळवणं सोपं असतं आणि वस्तू कोणतीही असू द्या, कितीही अनमोल असू द्या, कितीही महत्वाची असू द्या, शक्यतो जास्तीचे पैसे देऊन मिळवता येणार नाही, इतकी ती अवघड नसतेच." थोडे जास्त पैसे देऊन अति मौल्यवान वस्तुसुद्धा पैश्यावाल्याला सहज मिळवता येते.* *म्हणून, पैसा माणसाच्या आयुष्यात यासाठी महत्वाचा आहे. पैसा वाईट मार्गाने कमवायचा तर नाहीच, पण चांगल्या मार्गाने खूप पैसा कमवून तो वाईट मार्गावर खर्च सुद्धा नाही करायचा. चांगल्या मार्गाने कमावलेला खूप पैसा 'आनंदी आणि सुखकर आयुष्य' जगण्यासाठी खर्च करायचा आहे. पैशाचा लोभ नाही आणि तिरस्कारही नाही. त्याची हाव नको आणि त्याच्याविषयी विरक्ती नको. पैसा कमवताना आनंदाने कमवायचा तसाच तो खर्च करतानासुद्धा जीवनात आनंदच असला पाहिजे. एवढा सुंदर असा 'मध्यम मार्ग' संतानी आपल्याला दिला आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आतम अनुभव जब भयो, तब नहि हर्श विशाद चितरा दीप सम ह्बै रहै, तजि करि बाद-विवाद। सारांश आत्म अनुभव होता नुपजे हर्ष-विशाद । चित्रदीपासम स्थिर त्यागून वाद-विवाद ।। महात्मा कबीर आत्मानुभवाची महत्ती विशद करतात. ज्याला आत्मानुभवाचा साक्षात्कार झालेला आहे. त्याच्या ठायी कोणताही भेदभाव उरत नाही. निसर्गातील उदात्त भावाची अभिव्यक्ती त्याच्याकडून प्रत्ययास येवू लागतात. वृक्ष संगोपक व संहारक दोघांनाही समान वागणूक देतो. दोघांवरही शितलता (सावली) सारखीच धरीत असतो. तशी वागणूक आत्म अनुभव्याची असते. तो आप-परभाव बाळगित नाही. आनंद व खेद अशा भावनाही त्याच्याठायी उपजत नाहीत. चित्रातील ज्योत स्थिरता धारण करते. तिच्यावर बाह्य घटकांचा काहीही परिणाम जाणवत नाही. जिथे परमात्म्याचं विशाल रूप ध्यानात आलेलं आहे. त्या विशाल रूपाचे आपण एक सुक्ष्म अंश आहोत. तेव्हा त्याबद्दलची मत मतांतरं कशी काय उत्पन्न होतील. सारे वाद-विवाद कधीच मिटलेले अाहेत. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सायंकाळच्यावेळी थोडं तळ्याकाठी जाऊन पहा आणि काही क्षण त्याकडे पाहिले तर असे लक्षात येते की, तळ्यातल्या पाण्यावर तरंगणा-या लाटा एकामागून एक संथगतीने तळ्याच्या काठाकडे जणू हातात हात घालून येत आहेत आणि आम्ही एक आहोत असं सांगून जातात. त्यातून प्रत्येक लाटेच्या एकीचे दर्शन घडताना दिसते.त्यांच्या एकीबरोबरच निसर्गाचं सौंदर्य खुलताना दिसते.हे विहंगम दृश्य मानवी मनाला भुरळ पाडल्यावाचून राहत नाही.यातून निसर्गातील प्रत्येक घटक एकमेकांशी संवाद साधून एक मौलिक संदेश सा-या सजीवांना देतात.ज्याप्रमाणे एकमेकांच्याद्वारे निसर्गाच्या एकरुपतेचे दर्शन घडते.असे दर्शन मानवी जीवनाचे का दिसून येत नाही ? त्यात फक्त माणूसच असा आहे की,तो निसर्गाचे अनुकरण करायला थोडा विसरतो, निसर्गापासून दूर जाऊ पाहतो आणि आपले काही इतरांपेक्षा वेगळे आहे असे समजून जगायला पाहतो.तो अहंभाव मनात ठेवून जगण्याचा प्रयत्न करतो आणि कुठेतरी फसतो.पण एक माणसाने थोडे निरीक्षण करायला शिकले पाहिजे.शिकल्यानंतर असे लक्षात येईल की,निसर्गातला प्रत्येक घटक एकमेकांशी जुळवून घेऊन एक आगळेवेगळे विलोभनीय सौंदर्य निर्माण करुन आपले अस्तित्व टिकवून ठेवतो तर आपण का करत नाही.जर आपणही प्रयत्न केले तर आपल्याही जीवनात,जगण्यात, जीवनशैलीत भर पाडू शकतो.मग तरंगणा-या लाटा असतील किंवा अन्य घटक असतील. त्याचप्रमाणे मानवाने निसर्गावर प्रेम करत करत त्यातून मन शांत ठेवून, विचार करून आपणही एकमेकांतला असणारा भेद, तिरस्कार न करता एकतेने जीवन जगायला शिकले पाहिजे. इतरांनाही आपल्यात सहभागी करून घेऊन कुणालाही कमी न देता आपण सारे समान आहोत आपण सा-यांनी मिळून मिसळून राहून आपणही चांगली मानवसृष्टी निर्माण करु शकतो. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• समर्थाचिया सेचका वक्र पाहे। असा सर्व भुमंडळी कोण आहे॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३०॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिंपले* एक 6 वर्षाचा मुलगा आपल्या 4 वर्षाच्या लहान बहिणीसोबत बाजारातून जात असतो. अचानक त्याला जाणवते की त्याची बहीण मागे राहिली आहे. तो थांबतो व मागे वळून पाहतो तर त्याला दिसते की, त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी राहून अतिशय कुतूहलाने काहीतरी पहात आहे. तो मुलगा मागे जातो व तिला विचारतो, "तुला काही हवे आहे का?" ती एका बाहुलीकडे बोट दाखविते. तो मुलगा तिचा हात धरतो व एका जबाबदार मोठ्या भावा प्रमाणे तिला ती बाहुली देतो. ती बहीण अत्यानंदीत होते. हे सर्व तो दुकानदार पहात असतो व त्या मुलाचे प्रगल्भ वागणे पाहून आश्चर्यचकित होतो.इतक्यात तो मुलगा काउंटर कडे येतो व त्या दुकानदाराला विचारतो "काका, किती किंमत आहे या बाहुलीची?" दुकानदार एक शांत माणूस असतो व त्याने जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले असतात. तो त्या मुलाला प्रेमाने व आपुलकीने विचारतो "बोल तू काय देशील?" मुलगा आपल्या खिशातील सर्व शिंपले,जे त्याने व त्याच्या बहिणीने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावर गोळा केलेले असतात ते बाहेर काढतो व दुकानदाराला देतो. दुकानदार ते घेतो व जणूकाही पैसे मोजत आहे या अविर्भावात मोजायला सुरु करतो. शिंपले मोजून झाल्यावर त्या मुलाकडे पाहताच मुलगा म्हणतो " कमी आहेत का ?" दुकानदार म्हणतो " नाही नाही, हे बाहुलीच्या किमतीपेक्षा जास्त आहेत. ज्यादाचे मी परत करतो. असे म्हणून तो केवळ 4 शिंपले घेतो व बाकी सर्व शिंपले त्याला परत करतो. मुलगा एकदम आनंदात ते शिंपले आपल्या खिशात ठेवतो व बहिणीसोबत निघून जातो. हे सर्व त्या दुकानातील कामगार पहात होता. त्याने आश्चर्याने मालकाला विचारले, " मालक ! इतकी महागडी बाहुली तुम्ही केवळ 4 शिंपल्यांच्या मोबदल्यात दिलीत ?" दुकानदार एक स्मित हास्य करीत म्हणाला, "आपल्यासाठी हे केवळ शिंपले आहेत. पण, त्या मुलासाठी हे शिंपले अतिशय मौल्यवान आहेत. आणि आत्ता या वयात त्याला नाही समजणार पैसे काय असतात. पण जेंव्हा तो मोठा होईल ना, तेंव्हा नक्कीच समजेल. आणि जेंव्हा त्याला आठवेल कि आपण पैश्यांच्या ऐवजी शिंपल्यांच्या मोबदल्यात बाहुली खरेदी केली होती, तेंव्हा त्याला माझी आठवण होईल आणि तो हा विचार करेल कि हे विश्व चांगल्या माणसांनी भरलेले आहे.हीगोष्ट त्याच्यातील सकारात्मक दृष्टीकोन वाढण्यासाठी मदतीची ठरेल आणि तो सुद्धा चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित होईल." *तात्पर्य* -- " पेरावे तसे उगवते." म्हणून केवळ पैशांच्या मागे न लागता, असे काहीतरी चांगले काम करा, जे पुढच्या पिढयांना चांगले काम करण्याची प्रेरणा देईल, सकारात्मक दृष्टीकोन देईल..... *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/03/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९६४ - कॉन्स्टन्टाईन दुसरा ग्रीसच्या राजेपदी. १९७५ - अल्जियर्सचा तह - ईराण व इराकने सीमाप्रश्नी संधी केली. १९९२-'मायकेल अँजेलो' नावाचा संगणक विषाणू पसरण्यास झाली सुरुवात. १९९८- गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा 'लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर. १९९९-जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समूहाच्या सहस्रब्दीसोहळ्याचे राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या हस्ते उद्धघाटन २०००-शहर निर्वाह भत्ता ,महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता म्हणून मिळणारी रक्कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब 💥 जन्म :- १९५७-अशोक पटेल- भारतीय क्रिकेट खेळाडू १९६५-देवकी पंडित-गायिका 💥 मृत्यू :- १९८२-रामभाऊ म्हाळगी- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठप्रचारक, भाजप चे महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष १९९२-प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई १९९९- सतीश वागळे-चित्रपट निर्माते २०००-नारायण काशीनाथ लेले-कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - राज्यातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरचा भाऊ मुफ्ती अब्दुर रौफसह बंदी असलेल्या या संघटनेच्या ४४ दहशतवाद्यांना पाकिस्तानने केली अटक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे जेम एंड ज्वेलरी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दुष्काळ निवारणासाठी दुष्काळग्रस्त भागात २६०० टँकर्स सुरू करण्यात आले असून पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठय़ासाठी १४७ कोटी रुपये निधी वितरीत करण्यात आला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जम्मू-काश्मीर- राजौरीतल्या सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार, दिवसभरात तिसऱ्यांदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली - भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी घेतली अमेरिकन सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांची भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नागपूर : चित्तथरारक ठरलेल्या सामन्यात 'टीम इंडिया'ने ऑस्ट्रेलियाचा ८ धावांनी पराभव करीत पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारताचा हा पाचशेवा विजय होता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रदूषण एक समस्या* लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रणजित देसाई* रणजित रामचंद्र देसाई (एप्रिल ८, १९२८ - मार्च ६, १९९२) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते. *त्यांना मिळालेले पुरस्कार -* १९६३ - स्वामी कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९६३ - स्वामी कादंबरीसाठी हरी नारायण आपटे पुरस्कार १९६४ - स्वामी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार १९७३ - पद्मश्री पुरस्कार १९९० - महाराष्ट्र गौरव पुरस्कार *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान कोण आहे ?* विराट कोहली 2) *क्रिकेटमधील खेळाडूंची संख्या किती असते ?* 11 3) *कबड्डी खेळात खेळाडूंची संख्या किती असते ?* 9 4) *सायना नेहवाल कोण आहे ?* बॅडमिंटनपटू 5) *आपण कोणत्या खंडात राहतो ?* आशिया *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • अशोक पा. दगडे, सरपंच • सुरेश कटकमवार • सुरेश बावनकुळे, शिक्षक • माधव गोटमवाड • शेख जुबेर • कैलास वाघमारे • प्रकाश राजफोडे • राजू कांबळे • अविनाश गायकवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दुभंगलेले* वरवर एक,मने दुभंगलेले आहेत प्रत्येकजण आपल्या रंगात रंगलेले आहेत वरवर कितीही जोडा जोडलेले ते जोडलेले रहाते वरवर चिकटलेले सांगा कुठे एकजीव होते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥* *असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.* *खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञानी तो निर्भय भया, मानै नहीं संक इन्द्रिन केरे बसि परा, भुगते नरक निशंक। सारांश ज्ञानवंता भय नसे शंका नसे तया मना । इंद्रिया आहारी जाता निशंक नरक जाणा ।। महात्मा कबीर ज्ञानी माणसाचे वैशिष्ट्य कथन करतात. ज्ञानी माणसाचे ठायी सारासार विचार शक्ती असते. तो विवेकाने निर्णय घेतो. घाई गडबडीने निर्णय घेवून पुन्हा विचारात पडण्याची त्याची प्रवृत्ती नसते. तो पूर्णपणे आपल्या विचारावर ठाम असतो. पुढे काय होणार ? अशा द्विधा व संदिग्धावस्थेत तो गुरफटत नाही. व यशापयशा प्रती शंकाही घेत नाही. तो स्थिर असतो. मात्र जो षडविकारांना बळी पडून इंद्रियांच्या अधीन गेलेल्या बद्दल काय सांगावे. क्षणोक्षणी त्याच्या विचारात बदल होत असतो. त्याची अस्थिर विचार सरणी त्याला कोणत्याही मतावर ठाम होऊ देत नाही म्हणून तो सदा सर्वकाळ साशंक मनाने जगत असतो. ही साशंकताच त्याचा घात करते. तो निसर्गाच्या शाश्वत सत्यांवरही शंका घ्यायला लागतो. त्याच जगणं जटील बणतं . तो स्वतःच जीवनानंदापासून अलिप्त होवून जीवनानंदाला नरकात ढकलून नैराश्यात्मक यातनामय जगणे पदरी ओढून घेतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात आतापर्यंत विद्वान माणसे शरीराने जरी या जगातून गेली असली तरी ती आपल्या विचारांनी अमरच झालेली आहेत.कारण त्यांचे विचार हे सर्वसामान्य माणसेही आपल्या जीवनात आदर्श विचार मानून त्या विचारांच्या मार्गावरुन चालतात म्हणजे विचार रुपाने ते सदैव आपल्या जीवनात पाठराखण करत असतात.म्हणतात ना ' मरावे परी कीर्तीरुपी उरावे ' म्हणजेच विद्वान माणसे आपल्या जीवनात सदैव आपल्या विचारांच्या,कार्याच्यारुपाने आपल्यामध्येच असतात हे ध्यानात ठेवून आपणही त्यांचा मार्ग अनुसरावा म्हणजे आपणासही विचाररुपी अमरत्व प्राप्त होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590/ 8087917063. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दिनानात हा राम कोदंडधारी। पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥ मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२८॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उंदराचे सिंहाशी लग्न* उंदरामुळे जाळ्यातून सुटलेला सिंह खूश होऊन त्या उंदराला म्हणाला, ''अरे, तू माझ्यावर फार उपकार केले आहेस त्यासाठी तुला जे काय हवे असेल ते माझ्याजवळ माग, मी देतो.'' ते ऐकून उंदीर गर्वाने फुगला व आपल्या योग्यतेचा विचार न करता म्हणाला, ''महाराज, ज्या अर्थी आपण आनंदाने काय पाहिजे ते माग म्हणता त्या अर्थी काहीही भीती न धरता मी मागतो की तुमची मुलगी मला द्यावी.'' हे ऐकताच सिंहाला फार वाईट वाटले, पण तो वचनात गुंतल्यामुळे त्याला नाही म्हणता आले नाही. त्याने आपली मुलगी आणून उंदराच्या स्वाधीन केली. ती तरुण मुलगी मोठय़ा डौलाने चालत असता तिचा पाय उंदरावर पडून तो तात्काळ मरण पावला. तात्पर्य : जे मागायचे ते विचारपूर्वक व आपल्या योग्यतेला साजेल असे मागावे, नाहीतर भलतेच मागणे मागितल्यामुळे संकट निर्माण होईल. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/03/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९३१- गांधी-आयर्विन करार झाला. १९६४-श्रीलंकेत आणीबाणी १९९१-पहिले आखाती युद्ध-इराकने सगळ्या युद्ध कैद्यांची मुक्तता केली. २०००-कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित २००१ - मक्केत हज सुरू असताना ३५ भाविकांचा चेंगरुन मृत्यू. 💥 जन्म :- १९१६-ओरिसाचे मुख्यमंत्री आणि स्वातंत्रसेनानी बिजू पटनायक १९४२ - फेलिपे गॉन्झालेझ, स्पेनचा पंतप्रधान. १९५९ - वाझ्गेन सर्ग्स्यान, आर्मेनियाचा पंतप्रधान. 💥 मृत्यू :- १५३९ - नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर. १९६८-नारायण गोविंद चाफेकर, मराठीचे संशोधक १९८९- बाबा पृथ्वीसिंग आझाद,गदर पार्टीचे एक संस्थापक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पंजाब- लुधियाना रेल्वे स्थानकात 100 फूट उंचावर फडकला तिरंगा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *लक्ष्यावर अचूक प्रहार केल्यानंतर किती जण ठार झाले ते मोजण्याचे काम हवाई दल करत नाही, हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *एमएचटी सीईटी सामाईक प्रवेश परीक्षा यंदा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. जेईईच्या मेनच्या धर्तीवर ही परीक्षा होणार असून या परीक्षेत निगेटिव्ह पद्धत राहणार नाही.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी ४५ वर्षीय हमीद ए. मुर्तझा यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीला ११0 कोटी रुपयांची देणगी देण्याचा दिला प्रस्ताव,* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *एका स्थानी सर्वाधिक गर्दी, सगळ्यात मोठे स्वच्छता अभियान आणि सगळ्यात मोठा चित्रकला कार्यक्रम यासह यंदाचे प्रयागराज कुंभमेळा २0१९ ने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *महिला क्रिकेट मध्ये भारताचा पहिल्या टी-२0 मध्ये ४१ धावांनी पराभव झाला. इंग्लंडने ३ सामन्यांच्या या मालिकेत १-0 अशी आघाडी घेतली आहे. * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर खेळला जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नारायण गोविंद चाफेकर* नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चाफेकर (५ ऑगस्ट, इ.स. १८६९:मुंबई, महाराष्ट्र - ५ मार्च, इ.स. १९६८:बदलापूर, महाराष्ट्र) हे मराठीतले ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक व समीक्षक होते. पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण ह्यांसारख्या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले असून ते त्यांच्या चौफेर विचारांचे द्योतक आहेत. वैदिक वाङ्मया विषयीचे चिंतन व शोधन हा त्यांच्या विचाराचा आणखी एक विषय होता. १९३४ साली बडोद्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. चापेकरांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे झाले. मुंबईतून १८९४ साली कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ वकिली केली आणि मग ते न्यायखात्यात नोकरी करू लागले. १९२५ साली प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे वास्तव्यास गेले व अखेरपर्यंत तेथेच राहिले. चाफेकरांनी सेवानिवृत्तीनंतरच्या काळात 'भारत इतिहास संशोधक मंडळ', 'मराठी ग्रंथोत्तेजक सभा', 'राजवाडे संशोधन मंडळ', 'धर्मनिर्णय मंडळ' आदी अनेक संस्थांमधून काम केले. अनेक नव्या-जुन्या साहित्यिकांना एकत्र आणून त्यांनी 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'ला ऊर्जितावस्थेला आणले. पुणे विद्यापीठातून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत. त्या विद्यापीठाकडून १९६६ साली ना.गो. चापेकर यांना डी.लिट्. ही सन्माननीय पदवी देण्यात आली *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचे ब्रीदवाक्य कोणते ?* सत्यमेव जयते 2) *भारताचा ध्वज कोणता ?* तिरंगा 3) *भारताची राष्ट्रीय भाषा कोणती ?* हिंदी 4) *'प्रजासत्ताक दिन' केव्हा साजरा करतात ?* 26 जानेवारी 5) *प्रजासत्ताक दिन केव्हापासून साजरा करतात ?* 26 जानेवारी 1950 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • माणिक आहेर • गंगाधर मदनूरकर • बाळू भगत • अशोक कहाळेकर • गं.बा. नुकूलवार • बालाजी तिप्रेसवार • रमेश मेरलवार • समाधान शिंदे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दिखावा* दाखवण्या पुरता फक्त स्वाभिमानीबाणा आहे तसे पाहिल्यास इतिहास यांचा लाजिरवाणा आहे स्वाभिमानी असल्याचा उगीच दिखावा करतात लोकांच्या नजरेत दिखावा म्हणजे नाटक ठरतात शरद ठाकर सेलू जि परभणी ८२७५३३६६७५ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तसं पाहिलं तर आपल्यापैकी बहुतेकांचं जीवन साचेबद्ध असतं. घर आणि नोकरी किंवा घर आणि व्यवसाय अशा दोन विश्वांतलं आपलं जीवन. त्यामधील माणसांभोवती फेर धरणारं जगणं. आपण स्वत:साठी जगत असतो; परंतु आई-वडिल, भावंडे, पती-पत्नी आणि मुलं, मित्र-मैत्रिणी, सहकारी यांच्यासाठीही जगत असतो. शिकत असतो त्यावेळी उत्तम गुण मिळवून परिक्षा उत्तिर्ण होण्याचं स्वप्न असतं आपलं. शिक्षणानंतर स्वप्न असतं ते करिअरचं. नोकरी वा व्यवसायात स्थिरावण्याचं आणि त्यानंतर स्वत:च्या कुटुंबाचं, घराचं. लग्नाचं आणि मग मुला-मुलींना वाढवण्याचं. म्हटलं तर हे चक्रच. त्या-त्या काळातील आपली महत्वकांक्षा हे चक्र फिरवित असते.* *महत्वकांक्षा हे एक मानवी मूल्य आहे. विद्यार्जनासाठी, कर्तृत्वासाठी, स्वयंप्रेरणेसाठी ते आवश्यकच असते. महत्वाकांक्षा नसेल तर मग आपण कशाचा ध्यास घेणार आणि त्याच्या मागे धावणार? आपली इच्छा असो वा नसो, आपण स्पर्धेत ओढलो जातोच. महत्वाकांक्षा आपल्यामधील स्पर्धात्मकता वाढविते, कष्ट करायला प्रेरणा देते, चिकाटी निर्माण करते. निसर्गाकडून आपल्या प्रत्येकाला कमी'-आधिक प्रमाणात प्रतिभाशक्ती मिळालेली असते. वैयक्तिक जीवनात महत्वाकांक्षा जशी आवश्यक, तशी ती समाजजीवनातही गरजेची आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी, गांधीजींनी, नेहरूंनी देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याची आकांक्षा बाळगली. देशवासियांना एकत्र करून त्यांनी त्याची पूर्ताताही केली. महत्वाकांक्षा समाजासाठी अशा प्रकारे उपयुक्त ठरते.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⭐🔹🔹🔹🔹🔹🔹⭐ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर कलि खोटी भाई , मुनियर मिली न कोय | लालच लोभी मस्कारा , टिंकू आदर होई || अर्थ : हल्लीच्या सामाजिक भानाचं वर्णन करताना महात्मा कबीर ढोंगाला भुलणार्या अर्थात वास्तव न पाहता वरवरच्या सोंगालाच सत्य मानणार्या समाजमनाचं निरीक्षण नोंदवतात. भूगोल सांगतं पृथ्वीचं वय साडे चार अब्ज वर्षापेक्षा जास्त जास्त. भारतीयांच्या मानण्याप्रमाणे गतकाळ ते सांप्रत असे चार युग . १ कृत युग, २ त्रेता युग , ३ द्वापार युग, व ४ कली युग अशी काल विभागणी सांगितली जाते. हल्ली म्हणजे कलीयुगी पूर्वीपेक्षा खोटारडेपणा खूपच वाढलाय. हे युग महाभारताच्या लढाईपासून ते सांप्रतपर्यंत चालूच आहे. या युगी खरे खुरे मुनी , ऋषी , संत भेटणे कठीण झाले आहे. स्वार्थासाठी त्यांची नाटकं करणारे अनेक जण भेटतील. लालचीपणा, मोह यांनी ग्रासलेल्यांना हेच ढोंगी , पाखंडी , खरंं अध्यात्म सोडून थट्टा मस्करी करणारे, द्रव्य लुटणारे, वासनांधच साधू, मुनी म्हणून मिरवत आहेत. अन भक्तजण त्यांनाच डोक्यावर घेवून मिरवतात अन फसगत झाली की वैफल्यग्रस्त होतात. तेव्हा खरा साधून ओळखून त्याच्या ठायी लिन व्हायला सांगितलेला संतांचा कानमंत्र विसरू नये. म्हणजे झालं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दिनानात हा राम कोदंडधारी। पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥ मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२८॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सिंह आणि उंदीर* उन्हाळ्यात एक सिंह एका झाडाच्या सावलीत अगदी शांत झोपला होता. तेथे उंदरांनी फारच त्रास दिला. त्यामुळे जागा होऊन त्याने एका उंदरास पंजात पकडले व त्याला फाडून खाणार तोच त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ''महाराज, आपण मोठे, सर्व प्राण्यांचे राजे, मी आपल्यापुढे अगदीच लहान. माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नका. मला जीवदान द्यावं हेच योग्य.'' ते ऐकून सिंहाला त्याची दया आली व त्याने त्याला सोडून दिले. पुढे एकदा सिंह अरण्यात फिरत असता त्याच झाडाजवळ शिकार्याने जाळे लावले होते, त्यात सापडला. त्यावेळी त्याने आपली सगळी शक्ती खचरून धडपड केली, पण त्याची सुटका झाली नाही. तेव्हा तो निराश होऊन मोठय़ाने ओरडू लागला. तो आवाज ऐकून तो उंदीर तेथे आला व सिंहाला म्हणाला, ''राजा भिऊ नकोस, स्वस्थ बस.'' इतके बोलून त्याने आपल्या दाताने ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली. तात्पर्य : मोठय़ाचे एखादे मोठे काम लहानाच्या हातून एखादे वेळी होते. यासाठी कोणाला क्षुद्र समजून हिणवू नये. आपल्या चलतीच्या काळात माणसाने लोकावर उपकार केलेत तर पडत्या काळात तेच त्याच्या उपयोगी पडतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ ✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/03/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९४९ - कॅप्टन जेम्स गॅलाघरने विमानातून विनाथांबा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. १९५२-पंडित नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उदघाटन १९७२-अमेरिकेचे "पायोनीर-१०" यानाचे गुरूच्या दिशेने उड्डाण झाले २००४ - संयुक्त राष्ट्रांचा शस्त्रनिरीक्षण संघाने ने जाहीर केले की १९९४ नंतर इराककडे अतिविनाशकारी शस्त्रास्त्रे नव्हती. 💥 जन्म :- १९३१-राम शेवाळकर मराठी साहित्यिक १९६२ - जॉन बॉन जोव्ही, अमेरिकन रॉक संगीतकार. १९७७-अँड्रयु स्ट्रास-इंग्लिश क्रिकेटपटू 💥 मृत्यू :- १७९१ - जॉन वेस्ली, मेथोडिस्ट चर्चचा स्थापक. १८३५ - फ्रांसिस दुसरा, पवित्र रोमन सम्राट. १९२१ - निकोलस पहिला, मॉँटेनिग्रोचा राजा. १९४९-सरोजिनी नायडू १९८६ -काशीनाथ घाणेकर मराठी अभिनेते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे तीन दिवसांनंतर पाकिस्तानातून मायदेशात परतले, भारतीयांचा विजयी जल्लोष* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कात्रज - देहूरोड बायपास होणार सहा पदरी : २२३.४६ कोटी निधी मंजूर, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुरावा * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *दिल्ली - देशात सध्या तणावाची परिस्थिती असली तरी लोकसभा निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार, निवडणूक आयोगाची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जम्मू-काश्मीरमधील हंदवाड्यात अतिरेक्यांसोबत चकमक, भारताचे दोन पोलीस व एक अधिकारी शहीद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात तसेच होमगार्डच्या कर्तव्य भत्त्यात भरीव वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वाल्मिकी मेहता यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनीला दुखापत, पहिल्या सामन्यातील समावेशाबाबत संदिग्धता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षकांना शिकवू द्या ...* राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राम शेवाळकर* कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई. वेदशास्त्रसंपन्न रामशास्त्री शेवाळकर हे राम शेवाळकरांचे पणजोबा, बाळकृष्ण काशीनाथ ऊर्फ भाऊसाहेब शेवाळकर हे त्यांचे वडील. त्यांनी पासष्ट वर्षे कीर्तनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. अशा घराण्यात जन्मल्यामुळे राम शेवाळकरांना संस्कृत साहित्याची आवड लागली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले. राम शेवाळकरांचा जन्म मार्च २, १९३१ रोजी महाराष्ट्रातीलअमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर गावात झाला. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेडातील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून शिकवले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली. १९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरूजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात शेवाळकरांचा सहभाग होता. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?* हॉकी 2) *भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ?* वड 3) *भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?* मोर 4) *भारताचा राष्ट्रीय फळ कोणता ?* आंबा 5) *भारताचा राष्ट्रीय फुल कोणता ?* कमळ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • रवी कन्नावार • आकाश पाटील ढगे • गणेश पाटील हतनुरे • संतोष कदम • संभाजी सोनकांबळे • चक्रधर ढगे • शेख जुनेद • मीनाक्षी रहाणे • सुरेश मिर्जापूरे • सुबास नाटकर • धर्मगीर गिरी • नरेंद्र लखमावाड • बालाजी धारजने *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दिखावा* दाखवण्या पुरता फक्त स्वाभिमानीबाणा आहे तसे पाहिल्यास इतिहास यांचा लाजिरवाणा आहे स्वाभिमानी असल्याचा उगीच दिखावा करतात लोकांच्या नजरेत दिखावा म्हणजे नाटक ठरतात शरद ठाकर सेलू जि परभणी ८२७५३३६६७५ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या लहानपणी मुलांचं रडणं थांबविण्यासाठी कचकडी खुळखुळा होता. तो बाळाचे रडणे थांबवून त्याला हसरा करायचा. आता त्या खुळखुळ्याची जागा मोबाइलने घेतली आहे. कचकडी खुळखुळा बाळ लहान असेपर्यंत उपयोगी होता, मात्र हा नवा खुळखुळा माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत हाती राहतोय, असं दिसतयं. कचकडी खुळखुळ्यात नाद निर्माण करणारे खडे भरलेले असायचे. मोबाइलनामक खुळखुळ्यात नादाला लावणारे अॅप्स भरलेले असतात. हा खुळखुळा व्हिडीओ गेमचा नाद लावतो. हळूहळू फोन करायला शिकवतो, व्हाॅटस् अॅप शिकवतो, आठवीला गेला की 'मिस् काॅल' देऊ लागतो. युवापिढी रात्र-रात्र जागून चॅट करू लागते.* *माणूस कमवायला लागला की, मग तोंड लपवून 'फेसबुक' वर बाता मारू लागतो. लग्न झाले की, फेक अकाउंटवरून ह्रदय आणि मन मोकळं करत राहतो. कधी लाईक, कधी कमिंट, असं व्यक्त-अव्यक्त अभासी जगात जगू लागतो. गुड माॅर्निंग, गुड इव्हिनिंग, स्वीट ड्रीम, काँग्रॅट्स करत लक्षात येतं की, हे सारं झूट ! अवतीभवती संदेश, शुभेच्छा, सहवेदनांचा पाऊस; पण प्रत्यक्ष नक्षत्र मात्र कोरडंच ! अभासी जगात वाढलेली पिढी कोरडे जग जगताना आपण अनेकदा पाहतो. खरे पाहिले तर खुळखुळा, मोबाइल हे सारे त्या त्या काळातील अभासी भावच ! माणूस भावाचा भुकेला असतो. अभासी, भोगी संस्कृतीच्या जागी वास्तव, संवेदी, जीवाभावाची संस्कृती जपायची तर प्रसंगी जीव देऊन भाव, संबंध, नाते जपणे, जोपासणे म्हणजेच खरं जगणं !!!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀ ☀ ☀ ☀ ☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• धरती करते एक पग, करते समुद्रा फाल हातों पर्वत तौलते, ते भी खाये काल । सारांश जगी ज्याचा जन्म झाला .त्याला मृत्यूने गिळंकृत केले आहे. हे महात्मा कबीर आपल्या उपदेशपर अमृतवचनातून माया मोहाच्या बंधनात गुरफटलेल्या मानव प्राण्यास मृत्यूची जाणीव करून देताना सांगतात. वामनाची महत्ती सांगताना पुराण कर्त्यानं लिहून ठेवलंय की वामनानं एकाच पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली. हनुमानाने जन्मत:च एका उड्डाणात सूर्याला जेरीला आणले. सृष्टीच ज्याच्यावर अवलंबून आहे. त्यालाच गिळंकृत करायला निघाल्यामुळे, आता आपलं कसं होणार ? म्हणून सूर्य हनुमानापुढे निस्तेज पडला. आता आपलं कसं होणार म्हणून सर्वजण काळजीत पडले. याच हनुमानाने एकाच उड्डाणात समुद्र ओलांडला. कृष्णाने एका हाताने गोवर्धन पर्वत तोलून धरला आणि सृष्टीला वाचविले. अशा महा पराक्रमी वीरांनाही काळाने सोडलेले नाही. तिथं सामान्य जीवांचं काय चालणार आहे ! नको नको मना गुंतू मायाजाळी, काळ आला जवळी ग्रासावया । काळाची ही उडी पावेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप । या तुकोबांच्या ओळी किती समर्पक आहेत . जीवनात मृत्यू हे अंतिम सत्य आहे . माणूस कितीही महापराक्रमी असला किवा त्याने संपूर्ण जगाला ओरबाडून संपत्तीचा मुबलक साठा केला तरी त्याचे मरण अटळ आहे. जगज्जेत्या सिकंदराचे शेवटचे बोलही याचीच प्रचिती देतात. म्हणून माणसानं माणसासारखं वागून मानव जन्म सार्थक करावा. जीवनात समाधान प्राप्त करावं . कोण जाणे कोणत्या क्षणी आपल्याला काळाचं बोलावणं येईल आणि आपली खेळी संपुष्टात येईल ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• रंग कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी रंगांना कधीच भेदभाव,जातियता, प्रांतियता किंवा विषमता नाही.त्यांना कुठेही कॅनव्हासवर,कागदावर किंवा भिंतीवर वापरा कधीच काही म्हणत नाहीत.कितीही आणि कुठेही वापरले किंवा मिसळले तरी त्यांच्या वेगवेगळ्या छटा सौंदर्यात भर टाकतात आणि पाहणा-याच्या दृष्टीत अगदी सहज भरुन जातात. पाहाराही थक्क होऊन जातो तो विचार करायला लागतो की, वेगवेगळे असूनही एकात्मतेचे दर्शन घडवतात हे त्यांच्याकडून खरेच शिकायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दिनानात हा राम कोदंडधारी। पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥ मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२८॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चांगल्या विचाराची जोपासना* दोन साधू नदीच्या काठी आपले हात पाय धुवत होते. तेव्हा त्यांना एक विंचू बूडत असताना त्यांना दिसला. त्या साधूंपैकी एकाने लगेच त्याला ओंजळीत घेवून बाहेर काढले. पण त्याच वेळी त्या साधुला विंचुने डंक मारला आणि विंचु परत नदीत पडला. परंतु साधूने परत त्याला उचलुन घेतले तरी परत त्या विंचूने साधूला डंक मारला. हे बघुन दुसऱ्या साधूने त्या साधूला विचारले तो विंचू तुम्हाला सारखा डंक मारतो पण तुम्ही परत त्याला वाचवता का? त्यावर त्या साधूने अतिशय चांगले उत्तर दिले, 'डंक मारने हा त्याचा नैसर्गिक गुण आहे पण त्याला वाचविणे हा माझा नैसर्गिक गुण आहे'.. *लोक कितीही तुम्हाला त्रास देवो तुमचे चांगले कार्य मात्र सतत चालू ठेवा. काही क्षुल्लक लोकांसाठी तुमचे विचार कधीही बदलू नका.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*अभिनंदन* अभिनंदन करीत आहे सारे भारतभूमीचा वीर सुपुञा.... धडाडीचे कार्य करून परतलास तू मायदेशी असा वीर जन्मलास तू भारत मातेचा उदराशी अभिनंदन करीत आहे सारे भारतभुमीचा विर सुपूञा...... लाख मानावे तुझे आभार तरीही नाही फिटणार भार अशी विरता तुझी अपार मातृभूमीसाठी तू लढणार अभिनंदन तुझे करीत आहे सारे भारतभूमीचा वीर सूपूञा....... अभिनंदनास अभिनंदनाचा अर्पूया वर्षाव शब्दसुमनांचा अभिमान वाटावे असे वागणे आहे तुझे शौर्य आणि विरतेचे अभिनंदन तुझे करीत आहे सारे भारतभूमीचा विर सुपूञा........ धन्य धन्य ती माता धन्य धन्य तो पिता असा पुञ जन्मला धाडसास तुझ्या वंदन करीतो शतशः अभिनंदन तुझे करित आहे सारे भारतभूमीचा सुपूञा...... 🙏🙏🙏🙏🙏🙏 ✍©श्रीमती प्रमिला सेनकुडे. ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰
माझा परिचय *नावः श्रीमती प्रमिला कुंडलीक सेनकुडे (शिंदे)* *पदः सहशिक्षिका* *सध्या कार्यरत शाळाः जि.प.गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड.* शिक्षणः B.A.(Ded ) छंद व आवडः सामाजिक कार्याची आवड, संघटणात्मक कार्याची आवड, (काव्य , चारोळी, लेख) लिखाणाचीआवड, शैक्षणिक विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची आवड.वाचनाची आवड. *प्रकाशित काव्यसंग्रह: 'वास्तव.......एक सत्य'* तसेच काव्यप्रेमी शिक्षकमंच दिवाळी अंक, आम्ही काव्यस्तंभ विशेषांकात प्रसिद्ध कविता. *भुषवित असलेले पदः* १) म.रा.प्रा.शिक्षक महिला आघाडी संघ जिल्हासरचिटणीस नांदेड. २) रोटरी क्लब सदस्या हदगाव. ३) काव्यप्रेमी शिक्षकमंच नांदेड जिल्हाउपाध्यक्षा ४) जिजाऊ ब्रिगेड तालुका हदगाव कार्याध्यक्षापदी 〰〰〰〰〰〰〰 *मिळालेले पुरस्कार व* *सन्मानः* १) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम शिक्षणाची वारी सन्मानपञ २) आई गौरव पुरस्कार (होप सामाजिक संस्था उमरखेड) ३) हदगाव तालुकास्तरीय 'गुणी' शिक्षक गौरव पुरस्कार ४)'गौरव कर्तृत्वाचा' (कै.देवराव प्रभुजी पाटील सेवाभावी संस्था शाखा वाटेगाव.) ५) 'गौरव गुणवंताचा' पुरस्कार (सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादित जिल्हा परिषद नांदेड.) ६) मुलींची १००% पटनोंदणी पुरस्कार (प,स.हदगाव) ७) कुसुमताई चव्हाण 'महिला भूषण' पुरस्कार नांदेड ८) म.अॕ.पॕनल(MAP) तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (नाशीक) ९) रोटरी क्लब, हदगाव तर्फे (Nation Builder Award) १०) गुरुकुल महाराष्ट्र समूहातर्फे गौरव चिन्ह ११) मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे राज्यस्तरीय काव्य पुरस्कार १२) 'आम्ही सावित्रीचा लेकी' पुरस्कार (राज्यस्तरीय उपक्रमशिल शिक्षिका समूह) १३) अखिल.म.प्रा.शिक्षक संघ ता.हदगाव गौरव समारंभ सन्मान. १४) स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्था हदगाव/हिमायतनगर तर्फे सतत दोनवेळेस सत्कार व सन्मानचिन्ह (२०१७ व २०१८ ला) १५) मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे 'गुरू गौरव' पुरस्कार १६) 'आस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना' तर्फे ' राज्यस्तरीय अध्यापक पुरस्कार' १७) छञपती शिवाजी राजे प्रतिष्ठाण नांदेड चा वतीने श्री गुरूगोविंदजी प्रेरणा पुरस्कार १८) विविध स्पर्धांची आॕनलाइन सन्मानपञे. 〰〰〰〰〰〰〰(02-03-2019)शुक्रवार
Subscribe to:
Posts (Atom)