✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 11/07/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक लोकसंख्या दिन*💥 ठळक घडामोडी :-१९९४- दिल्लीच्या माजी पोलीस महानिरीक्षक किरण बेदी (तुरुंग) यांना ' रॅमन मॅगॅसेसे पुरस्कार' जाहीर.२००१-आगरताळा ते ढाका या शहरादरम्यान बससेवा सुरू झाली.२००३ - १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस सेवा पुनः सुरू.२००४ - सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला.२००६ - मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार.💥 जन्म :-१९२२-शंकरराव खरात,दलित साहित्यिक, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू.१९१६ - गॉफ व्हिटलॅम, ऑस्ट्रेलियाचा २१वा पंतप्रधान.१९३० - जॅक अलाबास्टर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.१९५० - जिम हिग्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.१९५३-सुरेश प्रभू, माजी केंद्रीय मंत्री💥 मृत्यू :-१८०४ - अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा अर्थमंत्री.१९५९ - चार्ली पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.१९८९ - सर लॉरेंस ऑलिव्हिये, ब्रिटीश अभिनेता.२००९-शांताराम नांदगावकर-गीतकार*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *नैसर्गिक शेतीचे सूरत मॉडेल संपूर्ण देशासाठी आदर्श बनेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासगार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *गडचिरोलीत मुसळधार पाऊस, आलापल्ली ते भामरागडसह अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. कोकणासह विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस पडत आहे, आता पुढील दोन दिवसही मुंबईत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईत १२ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट असणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारने सामाजिक आर्थिक जनगणनेची माहिती देशभरातील राज्यांना दिली असती तर ओबीसी समाज अडचणीत आला नसता, अशा शब्दात भुजबळ यांनी केंद्र सरकारवर केली टीका*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सूर्यकुमारचं शतक व्यर्थ, इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी हुकली, 17 धावांनी भारत पराभूत तरी मालिका 2-1 ने जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रशियात जन्मलेल्या पण कझाकिस्तानचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एलेना रायबाकिनाने विम्बल्डन स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. अंतिम लढतीत एलेनाने ट्यूनिशियाच्या ऑन्स जबेरवर 3-6, 6-2, 6-2 अशी मात केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - कानमंत्र* https://storymirror.com/read/story/marathi/ohy3fxfi/kaanmntr/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌍 *पृथ्वीचा परीघ किती आहे ?* 🌍या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी आपल्याला आपली पृथ्वी एखाद्या चेंडूसारखी गोल, गरगरीत, वाटोळी आहे हे गृहित धरायला हवं. वास्तवात ती तशी नाही. दोन्ही ध्रुवांच्या इथे ती जराशी दबल्यासारखी आहे. उलट विषुववृत्ताच्या ठिकाणी ती जराशी फुगल्यासारखी आहे. स्वतःभोवती सतत ती गरगर फिरत असते, त्यामुळे तिच्या आकारात हा फरक झालेला आहे. तरीही तिचा परीघ किती आहे हे समजून घेण्यासाठी आपण ती गरगरीत आहे, असं समजल्यास फारसा फरक पडणार नाही.आता परीघ म्हणजे कोणत्याही एका ठिकाणाहून आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाला धरून सरळ प्रवास करत निघालो तर परत त्याच ठिकाणी पोहोचेपर्यंत आपण किती मजल मारली असेल, याचं गणित आहे. तेव्हा अशा प्रवासासाठी असलेल्या साधनांवरूनच आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतो.पृथ्वीच्या काळी समुद्रावर प्रवास करणाऱ्या नावाड्यांना आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत हे समजण्यासाठी फारशी साधने नव्हती. त्यामुळे आकाशातल्या ग्रहगोलांनाच विचारात त्यांची वाटचाल होत असे. उत्तर गोलार्धात ध्रुवतारा उत्तर दिशा दाखवत असे. त्याच्यानुसार मग इतर दिशा ओळखल्या जात. तसंच आपण किती मजल मारली आहे हे समजण्यासाठीही अशाच गणताची मदत घेतली जात असे. त्यातूनच नॉटिकल माईल म्हणजेच 'नौकायानातला मैल' मैल ही संकल्पना पुढे आली. याचंच संक्षिप्तीकरण होऊन 'नाॅट' हे एकक रूढ झालं आहे. त्यामुळे जहाजांचा वेग हा दर ताशी अमुक इतके नाॅट असा मोजला जातो.जमिनीवरून प्रवास करत असतानाही आपण मैल हे अंतर मोजण्याचे एक एकक पाळतो; पण नॉटिकल माईल आणि आपल्या नेहमीच्या ओळखीचा मैल यांच्यात फरक आहे, कारण त्या एककांची व्याख्याच वेगळी आहे. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे त्या गोलाचे ३६० अंश संभवतात. या वर्तुळापैकी एक मिनिटाची आर्क म्हणजे एक नॉटिकल माईल अशी त्याची व्याख्या केली गेली आहे. म्हणजेच या वर्तुळाच्या एक अंशाच्या एक-साठांश इतक्या भागाचा प्रवास केल्यास एक नॉटिकल माईल अंतर कापलं जातं. तेव्हा संपूर्ण ३६० अंशांचा प्रवास करायचा झाल्यास ६० x ३६० म्हणजेच २१६०० नॉटिकल माईल इतकं अंतर होतं ; पण एक नॉटिकल मैल हा आपल्या जमिनीवरच्या मैलापेक्षा मोठा असल्यामुळे हेच अंतर २४८५७ मैल किंवा ४०००३ किलोमीटर इतकं भरतं.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातुन* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जगात दुसऱ्याला हसणे सोपे पण, दुसऱ्यासाठी रडणे फार कठीण.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनाबद्दल भारताने कोणत्या दिवशी राष्ट्रीय दुखवटा पाळला ?२) जगात व्हाट्सअप्पचा सर्वाधिक वापर कोणत्या देशात होतो ?३) वर्ण म्हणजे काय ?४) नाशिक येथे उदोजी वसतिगृह कोणी सुरू केले ?५) मुस्लीम लीगचे प्रथम अध्यक्ष कोण होते ?*उत्तरे :-* १) ९ जुलै २०२२ २) भारत ३) मूलध्वनी जो आपल्या मुखातून निघतो त्याला वर्ण म्हणतात. ४) छत्रपती शाहू महाराज ५) आगाखान*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● शिवाजी सूर्यवंशी● अनुपमा अजय मुंजे● प्रभुनाथ देशमुख● प्रमोद मंगनाळे● संतोष चव्हाण● नरेश गोट्टम● साईकिरण अवधूतवार● प्रकाश नाईक● स्वप्नील शिंदे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*गाण्याचा रियाज करावा तसा दु:खाचा रियाज करता येईल का? गाण्याच्या रियाजाने गायकांस त्याचा आवाज टिकवून धरता येतो. आवाजाची धार शाबूत राहते. त्याचं गाणं दिवसेंदिवस खुलत जातं. दु:खाच्या रियाजाने असं काही होईल का? दु:ख जर आणखीनच टोकदार होणार असेल तर दु:खाचा रियाज करायला कुणी धजणार नाही. कुणाला हवं आहे दु:खं ! नकोच आहे दु:खं. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून पृथ्वीभर जेवढे काही देव आहे, त्यांना साकडे घालून होते. खुद्द देवालाच दु:खाच्या संदर्भात जाब विचारणा-या माणसाची कथा आपण ऐकलीच आहे.**माणूस देवाला म्हणतो की, 'देवा तू सुखात माझ्याबरोबर असतो. कारण तेंव्हा दोन माझी अन् दोन तुझी पावलं उमटलेली असतात. मात्र दु:खात तू माझ्यासोबत नसतोस, कारण तेंव्हा माझी एकट्याचीच पावलं उमटलेली असतात !' तेंव्हा देव त्यास म्हणतो,'अरे दु:खातही मी तुझ्याबरोबरच होतो! ज्या दोन पावलांची गोष्ट तू करतो आहेस, ती पावलं तुझी नसून माझीच आहे. मी तुला कडेवर उचलून घेतलं होतं.' तरी माणूस मान्य करणार नाही. हीच माणसाची मोठी समस्या आहे. माणूस दु:खाचा बाऊ फार करतो. दु:खाची सवय करून घ्यायची ..ही गोष्ट फार लांब राहिली. सुख पाहता जवापाडे । दु:ख पर्वताएवढे ॥ तुकाराम महाराजांनी सुखाचे आणि दु:खाचे माप आपल्यासमोर ठेवले आहे. सुख जवसाच्या 'बी' इतके लहान, तर दु:ख पर्वताएवढे विशाल आहे. जवसाच्या बी इतक्या छोट्या असलेल्या सुखाचे व्यवस्थापण आपण करीत असतो. मात्र, पर्वताएवढ्या दु:खाचे व्यवस्थापण आपण बिलकुलही करीत नाही. म्हणून ते कमी व्हायच्या ऐवजी वाढत जाते..इतके की जवसा एवढ्या सुखाचाही तेच चट्टामट्टा करून टाकते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नागिन के तो दोये फन,नारी के फन बीसजाका डसा ना फिर जीये, मरि है बिसबा बीस।सारांश महात्मा कबीर व्यभिचारी व दुराचारी स्त्री-लंपटाना वरील दोह्यातून सचेत करतात. सापिनीला तर केवळ दोनच दात असतात. तिचा दंश झाला तर वैद्याकडून विष उतरवून टाकता येईल. परंतु स्त्रिला वीस दात असतात. तिचा दंश ज्याला झाला त्यातला कोणीही जीवित सुरक्षित राहू शकत नाही. तिचा दंश जर वीस लोकांना झाला तर वीसचे वीस मरून जातील. काम भावना सीमित असली पाहिजे. तिचं संतुलन राखता आलं पाहिजे. काम भावनेचं संतुलन बिघडलं की ती माणसाच्या आवाक्यात राहात नाही. ती त्याला मन मानेल तशी नाचवते. परिणाम स्वरूप माणूस अधःपतित होतो. लोक लज्जेचा , हेटाळणीचा विषय होतो. मग ती ईश्वरांची रूप मानलेली पात्र असोत की सामान्य जण साबुत राहात नाहीत. शंकर , इंद्र, चंद्र, रावणाचे चारित्र्य या माया मोहिणीने डागाळून टाकले. तिथं सामान्यांची काय बात घेऊन बसला आहात. यावर चांगदेवांच्या पुढील ओळी फारच बोलक्या आहेत.वासनेच्या मागे नको धावू मनापहा त्या रावणा काय झालेचंद्रा पडली भगे इंद्र झाला काळानारद चुकला चाळा भजनाचा अगदी अलीकडे समाजानं ज्यांना डोक्यावर घेतलं होतं अशा संत म्हणवून घेणार्‍यांनी स्व-संतुलन हरवून वासनेच्या आहारी जावून आज ते गजाआड दुर्दशेचे भोग भोगत आहेत. भल्या भल्यांची मायेनं अशी वासलात लावून टाकलीय. मात्र ज्यांनी स्वतः वरील नियंत्रण ढळू दिलं नाही. अशी पात्रंही कमी नाहीत की जी अनुकरणास पात्र ठरलीत. शुक, भीष्म हे निश्चयाचे महामेरूच होते. जगद्गुरू तुकोबारायही माया मोहात गुरफटलेल्या जीवांना पाहून हताश होवून म्हणतात बुडती हे जण न देखवे डोळा ।येतो कळवळा म्हणोनिया । तेव्हा माणसानं आपण अवहेलनेचे धनी होणार नाहीत . याची जाणीव ठेवून वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. तुकोबांनी सांगितलेलं 'पराविया नारी माऊली समान...' हे सुत्र कायम जपलं जपायला हवं. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्याप्रमाणे विद्यार्थीजीवनात विद्यार्थी मन लावून जिद्दीने आणि अभ्यासात सातत्य ठेवून परीक्षेत यश मिळवतो.त्याचप्रमाणे माणसाने जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगावर विजय मिळवायचा असेल तर आपल्या मनाची तयारी,त्यासाठी लागणारी मनातून जिद्द आणि यश मिळेपर्यंत सातत्य ठेवायला हवे.समजा पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी झाले तर तिथेच माघार न घेता आपण त्यात कुठे कमी पडलो याचा शोध घेऊन त्यात सुधारणा करण्याची तयारी करावी आणि आपले मन खचू न देता तेवढ्याच जोमाने तोंड देण्यासाठी सज्ज रहावे मग तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. मग तुमच्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असला तरी तुम्ही माघार घेणार नाहीत.©व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सकारात्मकता* एके दिवशी एक बैल विहिरीत पडला. बैल जोराने ओरडत होता. आणि मालक विचार करत होता, याला बाहेर कसे काढायचे .त्याने विचार केला बाहेर काढणे अवघड आहे. नाहीतरी बैल म्हातारा आहे. त्याला वाचवून काही फायदा नाही, त्यापेक्षा त्याला विहिरीतच पूरून टाकू. मालकांने आजूबाजूच्या लोकांना मदतीला बोलावले. सगळेजण विहिरीत माती लोटत होते. बैल आणखीनच हंबरू लागला. थोडा शांत झाला. थोड्यावेळाने मालकांनी विहिरीत डोकावले, पाहतो तो काय बैलाच्या पाठीवर जशी माती पडत होती तसतसा ती माती झटकून तो मातीतून पाय काढून उभा राहत होता शेवटी विहीर बुजली. बैल विहिरीच्या बाहेर आला व वाट दिसेल तिकडे पळू लागला . तात्पर्य : तुमच्या आयुष्यात अनेकदा तुमच्यावर माती फेकली जाईल, वेगवेगळ्या प्रकारची घाण तुमच्यावर फेकली जाईल, पुढे जाण्यापासून तुम्हाला रोखले जाईल ,तुमच्यावर टीका होईल, तुमचे यश पाहून मत्सराने वाईट बोलतील ,अशावेळी खचून जायचे नाही. निराशेच्या विहिरीत पडून राहायचे नाही. धाडसाने अंगावरील घाण झटकून योग्य तो धडा घेऊन त्याचीच शिडी करून पुढे जायचे.त्यासाठी सकारात्मक विचार करा. सकारात्मक जगा.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment