✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 05/07/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-१९७५- 'देवी' या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.१९९६- संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ ए पी जे अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना 'आर्यभट्ट पुरस्कार'जाहीर२००४ - इंडोनेशियात प्रथमतः राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका.२००६ - उत्तर कोरियाने प्रतिबंधांना न जुमानता नोडाँग-२, स्कड व तेपोडाँग-२ ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली💥 जन्म :-१८८२ - हजरत इनायत खान, शास्त्रीय गायक. १९१६ - आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण, कवि, वक्ते. धारवाड मध्ये. १९१६-के. करूणाकरन,केरळचे माजी माजी मुख्यमंत्री१९४६-रामविलास पासवान,केंद्रीय मंत्री💥 मृत्यू :-१६६६ - आल्बर्ट सहावा, बव्हारियाचा राजा.१९४५ - जॉन कर्टीन, ऑस्ट्रेलियाचा १४वा पंतप्रधान.२००४ - ह्यू शियरर, जमैकाचा पंतप्रधान.२००५-बाळू गुप्ते,लेग स्पिन गोलंदाज*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - आठवण गावाची*https://storymirror.com/read/story/marathi/li2r4x05/aatthvnn-gaavaacii/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🦅 *पक्षी केव्हा स्थलांतर करतात ?* 🦅रोटी, कपडा और मकान या मनुष्यप्राण्याच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. यातला कपडा ही केवळ मनुष्यप्राण्याचीच गरज आहे. पण रोटी व मकान यांच्या गरजा मात्र प्राणिसृष्टीच्या प्रत्येक सदस्याला भासतात. त्यामुळे त्यांची जिथे चांगली सोय होईल तिथेच जास्तीत जास्त वास्तव्य करण्याकडे प्रत्येक प्राण्याचा कल असतो. तो प्रदेश हा त्या प्राण्याचा नैसर्गिक अधिवास बनतो. त्या क्षेत्रात त्याला मुबलक अन्न मिळतं, पाण्याची सोय होते, राहण्याची गुहा मिळतात किंवा घरटी बांधता येतात. आपलं पुनरूत्पादन करून पुढची पिढी जन्माला घालण्यासाठी सर्व प्रकारे योग्य वातावरण लाभतं. आपला कळप वाढवता येतो. पक्षी हे प्राणीसृष्टीचाच अविभाज्य भाग असल्यामुळे त्यांनाही हे लागू पडतं. परंतु या अधिवासातील पर्यावरण सतत तसंच राहत नाही. ऋतुमानानुसार त्यात फरक पडत जातो. तापमान बदलतं. पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं. फळांचाही हंगाम असतो. तो ओसरला की तीही मिळेनाशी होतात. किडामुंगीही या बदलत्या पर्यावरणाला अनुसरुन आपल्या बिळात गडप होण्याची धडपड करतात. अन्नाची चणचण भासू लागते. तापमानही सुसह्य राहत नाही. अशा परिस्थितीला तोंड देत तगून राहण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. अशा वेळी ते स्थलांतर करतात. तरीही या स्थलांतरासाठी इतर काही घटना घडण्याची आवश्यकता भासते. पर्यावरण प्रतिकूल होत चाललं की पक्ष्यांच्या शरीरात काही विशिष्ट संप्रेरकांचा स्त्राव होऊ लागतो. तो त्यांना उडत जात दूरचा पल्ला गाठण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा आणि ताकद देतो. तसंच हा दूरचा पल्ला गाठण्यासाठी शरीरही बळकट करावं लागतं. दीर्घ काळपर्यंत उडत राहण्यासाठी स्नायूंना बळकटी यावी लागते. त्यासाठी जेव्हा अन्न मुबलक प्रमाणात मिळत असतं तेव्हा ते खाउन शरीर लठ्ठ करावं लागतं. चरबीचा साठा करावा लागतो. तो पर्याप्त झाल्याशिवाय स्थलांतर करता येत नाही. बहुतांश पक्षी स्थलांतर करताना सहा ते आठ हजार मीटर उंचीवरुन उडत राहणं पसंत करतात. कारण त्या उंचीवरचं घसरलेलं तापमान सतत उडत राहण्यामुळं शरीरात जी उष्णता निर्माण होते तिचा निचरा करण्यासाठी उपयोगी पडतं. तसंच पक्षी एकेकटे कधीच स्थलांतर करत नाहीत. त्यांचा कळपच्या कळप या प्रवासावर निघतो. काही पक्षी तर हजारो किलोमीटर दूरवरच्या तात्पुरत्या अधिवासाच्या प्रदेशात स्थलांतर करतात. तो आपल्या विणीच्या हंगामासाठीही उपयुक्त आहे याची खातरजमा त्यांनी करून घेतलेली असते. त्याचा शोध त्यांनी पूर्वीच घेतलेला असतो व तिथं जाण्याची वाटही त्यांच्या आठवणीत साठवून ठेवलेली असते. त्यामुळं नेहमीच्या नैसर्गिक अधिवासातली परिस्थिती प्रतिकूल बनली, शरीरातल्या चरबीचं प्रमाण पुरेसं वाढलं, अंगात संप्रेरकांचा पाझर पर्याप्त झाला आणि सगळ्या कळपाची तयारी झाली की पक्षी स्थलांतर करतात.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Health is wealth.*(चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.)*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1) *लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* महाराष्ट्र2) *दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* जम्मु काश्मीर3) *चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* उडीसा4) *सांभर सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* राजस्थान5) *वुलर सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* जम्मू काश्मीर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● डॉ. मनोज तानुरकर● गंगाधर कांबळे● गिरीश कहाळेकर● संतोष शेळके● फारुख शेख● नरेश शिलरवार● अजय चव्हाण● गजानन बुद्रुक● बालकिशन कौलासकर● रमेश अबुलकोड● किशन कवडे● सुधाकर चिलकेवार● बबलू दबडे● परमेश्वर अनिल कवडेवार● सुदर्शन पाटील● मोतीराम तोटलोड● नागनाथ भत्ते● मारोती कदम● अनिल गायकांबळे● चक्रधर ढगे● सुभाष कुलकर्णी● राजरेड्डी बोमनवाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.**काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.**"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही, त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."*संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••नागिन के तो दोये फन,नारी के फन बीसजाका डसा ना फिर जीये, मरि है बिसबा बीस।सारांश महात्मा कबीर व्यभिचारी व दुराचारी स्त्री-लंपटाना वरील दोह्यातून सचेत करतात. सापिनीला तर केवळ दोनच दात असतात. तिचा दंश झाला तर वैद्याकडून विष उतरवून टाकता येईल. परंतु स्त्रिला वीस दात असतात. तिचा दंश ज्याला झाला त्यातला कोणीही जीवित सुरक्षित राहू शकत नाही. तिचा दंश जर वीस लोकांना झाला तर वीसचे वीस मरून जातील. काम भावना सीमित असली पाहिजे. तिचं संतुलन राखता आलं पाहिजे. काम भावनेचं संतुलन बिघडलं की ती माणसाच्या आवाक्यात राहात नाही. ती त्याला मन मानेल तशी नाचवते. परिणाम स्वरूप माणूस अधःपतित होतो. लोक लज्जेचा , हेटाळणीचा विषय होतो. मग ती ईश्वरांची रूप मानलेली पात्र असोत की सामान्य जण साबुत राहात नाहीत. शंकर , इंद्र, चंद्र, रावणाचे चारित्र्य या माया मोहिणीने डागाळून टाकले. तिथं सामान्यांची काय बात घेऊन बसला आहात. यावर चांगदेवांच्या पुढील ओळी फारच बोलक्या आहेत.वासनेच्या मागे नको धावू मनापहा त्या रावणा काय झालेचंद्रा पडली भगे इंद्र झाला काळानारद चुकला चाळा भजनाचा अगदी अलीकडे समाजानं ज्यांना डोक्यावर घेतलं होतं अशा संत म्हणवून घेणार्‍यांनी स्व-संतुलन हरवून वासनेच्या आहारी जावून आज ते गजाआड दुर्दशेचे भोग भोगत आहेत. भल्या भल्यांची मायेनं अशी वासलात लावून टाकलीय. मात्र ज्यांनी स्वतः वरील नियंत्रण ढळू दिलं नाही. अशी पात्रंही कमी नाहीत की जी अनुकरणास पात्र ठरलीत. शुक, भीष्म हे निश्चयाचे महामेरूच होते. जगद्गुरू तुकोबारायही माया मोहात गुरफटलेल्या जीवांना पाहून हताश होवून म्हणतात बुडती हे जण न देखवे डोळा ।येतो कळवळा म्हणोनिया । तेव्हा माणसानं आपण अवहेलनेचे धनी होणार नाहीत . याची जाणीव ठेवून वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. तुकोबांनी सांगितलेलं 'पराविया नारी माऊली समान...' हे सुत्र कायम जपलं जपायला हवं. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••पैसा काहीवेळी कामाला येतो आणि त्यातून उपभोगण्यासाठी वस्तू खरेदी करता येतात परंतु आशीर्वाद हा आयुष्यभर पुरत असतो आणि कोणत्याही संकटातून दूर करण्यासाठी देवासारखा पाठीशी असतो...म्हणून कुणाच्या पैशाची अपेक्षा करु नका तर कुणाच्या आशीर्वादाची अपेक्षा करा यातच खरे समाधान आहे....©व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अहंकाराचे बीज विनाशकारी*एक गाय गवत चरायला जंगलात जाते. संध्याकाळच्या वेळेस तिच्या लक्षात आले की, एक वाघ तिच्याकडे दबक्या पावलाने येत आहे. ती भीतीने इकडे तिकडे पळू लागली. वाघ सुद्धा तिच्या पाठीमागे धावू लागला. धावता धावता गाय एका तलावापाशी पोहचली आणि घाबरलेली गाय त्या तलावात शिरली..वाघ देखील तिच्या पाठीमागे त्या तलावात शिरला. त्या दोघांनाही कळून चुकले की तलाव फारसा खोल नाही आणि त्यात पाणी सुद्धा कमी आहे ,मात्र चिखल जास्त आहे. त्या दोघांमधील अंतर तसे कमी होते परंतु ते दोघेही काही करू शकत नव्हते.गाय त्या चिखलात हळूहळू रुतायला लागली. वाघ तिच्या अगदी जवळ होता, परंतु तो सुद्धा त्यात रुतायला लागला होता. दोघेही अगदी गळ्यापर्यंत रुतलेली होती. दोघेही हलू शकत नव्हते.थोड्या वेळाने गाईने वाघाला विचारले, तुझा कोणी गुरू किंवा मालक आहे का ? वाघ घुश्यात म्हणाला , मी तर या जंगलाचा राजा आहे; माझा कोणी मालक नाही; मीच ह्या जंगलाचा मालक आहे. गाय त्याला म्हणाली ,परंतु तुझी शक्ती तुला याक्षणी काहीच उपयोगाची नाही. वाघ गायीला म्हणाला की, तुझे हाल देखील माझ्या सारखेच आहेत की . तेव्हा गाय त्याला हसून म्हणाली, बिलकुल नाही माझा मालक मला संध्याकाळ झाली अजून आली नाही म्हणून शोधत येईल आणि या चिखलातून मला काढून घेऊन जाईल.थोड्या वेळाने खरंच एक माणूस आला आणि गायीला चिखलातून बाहेर काढून घरी घेऊन गेला. जाताना गाय आणि मालक एकमेकांकडे कृतज्ञतेने पहात होते, त्यांच्या मनात असून सुद्धा ते वाघाला बाहेर काढू शकत नाही कारण त्यांच्या जीवाला धोका होता.आता या कथेतून बोध हा आहे की,गाय हे समर्पित हृदयाचे प्रतीक आहे.वाघ हे आपले अहंकारी मन आहे.मालक हे ईश्वराचे प्रतीक आहे ,तर चिखल हा संसार आहे आणि संघर्ष ही अस्तित्वाची लढाई आहे.कोणावर निर्भर असणे चांगली गोष्ट नाही ,परंतु मीच श्रेष्ठ आहे, मला कोणाची मदतीची गरज नाही, हाच अहंकार विनाशाचे बीज रोवते.〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 🌺संकलन🌺*प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment