✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 फेब्रुवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/01-26.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_२९ फेब्रुवारी लीप दिवस (लीप वर्ष)_* *_ या वर्षातील ६० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_पृथ्वीला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे३६५ दिवस लागतात. खगोलशास्त्रीय आकडेवारीनुसार नेमका कालावधी३६५.२४२ दिवस इतका असतो. दरवर्षी०.२४२दिवसाचा वाढीव कालावधी शिल्लक राहतो. चार वर्षांमधील हा वाढीव कालावधी एकत्रित करुन त्याचा एक दिवस पूर्ण केला जातो.फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस असल्यामुळे त्याला जोडून ‘लीप दिवस’ साजरा केला जातो._**२०१२:६३४ मीटर उंचीच्या टोकियो स्काय ट्री या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले.**२००८:अर्थसंकल्पात चार कोटी शेतकऱ्यांसाठी साठ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी**२०००:शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.**१९९६:क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.**१७७६:इंग्रज आणि मराठे यांच्यात प्रसिद्ध पुरंदरचा तह* *_जन्मदिवस/ वाढदिवस/जयंती:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:अॅडम सिंक्लेअर-- हॉकी खेळाडू**१९७६:सुधाकर तेलंग -- प्रसिद्ध कवी तथा शिक्षण उपसंचालक* *१९५६:महमूद कादिर याकुब रखांडी -- लेखक**१९५२:सुहास पटवर्धन-- लेखक**१९३०:प्रा.डॉ.वसंत दामोदर कुलकर्णी -- लेखक* *१९४०:शरदचंद्र कोपर्डेकर - लेखक संपादक* *१९३६:विष्णू जयंत बोरकर -- कादंबरीकार, कथाकार* *१९०४:वत्सलाबाई आंबेगावकर -- बालसाहित्यिक,लेखिका* *१९०४:रुक्मिणीदेवी अरुंडेल --भरतनाट्यम नर्तिका (मृत्यू:२४ फेब्रुवारी १९८६)**१८९६:मोरारजी देसाई -- भारतरत्न,भारताचे ४ थे पंतप्रधान(मृत्यू:१० एप्रिल १९९५)**१८२८:नारायण दाजी लाड: रसायनशास्त्र सचित्र व औषधविद्या हे ग्रंथ विलक्षण गाजले* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••*१९५६:एल्पिडियो क्विरिनो-- फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१६ नोव्हेंबर १८९०)**१९४०:एडवर्ड फ्रेडरिक-- इंग्लिश लेखक (जन्म:२४ फेब्रुवारी १९४७)**१९२०:नारायण तथा बापूराव बाळकृष्ण लेले -- ज्येष्ठ पत्रकार* *१५९२:अलेस्सांद्रो स्ट्रिजियो-- इटालियन संगीतकार*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बालपणीचे संस्कार*एकूण 27 भाग वाचण्यासाठी..... वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर, बचत गटाच्या अडीच लाख महिलांचा मेळावा, राज्यातल्या कोट्यवधींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *निलेश राणेंच्या मालमत्तेवर पुणे महापालिकेची कारवाई, पावणे चार कोटींची थकबाकी असल्याने कारवाईचा बडगा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तलाठी भरती प्रक्रियेबाबत केलेल्या खोट्या आरोपानंतर रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु; महसूलमंत्री विखेंची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बारावीची परीक्षा असल्याने 3 मार्चपर्यंतचे आंदोलन स्थगित, फक्त धरणे आंदोलन सुरू राहणार, मनोज जरांगेंची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जहांगीर आर्ट गॅलरीत २८ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत प्रदर्शन, राज्यपालांच्या हस्ते ४७ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा सत्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अशोक सराफ आणि रुतुजा बागवे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *यशस्वी जैस्वालची गगनभरारी ! ICC Ranking मध्ये घेतली हनुमान उडी, विराटच्या जवळ पोहचला !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *गरम पाण्याचे झरे* 📙हिमालयात प्रवासाला जाणारे परतल्यावर नेहमीच एक आश्चर्याचा किस्सा सांगतात. गंगोत्रीच्या वाटेवर वाटेत काही कुंडे लागतात. कुडकुडणारी थंडी, दूरवर डोंगरमाथ्यावर सफेद बर्फाचे थर आणि या कुंडातून मात्र पाण्यातून चक्क वाफा निघत असतात. हात बुडवला तर चटका बसतो. एवढेच नवे अनेक जण जवळचे तांदूळ त्या पाण्यात काहीवेळा कापडी पुरचुंडी बांधून धरतात व आयता शिजलेला भात खातात. हे पाणी काढून मनसोक्त आंघोळ करण्याचा मोहही कोणी आवरून धरत नाही. असाच पण जरा वेगळा अनुभव वज्रेश्वरीला महाराष्ट्रात येतो. पण येथील झऱ्यांचे पाणी गंधक मिश्रित उग्र वासाचे आहे. येथील उष्ण पाण्यात अंघोळ करून निसर्गोपचार करून घेणाऱ्यांचीही कायम गर्दी उसळलेली असते. जगात असे गरम पाण्याचे कित्येक झरे आहेत. तसेच फक्त वाफेचेही झरे आहेत. वाफेच्या झर्‍यातून फक्त जोरात वाफ उसळून एखाद्या प्रेशरकुकरप्रमाणे तेथे शिट्टीचा आवाजही येत राहतो. या सगळ्या प्रकाराचे मूळ भूगर्भात खोलवर घडणाऱ्या घडामोडीत आहे. सुमारे तीस एक किलोमीटर खोलीवर तप्त मध्यावरणाचा पाण्याच्या वाहत्या साठ्याशी संबंध येतो. तिथे वाफ कोंडू लागते. या वाफेच्या दाबाने जमिनीतील खडकातील काही भेगांतून मार्ग काढला जाऊ शकतो. त्यातूनच हे झरे निर्माण होतात. काही ठिकाणी ज्वालामुखीच्या मुखापासून काही ठराविक अंतरावर प्रथम वाफेचे व नंतर गरम पाण्याचे झरे सलगपणे आढळतात. पण अनेक ठिकाणी ज्वालामुखीचा अलीकडच्या ज्ञात काळात कधीच संबंध आलेला नसतो. हेही लक्षात घ्यायला लागेल. यातही एक मोठा फरक आहे. वाफेचे झरे मधूनमधून नाहीसे होतात, पण गरम पाण्याचे झरे मात्र सलगपणे वर्षानुवर्षे उकळताना दिसतात. काही झर्‍यांत गंधकाचा अंश सापडतो. ते नक्कीच ज्वालामुखीच्या उगमाशी संबंधित असावेत असा संशय घ्यायला जागा आहे.पृथ्वीचा गाभा अत्यंत गरम आहे मध्यावरणही अतितप्त आहे. पण बाह्यावरणाचा काही भाग बऱ्याच ठिकाणी भरपूर गरम आहे असेही लक्षात आले आहे. आईसलँड, न्यूझीलंड येथील काही भागात जेमतेम एक ते तीन किलोमीटर अंतर खोलवर बोअरिंगचे छिद्र पाडले असता भूगर्भातील गरम पाणी व वाफ मिळवता येते असा अनुभव आहे. जरी एवढे खोल छिद्र पाडणे अत्यंत महागडे असले तरी यातून मिळणारी ऊर्जा ही अनेक वर्षे पुरणार असल्याने हा खर्च परवडतो. हे गरम पाणी वा वाफ वापरून घरे उष्ण ठेवण्याचा वा विद्युतनिर्मिती उद्योग यातूनच केला जातो. येथेही गमतीचा भाग कसा आहे बघा. आइसलँड व न्यूझीलंडसारख्या थंड प्रदेशातही निसर्गाने ही सोय करून ठेवली आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती श्रेष्ठ.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'मेटा'चे संस्थापक कोण आहेत ?२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'बोधिसत्त्व' ही उपाधी कोठे प्रदान करण्यात आली ?३) अमेरिकेच्या पहिल्या व्यावसायिक अवकाश यानाचे नाव काय आहे ?४) एकही नदी नसलेला देश कोणता ?५) आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहानंतर अनेक तरुण - तरुणींना सुरक्षित निवारा देण्याच्या उद्देशाने राष्ट्रातील पहिले आश्रयस्थळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे ? *उत्तरे :-* १) मार्क झुकरबर्ग २) काठमांडू, नेपाळ ३) ओडिसिस ४) सऊदी अरब ५) वाई*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 आनंद बालाजी आनेमवाड, तंत्रस्नेही शिक्षक👤 सुरज आहेर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहर्निश सदा परमार्थ करावा । पाय न ठेवावा आडमार्गी ॥१॥आडमार्गी कोणी जन ते जातील । त्‍यातुनि काढील तोचि ज्ञानी ॥२॥तोचि ज्ञानी खरा तारी दुजीयासी । वेळोवेळा त्‍यासी शरण जावे ॥३॥आपण तरेल नव्‍हे ते नवल । कुळे उध्‍दरील सर्वांची तो ॥४॥शरण गेलियाने काय होते फळ । तुका म्‍हणे कुळ उध्‍दरीले ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा आपली परिस्थिती चांगल्याने सुधारते त्यावेळी लाखो रूपयाच्या घरात जुन्या सामानाची आपल्याला अडचण होत असते. वेळ आल्यावर त्याला बाहेर सुद्धा ठेवल्या जाते.तसंच परखडपणे बोलणाऱ्या किंवा विचार मांडणाऱ्याला बाजूला सारण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जाते. जेव्हा, गुलामगिरी पत्करली जाते व बुध्दी गहाण ठेवली जाते त्यावेळपासून जीवनाची दिशाच बदलून जाते. भलेही जुने सामान फेकल्याने आपली अडचण दूर होत असेल पण, स्पष्ट व सत्य बोलणाऱ्याला कितीही दूर सारण्याचा प्रयत्न जरी केले तरी काहीच फायदा होत नाही कारण तो, स्वयंप्रकाशित असतो. म्हणून सत्य नेमकं काय असते जाणून घेण्याचा सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे,असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने जीवनाचे सार्थक होण्यास मदत होईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?' त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ शोभिवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्‍हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.*तात्पर्य - मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणा मागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment