*मावळतीचा दिस* मावळतीचा दिस आजही नेहमीप्रमाणेच भेटला शांत रुप त्याचे समाधानी हसला मावळतीचा दिस आजही भेटला............. स्तब्ध होती सृष्टी सारी गगनी घाले पक्षी भरारी क्षितीजाला टेकणारी सूर्यकिरणे होती अंबरी मावळतीचा दिस आजही भेटला.......... आतुरतेने बळीराजा पावसाची वाट बघण्यात आयुष्यातील अंतःसमयी जगण्यात,अनाथ अपंग, वृद्धांचे दुःखही जाणण्यास मावळतीचा दिस आजही भेटला...... हरवलेल्या निळाईत ओथंबलेल्या नजरेत स्थिरावलेल्या नयनात तेजाच्या वलयात मावळतीचा दिस आजही भेटला........... सृष्टीचा वात्सलेत वृक्षाच्या पर्णात पावसाच्या थेंबात धरतीचा सुगंधात मावळतीचा दिस आजही भेटला............ 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे) नांदेड.

No comments:

Post a Comment