✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~दि. 23/07/2022वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 . *दिनविशेष . * 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोकमान्य टिळक जयंती* 💥 ठळक घडामोडी :-● १९६८ - अल ऍलच्या बोईंग ७०७ प्रकारच्या विमानाचे रोममधून अपहरण.●१९७० - ओमानमध्ये राजकुमार काबूस इब्न सैदने आपल्या वडिल, सैद इब्न तैमूरला पदच्युत करून सत्ता बळकावली.💥 जन्म :-◆१८५६ - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी.◆१९०६ - चंद्रशेखर आझाद, भारतीय क्रांतिकारक.◆ १९१७ - लक्ष्मीबाई यशवंत भिडे (ऊर्फ माई भिडे), मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री.◆१९७३ - मोनिका लेविन्स्की, व्हाइट हाउसमध्ये काम करणारी स्त्री.◆ १९७५ - सूर्य शिवकुमार, तमिळ अभिनेता.💥 मृत्यू :-■ १९९७ - वसुंधरा पंडित, भारतीय गायिका.■ २००४ - मेहमूद, हिंदी चित्रपट अभिनेता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, यात 'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाला 'सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा', तर अजय देवगणच्या 'तान्हाजी'ला 'लोकप्रिय हिंदी सिनेमा'चा पुरस्कार जाहीर झाला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *CBSE बारावी बोर्डाचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा निकाल 90.48 टक्के CBSE परीक्षेत मुलींची बाजी! तान्या सिंहने मिळवले 500 पैकी 500 गुण*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *उद्यापासून चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बत्तीस शिराळ्याच्या नागपंचमीवर राहणार ड्रोनची नजर, सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईसह 13 महापालिकांचे आरक्षण नव्यानं जाहीर होणार, सर्वसाधारण महिला प्रवर्गाचं आरक्षण रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचे आज पुण्यात निधन, वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि वेस्ट इंडिजच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा तीन धावांनी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - ब्लू व्हेल*https://storymirror.com/read/story/marathi/p5b2dmy2/blu-vhel/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌍 *पृथ्वीच्या पोटात किती उष्णता असते ?* 🌍पृथ्वीचा जन्म झाला तेव्हा तो एक धगधगता तापलेला वायूचा गोळा होता, असं आपण नेहमी ऐकतो. ते खरंही आहे. वैज्ञानिकांच्या मनात त्याबद्दल दुमत नाही. जोवर तो असा तापलेल्या वायूंचा गोळा होता तोवर त्याला कोणतंही ठोस रूप नव्हतं ; पण जसजसा काळ उलटत गेला तो तापलेला गोळा थंड होत गेला. त्या गोळ्याला रूप येऊ लागलं. उंच सखल भूप्रदेश तयार झाले. सतत वाफेच्या रूपात असलेलं पाणी द्रवरूप झालं. त्याचे सागर झाले. हळूहळू पृथ्वीचा पृष्ठभाग निवला. इतका की सजीव सृष्टी त्यावर अवतरली, रुजली, फोफावली. तरीही पृथ्वीचा गाभा मात्र तापलेला राहिला आहे. तिथं असले उष्णता अजूनही कायम आहे. उन्हाळ्यात धरती तापते तेव्हा उन्हाच्या काहिलीपासून आपलं रक्षण करण्यासाठी काही प्राणी बिळात जाऊन बसतात. विशेषत: वाळवंटी प्रदेशात हे दिसून येतं. त्यामुळे पृथ्वीच्या पोटात थंडावा आहे असा समज होतो. पण तो खरा नाही. पृष्ठभागाला तापवणारा सूर्यप्रकाश मातीच्या काही थरांमुळे झाकला गेला की तापमान काहीसं घसरतं. पृथ्वीच्या पोटात जसजसे आपण शिरत जाऊ तसतसा तो भाग उष्णच असल्याचं स्पष्ट होतं.पृथ्वीच्या पोटात किती उष्णता आहे, याची माहिती वैज्ञानिकांनी मिळवलेली आहे. त्यानुसार पृथ्वीच्या गाभ्याचं तापमान ४०००अंश सेल्सिअस आहे. याचं नीट आकलन होण्यासाठी आपण काही तुलनात्मक आकड्यांचा विचार करू शकतो. सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान ५००० अंश सेल्सिअस आहे. म्हणजे पृथ्वीचा गाभाही साधारण तेवढाच तापलेला आहे. आपल्या नेहमीच्या अनुभवातले आकडे सांगायचे तर पाणी समुद्रसपाटीवर १०० अंश सेल्सिअसला उकळतं. साठ अंश सेल्सियसपेक्षा जास्त गरम असलेल्या पाण्यानं अंग भाजून निघू शकतं. आजवर पृथ्वीवर सर्वात जास्त नोंद झालेलं तापमान ५८ अंश सेल्सिअस आहे. १९२२ मध्ये लिबियामध्ये त्याची नोंद झाली होती.पृथ्वीचा गाभा लोह आणि निकेल या धातूंचा बनलेला आहे. लोहही साधारण १५३५ अंश सेल्सियसला वितळतं. मग पृथ्वीचा गाभा संपूर्णपणे द्रवरूप लोहाचा आहे, असा समज होईल; पण त्या लोहाला प्रचंड दाबही सहन करावा लागतो. जसजसा दाब वाढत जातो तसतसा कोणत्याही पदार्थाचा उत्कलनबिंदू चढत जातो, त्यामुळे ४००० अंश तापमान असूनही लोह वितळत नाही. मात्र ते अतिशय तापलेलं असतं. त्या गाभ्याच्या वरच्या थरातलं तापमान तुलनेने कमी असतं. त्यामुळे ४००० अंश तापमान हे सरासरी तापमान असावं आणि अगदी केंद्रबिंदूजवळ गेल्यास ते त्याहूनही अधिक असावं असं काही वैज्ञानिकांचं मत आहे.*बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••दुसऱ्याच्या चुकामधुन शिका, कारण स्वत:च्या चुकांमधुन शिकायला आयुष्य फार थोड असत - आर्य चाणक्य*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताचे १५ वे नवनिर्वाचित राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली ?२) भारताची पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती कोण ?३) भारताची दुसरी महिला राष्ट्रपती कोण ?४) देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्म झालेल्या पहिल्या राष्ट्रपती कोण ?५) एनडीएच्या राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून कोणाची निवड झाली होती ?*उत्तरे :-* १) मा. द्रौपदी मुर्मू २) मा. द्रौपदी मुर्मू ३) मा. द्रौपदी मुर्मू ४) मा. द्रौपदी मुर्मू ५) मा. द्रौपदी मुर्मू*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● उदयकुमार शिल्लारे● प्रदीप दळवी● संतोषसुवर्णकार● लक्ष्मण मलगिरे● जितेंद्र पाटील● वैभव पाटील● विक्की पाटील● अविनाश धुप्पे● शंकर बोईनवाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*माणूस जोवर जिवंत असतो, तेंव्हा त्याच्या अपेक्षा असतात. इच्छा असतात. त्या कुणाच्या गावाला पोहचत नाहीत. त्याच्या आकान्तहाका कुणाला ऐकू येत नाहीत. नंतर मात्र त्याच्या कौतुकाचे पाढे सुरू होतात, पोवाडे गायले जातात. जिवंतपणी त्याच्या हाकांचा कानोसा घेतला असता, तर नक्कीच त्याच्या जगण्याचे काही दिवस वाढले असते. भुकेल्याची अपेक्षा फार नसते, त्यास भाकर हवी असते, तहानलेल्याला पाणी, कष्टक-याला त्याच्या घामाचा मोबदला, कलाकाराला त्याच्या कलेची दाद, एवढीच तर अपेक्षा असते... फक्त एक सेकंद जगण्याची... पण त्याच्या हयातीत आपल्याला पकडता येत नाही त्याचा जिवंत सेकंद..**सोनं तोळ्यात मापतात. मात्र, त्याहीपेक्षा माणसाचा माणसासाठीचा कौतुकाचा, जिव्हाळ्याचा शब्द महागला आहे. माणसाचं अपयश हे की तो पैसे मिळविण्याचं तंत्र तर शिकलाच; तंत्रज्ञानालाही त्याने असे आत्मसात केले की तंत्रमानव म्हणून कुशल झाला. पृथ्वीवर तर त्याने सत्ता काबीज केलीच, पण आज तो इतर ग्रहावरही चढाई करतोय. मात्र जिवंत राहण्याचं तंत्र तो शिकू शकला नाही. जगण्या-मरण्यातल्या एका श्वासांचं अंतर जेव्हा माणसास कळेल तेव्हा त्याच्या आत माणुसकीचा दीप तेवून उठेल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर हरि सो हेत कर,कोरै चित ना लायेबंधियो बारि खटीक के,ता पशु केतिक आये।सारांशकबीरा हरी स्मरण करनको मनी कचर्‍याचा भरकसाया दारी बांधला पशूतया आयुष्याचा विचार कर महात्मा कबीर म्हणतात की ईश्वराशी नाते जोड. जो सर्वत्र भरून उरला आहे. तो वार्‍याच्या रूपाने तुझ्याशी संवाद साधतो. पाण्याच्या रूपाने तुझे तन मन शितल करतो. प्रकाशाच्या रुपाने तुझं अंतरंग उजळून टाकतो. मात्र तू तर वरवरच्या बाह्य प्रतिक रुपालाच भुलतो आहेस. तू स्वार्थाने अंध होऊन ईश्वराचं सर्वव्यापी रूपंच विसरून गेला आहेस. अशा वरवरच्या ढोंगी भक्तीने तुला ईश्वराचं सत्य स्वरूप कसं काय कळणार आहे? शिवरूप तर सर्वत्र भरून आहे. निसर्गाच्या आविष्कारात ते सामावलेलं आहे. ते कळलंच नाही तर सुंदराचा कसा साक्षात्कार होईल बरे ! पळापळाने आयुष्य मृत्यूकडे धाव घेत आहे. मानवी जन्म जणू कसायाच्या दारी बांधलेल्या पशूसमान आहे. त्या पशूवर कसाई कोणत्या क्षणी सुरी चालवील काय माहित ? आयुष्याची क्षणभंगुरताही तशीच आहे. तुझ्याकडे उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून घे. तो सत्कारणी लाव. से प्रेम करो। अपने चित्तात भरलेला विकारांचा कचरा भिरकावून दे. शिवस्वरूप सत्याचा अंगिकार कर. जीवनातल्या सुंदरतेच्या जागा परमानंदाने भरून घे . एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही कामात सातत्याने करत असलेले प्रयत्न आणि त्यात मिळालेले यश हे तुमच्या मनाला समाधान देणारे आहे.प्रयत्नातून मिळालेला आनंद हा तुमच्या जीवनात अधिक महत्वाचा आहे.- व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद.9421839590•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनशांती*एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल .एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले.काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस."तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला. जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली.ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो."एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?"तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले."एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले, "हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.*ता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment